चांगले आणि खातरजमा केलेले उपयुक्त फॉर्वर्डस

Submitted by atuldpatil on 22 June, 2018 - 02:31

मायबोलीवर भोंदू फॉर्वर्डस असा एक धागा आहेच. त्याच धर्तीवर, पण हा उपयुक्त असणाऱ्या फॉर्वर्डस साठीचा धागा.

सोशल मीडियामध्ये खोटे व दिशाभूल करणारे मेसेजेस जसे असतात तसेच अनेकदा आपल्याला उपयुक्त माहिती असणारे मेसेजेस पण वाचावयास मिळतात. खातरजमा करून ते मेसेज इथे शेअर केल्यास इतरांना त्याचा उपयोग होऊ शकतो. पण ते खातरजमा केलेले असावेत. त्यासाठी आधी आपण स्वत:हून खात्री करून संबंधित बातमीची अथवा विकिपीडियावरची अथवा तत्सम विश्वासू संकेतस्थळची लिंक द्यावी हि विनंती.

पण कृपया चांगल्या वा उपयुक्त माहिती व्यतिरिक्त अन्य Meme टाईपचे मेसेजेस (राजकीय अजेंडे, जाहिराती, विनोद, तत्त्वज्ञान, शुभेच्छा, ललित, परीक्षण, समीक्षण, आर्टवर्क इत्यादी इत्यादी) कृपया नकोत.

चांगली तसेच उपयुक्त माहिती केवळ आपल्यापाशीच का ठेवायची? Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> मी दिलेले फॉर्वर्डस उपयुक्त नसतील तर क्षमस्व ! पुन्हा नाही टाकणार.

मला वाटते गणिताच्या ट्रिक्स उपयुक्त आहेत, तसेच पुण्यातल्या बस रूट चे नंबर्स पण कदाचित कुणाला उपयोग होऊ शकेल. मी काय एकादशी करत नाही त्यामुळे निर्जला एकादशी विषयी माहित नाही.

थंड ऐवजी कोमट/गरम पिल्याने होणारे फायदे मी स्वत: अनुभवलेत. तेंव्हापासून मी ते सर्वाना सुचवतो.>>>>>> काय फायदे झाले?

गरम पाणी पिण्याबद्दल त्या भोंदू फॉर्वर्ड्स धाग्यावर माहिती डकवली आहे.
बाकी दुधीभोपळ्यापासून करियर गायडन्सपर्यंत सगळं ग्यान एका धाग्यावर जमा केलेलं वेमांना आवडणार नाही हो.

आणि ज्यांनी तुमच्या धाग्याला भरभरून प्रतिसाद दिलाय असं तुम्हाला वाटतंय, त्यांनी निरागसपणाचा आव आणून या धाग्याची एक प्रकारे टर उडवलीय, हेही तुम्हांला कळलेलं दिसत नाही. त्यांच्या वावरावरून त्या जे लिहितात, ते त्यांना म्हणायचं नसतं, हे मला कधीचंच कळलंय.

यातली माहिती खरी ,विश्वासार्ह आहे की नाही, हा भाग वेगळा. पण आजकाल बहुतेक कोणत्याही प्रकारची माहिती आठदहा कीस्ट्रोक्सच्या अंतरावर असताना, असे फॉर्वर्ड खरंच उपयोगाचे आहेत का? म्हणजे कधीतरी वाचलेलं , माहीत झालेलं ठीक आहे. पण असे किती फॉर्वर्ड्स आपण साठवून ठेवू शकू? आंणि योग्य वेळी ते शोधून त्यांचा उपयोग होणार?

>> थंड ऐवजी कोमट/गरम पिल्याने होणारे फायदे मी स्वत: अनुभवलेत. तेंव्हापासून मी ते सर्वाना सुचवतो.>>>>>> काय फायदे झाले?

१. मुख्य फायदा म्हणजे अॅसिडीटी पासून मुक्ती. अॅसिडीटीचा त्रास खूप होत होता. गरम पाणी प्यायला लागल्यापासून एकदम बंद. पण हे गरम म्हणजे अगदीच कोमट नव्हे किंवा अगदीच फुंकून प्यावे लागेल इतकेही कढत नव्हे. Right temperature is the key. साधारण शेक बसेल इतके. अॅसिडीटी, करपे ढेकर ताबडतोब थांबतात (निदान माझ्या बाबत तरी हा अॅसिडीटीवर रामबाण उपाय ठरला आहे)

२. सकाळी पोट साफ होत नसेल तर अर्धा पाउण लिटर गरम पाणी प्यायचे. त्वरित परिणाम Happy

३. जेवणानंतर काही वेळाने गरम पाणी प्यायल्यावर अन्न पचन होण्यास खूपच मदत होते हे सुद्धा मी अनुभवले आहे.

४. नेहमीचे गार पाणी पीत असतानाचा दिवस आणि गरम पाणी पीत असतानाचा दिवस, या दोन्हीत मला खूप फरक जाणवला आहे. गरम पाणी प्यायची सवय असेल तर दिवसभर अतिशय हलके आणि उत्साही वाटत राहते.

हे फायदे विशेषतः थंडी आणि पावसाळ्यात जास्त जाणवलेत मला. उन्हाळ्यात मात्र याची गरज वाटत नाही. नेहमीचेच पाणी (room temperature) बरे वाटते.

>> गरम पाणी पिण्याबद्दल त्या भोंदू फॉर्वर्ड्स धाग्यावर माहिती डकवली आहे.
वाचतो.

>> या धाग्याची एक प्रकारे टर उडवलीय
असेल.

>बाकी दुधीभोपळ्यापासून करियर गायडन्सपर्यंत सगळं ग्यान एका धाग्यावर जमा केलेलं वेमांना आवडणार नाही हो.
धन्यवाद भरत. हेच लिहायला इथे आलो होतो. मायबोलीवर अनेक विषयांचे ग्रूप आहेत. त्या त्या गूपमधे त्या त्या विषयावर लिहा म्हणजे त्या विषयात रस असणार्‍या वाचकांपर्यंत पोहोचाल.

मायबोलीवर अनेक विषयांचे ग्रूप आहेत. त्या त्या गूपमधे त्या त्या विषयावर लिहा म्हणजे त्या विषयात रस असणार्‍या वाचकांपर्यंत पोहोचाल. >>> नोंद घेतली आहे. जस जसे ग्रुप्स माहीत होत जातील तस तसे तिथे शेअर करीन.

भरत, सिंबा आणि आरारा या टोळीसाठी कोण कुणाचा ड्युआय आहे, कुणाच्या प्रोफाईलला कुठले चित्र लावले आहे असे प्रतिसाद देण्यासाठी एखादा ग्रुप आहे का ? कारण पाच सहा धागे यांच्या अशा प्रतिसादांनी भरून गेले आहेत. इग्नोर करा, विनंती करा काहीच फायदा होताना दिसत नाहीये. अशा एखाद्या ग्रुप मधे यांचे प्रतिसाद असतील तर इग्नोर करायला सोपे जाईल.

जिथे माझे प्रतिसाद असतात तिथेच भरत हे चुकीचे कसे आहेत हे दाखवण्यासाठी उगवतात. इथेही त्यांची कळकळ होती असे मला वाटत नाही. सिंबा यांनी मी आल्यापासून माझ्यावर वैयक्तिक प्रतिसादांची सुरूवात केली आहे. किमान पाच धागे सहज दाखवता येतील. मी त्यांना काहीही उत्तर दिले नाही तरी ते थांबायचे नाव घेत नाहीयेत. इथेही त्यांचा कांगावा थांबत नाही असे दिसतेय. हे शेवटचे. सिंहगडावर दारूबंदीच्या एकाच धाग्यावर सिंबा यांचे मला उद्देशून असलेले वैयक्तिक प्रतिसाद किमान ५० च्या पुढे आहेत. तसेच कुठलाही पुरावा नसताना मुक्त पणे आरोप केलेले पोस्ट्स दीडशे ते दोनशे भरतील.

या पार्श्वभूमीवर गळे काढणे म्हणजे काय ते मला समज्ले नाही. हा शेवटचा प्रतिसाद.

मधुर, माझा पण हा शेवटचा प्रतिसाद,
तुम्ही वर मेन्शन केलेल्या प्रत्येक धाग्यांवर जाऊन पाहिलेत तर सुरवात नक्की कोणी केली ते लगेच दिसेल.
नंतर चिप पब्लिसिटी मिळवण्यासाठी दुसरा id घेऊन जी काही घाण केलीत ती अवर्णनीय होती.
या धाग्यावर मी अक्षर सुद्धा लिहिलेले नसताना आणि भरत यांनी कन्स्टरक्तीव सूचना दिलेल्या असताना ,उगाच आमचा उद्धार का करत आहात?
तुम्हाला धाग्याशी संबंधित बोलायचे नसेल तर गप्प राहणे हा उपाय आहे हे माहीत नाही का?

या धाग्यावर सुद्धा "व्हेरिफाय केलेले " असे स्पष्ट लिहिलेले असताना तुम्ही कोणते फॉरवर्ड टाकले आहेत ते एकदा बघा,

कल्चरल शॉक धाग्यांवर कीटक पळवून लावणाऱ्या व्हिडीओ ची लिंक टाकलीत , कशासाठी?

अजूनही 3 4 ठिकाणी असाच अचरटपणा केला आहात,

चुकून झाले असे दाखवून एखादे अक्षर चुकवून भलताच शब्द तयार करायचा ही सुद्धा खास तुमचीच ट्रिक,

तुम्ही वाट्टेल तसे वागणार, आणि कोणी त्या बद्दल तुमची मजा केली, किंवा स्पष्ट शब्दात असे करू नका म्हणून सांगितले की मला टार्गेट करत आहेत म्हणून गळा काढणार??

तुमचा काय तो निर्णय करायला वेमा समर्थ आहेत, पण जिकडे तिकडे गळे काढून तुम्ही काहीच आचिव करत नाही आहात

सिंबा मी स्क्रीनशॉट्स देऊ का ?
मी कुणाचा आयडी आहे याची सुरूवात तुम्ही तिघांनी केलेली आहे. प्रत्येक वेळी कुणाचा आयडी आहे हे बदलत गेले. सुरूवातीला गंमत म्हणून ठीक होते. पण तो दुसरा आयडी तुम्हीच काढला हे त्या आयडीनेच सांगितल्यावरही तुमचे धादांत खोटे चालूच राहीले आहे. हलकटपणाला पण मर्यादा असते. ती तुम्ही केव्हांच ओलांडलेली आहे. बास आता.
एकच विषय घेऊन प्रत्येक धाग्यावर याचा आयडी आहे का, त्याचा आयडी आहे का हे असले प्रतिसाद द्यायला तुम्हाला लाज सुद्धा वाटत नाही. आणि मी काही चुकीचे वागत असल्यास तक्रारी करा की. तुम्हाला कुणी अधिकार दिले ? थांबवा हे. असह्य झाले आहे.
इथेही तुम्ही पुन्हा तो दुसरा आयडी माझा होता हा आरोप केला आहे. तेव्हां ते सिद्ध करणे ही तुमची जबाबदारी आहे.
सुरूवात तुम्ही केली हे नाकारू नका.

तुम्हाला उत्तर द्यायचे नाही असेच ठरवले होते . कारण तुम्ही पुन्हा ड्युआयडी द्वारे माझ्यावर वैयक्तिक हल्ला करणार आणि त्याला उत्तर दिले तर आयडी जाणार नाही दिले तर गैरसमज पसरत राहणार.

सिंबा नेहमीप्रमाने तुम्ही इथे कांगावा सुरू केल्याने हा स्क्रीनशॉट टाकण्याची पाळी आलेली आहे.

१, हा स्क्रीनशॉट सिंहगडाच्या धाग्याचा आहे. तारीख आणि वेळ पहा. या धाग्यावर अशी काय वागण्यात चूक झाली म्हणून तुम्ही ड्युआयडी असल्याचा आरोप सुरू केला आहे ?

२. चुकीचे वागल्यास सौम्य शब्दात समज देता येते . त्याचा आणि ड्युआयडी असण्याचा संबंध काय ?

३. त्या पानाच्या अलिकडे इतरांनीही आरोप केला आहे. रावपाटील यांनी सुरूवात केली आहे. पण बाकीच्या आयडींनी जेव्हढ्यास तेव्हढेच केले आहे. त्यामुळे ती गंमत म्हणून सोडून दिली आहे. तुम्ही ते इतरांना बोअर होईल अशा पद्धतीने प्रत्येक धाग्यावर तुणतुणे सुरू ठेवलेले आहे. उडवलेल्या धाग्यवर पण मी चतुरांने या आयडीला बोलत आहे , मधुरांबेंनी स्वतःवर ओढवून घेऊ नये असा प्रतिसाद होता. त्या धाग्यावर माझा कुठलाही प्रतिसाद नसताना.

४. समजा माझे चुकले तर तुम्हाला हे असले धंदे करण्याचे अधिकार कुणी बहाल केले आहेत ?

५. इग्नोर केले तरीही तुमचे चालूच राहतेय.

६. माफ करा पण मला सोडा या शब्दात आवाहन केले तरी सलमान खानच्या धाग्यावर तुमचे शंभर प्रतिसाद मला उद्देशून आहेत. हे असे बेछूट आरोप ते ही पुरावा नसताना करण्याचे स्वातंत्र्य तुम्हाला वेबमास्टर यांनी दिले आहे असे तुमचे म्हणणे आहे का ?

७. माझा प्रश्न ड्युआयडींबाबतच्या आरोपांना आहे. त्याला माझे वागणे कसे आहे याचा कांगावा करून समर्थन करू नका. आणि उलट माझ्यावर आरोप लावू नका.

८. कीटक नाशकाचा व्हिडीओ सकाळी ढेकणाच्या धाग्यावर टाकला आहे अशी माझी समजूत होती. मला अजूनपर्यंत त्याबद्दल ठाऊक नव्हते. जर तसे चुकीचे झाले असेल तर निदर्शनास आणून देऊ नये असे मी कधीही म्हटलेले नाही. उलट इथे तुम्ही गप्प बसलात आणि अंगाशी यायला लागले तर कांगाव्यासाठी उपयोग करीत आहात. त्याच वेळी सांगितले असते तर तो व्हिडीओ मी योग्य त्या जागी टाकला असता. कल्चरल शॉक या धाग्यावर ट्रंप ची पूजा करणा-या माणसाचा व्हिडीओ मी टाकला होता. चुकून काही झाले असावे. ती चूक नाही मुद्दामच आहे हा तुमचा आरोप आहे याबद्दल मला काहीच म्हणायचे नाही. तुम्ही हा आरोप करायला मुखत्यार आहात. तो प्रश्न कधीही नव्हत

अ) आतापर्यंत तुम्ही ज्या आयड्यांशी संबंध जोडला आहे त्याचे पुरावे द्यावेत.
ब) मी सुरूवात केली याचे पुरावे तुम्ही द्यावेत. वर स्क्रीनशॉट दिला आहे त्या मागचे हवेत पुरावे
क) माझी न पटणारी मतं हे तुमच्या मते योग्य कारण असेल असे वागण्याचे तर विषय बंद करूयात.

मोबाईलवर येणाऱ्या जाहिरातींच्या कॉल्स / संदेशांपासून मुक्ती मिळवा!!
आजच आपला मोबाईल क्रमांक DND (Do Not Disturb) मध्ये नोंदवा!
त्यासाठी आपल्या मोबाईलवरून START 0 असा मेसेज 1909 या क्रमांकावर पाठवा! (START आणि 0 मध्ये space आहे.)
DND नोंदणी पूर्ण होण्यास ७ दिवसांचा कालावधी लागतो. त्यानंतरही जाहिरातींचे कॉल्स/ संदेश आल्यास 1909 या क्रमांकावर कॉल करून तक्रार नोंदवा!
आपल्या मोबाईलमधील सर्व contacts ना forward करा.

Pages