माय नेम ईज संजू ! एण्ड आय एम नॉट ए टेरेरीस्ट !!

Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अपलोड on 21 June, 2018 - 11:19

मै बेवडा हू.. ठर्की हू.. ड्रग एडीक्ट्स हू.. सब हू..

पर टेरेरीस्ट नही हू !!..

असं संजू बोलतो ..

विश्वास ठेवता ??

ठेवत असाल तर तो येतोय...
संजू .. संजय दत्त.. रणबीरच्या रुपात येतोय ..
एका राजकुमाराचे आयुष्य जगणे ज्याच्या नशिबी होते..
त्याला आयुष्यात काय स्ट्रगल करावा लागला याची संघर्षमय कहाणी घेऊन येतोय..
आपला मुन्नाभाय त्याची ओरीजिनल स्टोरी घेऊन येतोय..
तीनशेपेक्षा जास्त मुलींशी असलेले संबंध अत्यंत प्रामाणिकपणे कबूल करत येतोय..
फक्त त्याला टेरीरीस्ट तेवढे म्हणू नका..

कधी कधी मनात सहज विचार येतो,
आपल्या संजूचे आडनाव दत्त नसून खान असते तर....

पण हा विचार करायची ही वेळ नाही..

आपले आदर्श मेले ह्यांव नी त्यांव या गप्पा मारायची ही वेळ नाही..

आता आपल्या सर्वांचा लाडका बाबा येतोय...

मला विचाराल तर 200 कोटी कुठे गेले नाहीत..
काय बोलता ?

घ्या ट्रेलर बघा ...
रणवीर बोले तो डिट्टो संजू दिसतोय !

https://m.youtube.com/watch?v=1J76wN0TPI4

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रेड चिलीज शिवाय दुसरीकडे वीएफएक्स केले जात नाही का?
>>>>>>

जात असेल.
पण आमीर पर्रफेक्शनिस्ट आहे. त्याला बेस्ट माणूस आणि बेस्ट सर्विसच लागणार.

Whatssp

सालेम सात हॅण्डग्रेनेड्स घेऊन संजय दत्तच्या घरी आला, हे चित्रपटाच्या कथानकातून का लपवले ? – सरकारी अधिवक्ता उज्ज्वल निकम यांचा प्रश्‍न !

देशद्रोह्यांवर चित्रपट काढून त्याचे उदात्तीकरण करणारे आणि पहाणारे हेही देशद्रोहीच होत !
‘संजू’ चित्रपटाचे उदात्तीकरण करणार्‍यांनो, संजय दत्तचे हे ‘वास्तव’ ठाऊक आहे का ?

नाशिक – ‘मला आणि वडिलांना धमकी आल्यानंतर मी स्वसंरक्षणाकरिता एके ५६ रायफल घरात ठेवली होती’, ही आरोपीची गुन्ह्यातील कबुली चित्रपटात दाखवली असून हे वास्तव आहे; परंतु या खटल्याच्या कालावधीत पुढे आलेल्या पुराव्यांनुसार, १२ मार्च १९९३ आधी मुंबई बॉम्बस्फोटातील महत्त्वाचा आरोपी अबू सालेम एका टेम्पोमधून हॅण्डग्रेनेड्स आणि रायफल घेऊन संजय दत्तच्या घरी आला होता, त्यातून त्याने ५ एके ५६ रायफल्स आणि ७ हॅण्डग्रेनेड्स काही दिवस त्याच्या घरात ठेवल्या, हे या चित्रपटात का लपवण्यात आले ? काही दिवसांनंतर एक रायफल संजय दत्तने स्वत:कडे ठेवून बाकीच्या सालेमला परत केल्या, हे का दाखवले नाही ?, असा रोखठोक प्रश्‍न संजय दत्तविरोधातील खटला लढवलेले सरकारी अधिवक्ता उज्ज्वल निकम यांनी केला आहे. प्रत्यक्ष खटल्यातील वस्तुस्थिती आणि चित्रपट यात फरक असल्याने लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होऊ शकतो.

चरित्र चित्रपटात वास्तव गोष्टींचा उल्लेख असणे अपेक्षित असते. गुन्ह्यावर पडदा टाकून सहानुभूती मिळवायची नसते, हे निर्माता, दिग्दर्शकांना समजू नये, हे दुर्दैवी आहे, असेही त्यांनी पुढे म्हटले आहे.

कयूमकडून घेतलेल्या पिस्तुलाचे काय ?
टाडा कायद्यातील तरतुदींनुसार विनापरवाना संहारक शस्त्र ठेवणे हा गुन्हा संजय दत्तने केला होता; परंतु न्यायालयाने या गुन्ह्यात त्यास दोषमुक्त केले आणि अवैध शस्त्रास्त्र कायद्याखाली शिक्षा ठोठावली. त्या वेळी चांगल्या वर्तणुकीच्या बॉण्डवर आपल्याला सोडावे, ही विनंती त्याने केली होती. त्याच्या कबुलीजबाबानुसार, दाऊदचा शार्प शूटर कयूमकडून संजयने विनापरवाना पिस्तूल घेतल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे त्याला बॉण्डवर सोडू नये, असा आक्षेप सरकारी पक्षाने घेतला होता; परंतु कयूमकडून घेतलेल्या या पिस्तूलचा उल्लेखही या चित्रपटात नाही.

पोलीस संरक्षणाचा दावा करण्यामागे उद्देश काय ?
वडील खासदार असल्याने संजयच्या घरी पोलीस संरक्षण होतेच. मग ‘संरक्षणाच्या नावाखाली ‘एके ५६’ बाळगणे हा भाबडेपणाचा बचाव आहे कि त्यामागे दुसरा काही उद्देश होता, हे चित्रपटात दाखवणे आवश्यक होते. बॉम्बस्फोटापूर्वी अशी शस्त्रे आणि हॅण्डग्रेनेड्स घेऊन सालेम आला होता. ही गोष्ट संजयने पोलिसांना कळवली असती, तर निरपराध २५६ लोकांची हत्या टाळता आली असती. याविषयी त्याला आता काय वाटते, हेही चित्रपटात दाखवायला हवे होते.

‘आतंकवादी’ नसल्याचे न्यायालयाचेच तोंडी प्रमाणपत्र !
कोणत्याही खटल्यात न्यायालय दोषी किंवा निर्दोष एवढाच निकाल देते. संजय दत्तच्या खटल्यात मात्र ‘तू दहशतवादी नाहीस’ असे तोंडी प्रमाणपत्र देण्याची घटना इतिहासात पहिल्यांदाच घडली. त्याचा पुरेपूर लाभ चित्रपट निर्मात्याने या चित्रपटात करून घेतला. संजय दत्तच्या घरी आर्डीएक्स ठेवण्यात आले होते, असा आरोप पोलिसांनी कधीही केला नव्हता; परंतु त्याचेही माध्यमांच्या नावाने या चित्रपटात भांडवल करून सहानुभूती प्राप्त करून घेतली आहे.

सहानुभूती मिळवण्यात यशस्वी
मानसशास्त्रातील अभ्यासक सांगतात, की एखादा गुन्हेगार पुराव्याअभावी निर्दोष सुटला किंवा जामिनावर बाहेर आला, तरी तो आपण गुन्हाच केला नसल्याचा आभास जनमानसात निर्माण करून आपल्या प्रती जनतेेची सहानुभूती मिळवण्यात यशस्वी होतो. याच मानसशास्त्राच्या आधारे चित्रपट निर्मात्याने या अभिनेत्याविषयी सामान्य जनमानसात सहानुभूती मिळवून दिली आहे.

Pages