दारू का पिऊ नये?

Submitted by राव पाटील on 18 June, 2018 - 22:43

दुसऱ्या एका अतिशय मनोरंजक आणि माहितीपूर्ण धाग्यावर धुमाकूळ घातलेल्या एका सदस्यासाठी हा धागा अतिशय कंटाळून काढलेला आहे.
तर, ज्या लोकांना दारू प्यायची नाहीये/ दारूचा विरोध करायचा आहे त्यांनी कृपया या धाग्यावर आपले प्रवचन चालवावे. उगाच इतरत्र आपली टिमकी वाजवुन इतर रसिकांच्या रंगाचा बेरंग करू नये!

@वेबमास्तर, हा धागा जर मायबोलीच्या नियमांचा भंग करत असेल, तर कृपया उडवण्यात यावा.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

दारूची - म्हणजे खासकरून व्हिस्की - 'एजिंग' करतात तेव्हा ती लाकडी ड्रम मधे भरलेली असते. त्या लाकडाचा अर्क्/गंध्/चव उतरून ती मुरते. एकदा बाटलीत भरली की ती पुढे मुरत नाही.

मित्रांनो दारू सोडा, दारू आणि सोडा नको!

औत्सुक्य, कुतूहल, जिज्ञासा, ज्ञानलालसा - सदर धाग्यात उल्लेख केलेला तो दुसरा एका अतिशय मनोरंजक आणि माहितीपूर्ण धागा कोणता? कुणी लिंक देईल का?

>>> १४ तारखेला बारमालक संपावर.

हं. ही बातमी महाराष्ट्रातली दिसतेय. तरी तेलंगणाच्या तुलनेत महाराष्ट्रात बार काढणे व चालविणे प्रचंड स्वस्त आहे! कर्नाटकातही मागे त्यांचा संप होणार होता.

Pages