Submitted by राव पाटील on 18 June, 2018 - 22:43
दुसऱ्या एका अतिशय मनोरंजक आणि माहितीपूर्ण धाग्यावर धुमाकूळ घातलेल्या एका सदस्यासाठी हा धागा अतिशय कंटाळून काढलेला आहे.
तर, ज्या लोकांना दारू प्यायची नाहीये/ दारूचा विरोध करायचा आहे त्यांनी कृपया या धाग्यावर आपले प्रवचन चालवावे. उगाच इतरत्र आपली टिमकी वाजवुन इतर रसिकांच्या रंगाचा बेरंग करू नये!
@वेबमास्तर, हा धागा जर मायबोलीच्या नियमांचा भंग करत असेल, तर कृपया उडवण्यात यावा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
प्रमाणात व्यसनं करावीत. अगदी
प्रमाणात व्यसनं करावीत. अगदी बजेटमध्ये परवडत असली तरी प्रमाणातच घ्यावी. सब का भला.
प्रमाणात काहीही करू नये. दारू
प्रमाणात काहीही करू नये. दारू प्रमाणात तर मुळीच पिऊ नये. फुल्ल टल्ली होऊन रस्त्यावर झोपण्यात जी मजा आहे ती दुसरी कशातच नाही. अशा माणसांना अणुबॉम्ब युद्ध जरी झालं तरी पर्वा नसते.
दारू पिणे आपण सुरू करू शकतो
दारू पिणे आपण सुरू करू शकतो.पण आपण दारू पिणे थांबवू शकत नाही.
म्हणून आपल्या क्षमतेवर ज्यांना विश्वास आहे त्यांनीच हा मार्ग पकडावा
प्रमाणात व्यसनं करावीत
प्रमाणात व्यसनं करावीत
व्यसन ह्या शब्दाचा अर्थ च आहे ती सवय नंतर तुमच्या कंट्रोल मध्ये राहत नाहीत.
प्रमाणात व्यसन करणे खूप कमी लोकांना जमते.
काही लोक दारू पिऊन
रस्त्यात पडतात काही आपल्या अलिशान गाडीत पडतात.
पडण्याची जागा फक्त वेगळी असते
काही लोक दारू पिऊन
काही लोक दारू पिऊन
रस्त्यात पडतात काही आपल्या अलिशान गाडीत पडतात.
पडण्याची जागा फक्त वेगळी असते>> आणि काही लोक टुन्न होऊन माबो वर धिंगाणा घालतात.
Yes
Yes
प्रत्येकाने युवावस्थेत
प्रत्येकाने युवावस्थेत आठवड्याला किमान ७० तास अमृतप्राशन केले पाहिजे.
आयडिया वाईट नाही.
आयडिया वाईट नाही.
देश खूप पुढें जाईल
आरोग्य क्षेत्रातील उद्योगांना सोन्याचे दिवस येतील
“युवावस्थेत” - युवावस्था ही
“युवावस्थेत” - युवावस्था ही शारिरीक अवस्था नसून, मानसिक आहे

आरोग्य क्षेत्र नाही
आरोग्य क्षेत्र नाही
कृषि पूरक क्षेत्र... इकडे सोन्याचे दिवस कायमच असतात. मुद्दाम यावे लागत नाही.
काजी पिकवा घाला भट्टी
फणस पिकला चालवा भट्टी
संत्र मोसंबी द्राक्ष काही काही म्हणून वाया नको जायला .... खंडया आहे जोडीला
कसलेही पीक पिक प्रोडक्शन वर झालं म्हणून रस्त्यावर माल फेकायची गरजच नाही.
||जय विजय जय मल्ल्या ||
ज्यांना लिहीता वाचता येतं,
ज्यांना लिहीता वाचता येतं, आणि ज्यांना ते येत नाही त्या सर्वांनाही दारुचे दुष्परिणाम माहीत असतातच, आणि असे असुनही ते जर दारू पिण्याचा पुरस्कार करत असतील तर तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. प्रत्येकाने स्वतःमध्ये सुधारणा घडवावी दुसऱ्याला सुधरवण्याच्या फंदात पडू नये. दारु प्यालेल्या अवस्थेत जर हातून कोणताही गुन्हा घडला हे सिध्द झाले तर त्याची शिक्षा सामान्य अवस्थेत केलेल्या गुन्ह्या पेक्षा कठोर स्वरूपाची असावी. व्यसनामुळे त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या वाट्याला जर दुर्दशेचे दशावतार जरी आले येत असेल तर त्याबद्दल हळहळ, कळकळ तिऱ्हाईताने का दाखवावी? उलट व्यसनी माणसांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना वाऱ्याला सुद्धा उभे करु नये. पिणाऱ्यांना व्यसनामध्ये असणाऱ्या जोखमींची पुर्ण कल्पना असते. शिकल्या सवरलेल्यांना तर नक्कीच असते. उगाच आपण समाजसुधारकाच्या भुमिकेत शिरु नये. आपले हित आपण पहावे.
पीत्वा पीत्वा पुनः पीत्वा,
पीत्वा पीत्वा पुनः पीत्वा, यावत्पतति भूतले ।
उत्थाय च पुनः पीत्वा, पुनर्जन्म न विद्यते ॥
(प्या, आणखी प्या, पुन्हा पुन्हा प्या. पिऊन शुद्ध हरपेस्तोवर प्या. जमिनीवर पडेस्तोवर प्या. शुद्धीवर आलात की उठून पुन्हा प्या. कारण पुनर्जन्म, मोक्ष, कर्मसिद्धांत सारं झूठ आहे.)
भारतीय तत्वज्ञानाच्या मुख्य नऊ शाखांपैकी एक शाखा- ‘चार्वाकदर्शन’ मधील मुख्य सूत्र.
भारतीय तत्वज्ञानाच्या मुख्य
भारतीय तत्वज्ञानाच्या मुख्य नऊ शाखांपैकी एक शाखा- ‘चार्वाकदर्शन’ मधील मुख्य सूत्र.>> विकास दिव्यकिर्ती - भारतीय दर्शन?
सोमरसाचा निर्माता स्वतः चंद्र
सोमरसाचा निर्माता स्वतः चंद्र आहे. आज चंद्रग्रहण आहे आणि कोजागिरी पौर्णिमाही !
आज मनसोक्त सोमरस प्राशन करा. पीयुष तर सेवन कराच करा.
राईट खेळीया. मात्र
राईट खेळीया. मात्र चार्वाकांबद्दलचं ऑब्सेशन जुनंच आहे. काही वर्षांपुर्वी 'दार्वाक उवाच' नावाची दारूला वाहून घेतलेली सिरीजही फेसबुकवर लिहिलेली.
दार्वाक उवाच >>
दार्वाक उवाच >>
'दार्वाक उवाच' >>>
'दार्वाक उवाच' >>>
दारू वाईट आहे हे सामान्य
दारू वाईट आहे हे सामान्य लोकांपेक्षा डॉक्टर लोकांना चांगले माहीत असते.
तरी डॉक्टर लोकांच्या दारू च्या पार्ट्या असतात ( काही अपवाद असतील नाही असे नाही)
यशस्वी झालेले .
उद्योगपती,उच्च पदस्थ सरकारी अधिकारी,उच्च पदस्थ आर्मी ऑफिसर, सत्तेत असलेले नेते, . बॉलिवूड, tolywood, मराठी फिल्म इंडस्ट्री.
सर्व दारू पितात.
कॉर्पोरेट क्षेत्रात ज्या अती बुध्दीमान लोकांच्या वरचेवर ऑफिस पार्ट्या होतात .
त्या मध्ये लिंबू सरबत,आणि कॉल्ड ड्रिंक नसते.
दारू च असते.
फक्त फरक इतकाच असतो ही सर्व श्रीमंत मंडळी असतात त्यांच्या मध्ये दारू पिने असे म्हणत नाहीत ड्रिंक घेणे म्हणतात.
दारू मुळे होणारे दुष्परिणाम वर उपचार करण्याची त्यांची कुवत असते.
दारू मुळे त्यांची आर्थिक दुर्दशा होत नसते कारण इन्कम खूप मोठा असतो.
पण दारू चे दुष्परिणाम ह्या वर जाहिरात द्यायची असेल तर .
गरीब, फाटका फार दुर्दशा झालेला व्यक्ती च दाखवतात
दारू पिल्यामुळे सिस्टीम फ्लश
दारू पिल्यामुळे सिस्टीम फ्लश होते. सिस्टीम फ्लश झाली क हायसे वाटते.
मग नियंत्रित पोस्टी येऊ लागतात. अन्यथा बद्धकोष्ठित पोस्टींचा मारा सुरू राहतो.
पण दारू चे दुष्परिणाम ह्या वर
पण दारू चे दुष्परिणाम ह्या वर जाहिरात द्यायची असेल तर .
गरीब, फाटका फार दुर्दशा झालेला व्यक्ती च दाखवतात>> सर ह्या विषयात पण दांडगा अभ्यास दिसतो आपला.
राज्यातील बियरवरील कर कमी
राज्यातील बियरवरील कर कमी करून बियरची विक्री वाढवता येऊ शकेल का? या विषयी निर्णय करण्यासाठी एक शासकीय कमिटी नेमली आहे.
ह्या विषयात पण दांडगा अभ्यास
ह्या विषयात पण दांडगा अभ्यास दिसतो आपला.
कॉर्पोरेट क्षेत्रातील नेहमी होणाऱ्या पार्ट्या अटेंड केल्या आहेत.
तिथे पिण्यासाठी लिंबू सर्वात नसते.दारू च असते .
आणि उच्च शिक्षित ,उच्च पदस्थ तिचा आस्वाद घेत असतात.
चित्रपट क्षेत्रातील बातम्या तर मीडिया मध्ये येतात.
Five star , विमान प्रवास ह्या मध्ये दारू ची सोय असते .
ती त्यांच्या व्यवसायाची गरज आहे .
म्हणजे उच्च आर्थिक गटात पण दारू वर्ज्य नाही.
आर्मी मध्ये तर सरकार स्वतचं स्वस्तात दारू पुरवते.
हे जनरल knowladge आहे..विरू तुम्हाला पण असायला हवं होते
कौन कंबख्त है ?https://youtu
कौन कंबख्त है ?
https://youtu.be/AlnolKzGiDc?t=28
प्रत्येक व्यक्तिने १ल्या वाढ
प्रत्येक व्यक्तिने १ल्या वाढ दिवशी आणि पुढील प्रत्येक वर्षी किमान १ खंबा भेट घ्यावा व जपून ठेवावा... सज्ञान झाल्यावर ठरवावे प्यायचे की नाही प्यायचे.
प्यायचे ठरवले तर १८ वर्षे जुनी मिळणार ते सुद्धा १८ खंबे.
नाही प्यायचे ठरले तर इतकी जुनी म्हणून तीची मार्केट मधील किंमत येणार त्यात सर्व कॉलेज शिक्षण आरामात भागणार.
दोन्हीकडे फायदाच !! मग आता सांगा ती वाईट का चांगली ?
तर आता काय ठरवलं.
तर आता काय ठरवलं.
सूर्य पूर्वेकडून उगवतो की
सूर्य पूर्वेकडून उगवतो की पश्चिमेकडून?
दोन अधिक दोन चार होतात की पाच?
दारू चांगली की वाईट?
दारू पिणे योग्य की अयोग्य?
दारू नंतर माल फुकावा की नाही?
दारू नंतर माल फुकावा की नाही?
>>प्यायचे ठरवले तर १८ वर्षे
>>प्यायचे ठरवले तर १८ वर्षे जुनी मिळणार ते सुद्धा १८ खंबे.<<
खंबे (बाटल्या) जुन्या होणार, आतली दारु नाहि...
adnyani- Once it’s bottled,
adnyani- Once it’s bottled, it doesn’t continue to age.
दारू पिणे योग्य की अयोग्य?
दारू पिणे योग्य की अयोग्य?
अयोग्य आहे
Pages