झिरो (o) टीजर! काय आवडले आणि काय जास्त आवडले?

Submitted by भन्नाट भास्कर on 16 June, 2018 - 17:49

शाहरूखचा चित्रपट चालो न चालो. पण त्याच्या नवीन चित्रपटाच्या ट्रेलरवर लोकं नेहमीच तुटून पडतात.
ईदच्या मुहुर्तावर त्याने आपल्या आगामी चित्रपट झिरोचा टीजर रीलीज केला आणि चोवीस तासांच्या आत दोन करोडपेक्षा जास्त लोकांनी तो बघायचा विक्रम केला.
जर तुम्ही त्या दोन करोड लोकांमध्ये नसाल तर तुमच्यासाठी खाली लिंक देतो.
टीजर यूट्यूब ट्रेंडींगमध्ये फूटबॉल वर्ल्डकपला दुसर्‍या क्रमांकावर सारत पहिल्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. ही भारतीय चित्रपटप्रेमींसाठी अभिमानाची बाब आहे _/\_

#1 ON TRENDING
Zero | Eid Teaser | Shah Rukh Khan | Salman Khan | Aanand L Rai | 21 Dec 2018
https://www.youtube.com/watch?v=89aTDByJTz4

मला कमी जास्त आवडलेल्या गोष्टी

१) टीजरमधील शाहरूखची एंट्री. बॉलीवूडच्या ईतिहासात आजवर बुटक्यांचा वापर केवळ विनोदनिर्मितीसाठीच केला गेला आहे. पण झिरो मध्ये मेन हिरो खुद्द शाहरूख खान एका बुटक्याची भुमिका करत आहे हे बघूनच थक्क व्हायला होते. त्याच्या या प्रयोगासाठी त्याला त्रिवार हॅटसऑफ !!!

२) टीजर असा असावा की चित्रपटाच्या कथेची पुरेशी कल्पना न देता उत्कंठा वाढवावी. शाहरूखला बुटके बघून हा उद्देश साध्य होतो.

३) टीजरमध्ये जो एक छोटासा म्युजिकचा तुकडा आहे त्यावरून चित्रपटाचे संगीत चांगले असावे असे सध्या तरी वाटते.

४) शाहरूखसोबत यात सलमान दिसतो. दोघांना एकत्र बघणे चाहत्यांसाठी पर्वणी असते. शाहरूखला सलमानसमोर बुटके बघणे अजून मजेशीर वाटते. सलमान जर टीजरपुरता नसून यात पाहुणा कलाकार असेल तर आणखी मजा आहे.

५) बुटक्या व्यक्तींच्या नाचात एक टिपिकल उत्साह एक अतरंगीपणा असतो. शाहरूखने ती बॉडी लॅंगवेज नेमकी पकडल्यासारखे वाटतेय. त्यामुळे पुर्ण चित्रपटभर त्याने काय धमाल केली असेल हे बघायची उत्सुकता आतापासूनच वाढली आहे. कारण शाहरूख म्हणजे सळसळत्या चैतन्याचा झरा आहे ..

६) चित्रपटात शाहरूखसोबत अनुष्का आणि कतरीना कैफ अश्या टॉपच्या दोन लोकप्रिय अभिनेत्री आहेत. पण ते या टीजरमध्ये कुठेही नव्हत्या. त्यामुळे आता पुढच्या ट्रेलरची वाट तितक्याच उत्सुकतेने बघितली जाईल.

७) शाहरूखचा झिरो धो धो चालला तर बुटक्या व्यक्तींना नक्कीच एक ग्लॅमर येईल. कित्येकांना शाहरूख म्हणून हाक मारली जाईल. कित्येकांच्या मनातील न्यूनगंड निघून जाईल. ईन्शाल्लाह असेच व्हावे. टीजरला लोकांनी डोक्यावर उचलून धरले आहेच.

मात्र या सगळ्यात एकच गोष्ट खटकली. चित्रपट डिसेंबरला प्रदर्शित होतोय. आणि टीजर आताच रीलीज करून उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे. त्यामुळे पिक्चर रीलीज व्हायच्या आधी मी मरून तर नाही ना जाणार ही भिती सतावू लागली आहे Sad

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गणेशोत्सवात पडद्यावर दाखवला तर बघीन>>>
>>>

हे काही समजले नाही..
म्हणजे आयुष्यातील तीन तास वेळ खर्च करून शाहरूखचा चित्रपट बघायचा तर आहे.. पण मग अशी काय अडचण आहे जे गणेशोत्सवाच्या मुहुर्ताची वाट बघत आहात?

टिजर पाहिलेला नाही आवडला. इथे हा धागा वाचला म्हणुन पुन्हा एकदा पाहिला. पण नाहीच आवडला. Happy
>>>

टीजर जुना झाला.
ट्रेलर आलाय तो बघा...
थक्क व्हाल !

कथा चांगली असू शकते.
>>>
आमीन अमा !
कथा पटकथेत दहा टक्के जरी दम असला तरी शाहरूख आग लाऊन टाकेन..
कथा पटकथा हा चित्रपटाचा आत्मा असतो. कोणताही कलाकार त्यापेक्षा मोठा नाही.

कथा पटकथेत दहा टक्के जरी दम असला तरी शाहरूख आग लाऊन टाकेन..>>>>>

त्यापेक्षा कमी असला तर शाहरुख करिष्मा फेक?

खरा सुपरस्टार तोच जो 0 टक्केही दम नसलेल्या कथेतही आग लावून टाकायचा. जसा राजेश खन्ना. तो पडद्यावर असणं पुरेसं असायचं. स्टोरी गेली खड्ड्यात.

पाफा Happy Happy

खरा सुपरस्टार तोच जो 0 टक्केही दम नसलेल्या कथेतही आग लावून टाकायचा. जसा राजेश खन्ना. तो पडद्यावर असणं पुरेसं असायचं. स्टोरी गेली खड्ड्यात. >>> सौ टका सच
'बस नाम ही काफी है' अश्यांमधे शाहरुख नाही.

सौ टका सच
'बस नाम ही काफी है' अश्यांमधे शाहरुख नाही.>>
हे फक्त तुमचं मत आहे तुमच्या आवडीनुसार fact नाही

खरा सुपरस्टार तोच जो 0 टक्केही दम नसलेल्या कथेतही आग लावून टाकायचा. जसा राजेश खन्ना. तो पडद्यावर असणं पुरेसं असायचं. स्टोरी गेली खड्ड्यात.
>>तेंव्हा option नव्हते जास्त

तेंव्हा option नव्हते जास्त >>> तेव्हा थिएटर पण नव्हते जास्त आणि तिकीट दर ही कमी असायचे पण तरीही भरपुर गल्ला जमायचा.
आता किती काय काय करावे लागते. चित्रपट हिट करण्यासाठी. Happy

खरा सुपरस्टार तोच जो 0 टक्केही दम नसलेल्या कथेतही आग लावून टाकायचा. जसा राजेश खन्ना. तो पडद्यावर असणं पुरेसं असायचं. स्टोरी गेली खड्ड्यात
>>>>

अश्लील पॉर्न चित्रपटसुद्धा स्टोरीशिवाय चालतात.
तसेच ड दर्जाचे रामसेपट सुद्धा स्टोरी अभिनयाशिवाय चालतात.
तर असतात असे काही चित्रपट जे पिटातले प्रेक्षक चालवतात. पण शाहरूखचा एक दर्जा आहे. त्याचा जो ऑडियन्स आहे तो काहीही खपवून घेत नाही Happy

आता किती काय काय करावे लागते. चित्रपट हिट करण्यासाठी. Happy
>>>>

आजच्या तारखेला शाहरूख हा स्वत: भारतातील सर्वात मोठा ब्रांड आहे.
लोकं आपले प्रॉडक्ट चालवायला शाहरूखनामाचा वापर करतात.

शाहरूखचा एक दर्जा आहे. त्याचा जो ऑडियन्स आहे तो काहीही खपवून घेत नाही.
>>>>>

बंद पडलेलं घड्याळही दिवसातून दोन वेळा बरोबर वेळ दाखवते.
बाकी शाहरुख खान नामक नट - अभिनेता नाही - त्याचा दर्जा वगैरे कोकणातल्या दशावतारी मंडळींइतकाही चांगला नाही.

ऑडियन्स आहे तो काहीही खपवून घेत नाही Happy >> Fan घेतला की खपवुन असो.
त्याने आजपर्यंत ट्राय केलेले Antihero role यामुळे तो मागे पडला. उदा. डॊन, राईस.
as a comedy actor रावण बरा होता.

शाखा... कभी हा कभी ना.. बाझिगर .. डर.. राजु बन गया जंटलमन.. यस बॉस.. या लेव्हल पर्यंत.. गोड्ड होता.. छोटा छान.. डिडिएलजे कुछ कुछ पण ठिक कारण त्यातला त्याचा कुलनेस , श्रिमंत लोकांच राहाणीमान. गुडी गुडी लव्ह स्टोरिज लोकाना आवडायच्या..
त्यानंतर तो आजपर्यंत चाच्पडत आहे.. खुद्द त्याने सध्याच्या एका संवादा मधे म्हंटलं होतं की तो काळ माझ्या करिअर चा छान काळ होता आता लोक मला भरमसाठ सल्ले देतात.. चक दे जैसा मुव्ही करो.. स्वदेस जैसा मुव्ही करो .. पर कुछ ऐसा ऑफर तो आये.. अभी मुझे लगता है बहोत कुछ करना रेह गया है.. डिडिएलजे इज नॉट माय बेस्ट मुव्ही .. आय एम स्टिल फायंडिंग माय्सेल्फ .. असं बरच काही..
लोक स्टार म्हणुन किती दिवस बघतिल ना..
ते ९० चे दिवस थोडे गुलाबी बनवल्या बद्दल मात्र मानलं पाहिजे

ते ९० चे दिवस थोडे गुलाबी बनवल्या बद्दल मात्र मानलं पाहिजे >>>१॒॒११११ extra १००
यानंतरही बरेचसे चांगले म्हणजे RBDJ किंवा oso पर्यंत आवडले होते.

बाकी शाहरुख खान नामक नट - अभिनेता नाही - त्याचा दर्जा वगैरे कोकणातल्या दशावतारी मंडळींइतकाही चांगला नाही.
>>>>

कोकणातल्या दशावतारी मंडळींना उगाच का हिणवायचे? चर्चा शाहरूखपुरती ठेऊया

शाहरूखचा दर्जा -
आज शाहरूख हा भारतातील पहिला आणि जगातील दुसरा श्रीमंत कलाकार आहे.

शाहरूखचा दर्जा -
आज शाहरूख हा जाहीरात क्षेत्रातील सर्वात मोठा आणि महागडा ब्रॅण्ड आहे.
एखाद्याला जाहीराती कश्याच्या जीवावर मिळतात याचे कोणी ईथे एक्सपर्ट विश्लेषण करू शकेल का?
कोणच एक्स्पर्ट नसल्यास ते मी करेन.

शाहरूख नक्किच श्रीमंत आहे, स्टार आहे. पण अभिनेता म्हणून तो फार फार तर अबोव्ह अ‍ॅवरेज आहे माझ्यासाठी.

>>>आज शाहरूख हा जाहीरात क्षेत्रातील सर्वात मोठा आणि महागडा ब्रॅण्ड आहे
याबद्दल शाहरूखला नक्कीच श्रेय द्यायला हवे. त्याने निवडलेल्या मिडीया मॅनेजर्स आणि पीआर हँडलर्सनी उत्तम काम केले आहे. या बाबतीत अजूनही शाहरूख तरूण लोकांना जड जातो. त्याच्या मिडीया टीमविना हे अशक्य आहे.

Forbes ranked highest-paid actors in the world (२०१८):
Chris Hemsworth — $64.5 million.
Jackie Chan — $45.5 million. ...
Will Smith — $42 million. ...
Akshay Kumar — $40.5 million. ...
Adam Sandler — $39.5 million. ...
Salman Khan — $38.5 million. ...
Chris Evans — $34 million

आता यावरुन सलमान सुद्धा उत्तम अभिनेता आहे असे तर नाही ना म्हणू शकत. Happy

>>पण अभिनेता म्हणून तो फार फार तर अबोव्ह अ‍ॅवरेज आहे माझ्यासाठी.<<
माझ्यासाठी अभिनेता म्हणुन तो वेऽ बिलो अ‍ॅवरेज आहे. पण त्याची सांपत्तीक स्थिती पहाता तो एक चांगला बिझनेसमन आहे यात मात्र शंका नाहि. वर ऋन्म्याने म्हटल्याप्रमाणे तो सद्ध्याचा बिग्गेस्ट ब्रँड आहे वगैरे इज ए बिग बीएस; सलमान त्याच्यापेक्षा मोठ्ठा ब्रँड आहे. आता हे ऋन्म्या आणि त्याच्यासारख्या शारुखप्रेमींच्या गळी उतरणार नाहि, बट इट्स ए फॅक्ट.

तेंव्हा हि साध्यंत परिस्थिती पहाता, शारुखच्या इन्कमचा सोर्स काय आहे? माझ्या माहिती नुसार त्याचे हल्लीचे सगळे चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटलेले आहेत. एंडॉर्समेंट म्हणाल तर तिथेहि आता उतरती कळा लागली असेल. त्याचं होम प्रॉडक्शन (रेड चिली?) सिनेमा प्रोड्युस करते पण त्याचा आवाकाहि यशराज/धर्मा प्रॉडक्शन्स एव्हढा नाहि. तर या सगळ्या बाबीं विचारात घेता शारुखचं नेट वर्थ $७५० मिल्यन असणं हि उल्लेखनीय बाब आहे. त्याच्या यशात ऋन्म्यासारख्या फॅन्सचा थोडाफार सहभाग असला तरीहि त्यात त्याच्या बिझनेस अक्युमेनचा सिंहाचा वाटा आहे - हे माझं वैयक्तिक मत...

इन शॉर्ट, शारुखने एक अ‍ॅक्टर म्हणुन त्याच्या करियरची सुरुवात जरी केली असली तरिहि त्याच्या सध्याच्या नेट वर्थ मध्ये त्याचा एक अ‍ॅक्टर म्हणुन वाटा वर्थलेस आहे. अ‍ॅक्टर्सचं नेट वर्थ केवळ त्यांच्या टॅलंटवर जोखलं जात/गेलं असतं, तर दिलिपसाब आणि बच्चनसाब आता मल्टाय-बिल्यनेर असते...

सलमान हा बॉलीवूडचा रजनीकांत आहे. मराठीत जसे दादा कोंडके. हे सारे नक्कीच महान अदाकार आहेत. त्याशिवाय यांच्या नावावर चित्रपट चालत नाहीत. अश्यांचा एक प्रेक्षकवर्ग असतो. त्यांना अश्यांचे चित्रपट भयंकर आवडतात तर ईतरांना ते नुसतेच भयंकर वाटू शकतात. पण शाहरूख अमिताभ दिलीपकुमार अश्या सुपर्रस्टार्ससोबत यांची तुलना करणे योग्य नाही. सारे निकषच वेगळे पडतात. त्यामुळे सलमानला बिगेस्ट ब्रांड बोलणे हे खरेच मजेशीर आहे.

अरे हो, अमिताभ हा त्याच्या काळातील सर्वोत्तम अभिनेता होता का? यावर फार मतांतरे आहेत.

आणि हो, शाहरूखच्या दर्जाला फक्त अभिनयाच्या फूटपट्टीवर मोजू नका. आज तो भारतातील सर्वात मोठा एंटरटेनर आहे. एखद्या फिल्मी फंक्शनमध्ये जिथे बॉलीवूडचे सारे तारे उतरतात तिथेही लाईमलाईट तोच मिळवून जातो. त्याच्याच चेहरयाची आणि दर्शनाची मार्केट वॅल्यू आजही सर्वाधिक आहे. तो आपल्या एक्टींग करीअरच्या शिखरावरून उतरत असताना हे विशेष.

ईथे पुन्हा सचिनशी तुलना करायचा मोह आवरत नाहीये. मागे कोणीतरी कोणालातरी सचिनच्या ब्रांड वॅल्यूबद्दल विचारलेले. तेव्हा धोनी सर्वात मोठा ब्रांड होता. आज कोहली सर्वात मोठा ब्रांड आहे. असे त्या त्या काळातील ब्रांड असतातच. पण सचिन हा निवृत्तीनंतर काही दशके शतके या देशात ब्रांड बनून राहील अश्या लेव्हलला पोहोचला आहे.
शाहरूखही त्या लेव्हलला पोहोचला आहे. सलमानचे दुकान आणखी चार सहा वर्षांनी उठेलही. आणि तेव्हा तो कुठल्या स्पर्धेतही नसेल. शाहरूख हा कालही होता, आजही आहे, उद्याही असेल...

ऋन्मेष एसार्के, स्वप्निल इ. चा फॅन वगैरे काही नाहीये. एवढे कळले नाही का लोक्स तुम्हाला अजून?
ते सचिन ला नावे ठेवणे, शारुक ची स्तुती हा एक अटेन्शन मिळवायचा प्रयत्न आहे. अशी काही स्टेटमेन्टस केली की कोणी ना कोणी अजाण भोले भाले मासे गळाला लागतात. ते वाद घालणार, उलट सुलट पोस्टी टाकणार = टीआरपी ( जो मिळणे हल्ली अवघड झालेले आहे) ! Happy
असो. ही पण एक पोस्ट अ‍ॅड झाली की. यू आर वेलकम ऋन्मेष!

Pages