झिरो (o) टीजर! काय आवडले आणि काय जास्त आवडले?

Submitted by भन्नाट भास्कर on 16 June, 2018 - 17:49

शाहरूखचा चित्रपट चालो न चालो. पण त्याच्या नवीन चित्रपटाच्या ट्रेलरवर लोकं नेहमीच तुटून पडतात.
ईदच्या मुहुर्तावर त्याने आपल्या आगामी चित्रपट झिरोचा टीजर रीलीज केला आणि चोवीस तासांच्या आत दोन करोडपेक्षा जास्त लोकांनी तो बघायचा विक्रम केला.
जर तुम्ही त्या दोन करोड लोकांमध्ये नसाल तर तुमच्यासाठी खाली लिंक देतो.
टीजर यूट्यूब ट्रेंडींगमध्ये फूटबॉल वर्ल्डकपला दुसर्‍या क्रमांकावर सारत पहिल्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. ही भारतीय चित्रपटप्रेमींसाठी अभिमानाची बाब आहे _/\_

#1 ON TRENDING
Zero | Eid Teaser | Shah Rukh Khan | Salman Khan | Aanand L Rai | 21 Dec 2018
https://www.youtube.com/watch?v=89aTDByJTz4

मला कमी जास्त आवडलेल्या गोष्टी

१) टीजरमधील शाहरूखची एंट्री. बॉलीवूडच्या ईतिहासात आजवर बुटक्यांचा वापर केवळ विनोदनिर्मितीसाठीच केला गेला आहे. पण झिरो मध्ये मेन हिरो खुद्द शाहरूख खान एका बुटक्याची भुमिका करत आहे हे बघूनच थक्क व्हायला होते. त्याच्या या प्रयोगासाठी त्याला त्रिवार हॅटसऑफ !!!

२) टीजर असा असावा की चित्रपटाच्या कथेची पुरेशी कल्पना न देता उत्कंठा वाढवावी. शाहरूखला बुटके बघून हा उद्देश साध्य होतो.

३) टीजरमध्ये जो एक छोटासा म्युजिकचा तुकडा आहे त्यावरून चित्रपटाचे संगीत चांगले असावे असे सध्या तरी वाटते.

४) शाहरूखसोबत यात सलमान दिसतो. दोघांना एकत्र बघणे चाहत्यांसाठी पर्वणी असते. शाहरूखला सलमानसमोर बुटके बघणे अजून मजेशीर वाटते. सलमान जर टीजरपुरता नसून यात पाहुणा कलाकार असेल तर आणखी मजा आहे.

५) बुटक्या व्यक्तींच्या नाचात एक टिपिकल उत्साह एक अतरंगीपणा असतो. शाहरूखने ती बॉडी लॅंगवेज नेमकी पकडल्यासारखे वाटतेय. त्यामुळे पुर्ण चित्रपटभर त्याने काय धमाल केली असेल हे बघायची उत्सुकता आतापासूनच वाढली आहे. कारण शाहरूख म्हणजे सळसळत्या चैतन्याचा झरा आहे ..

६) चित्रपटात शाहरूखसोबत अनुष्का आणि कतरीना कैफ अश्या टॉपच्या दोन लोकप्रिय अभिनेत्री आहेत. पण ते या टीजरमध्ये कुठेही नव्हत्या. त्यामुळे आता पुढच्या ट्रेलरची वाट तितक्याच उत्सुकतेने बघितली जाईल.

७) शाहरूखचा झिरो धो धो चालला तर बुटक्या व्यक्तींना नक्कीच एक ग्लॅमर येईल. कित्येकांना शाहरूख म्हणून हाक मारली जाईल. कित्येकांच्या मनातील न्यूनगंड निघून जाईल. ईन्शाल्लाह असेच व्हावे. टीजरला लोकांनी डोक्यावर उचलून धरले आहेच.

मात्र या सगळ्यात एकच गोष्ट खटकली. चित्रपट डिसेंबरला प्रदर्शित होतोय. आणि टीजर आताच रीलीज करून उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे. त्यामुळे पिक्चर रीलीज व्हायच्या आधी मी मरून तर नाही ना जाणार ही भिती सतावू लागली आहे Sad

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भभा आणि मधुरांबे महाशय,
आता खूप बोर झालो तुमचे पुराण ऐकून. आता कृपया दुसर्‍या धाग्यावर मोर्चा वळवा.

झब्बरदस्त
ट्रेलर आला आणि करोडो लोकं त्यावर तुटून पडले ... अवघ्या काही तासांतच

https://www.youtube.com/watch?v=Ru4lEmhHTF4

Zero | Official Trailer | Shah Rukh Khan | Aanand L Rai | Anushka | Katrina | 21 Dec 2018

>>झब्बरदस्त...<<
अरे काय हे, आता विएफएक्सच्या कुबड्या घ्यायची वेळ आली काय? ते हि फॉल्टि दिसतंय - एस्पेशियली त्याला पळताना दाखवलंय ते. पथेटिक!..

शाहरूख कुठेही बुटका वाटत नाही vfx ने फक्त छोटा दिसतोय अन ते एकदम भिकार दिसत आहे .... बुटका शाहरूख साठी झिरो

विएफएक्सच्या कुबड्या
>>>>

बाहुबली आणि प्रभासबद्दल हेच म्हणता येईल या नात्याने...

वीएफएक्स नाही तर काय शाहरूखने व्यायाम करून ऊंची कमी करणे अपेक्षित होते का?

आणि समजा वीएफएक्सने दिलेले ईफेक्ट कोणाला आवडले नाही, तर यात शाहरूखचा काय संबंध? तो काय वीएफएक्स कारागीर आहे का?

मी झबरदस्त म्हटलेय ते शाहरूखच्या अदाकारीला...
आणि ट्रेलरची झलक पाहता पिक्चरमध्ये त्याने कमाल आणि धमाल केली असणार...

सगळ्यात ईंटरेस्टींग तर लास्ट डायलॉग !

शाहरूख त्या रॉकेटमधून चंद्रावर जातो का.... धमाल आहे Happy

वीएफएक्स नाही तर काय शाहरूखने व्यायाम करून ऊंची कमी करणे अपेक्षित होते का?
>>>
चांगले आहेत की VFX, नक्की काय पटत नाहीय?

You ट्यूबवर दिसला म्हणून ट्रेलर पाहिला.

भिकार!!!!! हा शब्द पाहताक्षणी तोंडात आला. माबोवर लिहिलेले वरचे गुणवर्णन मी विसरून गेल्याने शाहरुख यात बुटका आहे हे मी विसरले होते. त्यामुळे सुरवातीला हे असे काय विचित्र दिसतेय असे वाटले. नंतर कळले की त्याला बुटका दाखवायचा प्रयत्न सुरू आहे.

स्पेशल इफेक्टस कुणी केलेत? इतके भयाण??? हल्ली हिंदी चित्रपटात हॉलिवूडच्या तोडीचे स्पे इ केले जातात असे ऐकून आहे. दोन्ही बाहुबली स्पे इ च्या जोरावर उभे होते तरी ते स्पे इ खोटे वाटले नाहीत. मजा आली बघायला.

हिरो गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध उडी मारतो ते गम्मत म्हणून पाहायला ठीक वाटते, सौथी मुवीत चालतंय की... म्हणून सोडून देता येते. थोडा वेळ असते ही गम्मत.

पण चित्रपटभर मुख्य भूमिकेत माणूस स्पे इ ने दिसत राहिला तर तो डोस खूपच मोठा होतो. निदान ते स्पे इ चांगले तरी करायचे. इथे दोन नॉर्मल माणसे उभी आहेत व एक तिसरा माणूस त्यांच्या मध्येच पण खूप दूर आहे व त्यामुळे लहान दिसतो हा फील येतो. अतिशय वाईट स्पे.इ.

(पूर्ण चित्रपट स्पे इ साठी हॉलिवूड मुवि अवतारचे नाव लिहायचा मोह झालेला पण कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे श्यामभट्टाची तट्टाणी... म्हणून मोह टाळला. इंद्राचा ऐरावत = अवतार, शामभटाची तट्टाणी = शाहरुखचा येऊ घातलेला झिरो. हे आधीच स्पष्ट करते, नाहीतर.....)

आणि शाहरुख भयाण की अतिभयाण दिसतो हे मी नक्की ठरवू शकत नाही, बहुतेक अतिभयाणच दिसतो . रंगवलेले केस, खप्पड तोंड, वाळलेले शरीर, चेहऱ्यावर विचित्र भाव... तौबा तौबा. प्रत्यक्षात यापेक्षा थोडा बरा दिसतो. अर्थात मी प्रत्यक्ष पाहून वर्ष झाले. यंदा जिओ 5जी लाँच करायला आला तर परत पाहीन.

आणि समजा वीएफएक्सने दिलेले ईफेक्ट कोणाला आवडले नाही, तर यात शाहरूखचा काय संबंध? तो काय वीएफएक्स कारागीर आहे का?>>>>>

निर्माता आहे तो. चांगले स्पे इ करून घेण्यासाठी पैश्याची थैली मोकळी सोडू शकतो. इतके भिकार काम स्वतःलाच प्रोजेक्ट करायला??

आणि चित्रपट चालतो तो शाहरुखमुळे, त्यात दिग्दर्शक, संगीत, कथा, इतर कलाकार यांचा शून्य सहभाग असतो असे ज्यांना वाटते त्यांनी पिक्चर पडतो तोही शहरुखमुळे हे ऐकून घ्यायची तयारी ठेवावी.

पाफा, मी शाखाबद्दल फक्त बोलतेय Happy
तेही बोलले नसते, पण त्याला लाईव्ह कार्यक्रमात पाहिल्यावर हा माणूस बुद्धिमान आहे, अभिनयाची जाण आहे, हजरजबाबी आहे असे वाटले. तरुण वयात पैश्यांसाठी केलीत वाट्टेल ती कामे केलीत. निदान आतातरी वेगळे प्रयोग करा.

तिकडे आयुष्यमान, वरूण, विकी कौशल सारखे तरुण अजून नीटपणे इस्ताब्लिश न अभिनेते वेगवेगळे प्रयोग करायच्या संधी सोडत नाहीयेत. इथे स्वतःचे प्रोडक्शन हाऊस असतानाही तेच ते घिसेपिटे काम करत राहावे? शाहरुख करू शकतो, जर इच्छा असेल तरच.

म्हणून लिहिले. नाहीतर धागाकर्ता पाहून धागा न उघडायचे प्रसंग हल्ली जास्त येत आहेत माबोवर. जालावर इतरत्र जास्त चांगले कंटेंट मिळतेय. माबोवर प्रेम आहे म्हणून मुद्दाम सांगावेसे वाटते.

साधना मी फक्त तुम्हाला उद्देशून नव्हते लिहीले. तसे वाटले असल्यास क्षमस्व.
एकंदरीतच धागा वर आल्यावर (काढल्यावर) सिनेमा बद्दल नकारात्मक प्रतीसाद जास्ती जाणवले. अन शाखा ही तर "त्या" ची दुखरी नस आहे. (डंबलडोर ने सांगितले आहे त्याचे नाव घ्यायचे नाही Rofl )

@साधना
Perfect मांडलाय.

किती तेच तेच आणि तेच.
मला ओम शांती ओम च ट्रेलर लागलं अस वाटलं.

कथा चांगली असू शकते. अनुष्का म्हणजे स्टीफ न हॉकिंग सारखी व्यक्तिरेखा आहे का?

शारूक चे वडील काम कर णारा नट ५१ वयाचा आहे व खुद्द माणूस ५३ वयाचा !!! हे लिहायला आले. आणि अगदीच काहीतरी दिसतो आहे जसा आहे तसाच दिसणार. ऑर्डिनरी.

पण त्याला लाईव्ह कार्यक्रमात पाहिल्यावर हा माणूस बुद्धिमान आहे, अभिनयाची जाण आहे, हजरजबाबी आहे असे वाटले.
>>>

एकदा लहानपणी काकांसोबत वानखेडेला क्रिकेटचा सामना बघायला गेलो होतो... सचिनला लाईव्ह खेळताना पाहिलेले. चांगला खेळतो असे वाटलेले Happy

निर्माता आहे तो. चांगले स्पे इ करून घेण्यासाठी पैश्याची थैली मोकळी सोडू शकतो.
>>>>>

कला पैश्यात मोजता तर...
ओतला पैसा बनली छान कलाकृती Happy

आणि चित्रपट चालतो तो शाहरुखमुळे, त्यात दिग्दर्शक, संगीत, कथा, इतर कलाकार यांचा शून्य सहभाग असतो असे ज्यांना वाटते त्यांनी पिक्चर पडतो तोही शहरुखमुळे हे ऐकून घ्यायची तयारी ठेवावी.
>>>>

असं जर खरेच कोणी समजत असेल तर तो एक भाबडेपणा झाला..
क्रिकेट असो वा चित्रपट.. दोघांमध्ये टीमवर्क गरजेचे..
जसे सचिन हा क्रिकेटचा देव आहे तसे शाहरूख हा बॉलीवूडचा देव आहे.
पण सचिन फक्त एका साईडने फलंदाजी करू शकतो. बाकीची दुसरया एण्डने फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण ईत्यादी कामे बाकीच्यांना करावी लागतातच..
शाहरूख एका बाजूने आपला अभिनय करू शकतो.. कथा पटकथा संवाद संगीत दिग्दर्शन कलादिग्दर्शन ... अरे चित्रपटाला तर ईतर कित्येक पैलू असतात..

आणि म्हणूनच सचिनने शतक मारलेला सामनाही आपण हरतो तसे शाहरूखने छान काम केलेला चित्रपटही डब्यात जाऊ शकतो.

पण यावरून कोणी सचिन वा शाहरूखवर टिका करत असेल तर ते ज्याचे त्याचे वैयक्तिक मत समजावे. ते बदलायला जाऊ नये Happy

कारण ईतरांनी साथ दिली तर हे दोघे काय करू शकतात हे जगाने पाहिले आहे ..

तरुण वयात पैश्यांसाठी केलीत वाट्टेल ती कामे केलीत.
>>>>

कोणी म्हटले मी वाट्टेल ते काम करायला तयार आहे म्हणून कोणी कोणालाही वाट्टेल तितका पैसा देत नाही..
ईतकंही सोपे नसते पैसा कमावणे..
शाहरूख आज भारतातील सर्वात श्रीमंत आणि जगातील दुसरया क्रमांकाचा श्रीमंत कलाकार आहे.. कोणीही वाट्टेल ते करून त्याची जागा घेऊ शकत नाही. मी त्याचा चाहताच नाही तर मला आदर आहे त्याच्याबद्दल ..
रिस्पेक्ट _/\_

शारूक चे वडील काम कर णारा नट ५१ वयाचा आहे व खुद्द माणूस ५३ वयाचा !!! हे लिहायला आले. आणि .....
>>>>>

ग्रेट !!
खरे तर तीनही खान ग्रेट आहेत जे या वयात हिरोच्या भुमिका करतात...

गंमत बघा.. ईथेही पुन्हा सचिनच आठवतो.. सोळाव्या वर्षी आला आणि चाळीसाव्या वर्षापर्यंत खेळला Happy

गणेशोत्सवात पडद्यावर दाखवला तर बघीन >>> +१

टिजर पाहिलेला नाही आवडला. इथे हा धागा वाचला म्हणुन पुन्हा एकदा पाहिला. पण नाहीच आवडला. Happy चित्रपट चालेलही कदाचित पण पाहणारे सगळे त्याचे नेहमीचे फॅन्सच असतील. यात जी सल्लुमियांची एंट्री आहे ती पण निरुपयोगी वाटते. उबग आल्यासारखे वाटते. म्हणजे प्रत्येक चित्रपटात उगाच अतिक्रमण करायच. मग तो दुसर्याचा असो वा स्वत्:चा Happy उरतो प्रश्न व्हिएफएक्स चा तर हा vfx कारागिर बेसिक नॊलेज असल्यासारखा वाटतो. अगदिच सुमार दर्जा आहे.

ग्रेट !!
खरे तर तीनही खान ग्रेट आहेत जे या वयात हिरोच्या भुमिका करतात+111

शाहरूख आज भारतातील सर्वात श्रीमंत आणि जगातील दुसरया क्रमांकाचा श्रीमंत कलाकार आहे.. कोणीही वाट्टेल ते करून त्याची जागा घेऊ शकत नाही. मी त्याचा चाहताच नाही तर मला आदर आहे त्याच्याबद्दल ..
रिस्पेक्ट _/\_
+111111111111111111111

Pages