संधी (शतशब्दकथा)

Submitted by अंबज्ञ on 16 June, 2018 - 11:54

आज घरी कोणीच नसणार. ह्या एकटेपणाचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी त्याने सर्वांच्या नजरा चुकवत हळूच तिला संध्याकाळी घरी आणली. दरवाजाच्या सर्व कड्या नीट लागल्या आहेत ह्याची पुनः एकवार खात्री केली. आल्याआल्याच उतावीळपणाने त्याने तिला आपल्या दोन्ही हातात धरले. ते सौंदर्य अन् माधुर्य चाखण्यासाठी त्याचे हात शिवशिवत होते. तिच्या सर्वांगावरून त्याची अधाशी नजर फिरत राहिली. तिला जवळ ओढुन् घेत त्याने स्वर्गीय सुख देणारा गंध आपल्या श्वासात भरभरुन घेतला. त्याच्या अधिरतेने आता परमोच्च क्षण गाठलेला. पुढल्याच क्षणी
तिचा मऊ लुसलूशीत देह त्याने उघडा केला. तो तिच्यावर तुटून पडणार इतक्यात डोअरबेल वाजली. अचानक मम्मी पप्पा आल्याने चिंटूने डेरीमिल्क न खाताच घाबरून खिड़कीबाहेर फेकून दिली.

― अंबज्ञ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मऊ लुसलूशीत देह = बियर कसं ?
ते फक्त कैडबरी रैपर्स उलगडून होवू शकते Happy पेरेंट्स समोर खाताना लहान मुलाना ओरडा पडण्याची धाकधुक म्हणून डेरिमिल्क फक्त माझ्या मनात होती.

प्रतिसादाबद्दल धन्स च्रप्स आणि कटप्पा Happy

मला निरोध वाटला.
बरेचदा पौंगडावस्थेतील मुले असे करतात.

बापरे भ भा Lol
ऐसा भी करते क्या लोगा
__________

प्रतिसादाकरिता धन्स शाली आणि भन्नाट भास्कर Happy

मला निरोध वाटला.
बरेचदा पौंगडावस्थेतील मुले असे करतात.
नवीन Submitted by भन्नाट भास्कर on 19 June, 2018 - 09:53
>>>>
नवीन धागा काढू नका.