द्रौपदी (शतशब्दकथा)

Submitted by स्वप्ना_राज on 16 June, 2018 - 04:21

‘लेट गो ऑफ मी. हेल्प'

स्त्रीचा आवाज ऐकताच तो गर्रकन वळला. गल्लीच्या दुसर्या टोकाशी एक स्त्री दोन पुरुषांशी झटापट करत होती. तिथे पोचायला त्याला वेळ नाही लागला. त्याने एकाचं मनगट धरलं. त्या मवाल्याने त्याच्यावर पिस्तुल रोखलं. पण त्याच्या नजरेतला विखार जेव्हा जाणवला तेव्हा ते दोघेही अंधारात पसार झाले.

‘तुमचे आभार कसे मानू?'

त्याची नजर आपोआप खाली झुकली.

‘तुम्हाला कुठे जायचंय?’ आपलाच आवाज त्याला अपरिचित वाटला. आजकाल बोलायची सवय राहिली नव्हती.

‘समतानगरला. मी जाईन. नका तसदी घेऊ'.

‘चला सोडतो'

ती स्त्री वळली.

‘एकदा चूक केली. आता द्रौपदीला नाही बळी जाऊ देणार.’ कपाळावरच्या ओल्या जखमेवरची पट्टी घट्ट करत त्याने स्वत:ला पुन्हा बजावलं.
----

डिस्क्लेमर - स्त्री अबला आहे वगैरे सुचवायचा अजिबात हेतू नाही. एक कथा म्हणून वाचावी ही विनंती.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान..

मस्त जमली आहे.
अश्वत्थाम्याचा ट्विस्ट आवडला! >> +१