दोघांनी ठरवल्याप्रमाणं घनदाट येड्याबाभळी पसरलेल्या पांदीत आलो होतो. हवा असलेला एकांत आज आम्हाला तृप्त करणार होता. समाज पण निष्ठुर असतो, प्रेमाचं नातं नेहेमीच नाकारतो. आज मात्र आम्हाला मिलनापासून रोखणारं कुणीही नव्हतं. कमालीचा एक्साइटेड मी, तिची आतुरतेनं वाट बघत होतो.
अचानक पाठीमागून ती पुढे आली. मदमस्त यौवना ! डोळ्यांत नशिलेपण होतं. तिच्या सुगंधानं वेडापिसा, घायाळ झालेलो मी; अनावर उर्मीनं तिला बाहूपाशांत आवळलं आणि तुटून पडलो. तिही प्रतीसाद देऊ लागली. ओठांनी ताल धरला. प्रेमवर्षाव होऊ लागला. मी रंगलेलो असतानाच तिनं गुलाबी ओठांच्या पाकळ्या अलग केल्या अन् मुखाद्वारे बाहेर आलेला सुळा लख्खकन् चमकला. भितीनं गर्भगळीत माझ्या कानांवर गडगडाटी शब्द आदळले, "संगीच्या बापानं पाठवलंय मला !"
_हाडळीचा आशिक
दिनांक -१६ जून २०१८
हे भारीये..
ही लव्हस्टोरी आहे की भयकथा ?
Sula mhanje?
Sula mhanje?
शेवट कळला नाही
शेवट कळला नाही
@aditi... मला वाटते ती
@aditi... मला वाटते ती vampire आहे.पण संगीच्या बापाने पटवालय म्हणजे काही कळले नाही
(No subject)
सर्वांचे आभार
सर्वांचे खूप आभार

sula mhanje >>
सुळा- मोठा दात
शेवट कळला नाही>>
संगिता ही प्रेयसी आहे पण तिच्याऐवजी तिचं रूप घेऊन हडळ आली आहे. त्या हडळीला संगिताच्या वडिलांनी पाठवलंय
(No subject)
(No subject)
(No subject)
ओके
ओके
संगिता ही प्रेयसी आहे पण
संगिता ही प्रेयसी आहे पण तिच्याऐवजी तिचं रूप घेऊन हडळ आली आहे. त्या हडळीला संगिताच्या वडिलांनी पाठवलंय>> ओहो. असं होय मला वाटलं त्याने आधी कुठल्या संगी नावाच्या मुलीला प्रेमाचं नाटक करुन फसवलंय नि तिच्या वडिलांनी बदला घ्यायला ह्या हडळीला पाठवलंय.
असं होय मला वाटलं त्याने आधी
असं होय मला वाटलं त्याने आधी कुठल्या संगी नावाच्या मुलीला प्रेमाचं नाटक करुन फसवलंय नि तिच्या वडिलांनी बदला घ्यायला ह्या हडळीला पाठवलंय.>>>
हे माझ्या ध्यानातच आलं नाही..
आभार सगळ्यांचे
<<<ओहो. असं होय मला वाटलं
<<<ओहो. असं होय मला वाटलं त्याने आधी कुठल्या संगी नावाच्या मुलीला प्रेमाचं नाटक करुन फसवलंय नि तिच्या वडिलांनी बदला घ्यायला ह्या हडळीला पाठवलंय. >>> +१ मलापण तसच वाटलं.
छान आहे शशक.
अॅमी धन्यवाद
अॅमी धन्यवाद
अॅमी धन्यवाद
अॅमी धन्यवाद
हाच का तो पहिला धागा ? मस्त
हाच का तो पहिला धागा ? मस्त आहे शशक. त्यावेळेस पण वाचले होते आता प्रतिसाद देतोय.
हाच का तो पहिला धागा ? >>>
हाच का तो पहिला धागा ? >>> नरो वा कुंजरो वा

मस्त आहे शशक. त्यावेळेस पण वाचले होते आता प्रतिसाद देतोय.>>>
प्रतिसादाबद्दल धन्यवाद !