आवाज ― शतशब्दकथा

Submitted by योगेश_जोशी on 15 June, 2018 - 05:49

नीरव शांत दुपार अन् कलती उनं.. त्या हॉल मधले सर्वजणच थोडं पेंगुळलेले. ह्या संधीचा फायदा घेण्यासाठी त्याने चोरपावलाने सावकाश दबकत यायचा खुप प्रयत्न केला. मुद्दामहुन कोणी लक्ष दिलेही नसते पण आवाजच शेवटी एवढा मोठ्ठा झाला की सगळ्यांना मान वर करून त्याच्या दिशेने बघायला भाग पाडले.

सर्वच नजरांनी त्याला चहुबाजूंनी घेरले. आता त्याची सुटका निव्वळ अशक्य होती. तो रंगेहाथ पकडला गेला होता.

अनेक कुजबुजणारे आवाज अन् मिश्किल खसखस ऐकून त्याचा चेहरा शरमेने पार गोरामोरा झाला होता. पुटपुटत मान खाली घालत तो स्वत:शी एवढंच म्हणाला ―

"आज डब्बा विसरल्याने दुपारी लागोपाठ चार वडापाव उगीच खाल्ले. डँबीस बटाट्यांनी गनिमीकावा करत अखेर डाव साधलाच लेकाचा !!"

― अंबज्ञ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

:)))