Submitted by दक्षिणा on 10 June, 2018 - 23:02
बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162/
अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.
उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
पुष्कर जोग
सई लोकुर
मेघा धाडे
शर्मिष्ठा राऊत
अस्ताद काळे


विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
दिप्ती मस्त पोस्ट. मेघा अगदी
दिप्ती मस्त पोस्ट. मेघा अगदी सुरूवातीला मला अजिबातच आवडायची नाही. मध्यंतरी खूप आवडायला लागली.
अग असच असतं ना.. जे चूक आहे ते चूक आहे. आणि आपण हे बोलतोच ना.. पण लोक कोणाला blindly follow कसा काय करू शकतात ह्याचाच आश्चर्य वाटतं ..
परत एकदा गेल्या आठवड्यातले तिचे टॅन्ट्रम्स पाहून तिचा फारच राग यायला लागला होता. स्वत:च बोललेलं स्वत:च्याच बोलण्याने अथवा कृतीने खोडून काढते ती.
Submitted by दक्षिणा on 9 July, 2018 - 16:15>>> धन्यवाद दक्षिणा.
शेवटी हे सगळं आपल्या मनोरंजनासाठी असतं. पण लोक अगदी खालच्या पातळीला जातात कंमेंट करताना .. अर्वाच्च भाषेत शिव्या देणं वगैरे ..
दीप्ती छान लिहिलेय, दूध
दीप्ती छान लिहिलेय, दूध प्यायचा टास्क संपल्यावर ती भाग्यश्री ला सांगत पण होती की मी मुद्दाम वेळ काढत होते
Submitted by VB on 9 July, 20धन्यवाद.. हो तेच.. आणि पुढे जाऊन issue करायचा...
मेघाचे समर्थक तिच्या चुका
डबल पोस्ट
इकडे आणि सोमी वर अनेकांच्या
इकडे आणि इतर सोमि वर अनेकांच्या लिखाणातून मेघाबद्दल सहानुभूतीचा सूर लागतोय, याचं कारण बिबॉच्या घरात ती एकटीच धुतला तांदूळ कॅटेगरी आणि बाकीचे सगळेच कारस्थानी असं नसून, बिबॉ आणि ममां दोघांच्या दुटप्पीपणामुळे आहे असं वाटतं. एक स्मिता सोडली तर घरात प्लॅनिंग, प्लॉटिंग, बॅकस्टॅबिंग, अनफेअर प्ले हे सगळं सगळेच करताहेत... त्यात मेघा पण आहेच.
पण काल परवा च्या एपि मधे फक्त आणि फक्त मेघा बॅशिंगच झालं म्हणून सगळीकडून तिच्या बाजूने बॅटिंग होत असलेली दिसतीये !
मेघाचे समर्थक तिच्या चुका
मेघाचे समर्थक तिच्या चुका मान्य करतात तसे आ, रे समर्थक का नाही मान्य करत त्यान्चा चुका?
आस्तादला हे आधीपासून माहित होत की मेघाला दुध पचत नाही. मग तिला दुध आणि पाणी आलटून पालटून पाजण्याची आयडिया कोणाची होती? आस्तादचीच.
आस्ताद आणि पु ने सासू-सून टास्कमध्ये चिटिन्ग केलेली चालते तर मग मेघा खोटे बोलली हयाचा एवढा बाऊ का करायचा?
इथे स्मिता किती गोड वागते असे सगळेच म्हणतात, पण तिने खेळणी टास्कच्या वेळी काहीही कारण नसताना पुष्करला 'लाथ मारीन' असे बोलत होती. तसेच मेघाचे मोराल डाऊन करण्यामध्ये ति रेशमला अप्रत्यक्षपणे मदत करत होती खदाखदा हसून अस इथे कुणीतरी लिहिलय.
बाकी सगळयान्ची पत्रे सो सो होती. अपवाद किशोरचे पत्र. छान लिहिले होते त्याने. जाता जाता मात्र त्याने सर्वान्ची मने जिन्कली. तो पहिल्यापासून हवा होता यार शोमध्ये.
बायदवे इतकी मर मर करून
बायदवे इतकी मर मर करून जिंकल्यावर प्राइझ मनी फक्त २५ लाख आहे ?किती तो म.म. बिग बॉस
हो हो चौघुलेंचं पत्र खरंच खूप
हो हो चौघुलेंचं पत्र खरंच खूप मस्त होतं. अलिकडे बरे वागू लागले होते तोपर्यंत गेले घराबाहेर.
केवळ तेवढंच नाही. मेघानं
केवळ तेवढंच नाही. मेघानं पहिल्यापासून खूप चलाखी दाखवली आहेच पण त्याचबरोबर तिचा आत्मविश्वास, हिंमत, झुंडशाहीच्या दबावाला बळी न पडता ठाम उभं राहण्याची जिद्द बघून तिला समर्थक मिळाले आहेत. चुका सगळेच करताहेत. मेघाची. 'त्या'तिच्या चुकीच्या निर्णयानंतर ती जरा ढेपाळलीय पण तिच्यातला स्पार्क तसाच आहे.
अस्तादसारख्या एम्सिपी लोकांना हे गुण न दिसता ते दुर्गुण आहेत असं वाटतं कारण एखादी स्त्री त्यांना भावच देत नाहीये हे झेपत नाही त्याला.
50 लाख आहे बहुतेक.
50 लाख आहे बहुतेक.
. पंप मारायचा सोडून व
. पंप मारायचा सोडून व लावालाव्या करायचे सोडून त्यांनी काहीच केले नाही.. नंकी त्यापेक्षा नक्कीच खूपच डीझर्विंग होता. >>>> इथे कृपया कुणाच्या आजारावर कमेन्ट करू नये, प्लिज.
तसच कोणी अमक्याच/ अमकीच त्याच्या/ तिच्या चुकान्सकट समर्थन करत म्हणून त्यान्ना भिकार/भिकारेस्ट म्हणायचा कुणालाच अधिकार नाही. पर्सनल होतय हे.
एखादी स्त्री त्यांना भावच देत
एखादी स्त्री त्यांना भावच देत नाहीये हे झेपत नाही त्याला. >>>> रेशम देतेय ना त्याला भाव.
>>ह्यात स्मिता जाऊ नये असं
>>ह्यात स्मिता जाऊ नये असं मनापासून वाटतं आणि तीच जिंकावी अशी खूप इच्छा आहे. She deserves it. ती जिंकली ना तर अती आत्मविश्वासू,गर्विष्ठ, प्रेक्षकांना गृहीत धरणाऱ्या आणि इतरांना weak समजणाऱ्याना (धाडेना) धडा मिळेल.

@दिपी_३०
एकद चपखल!.
संपूर्ण पोस्टला अनुमोदन..Smita with bit of communication skills grooming will reach top leves in Corporate world! She is wasting her time in trash like BB.
पण कुणाला धडा वगैरे देण्याची दृष्टि नसावी बि बॉ ची. अन्यथा अर्धे घर कधीच रिकामे झाले असते. This is all about page 3..' सब गंदा है पर धंदा है ये' च्या तालावर..
>>इथे कृपया कुणाच्या आजारावर कमेन्ट करू नये, प्लिज.
कैच्याकै! दुधाच्या अॅलर्जी वर शंभर पोस्टी खर्ची पडल्यात ईथे!
असो. पुन्हा एकदा पुढील २ आठवडे ईथे भिषण करमणूक होणार बहुतेक.. ममा मिळालेल्या स्पेशल अधिकाराचा वापर करतात का ते पाहू.. का ऊगाच आपली गल्ली क्रिकेट सारखी पोकळ धमकी.. "माझे ऐकले नाही तर मी बॅत बॉल घेऊन घरी जाईन.."
>>बायदवे इतकी मर मर करून
>>बायदवे इतकी मर मर करून जिंकल्यावर प्राइझ मनी फक्त २५ लाख आहे ?किती तो म.म. बिग बॉस Happy
अगदीच म. म. पणा आहे ना!
खर म्हणजे ते ५० लाख आहे बहुतेक!
आणि त्या कुठल्यातरी स्पॉनर्सच्या टाउनशिपमध्ये फ्लॅटपण देणार आहेत ना?
तो मुखवट्यांचा गेम दाखवलाच
तो मुखवट्यांचा गेम दाखवलाच नाही का ? >>>>> नाही ना. मेबी वूटवर असेल.
रच्याकने अजून कोण म्हणलं नाही फोन कॉल्स फेक असतात. >>>> फोन कॉल्स फेकच असतात सगळे. ममाच्या होस्टिन्गच कौतुक करणारे दोन फोन कॉल्स आले होते, आता बोला.
चुकान्सकट समर्थन करत म्हणून
चुकान्सकट समर्थन करत म्हणून त्यान्ना भिकार/भिकारेस्ट म्हणायचा कुणालाच अधिकार नाही. पर्सनल होतय हे.>>>> exactly. मला बोलायचं होतंच पुढे त्यांच्या 'भिक्कारेस्ट इति' कमेंटबद्दल. पण एकूणच सुर निराळा होता. त्यापुढे अजून एखादा उर्मट रिप्लायच आला असता. So smiley देऊन बंद. अर्थात ती smiley sarcastic होती हे कदाचित कळले नसेल.
सतत credit घेणारे, मी मी
सतत credit घेणारे, मी मी करणारे असे कित्ती तरी लोक आपल्या आजूबाजूला , ऑफिस मध्ये असतात. तसाच किंबहुना त्यापेक्षा जरा जास्तच असा हा एक नमुना. त्यामुळे घरातले जर सगळे तिच्याविरुद्ध गेले तरी ते साहजिकच आहे. कोण सतत कोणाचा तरी शहाणपणा ऐकून घेईल.
इथे ऋतुजा बद्दल खूप वाचलं... काय तर म्हणे villain group च्या हिंसक खेळण्यामुळे ती गेली. तो एपिसोड पाहावंच सगळ्यांनी एकदा.. टास्क संपायच्या वेळी स्वतःच जाऊन त्या फुलांच्या ताटव्यात उडी मारली कि हो तिने.. तिथे तोल जाऊन विटांवर पडली
>>
हे दोन पॅरा मस्तच..हे भक्तांना कसं दिसत नाही तेच आश्चर्य..
Submitted by सूलू_८२ on 9
Submitted by सूलू_८२ on 9 July, 2018 - 18:43
Submitted by मी चिन्मयी on 9 July, 2018 - 18:51
>>
या दोन्हीं साठी..हाहा..
भिकार, महाभिकार अन भिकरोत्तम हे फुले टाकण्यासारखे शब्द आहेत बहुतेक..
>>टास्क संपायच्या वेळी स्वतःच
>>टास्क संपायच्या वेळी स्वतःच जाऊन त्या फुलांच्या ताटव्यात उडी मारली कि हो तिने.. तिथे तोल जाऊन विटांवर पडली

ते अती शहाणपणाचं दुसरं टोक.
या खेळात फक्त लढल्या सारखं दाखवायचं असतं खरच लढायचं नसतं.. obviously Rutuja did't read the manual (ref: top ten tips on deceit and backstabbing- by वटवट चिक्की) टोपण नाव आहे बरं का.. nothing personal..
>>भिकार, महाभिकार अन भिकरोत्तम हे फुले टाकण्यासारखे शब्द आहेत बहुतेक.

शो, होस्ट आणि त्यातील सदस्य
शो, होस्ट आणि त्यातील सदस्य यांबद्दलची कमेंट आहे ती.
इथे मेघाविरोधात हवं ते बोला ना. पण तसं न करता समस्त मेघाहेटर्स मायबोली सदस्यांवर पर्सनल कमेंट्स करतायत.
फरक कळला तर विचार करा. नाहीतर चालू देत थयथयाट मायबोली सदस्यांविरुध्द.
बायदवे इतकी मर मर करून
बायदवे इतकी मर मर करून जिंकल्यावर प्राइझ मनी फक्त २५ लाख आहे ?>>>
मला जे काही आर्थ कारण समजलं आहे त्या वरुन तरी प्राइज मनी हा बोनस आहे. बाकी त्याना त्यांचे डेली जे ठरले आहेत ते पैसे मिळत आहेतच. परत ८ आठवडे टिकले तर डेली अलाउन्स मधे वाढ, परत जिंकलात तर बक्षिस... इ. इ. म्हणजे जर मेघा जिंकली तर तिला ३०,०००*१००+ २५ लाख + घर+ आठ आठवडे टिकली म्हणुन बोनस असे पैसे मिळतिल. तिच रेशम जिंकली तर ६०,०००*१००+ २५ लाख + घर + .......
त्यामुळे ज्याला त्याला डेली सोप मध्ये काम केल्या प्रमाणे ३ शिफ्ट चे पैसे मिळत आहे. बीग बॉस च्या रोजच्या जाहिरातीचा रेट ३० सेकंदाला ४० हजार तरी असावा. आणि वीक एन्ड ला ३० सेकंदाला ५०-६० हजारा पर्यन्त असावा.
मला बीग बॉस मध्ये नाही पण ह्या अर्थ कारणात खुप रस आहे. बीग बॉस माझे सासरे अगदी हिरीरीने बघतात, त्यन्च्या बेडरुम मध्ये. त्यन्च्या बरोबर मी फक्त रविवार चा एपि बघते. मागे एकाने एक लिंक पाठवली होती मेघाची की त्यात ती सांगत होती की तिने ही एक पी.आर. ठेवला आहे. आधी पासुन नाही पण जर ती ८ पेक्षा जास्त आठवडे राहिली तर ते पब्लीसीटी करणार. त्यांचे रेट खुप जास्त आहे असे ती सांगत होती.
https://www.voot.com/clip/a-well-planned-game/614456
सब पैसे का खेल है रे बाबा !!!
बाकी इकडे जोरदार चालु आहे.
फरक कळला तर विचार करा. नाहीतर
फरक कळला तर विचार करा. नाहीतर चालू देत थयथयाट मायबोली सदस्यांविरुध्द.>>>>> मामी, त्यांना कंटाळा येईपर्यंत चालूच राहणार हे. दुर्लक्ष करणं उत्तम वाटतंय.
करेक्ट चिन्मयी. तेच करते. पण
करेक्ट चिन्मयी. तेच करते. पण कळतच नसेल तर टाॅर्च मारावा म्हणून लिहीलं.
Smita with bit of
Smita with bit of communication skills grooming will reach top levels in Corporate world! >>>
(आता याला अंध किंवा भाबडे भक्त वगैरे म्हणावे का? )
मै... अगदी अगदी.
मै... अगदी अगदी.
मी मेघा सपोर्टर आहे पण
मी मेघा सपोर्टर आहे पण तरीदेखील काही लोकांना मेघा का आवडत नसेल हे मला समजू शकते. मात्र आस्ताद रेशम लोकांना सपोर्ट करावेसे कोणाला का वाटेल हे अजिबात समजू शकत नाही. ते शुद्ध बुली आहेत.
मेघाची चिडचिड आत्ता डोक्यात जातेय आणि डोळ्यात भरतीय पण त्या घरात गेल्यादिवसापासून तिला किती बोलते किती बोलते करत बुली केले गेले आहे. कितीतरी प्रसंग आहेत जिथे आस्तादने तिला लिटरली गप्प बसवले आहे. अशा घरात राहून मनस्थिती टिकवणं अवघड काम आहे. मेघा ते पार पाडतच होती मात्र परवाचे सर्वांचे मेघाच्या अगेन्स्ट मेल्ट्डाउन अतिशय अब्युझिव्ह होते. कोणीही माणूस उन्मळून पडेल त्याने. आणि कारण काहीच विशेष नव्हते. मेघा काहीही जगावेगळं करत नाही. त्या घरात सर्व जण आपापल्या परीने स्ट्रॅटेज्या लढ्वायचा प्रयत्न करतातच. मेघाची उडी जास्त मोठी आहे इतकेच. ती अभ्यास करून आली आहे खेळाचा. त्यात तिची चूक नाहीये. तिचा ‘जॉब’ ती व्यवस्थित पार पाडत आहे. पण हे इतर लोळत पडलेल्यांना ते सहन होत नाही मग ते बुलीइंग आणी अॅब्युझिव्ह वागतात.
ह्याच कारणाने मेघा जरी काही वेळेस चुकली तरी इतरांच्या तुलनेत तिच्या चुका किस झाड की पत्ती आहेत. आणि म्हणूनच तिला ती चुकली तरीही सहानुभुती मिळणार. (चुका: माझ्यामते तिच्या दोनच चुका आहेत. सईवर अंधविश्वास आणि तोंडावर/रागावर ताबा न ठेवणे. बाकी गेम प्लॅन, स्ट्रॅटेजीबद्दल काहीही म्ह्णणे नाही माझे.)
मात्र आस्तादचे अत्यंत अॅब्यिझिव्ह बिहेविअर (त्या आधी राजेश सुशांतचे तसेच अॅब्युझिव बिहेविअर) , रेशमचा सदाचा व उगाचचा अत्यंत फटकळ टोन, हे कदापि ’ओके’ नाहीये माझ्यामते. तोच टोन इथे आस्ताद रेशम समर्थकात दिसतो ही गंमत आहे.
https://www.voot.com/clip
https://www.voot.com/clip/aastad-sheds-tears-of-joy/614069
हे असं काही दाखवत नाहीत बहुतेक. किती सुरेख आहे तो प्रसंग. एकदम नीरागस. जरुर बघा.
मला वाटतय की सगळी भांडणं जास्त प्रोजेक्ट होत आहेत. आणि इतर हळुवार गोश्टी मात्र होत नाहीत.
https://www.voot.com/clip/megha-mocks-a-slim-resham-/613156
हे काहीही दाखवत नाहियेत. ह्या खर्या छान मज्जा आहेत.
वूट व्हिडिओज इकडे नाही दिसत.
वूट व्हिडिओज इकडे नाही दिसत. अमेरिकेत मराठी लोक आहेत आणि ते हा शो बघतात हे त्यांना माहितच नसावे. काल ममां पण त्या फोन कॉल नंतर म्हणाला , "अमेरिकेत पण बघतायत लोक?!! "
मोकीमी, बिग बॉस आवडत नाही
मोकीमी, बिग बॉस आवडत नाही म्हणता म्हणता तुझा अभ्यास जोरदार आहे की!
बस्कु, मस्त पोस्ट.
बस्कु, मस्त पोस्ट.
>>मेघाने कोणत्या टास्क मध्ये
>>मेघाने कोणत्या टास्क मध्ये चोरी केली आहे? (हे मला खरंच माहित नाही) आणि कोणी कोणत्या टास्कमध्ये लबाडी केली नाही?<<
>>ती कधीच उगाच इगो कुरवाळत बसलेली नाही, ती पटकन सॉरी म्हणून टाकते, भांडणानंतरही आपणहून मैत्रीचा, समझोत्याचा हात पुढे करते!<<
या दोन्हि कामेंट्स वाचुन इथे नॉर्थ अमेरिकेत मेघाविरुद्ध मतं बनण्याकरताच (डॉक्टर्ड) एपिसोडस दाखवले जातात यावर विश्वास बसत चालला आहे. कारण इकडे मेघाने केलेल्या, नंतर पकडल्या गेलेल्या चोर्या, तिचं छातीठोकपणे केलं गेलेलं डिनायल (कालचाच अॅलर्जीचा प्रसंग हे ताजं उदाहरण), एखाद्याच्या समोर हसरा चेहेरा पण त्याची/तीची पाठ वळताच केलं गेलेलं बिचिंग, स्वगतात भडास्/जळजळ ओकणे हेच प्रकार दाखवले जातात. इथे वूट दिसत नाहि, तेंव्हा मेघाची पाझिटिव साइड, प्रामाणिक्/फेअर अॅटिट्युड फक्त वूट वरच दाखवली जात असावी..
आस्ताद, चौघुले यांचं पत्र बेस्ट. रेशम, मेघा या दोघींची पत्रं हि चांगली होती पण रेशमचं इंग्रजीत असल्याने आणि मेघाचं अतिशय वर्बोज अस्ल्याने बाद. कँसस्/अॅरिझोनातुन, पक्षी अमेरिकेतुन फोन केले जाउ शकतात या कल्पनेने मिश्र भावना उचंबळलेल्या आहेत...
Pages