बिग बॉस - मराठी २

Submitted by दक्षिणा on 10 June, 2018 - 23:02

बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162/

अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.

उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
पुष्कर जोग
सई लोकुर
मेघा धाडे
शर्मिष्ठा राऊत
अस्ताद काळे

1523851709_bigg-boss-marathi-contestants_6.jpgsharmishtha-raut_0.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

आजच्या भागात ममां मला वाटतेय तशी झुंडीने मेघावर वार केल्याबद्दल ह्या मंडळींची शाळा घेतात का बघायचे!
>>>> जास्त काही नाही बोलले ममा....

आस्ताद बार भरून बसला होता पण फार वेगळं काही नाही बोलता आलं त्याला मेघाबद्दल. ताणायला बघत होते पुष्की आणि तो पण ममांनी मोर्चा वळवला पत्रांकडे. त्यात पण बोअर करतात हे लोक. जे बोलता येत नाही ते लिहायला सांगितलेलं पत्रात. तरी सगळ्यांनी रोजचाच बाजा वाजवला. नाही म्हणायला चौगुलेनी वेगळं पत्र लिहायला घेतलं पण ते ही शेवटी 'मेघा, हाय हाय' वर संपलं.

मेघाचे कॅलक्युलेशन्स चुकले असेल गेल्या आठवड्यात, त्यामुळे कडाकडा भांडणे झाली आणि बिग बॉसला अभूतपूर्व कन्टेन्ट मिळालं , त्यांचा हेतु साध्यं !
जर मेघा बोलली ते पर्सनल लेव्हलचं वाटलं तर एडीट का नाही केलं , कारण बिबॉ अ‍ॅक्चुअली खुष हुआ टीआरपी साठी Proud
जाउद्या झालं सोशल मिडीयावर क्लिअर सपोर्ट मेघाला असताना सध्याची सिच्युएशन काय सांगतेय दिसतच आहे, सो काही पॉझिटिव घडेल आशा ठेउ नये मेघास्टर्सनी .
पुष्कि - मेघा फाइट काय लेव्हलला जतेय इतकाच इंटरेस्ट आहे बिबॉला सध्या मेघामधे , त्यासाठी गाणीही स्पेशल लागतात.
सिनेमा चालु रहावा म्हणून ठेवतील पुष्कि-मेघाला एंटरटेन करायला.
बाकी आउ म्हणायच्या तसा एका बेडने घात झाला Wink
८० दिवस २४ X ७ एकत्रं , रात्रीसुद्धा एकमेकींपासून वेगळे नाही मग सुपर पझेसिव सो कॉल्ड मैत्रीसाठी, आता इतकं कडाकडा भांडण झालय तरी सईचं तुणतुणं आहेच शर्मिष्ठा माझी रिप्लेसमेन्ट आहे का वरून , काही समजत नाही हे Uhoh
पुष्कि म्हणे मेघाला तू मला पुष्कर म्हणणार कि पुष्कि क्लिअर कर, पुष्कर म्हंटलं कि त्याला परकं वाटत, एमोशनल फुल्स !

पर्सनल टीका करणार्यांना डायरेक्ट एलिमिनेट करण्याचा अधिकार दिलाय ममांना...असं तेच म्हणाले.

थँक्यू पुंबा Happy

जास्त काही नाही बोलले ममा....>> अरेरे आसा Sad

काही पॉझिटिव घडेल आशा ठेउ नये मेघास्टर्सनी .>> बरोबर आहे. आता पटलेच.. Sad

जर मेघा बोलली ते पर्सनल लेव्हलचं वाटलं तर एडीट का नाही केलं ,>>> शिवाय ते काल उगाळलंसुद्धा! आणि मेघाला पुन्हा एकदा एक्स्पोझ केलं.. केवळ तिचं मोराल डाऊन करण्यासाठी असावं.. एकटी बाई इतक्या जिद्दीने कशी काय सामना देते झुंडीला, खेचा तिला खाली, अशा मानसिकतेने.

मेघा जिंकली तरच हे गृहीतक खोडले जाईल आता मेघा समर्थकांच्या मनातून.

पर्सनल टीका करणार्यांना डायरेक्ट एलिमिनेट करण्याचा अधिकार दिलाय ममांना...असं तेच म्हणाले.

>>> तर मग स्मिताला सतत कन्फ्युज्ड म्हटल्याबद्दल आणि वाईट प्रकारे ओरडल्याबद्दल ममांनी स्वतःलाच एलिमिनेट करायला हरकत नाही.

मामी, वेल सेड!!

मला पुढच्या सिझनला वेगळे कोणीतरी ममांच्या जागी पाहायला आवडेल.

What about personal talks by Astad ?' Sai after show pushkar chya gharich jaoon basel 'was his statement !

मामी:P Proud : ममा एकदम पार्षल आहे. आज चकार बोलला नाही आ रे गॅंगला. अगली असं काहीतरी एक वाक्य बोलला. बास. बहुदा रे ला जिंकून द्यायचं हे त्याला टास्क दिलं असेल.

तर मग स्मिताला सतत कन्फ्युज्ड म्हटल्याबद्दल आणि वाईट प्रकारे ओरडल्याबद्दल ममांनी स्वतःलाच एलिमिनेट करायला हरकत नाही.>>>> Lol
अजून पण खूप लोक आहेतच की पर्सनल टीका करणारे. निदान आता थयथयाट तरी मांडू नये सगळ्यांनी.

What about personal talks by Astad ?' Sai after show pushkar chya gharich jaoon basel 'was his statement !>>>> that would b an innocent friendly comment दिपांजली. Wink

What about personal talks by Astad ?' Sai after show pushkar chya gharich jaoon basel 'was his statement !>> सुरुवातीला भागांमध्ये रे मंडळी पु आणि सै बद्दल बरंच बिचिंग करायचे, इव्हन पु ला सै चा चमचा वगैरे हीच मंडळी बोलायची, त्याबद्दल कधी काही दाखवलं नाहीच शिवाय काल पु मेघावरच बरसला , मला तू सै चा चमचा म्हणते म्हणून. हे आरे टीमचे लोक यांच्याशी कसे वागलेत, ते एका क्षणात विसरलेत पु सै सोयीस्करपणे..

आऊ म्हणाल्या, हे म्हणजे गृप आणि आम्ही म्हणजे उरले सुरले, ही भावना मनात असल्याने ह्या ग्रुपचा भाग होणे, ही सै पु ची पहिल्यापासूनच अंतरिक इच्छा असणार आणि मेघाच्या एका चुकीच्या निर्णयामुळे त्यांना रान मोकळे झाले आणि ते मोकळे झाले तिच्या विरोधात जायला. प्रस्थापित गटात जाण्यासाठी आसुसणे, त्यासाठी एखाद्याला सॉफ्ट टार्गेट करणे, हा तर जगात नेहमी दिसून येणारा प्रकार आहे. सै आधीपण शक्य तितकी मेघाला ह्या लोकांना मिळून नावं ठेवायचीच, पण त्यात जरा मैत्रीचा दबाव होता, जो मेघाच्या घोडचूकीने संपलाच.

कॅप्ट्न्सी टास्क चा काहीच अर्थ राहीला नाही. कॅप्ट्न्सी टास्क साठी जे दोन उमेदवार निवडले गेले होते त्यापैकी कुणीच कॅप्टन झाला नाही. अस झालय का कधी हिंदी बिबॉ मध्ये.

स्मिता मोस्ट डिजर्वींग होती त्या पदासाठी.
आता स्मिता आवडू लागलीय पण मत शरा लाच Wink

पुढचा नंबर तिचाच असेल पण Lol

पुढचा नंबर तिचाच असेल पण >> नाही, मला वाटतं, शरा जाईल.. बाकी सगळे राहतील शेवटपर्यंत, मेघाला टार्गेट करत. मग मेघा स्मिताजवळ मन मोकळं करेल शेवटचा आठवडा. विनर असेल रे किंवा सै

पुढचा नंबर तिचाच असेल पण >> नाही, मला वाटतं, शरा जाईल..

>>>> पुढचा नंबर म्हण्जे बाहेर जाण्याचा अस म्हणायच होत मला Proud

तो गृप कुठे प्रस्थापित राहिलाय आता, फक्तं २ लोक राहिलेत गावगुंड गृपमधून!
यांच गटबंधन फक्तं मेघाला टार्गेट करण्यासाठी झालय, नाहीतर रेशमला माहितेय सई तिच्याबद्दल काय विचार करते आणि व्हाइस व्हर्सा.
अस्ताद कसा आहे पुष्कर सईलाही माहितेय , कोणी कोणाचं नाहीये सध्या विश्वास ठेवायला एकमेकांवर.
फक्त सई एकटी इमिशनली इन्व्हॉल्व्ह्ड आहे, पुष्कि प्रेमात अंधळी.

फक्त सई एकटी इमिशनली इन्व्हॉल्व्ह्ड आहे, पुष्कि प्रेमात अंधळी.>>> मी सहमत आहे. सई खरंच खूप पुढे गेली आहे इमोशनली या मैत्रीमधे पण पुष्कर तिथे पोहोचलाच नाहीये आणि पोहोचणार पण नाही. त्याला फॅमिली आहे बाहेर असं म्हणत तो कायम दोन पावलं मागे राहतो. तसं चुकीचं नाहीये ते. सईला समजायला हवं. आज पत्रांच्या वाचनात पण दिसलं. सईच्या डोळ्यात पाणी आलं लगेच आणि पुष्कर was indifferent. रेशमने राजेशच्या बाबतीत केलं ते सई पुष्करच्या बाबतीत करतेय. आंधळा विश्वास आणि अती अवलंबून राहणे.

आज अगदीच निराशा केली मांजरेकरांनी.... बिग बॉस होस्ट ते आहेत का आस्ताद असा प्रश्न पडावा इतका होल्ड घेतला होता आस्तादने आज!
सलमान असे कुणी अतिशहाणपणा करायला लागला की मस्त स्टेजवरच मांडी घालून बसायचा किंवा चक्क झोपायचा कधीकधी.... थोडक्यात समोरच्याला जाणीव करुन द्यायचा की बास आता..... इधर बॉस मै हू!
इकडे मांजरेकरांना गुंडाळूनच ठेवतात सगळे!

बाकी आजचा भाग म्हणजे मेघाचे मोराल पूर्णतः खच्ची करायचा सामुहिक प्रयत्न होता!
मांजरेकरांनी कालचाच राग आज परत आळवला.... आस्ताद परत आज मोकाट
व्ह्युअर्स फोन कॉल, ते चौगुलेंचे लव्हलेटर आणि बाहेर येउन शराला उपदेश हे सगळे आता शराला मेघापासून तोडण्याचा एककलमी कार्यक्रम होता
बाहेर आस्तादला इतक्या शिव्या पडत असताना फोन कॉल फक्त मेघाला आणि शराला डिवचायला?
अजब फिल्टर है बॉस?

आता मांजरेकरांना एक स्पेशल अधिकार आहे म्हणे.... पर्सनल बोलणाऱ्यांना डायरेक्ट बाहेर काढायचा!
आता मेघाला एकटे पाडून पर्सनल कॉमेंट करायला प्रोव्होक करतील तिचे दुष्मन!
आणि फटकळ मेघा त्याला बळीही पडेल..... once again control मेघा control!

बाकी मेघाने शराला लिहलेले लव्हलेटर ऐकताना सई एकदम जेलस झालेली!
चौगुले बाहेर पडणार हे बऱ्यापैकी अपेक्षितच होते.... तश्या बातम्याही येत होत्या.... त्यामुळे एलिमेनेशनबद्दल फारशी उत्सुकता नव्हतीच.... एकंदरीत बोअरच झाला आजचा एपिसोड!

मेघा अतिशय चुकीचं वागली तिला बोलले म मां हा माझा आक्षेप मुळीच नाहीये, जे जे ती बोलत होती रे पु बद्दल ते चूक होतं, ते target केलं म मां नी गुड पण बाकीच्यांना वरवर बोलले, त्यांच्या चुकांवर बोलल्यासारखे करून पांघरूण घातलं त्याचं काय. हे मला पटलं नाही.

सर्वात पाताळयंत्री सई जी मेघाच्या मैत्रीचा फायदा घेऊन, ज्या grp बद्दल तीही खालच्या पातळीचे बोलत होती त्यांना जाऊन मिळाली, काड्या केल्या, चुगल्या केल्या आणि bb ने त्याचं बक्षीस दिलं, very lucky person. फायनलला गेली, आता जिंकेलही. जिंकू नये ही इच्छा. रेशमपेक्षा मनातून उतरली. आता स पु चा रे रा अवतार बघत राहिला लागणार, जरा सौम्य फक्त. तो जास्त होतोय आणि टीका झाली तर पुष्करचा बळी देणार सई सेफ, सेम रे रा सारखं. रा बळी गेला.

स्मिताचे कौतुक जरासे झालेलं स पु आ च्या डोळ्यात येणार नक्की. तिने आहे तसंचं राहावं, कोणाच्या बोलण्या म्हणण्यात येऊ नये. तिची एवढीशी चूक मोठी करून उलटवतील अशी मला काळजी वाटते. ती ह्या तिघांची target आहेच फक्त आ ने तिला नोमिनेट केलं नाही आत्तापर्यंत एवढंचं. बाकी स पु तिला घालवायला कधीपासून बसलेत. मला नेहेमीच तिची काळजी वाटते, तशी आताही वाटते. सगळ्यांच्या मोठ्या गोष्टी कानाडोळा केल्या जातील पण स्मिताची एवढीशी चूक हायलाईट होऊ शकते आता, God bless her.

बाय द वे स्मिताला कोणीच letter लिहिलं नाही, ती कोणाच्याच खिजगणतीतही नसते. असो.

त्यांना जे कन्टेन्ट हवय तेच बोलावं लागतना पण ?
मेघाची स्तुति आणि इतरांना शिव्या असा फोन कॉल कसा होईल सिलेक्ट ? Wink

सगळ्यांनी सईचं भरभरून कौतुक केलं. चौगुलेने तिला vote का दिलं. स्मिताने फक्त सईचं कौतुक नाही केलं, आस्तादला मत द्यायचं होतं पण फुकट जाईल म्हणाली, ग बायो जाऊदे ना फुकट द्यायचं होतंस आस्तादला. सईने अजून डूक धरला असता तुझ्यावर एवढंच.

डीजे, एक मेघाच्या बाजूने होता की तुला सावध केलेलं म मां नी की स पु तुझ्याविरोधात बोलतात, backstab करतात तर तू त्याचं तेव्हा ऐकलं का नाहीस, तेव्हाच तू सावध राहिली असतीस तर आज ही वेळ आली नसती.

मला वाटलं हा फोन तू तर केला नाहीस ना Lol , नेमकं नाव नाही ऐकलं कारण हे आपल्या बऱ्याच जणांच्या मनात होतंना. आपण लिहिलंय ही इथे.

तर मग स्मिताला सतत कन्फ्युज्ड म्हटल्याबद्दल आणि वाईट प्रकारे ओरडल्याबद्दल ममांनी स्वतःलाच एलिमिनेट करायला हरकत नाही. >>> Lol वेलसेड मामी.

" ये जो पब्लिक है ये सब जानती है... " या गाण्याने सुरुवात झाली तेव्हाच कळले होते रोख कुणावर आहे ते.
आज आस्ताद ने मेघा चा सो कॉल्ड 'गिल्ट' आणि 'स्टॅटर्जी' चा डोलारा अक्ष्ररशः क्षणात ऊध्वस्त केला.. केवळ तीन मुद्द्यात, ८० दिवसातील सर्व गेम, स्टॅटर्जी, विश्वासार्हता व मोरालिटी चा आणलेला आव सर्व कोलमडून पडला.
मेघा ला दुधाची अ‍ॅलर्जी आहे हे तर बिग बॉस ला ही माहित नाही... सही पकडे है दोस्त! खेळ खल्लास..!
खरे तर बिग बॉस व ईतर स्पर्धकांपासून हि बाब लपवून ठेवल्याने तिला डिस्क्वालीफाय करायला हवे. This is way beyond than guilt and strategy blunder..! Shame on her...
आणि शरा ला वेलची ची अ‍ॅलर्जी आहे हे आम्हाला सर्वाना ती आली त्या पहिल्याच दिवशी माहित होते हे आस्ताद ने सांगितल्यावर तर अगदीच केविलवाणी अवस्था झाली मेघाची... big loser..! शेवटी हे ओढून ताणून घात्लेले नकाब ऊतरणाच होते.. मेघा ने मात्र स्वताच्या अती शहाणपणा पायी हा नकाब स्वताच ऊतरवला.. damage is already done and too late to salvage!
मेघा ही व्यक्ती हे अती मह्त्वाकांक्षा व अती शहाणपणा यामूळे एखाद्या व्यक्तीचे किती नुकसान होवू शकते याचे ऊत्तम ऊदाहरण आहे. आज्च्या घडीला घरातील ज्या व्यक्तींबरोबर ८० दिवस घालवले त्यातील एकही व्यक्ती तिच्यावर विश्वास ठेवण्यास तयार नाही. कुठल्याही क्षणी स्वताच्या स्वार्थासाठी स्वताच्या मित्रांना फसवणार्‍या व्यक्तीचे आयुष्यात कुणीच नसते. 'ऐसे दोस्त से दुष्मन बेहतर' असे आता तीच्याबद्दल सार्वत्रिक मत आहे.. फारच केविलवाणा प्रकार!
आणि ५ आठवड्यापूर्वी आलेली शरा आता हिच्या मनाच्या कप्प्यात? कैच्याकै! Rofl शरा ने यावर विश्वास ठेवणे म्हणजे तर मूर्खपणाची परिसीमाच.. watch out Sharaa.. Megha is going to use you for next remaining days... nothing more..! नंकी ने देखिल बाहेर गेल्यावर तीला हेच सांगायचा प्रयत्न केलाय. पण ऊपयोग व्हायचा नाही. मी माझा गेमच खेळते आहे. ईतपत पटवून देण्यातच तिची मजल आहे...
असो.

बाकी फोन कॉल्स तर सर्वच फेक असतात .. मेघा च्या सपोर्ट चे असो वा तीच्या विरुध्द! नाही का लोक्स? Proud तेव्हा फोन कॉल्स ना काही विशेष अर्थ नाही. ऊसगाव वरून आला काय किंवा लासलगाव वरून आला काय. Proud

पण आत्ता आताच अगदी भारताबाहेरून फोन येवू लागले की.. गंमतच आहे. पि आर एजंसी जोरात कामाला लागलेली दिसते. Wink

आज ममा फारच संयम ठेवून बोलत होते, मेघाशी... चेहेर्‍यावर व एकंदर देहबोलीत.. मेघाविषयी असलेली अविश्वासार्हता अगदी स्पष्ट दिसत होती. पण करतात काय... सगळेच चालवून घ्यायला लागणार. आणि मेघा ला जास्ती रागवायचं नाही बर का.. जगबुडी नाही झाली तरी लोणावळा तर बुडेल ना, मग?

शेवटी सगळे फिक्स आहेच नाही का? म्हणजे स्मिता, नंकी सोडून दुसरेच कुणी कॅप्ट्न झाले की. Happy तेव्हा पुढील आठवड्यात शरा जाणार आणि मग फिनाले मध्ये ईकडचे तीन, तिकडचे तीन असे मस्त फेवरेट सहा राहणार.. मजबूत टी आर पी, मजबूत धंदा.!

एक नक्की: ईंडस्ट्री मधिल सर्वांना स्मिता बरोबर काम करायची उत्सुकता असणार.. she may not win Big Boss Trophy but she has won every heart and every person with her dignified behavior and humility. A true loyal team player and gem person.. rare qualities! Kudos! She will go long way... in life.
Megha may win the Big Boss Trophy but has lost every other thing in the process.. तीच्या बरोबर कुणीच काम करायला मागणार नाही हे नक्की. she is back to where she started... alone! sad!

माझे वैयक्तीक मत मात्र पुष्कर ला. well played dude! आणि of course आस्ताद had said he would like to be a King Maker.. he has played that part really well..

रच्याकने: "एकेमेकांच्या झिंंज्या ऊपटा पण पर्सनल होवू नका" हे वाक्य Oxymoron या संज्ञेचे मराठी मधिल सर्वात महान ऊदाहरण म्हणून विकीपिडीयात नोंदले जावे. It sums up the entire Big Boss Marathi season!

आस्ताद म्हणजे फोडा आणि राज्य करा, या mentality चे उत्तम उदाहरण! कमालीचा नीच माणूस... पहिल्यापासूनचे एपिसोडस आठवून पहा.. (माझे 2 ते खुर्ची टास्क पर्यंतचे हुकलेत), मेघा गेम कसा खेळायचा, याचे प्लॅनिंग्ज करायची, त्यात लूप होल्स शोधून जिंकायचा प्रयत्न करायची, लोक आपल्या बाजूने यावेत, यासाठी प्रयत्न करायला सै ला सुचवायची, हे प्रयत्न तिने काय केले, केले की नाही, कधी समजले नाही आणि यशस्वी झाल्याचे दिसले ही नाहीत.

मात्र आस्ताद दुसऱ्या दिवसापासूनच (करेक्ट मी इफ आय एम wrong) तो धरून चार लोकांसोबत (रे, रा, भु/सु) यांच्या सोबत मेघा, सै ग्रुपमध्ये भांडण लावून देऊन त्यांचा गृप वीक करण्याची स्ट्रॅटेजी आखताना youtube वर हायलाईट्स मध्ये दिसला. त्यांनंतर एकदा सै मेघात भांडण लावून देण्यासाठी मेघाचे कौतुक करूया, मग सै जेलस होईल, अशी स्ट्रॅटेजी आखतांना दिसला, जी विंकेंडच्या डावात ममांनी एक्सपोझ केली होती, तेंव्हा सै खूप आश्चर्यचकित झालेली दिसली होती.

मग अस्तादच्या खालोखाल नीच स्वभावाची बाई रेशम हिनेपण चोरीच्या टास्कमध्ये, अजून काही टास्कस मध्ये मेघाला इरिटेट करून, चिडायला लावून तिचे मोराल डाऊन करायची धुरा उचलली होती, ज्यात मला आठवतंय, त्या प्रमाणे स्मितानेही साथ दिली होती. मेघा चिडली की ही खदाखदा हसायची.

मेघाच्या अती बोलण्यावरून, तिच्या आवाजावरून कायम तिला हिणवले आणि आस्तादने मेघाला सगळं कळतं, सगळं माहिती असतं, अशी स्लोगन बनवून गायला सुरुवात केली.

हळूहळू आस्ताद त्याच्या मेघाला एकटं पाडण्याच्या प्रयत्नात यशस्वी झाला एकदाचा! ती कॅप्टनशीपची उमेदवार होऊ नये, म्हणून नंकिलाही शेवटच्या टास्कमध्ये भडकवलं, तिला दूध पाजून क्वीट करायला लाव, हे पु ला सुचवलं, तिच्यावर झुंडीने हल्ला करायला सगळ्यांना उद्युक्त केलं..
एखाद्या माणसाचा कसा पराकोटीचा दुस्वा:स करायचा, त्याच्या जीव खाऊन मागे लागायचं, अगदी समोरच्याचा जीव जाईस्तोवर, हे त्याच्याकडून शिकावं!
फायनली, सगळं त्याच्या मनासारखं झालं. आता तो शांतपणे झोपला असेल, बिबॉ च्या घरात!

Pages