बिग बॉस - मराठी २

Submitted by दक्षिणा on 10 June, 2018 - 23:02

बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162/

अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.

उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
पुष्कर जोग
सई लोकुर
मेघा धाडे
शर्मिष्ठा राऊत
अस्ताद काळे

1523851709_bigg-boss-marathi-contestants_6.jpgsharmishtha-raut_0.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मी मत स्मिताला दिलं, मेघाला मिळतील खूप. तिची काळजी नाही मला. आता जास्त सपोर्टर्स आहेत तिला.
>>>
अंजुतै तू नेहमी असंच करतेस बरं... किमान आत्ता तरी मला वाटलेलं मेघाला देशील..

यावेळेला मेघा आणि सईची मतं डिवाईड होणारेत या उलट रेशम गँगची सगळी मतं स्मिताला मिळणार आहेत.

मेघा सेफ असेल पण तिला भरपुर मतं मिळतील असं नाही वाटतेय मला.

नंकि आणि शरा पैकी कोणी तरी जाईल आता . शरा नको जाईला

आणि मेघाला म्हणत होती, एक मिनीटही वेस्ट करु नकोस.. Lol

>>>
हो ना, मला रागच आला.. मेंटल कुठली.. सई आवडत नाहीये, पुष्कर कधीच आवडत नव्हता पण आता जास्तच आवडत नाहीये.
रेशम आणि अस्ताद व्यवस्थीत शेवटी शेवटी आपली प्रतिमा सांभाळतायेत.
अस्तादला माहीत आहे आपण हा शो जिंकणार नाही तेंव्हा बाहेर जाउ तेंव्हा लोकांना फेस करता आलं पाहिजे
रेशमला माहीत आहे ती फायनल ला असणार, जिंकली नाही जिंकली तरी तिला फरक नाही पडत असं वाटतंय कारण तीने झोकुन देउन काही केलंच नाहीये त्यामुळे ती पण आता ईमेज सांभाळतेय
बरोबर योग्य वेळेला त्या दोघांनीही हे केलंय कारण मला पुर्वी यायचा तेवढा त्यांचा राग येत नाहीये आता Happy

मेघा कशाला गेली सई चं डोकं बिकं दाबायला...
ईतकी बोलली सई तिला...काही सेल्फ रीस्पेक्ट आहे की नाई मेघा ला....२ दिवस तरी जरा लांब बसायचं ना सई पासुन...

>>>>
प्रेम आहे तिचं सईवर... तुमचं तुमच्या बहिणीशी भांडण झालं म्हणुन तुम्ही ती आजारी असली तरी तिला हाडतुड करत अका?
पण मेघाने आता रिअ‍ॅलिटी समजुन घ्यायला हवी, सई इज नॉट गूड फॉर यू

बाकी स्मिता माणुस म्हणून फार छान आहे पण ती या घरासाठी योग्य नाही म्हणून तिला डंब म्हणलं जातं. स्मिता जिंकली नाही तरी तीने बराच फॅन क्लब जमवलाय हे नक्की.

शरा के व ढी लाऊड आहे, सतत किंचाळणे, लाडे लाडे हेल काढुन बोलणे, उगाच आरडा ओरडा Uhoh
पण ती मुळात तशीच आहे असं वाटतं

सई, मेघा आणि शरा यांना मिळणारी मतं विभागली जातील >>>पुष्कर सपोर्टर सईला देतील मतं, सईचा स्वतःचा क्लब आहेच. मेघा बद्दला तिला सपोर्ट मिळेल मिळेल करुन कोणीच मत दिलं नाही असं नको होईला Sad मला थोडीशी भिती वाटतेय

रिया काळजी करू नकोस, मेघाचे सपोर्टर्स जे सई ला मत देत होते ते पार विरुद्ध गेलेत, सो मि वर वाचलं मी सर्व. स्मिताला मी मत देत रहाणार, मला फायनलमध्ये तिला नेण्यात इंटरेस्ट आहे, रेशमपेक्षा. पण रे ला bb नेतील फायनलमध्ये. मेघा पण आरामात जाईल, प्रचंड पब्लिक सपोर्ट आहे, त्यामुळे स्मिताला दिलं.

फायनलमध्ये मात्र मेघाला मत देणार कारण तिला तिथे जितकी जास्त मिळतील मतं, तितकी चांगली.

पुंबा तुमच्यासारखाच विचार मी केला स्मिताला मत देताना.

आज स्मिता सर्वात गोड दिसत होती, सासुपेक्षा ती सून वाटत होती.

हो स्मिताने मस्त give up करायला लावलं, आ चं पण ऐकलं नाही, मग तिला कळेचना, की हिरा मिळेल की नाही, हिला खेळू द्यायचं की नाही, सु मो ताई मदतीला आल्या म्हणून बरं झालं.

रिया मेघाला सोडून श रा मतं कोणी देणार नाहीत असं वाटतं. एकत्र फॅन्स च्या मनातून सई कधीच उतरली आहे, बरेच जण मेघामुळे मतं देत होते.

मग तिला कळेचना >> इथेच कमी पडते ती Uhoh

मला उद्या बघायला मिळेल Happy

आईला फोन केलेला तेंव्हा आई बिबॉ बघत होती आणि शरा जोर जोरात केकाटत होती Uhoh सु मो ला बघुन कदाचित Proud

ती हिची सासु कुठल्या मालिकेत होती म्हणे?

रिया मेघाला सोडून श रा मतं कोणी देणार नाहीत असं वाटतं. एकत्र फॅन्स च्या मनातून सई कधीच उतरली आहे, बरेच जण मेघामुळे मतं देत होते.
>>
वर बघ की एकाने दिलंय Proud

देउ शकतात गं शराला पण ती जाऊ नये आणि मेघाला सपोर्ट रहावा म्हणून .. पण शरा गेली तर मेघा खरंच एकटी पडेल Sad

स्मिताला रे ग्रुप्ची सगळी मतं मिळणार, बहुतेक स्मिताला सगळ्यात जास्त मतं असतील, मग मेघा आणि सई, मग शरा आणि मग नंकी...
नंकी जाईल, २ जाणार असतील तर शरा जाईल.

स्मिताने शहानं होऊन ग्रूप बदलावा पण तिच्या आईने तिला जाताना ग्रूप सोडु नकोस सांगितलंय. स्मिताच्या ग्रूपला तिची काहीही पडलेली नाहीये हे पण तितकंच खरंय..

रेशम खरंच पिकनिक ला आलीये Proud

आता किचन कोण सांभाळतंय?

माझा क्रम फिनालेला बाहेर जायचा क्रम :-

पुष्की/स्मिता
अस्ताद
सई
रेशम/ मेघा पैकी एक विनर
मेघा डिजर्विंग आहे पण रेशम वर बिबॉ आणि चॅनलचं प्रेम आहे

शरा आनंदात आणि दु:खात फारच रडते. स्मिता छान दिसत होती आणि कन्फ्यूज झाल्यावर साडी सांभाळत सुमोला विचारायला गेली तेही फारच गोड. तिचा विश्वास बसत नसेल की रेशमने एवढ्या लवकर गीव्हप केलं पण ती रेशमची खासीयत आहे. मेघा विसरली की नंकि तिच्या टीममध्ये आहे आणि त्याला हिरा का देता म्हणून भांडत होती. पुष्करला छान पिळला आज मेघाने. रेशम आणि सुमो बोलत होत्या तेव्हा रेशम म्हणाली की काही लोकांच्या लेवलला मी जाऊ शकत नाही तेव्हा वाटलं की त्या काही लोकांनाही तेच वाटत असेल. मेघा जास्त आवडू लागली आहे.

खरं म्हणजे स्मिताचा छळ सर्वात परफेक्ट होता. एका सेकंदात रेशम बाहेर Lol , तिला खरे दोन हिरे द्यायला हवे होते सुमो ने. इतक्या लवकर कोणीच कोणाला give up करायला लावलं नाही आजच्या task मध्ये. आस्ताद स्मिताला उल्लू बनवायला आला, रे ला सिम्पथी मिळावी म्हणून पण स्मिता ठाम होती. नंतर तिला रेशमताईला give up करायला लावलं याचे वाईट वाटलं की हिरा मिळेल की नाही साशंक होती काय माहिती की, अजून छळायला हवं ताईला, हा काही छळ नव्हे वाटलं. जाऊदे मीच confused, म्हणून मी स्मिताला सपोर्ट करत असते.

स्मिताने शहानं होऊन ग्रूप बदलावा पण तिच्या आईने तिला जाताना ग्रूप सोडु नकोस सांगितलंय. स्मिताच्या ग्रूपला तिची काहीही पडलेली नाहीये हे पण तितकंच खरंय.. >>> आता बदलण्यात अर्थ नाही. मागे चान्स होता पण स्मिताला फक्त मेघा आवडते असं दिसून आले. पु आणि स शी तिचे पटत नाही, ते दोघे तिला पाण्यात बघतात.

स्मिताला रे ग्रुप्ची सगळी मतं मिळणार, >>> सांगता येत नाही. असा विचार मी नाही करू शकत. मी मत दिलं नाही आणि ती गेली तर मला वाईट वाटेल, मत देऊन गेली तर कमीतकमी मी तरी दिलं असं माझं समाधान.

शेवटी bb ला तिला ठेवायचं नसेल तर काढू शकतात हेही खरं.

सासू नाही आई होती ना जु ये रे गा मध्ये. >> हो की Happy

स्मिताचं नेमकं काय झालंय कळत नाही, इतके सुंदर टास्क करुन पण ती कॉन्फिडंट का नसावी बरं?

बाकीच्यांनी तिला डॉमिनेट केलंय बहुदा फारच..

मेघाला स्मिता आवडते आणि स्मितालाही मेघा आवडते.

मेघाला रेशम आवडत नाही पण रेशमला मेघा आवडते बहुदा (माणूस म्हणून) , रेशमला सई आजिबात आवडत नाही

voting बद्दल अजूनही मी confused, कोणीतरी इथे लिहिलं होतं ना, एक वोट valid पहील्यांदा दिलं ते. मी त्या terms condition वाचायला जाते पण फार कंटाळा येतो.

रोज आपण एक वोट देऊ शकतो का, म्हणजे जे धरलं जातं का.

मेघाला स्मिता आवडते आणि स्मितालाही मेघा आवडते. >>> हो. मेघा कधी वाईट बोलत नाही स्मिताबद्दल, सई बोलत असली तरी फक्त एकदा स्मितावरच्या रागाने बोलली तेवढंचं. स्मिताची मूळ चूक होती, मेघाची चूक अशी की डायरेक्ट स्मिताला न बोलता श रा ने विचारलं म्हणून उत्तर दिलं पण त्यात body shaming केलं तिने. पण माफी मागितली बहुतेक नंतर.

रिया, लायक असून confidence कमी, आपल्या कामाबद्दल नीट न सांगता येणं अशी अनेक लोकं असतात ती बिचारी मागे राहतात आणि काहीजण एवढंसं करून एवढे मोठे दाखवतात त्यामुळे पुढे जातात. स्मिता पहिल्या प्रकारातली आहे. घर आहे अनेक स्वभाव, अनेक गुण दोष असणारी माणसे आहेत इथे.

>>बाकीच्यांनी तिला डॉमिनेट केलंय बहुदा फारच..

त्यात आस्ताद एक नंबरला!
वीकेंडला पण तिने दिलेले उत्तर त्याच्या फेव्हरमध्ये नसेल तर तो तिला "असा पण विचार कर/ तसा पण विचार कर ' असले बोलबच्चन देउन गोंधळात टाकतो!

परवापण तिने स्वताचे काहीतरी लॉजिक लावून त्या काडेपेटीतल्या काडीची उपमा आस्तादला दिली होती पण मग आस्तादने तिला सोयीस्कररित्या गंडवून तो किताब पुष्करला द्यायला लावला!

परवापण तिने स्वताचे काहीतरी लॉजिक लावून त्या काडेपेटीतल्या काडीची उपमा आस्तादला दिली होती
>>
ते उगाच होतं पण Proud

उलट त्यावेळी स्मिता smart वाटली मला, tont मारला आस्तादला smoking बद्दल. ठिणगी टाकणाराशी काही संबंध नव्हता म्हणा त्याचा तरीही.

मला नाही वाटत तिला तेवढी अक्कल आहे Proud
अक्कल पेक्षा पण ती तेवढी कनिंग नाहीये, उगाच कोणाला टॉण्ट मारायला जाणार नाही ती Happy

एकदा प्रयत्न केला मेघाला काही तरी बोलायचा पण तीच तोंडावर पडली Proud

शरा फार आवडत नाही मला पण सई जायला हवी आता असं वाटतं. मेघासाठी श रा हवी. पण सो मि वर शराला खूप नावे ठेवताना दिसतायेत बरेच जण, बहुतेक त्यांना ती जायला हवीय.

Pages