चंद्राचा मंद प्रकाश सर्वत्र पसरला होता. शीतल चांदण्यात न्हाऊन निघत ती बगिच्यात ओट्यावर बसली होती. तिला ना रात्रीची फिकीर होती, ना उशीर झालाय हे दर्शवणाऱ्या घटिकायंत्राची! स्वछंदी मन असलेली ती जग काय म्हणेल याची पर्वा न करता रात्र जागून काढत होती. इतरांना सुखद वाटणारी चांदणी रात्र तिला मात्र वैशाख वणव्याप्रमाणे भासत होती. थुई थुई नाचत असलेली कारंजी सुद्धा तिचं मन उल्हसित करण्यास असमर्थ होती. आपल्या प्राणपतीची भेट व्हावी म्हणून ती विरहिणी तळमळत होती. व्याकुळ होऊन त्याच्या परतण्याची वाट पाहत होती. "आज तो माझ्या महाली का बरे आला नाही", ह्या प्रश्नाने तिचे काळीज व्यथित झाले होते. सवती शंकेने तिच्या मनात घर केले आणि ती आणखीनच दुःखी झाली. विरहात किती काळ गेला हे तिला समजलेच नाही! तिच्या हळव्या मनाला जणू आयुष्यभर त्याची वाट पाहत आहे असे वाटत होते!
पुन्हा एकदा तिला प्राणनाथांच्या आगमनाची चाहूल लागली. "हा आभास तर नव्हे? पदरव ऐकू आला, अश्वांच्या टापांचा आवाज का नाही आला?” मनातल्या शंकेने मान वर केली. पण तरीही कक्षाचे दरवाजे धावत जाऊन उघडण्यास ती अधीर झाली. पण आपोआपच दरवाजा उघडला गेला. दारातल्या व्यक्तीला पाहताच तिची म्लान मुद्रा खुलली आणि मुखावर सुखद हसू पसरले. होय, इतका दीर्घ विरह सहन केल्यानंतर आनंदाचा क्षण आला होता. ज्याची स्वप्ने पाहिली, तो यावा म्हणून अश्रु ढाळले, तो तिच्या समोर उभा होता. सगळंच स्वप्नवत!! ती त्याला बिलगली. त्याच्या मुखातून पाझरणारी अमृतवाणी ऐकण्यास ती उत्सुक होती. ते जाणून तो म्हणाला,
“तू ऑफिस मधून घरी आल्यानन्तर ४ तासांनी मी रोज घरी येतो! सेकंड शिफ्ट आहे,काय करणार. त्यासाठी स्वतःला असा त्रास नको देऊ, राणी! जेवली नसशीलच तू, चल, एकत्र जेवूया. मी आपलं एकच ताट वाढून घेतो!”
आणि अशा प्रकारे प्रेमी युगुलाची भेट होऊन विरहाचे ग्रहण सुटले, त्या दिवसापुरते तरी!
----------------------------------------------------------------------------------------------------
**किल्ली**
----------------------------------------------------------------------------------------------------
- सत्य घटनेवरून प्रेरित
छान लिहिलंय किल्लीताई.
छान लिहिलंय किल्लीताई.
मस्तच लिहिलंय अगदी!!!
मस्तच लिहिलंय अगदी!!!
पु.ले.शु.
जमेश खन्ना !
जमेश खन्ना !
बादवे - सेकंड शिफ्ट मुळे 4 तास उशीर होतोय तर सवती शंका का बरे?
Masta ch...khurchi Cha
Masta ch...khurchi Cha pudhcha bhag kadhi yenar?
छान लिहलंय!
छान लिहलंय!
मंडळ आभारी आहे, द्वादशांगुला
मंडळ आभारी आहे, द्वादशांगुला, मेघा, च्रप्स, अक्षय दुधाळ, Madhavi Chavda
अहो आमचया प्रश्नाचं उत्तर
अहो आमचया प्रश्नाचं उत्तर द्या की.
सेकंड शिफ्ट मुळे 4 तास उशीर
सेकंड शिफ्ट मुळे 4 तास उशीर होतोय तर सवती शंका का बरे?>>>>>>
ती अतिरंजित स्वप्न पहातेय, ती राणीतरी कुठेय!
खूप उशीर झाला आहे वाटत असते ना, त्यामुळे काहीबाही शंका येतात.
विरह मोड आहे तो !!!
khurchi Cha pudhcha bhag
khurchi Cha pudhcha bhag kadhi yenar?>>>>>
काही सांगता येत नाही हो, अर्धाच झालाय लिहून! आता तेच ध्येय आहे !
विलंबाबद्दल किल्ली दिलगीर आहे.
तोपर्यंत ही कथा सुचली, लिहून टाकली.
धन्यवाद किल्ली ☺️
धन्यवाद किल्ली ☺️
(No subject)
छान लिहिले आहे
छान लिहिले आहे
धन्यवाद अधरा
धन्यवाद अधरा
परीकथेतल्या राजकुमाराची
परीकथेतल्या राजकुमाराची आधुनिक गोष्ट!!!! कित्ती गोड. मस्त.
धन्यवाद डॉ. मनाली
धन्यवाद डॉ. मनाली
किल्लीताई काय बदल केलाय? परत
किल्लीताई काय बदल केलाय? परत दिसतोय नवीन मध्ये.
spaces , typos दुरुस्त केले
spaces , typos दुरुस्त केले
मस्त जमलिये कथा
मस्त जमलिये कथा
तिचा विरह नेमक्या भाषेत प्रभाविपणे मांडलाय मस्त
खुर्चिचा पुढचा भाग येऊद्या लवकर वाट बघतोय
पुलेशु
अंतिम भाग टाकला आहे : https:/
अंतिम भाग टाकला आहे : https://www.maayboli.com/node/66310
धन्यवाद akki320
धन्यवाद akki320
मस्त लिहीलय आवडल
मस्त लिहीलय आवडल
सुंदर
सुंदर
छान आहे
छान आहे
धन्यवाद mr.pandit, शीत,
धन्यवाद mr.pandit, शीत, अंबज्ञ
Awesome!
Awesome!
धन्यवाद vichar
धन्यवाद vichar