विरह मोड ऑन!

Submitted by किल्ली on 30 May, 2018 - 09:45

चंद्राचा मंद प्रकाश सर्वत्र पसरला होता. शीतल चांदण्यात न्हाऊन निघत ती बगिच्यात ओट्यावर बसली होती. तिला ना रात्रीची फिकीर होती, ना उशीर झालाय हे दर्शवणाऱ्या घटिकायंत्राची! स्वछंदी मन असलेली ती जग काय म्हणेल याची पर्वा न करता रात्र जागून काढत होती. इतरांना सुखद वाटणारी चांदणी रात्र तिला मात्र वैशाख वणव्याप्रमाणे भासत होती. थुई थुई नाचत असलेली कारंजी सुद्धा तिचं मन उल्हसित करण्यास असमर्थ होती. आपल्या प्राणपतीची भेट व्हावी म्हणून ती विरहिणी तळमळत होती. व्याकुळ होऊन त्याच्या परतण्याची वाट पाहत होती. "आज तो माझ्या महाली का बरे आला नाही", ह्या प्रश्नाने तिचे काळीज व्यथित झाले होते. सवती शंकेने तिच्या मनात घर केले आणि ती आणखीनच दुःखी झाली. विरहात किती काळ गेला हे तिला समजलेच नाही! तिच्या हळव्या मनाला जणू आयुष्यभर त्याची वाट पाहत आहे असे वाटत होते!
पुन्हा एकदा तिला प्राणनाथांच्या आगमनाची चाहूल लागली. "हा आभास तर नव्हे? पदरव ऐकू आला, अश्वांच्या टापांचा आवाज का नाही आला?” मनातल्या शंकेने मान वर केली. पण तरीही कक्षाचे दरवाजे धावत जाऊन उघडण्यास ती अधीर झाली. पण आपोआपच दरवाजा उघडला गेला. दारातल्या व्यक्तीला पाहताच तिची म्लान मुद्रा खुलली आणि मुखावर सुखद हसू पसरले. होय, इतका दीर्घ विरह सहन केल्यानंतर आनंदाचा क्षण आला होता. ज्याची स्वप्ने पाहिली, तो यावा म्हणून अश्रु ढाळले, तो तिच्या समोर उभा होता. सगळंच स्वप्नवत!! ती त्याला बिलगली. त्याच्या मुखातून पाझरणारी अमृतवाणी ऐकण्यास ती उत्सुक होती. ते जाणून तो म्हणाला,

“तू ऑफिस मधून घरी आल्यानन्तर ४ तासांनी मी रोज घरी येतो! सेकंड शिफ्ट आहे,काय करणार. त्यासाठी स्वतःला असा त्रास नको देऊ, राणी! जेवली नसशीलच तू, चल, एकत्र जेवूया. मी आपलं एकच ताट वाढून घेतो!”

आणि अशा प्रकारे प्रेमी युगुलाची भेट होऊन विरहाचे ग्रहण सुटले, त्या दिवसापुरते तरी!

----------------------------------------------------------------------------------------------------
**किल्ली**
----------------------------------------------------------------------------------------------------
- सत्य घटनेवरून प्रेरित Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जमेश खन्ना !

बादवे - सेकंड शिफ्ट मुळे 4 तास उशीर होतोय तर सवती शंका का बरे?

सेकंड शिफ्ट मुळे 4 तास उशीर होतोय तर सवती शंका का बरे?>>>>>>

ती अतिरंजित स्वप्न पहातेय, ती राणीतरी कुठेय!
खूप उशीर झाला आहे वाटत असते ना, त्यामुळे काहीबाही शंका येतात.
विरह मोड आहे तो !!!

khurchi Cha pudhcha bhag kadhi yenar?>>>>>
काही सांगता येत नाही हो, अर्धाच झालाय लिहून! आता तेच ध्येय आहे !
विलंबाबद्दल किल्ली दिलगीर आहे.

तोपर्यंत ही कथा सुचली, लिहून टाकली. Happy Happy Proud

मस्त जमलिये कथा
तिचा विरह नेमक्या भाषेत प्रभाविपणे मांडलाय मस्त
खुर्चिचा पुढचा भाग येऊद्या लवकर वाट बघतोय
पुलेशु