मनधरणी

Submitted by आनंद. on 24 May, 2018 - 12:18

"मनधरणी"

दिवसभर पोटांसाठी लाचारासारखी घिसापिट करून
बॉसचं ऐकून थांबल्यानं रात्री उशीरा घरी परतलो तेव्हा
फणकाऱ्यानं ती जेव्हा म्हणाली,
'कशाला आलास आत्ताशी ? काळं कर तुझं थोब्बाड'
खरं सांगू ? मलाही वाटलं द्यावा तिला एक जवाब, थुत्तरफोड !

प..पण..

सोफ्यावर निजलेल्या त्या चिमुकल्या जिवाला बघून शांत झालो मी
आणि
उद्याच्या शांतीसाठी घेतलेला पांढरा गजरा काढून धरला तिच्यासमोर
तेव्हा
तोही हसला माझ्यासारखाच दीनपणे केविलवाणा होऊन,
तिची मनधरणी करायला !

―र!/२४.५.१८

[थुत्तरफोड शब्दासाठी साभार, मायबोलीकर.]

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्तच. अगदी डोळ्यासमोर उभा राहिला हा प्रसंग.

<<< तोही हसला माझ्यासारखाच दीनपणे केविलवाणा होऊन,
तिची मनधरणी करायला ! >>> खरं आहे. Sad

छान आहे... Happy
पु. ले.शु.
आणि '21 वर्षांनी' पण पूर्ण करा की... Proud

उद्याच्या शांतीसाठी घेतलेला पांढरा गजरा काढून धरला तिच्यासमोर
तेव्हा >> Biggrin हल्ली कुणाचा राग जातो गजरा बघुन, मुळात गजरा घालणार्या सुद्धा दुर्मिळ झाल्यात

उगाच्च वढुन ताणुन केल्यासारखी वाटली

@ समाधी
गजराच असायला हवा असं कंपल्शन थोडीच आहे...गजरा हे एक प्रतीक असेल लेखकाने दर्शवलेलं... प्रत्यक्षात कोणीही दुसरी कुठली तरी आवडीची वस्तू देऊ शकतो ना तिची मनधरणी करायला.... लेखकाला तसं सांगायचं असेल.... Happy

अंबज्ञजी, उपाशी बोकाजी, अक्षय, द्वादशांगुला, सायुरी, पंडितजी, शालीजी, च्रप्स, मेघा, सिद्धी, समाधी सर्वांना मनापासून धन्यवाद ! Happy

@मेघा, लवकरच येईन त्या कथेचा पुढील भाग. Happy

@ च्रप्स, 'तो' म्हणजे गजरा !

@समाधी,
हो खरंय अगदी, 'गजरा घालणाऱ्या दुर्मिळ झाल्या आहेत !' पण ती माळते हो गजरा आणि गजरा बघून तिचा रागसुद्धा कुठल्या कुठे पळून जातो.. बस तेच लिहीलं मी जमेल तसं ! Happy

@आदिसिद्धी,
Exactly ! आवडीची कुठलीही वस्तू आणल्याने आपल्या प्रियजनांचा आलेला तात्कालिक राग चटकन विसरला जातो. Happy