Submitted by आनंद. on 24 May, 2018 - 12:18
"मनधरणी"
दिवसभर पोटांसाठी लाचारासारखी घिसापिट करून
बॉसचं ऐकून थांबल्यानं रात्री उशीरा घरी परतलो तेव्हा
फणकाऱ्यानं ती जेव्हा म्हणाली,
'कशाला आलास आत्ताशी ? काळं कर तुझं थोब्बाड'
खरं सांगू ? मलाही वाटलं द्यावा तिला एक जवाब, थुत्तरफोड !
प..पण..
सोफ्यावर निजलेल्या त्या चिमुकल्या जिवाला बघून शांत झालो मी
आणि
उद्याच्या शांतीसाठी घेतलेला पांढरा गजरा काढून धरला तिच्यासमोर
तेव्हा
तोही हसला माझ्यासारखाच दीनपणे केविलवाणा होऊन,
तिची मनधरणी करायला !
―र!/२४.५.१८
[थुत्तरफोड शब्दासाठी साभार, मायबोलीकर.]
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान
छान
मस्तच. अगदी डोळ्यासमोर उभा
मस्तच. अगदी डोळ्यासमोर उभा राहिला हा प्रसंग.
<<< तोही हसला माझ्यासारखाच दीनपणे केविलवाणा होऊन,
तिची मनधरणी करायला ! >>> खरं आहे.
छान __/\__
छान __/\__
छान लिहिलंय . 'एक विलन'
छान लिहिलंय . 'एक विलन' मूव्हीतला एक प्रसंग आठवला.
छान आहे..
छान आहे..
___/\___ डोळ्यासमोर उभा
___/\___ डोळ्यासमोर उभा राहिला प्रसंग
अप्रतिम
प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार
प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार !
मस्त! आवडली कविता.
मस्त! आवडली कविता.
तोही हसला माझ्यासारखाच दीनपणे
तोही हसला माझ्यासारखाच दीनपणे केविलवाणा होऊन,
तिची मनधरणी करायला !
>>> तो कोण?
छान आहे...
छान आहे...
पु. ले.शु.
आणि '21 वर्षांनी' पण पूर्ण करा की...
ती 21 वर्षांनी पूर्ण होणारे..
ती 21 वर्षांनी पूर्ण होणारे...सो डोन्ट वरी...
उद्याच्या शांतीसाठी घेतलेला
उद्याच्या शांतीसाठी घेतलेला पांढरा गजरा काढून धरला तिच्यासमोर
तेव्हा >> हल्ली कुणाचा राग जातो गजरा बघुन, मुळात गजरा घालणार्या सुद्धा दुर्मिळ झाल्यात
उगाच्च वढुन ताणुन केल्यासारखी वाटली
गजराच असायला हवा असं कंपल्शन
@ समाधी
गजराच असायला हवा असं कंपल्शन थोडीच आहे...गजरा हे एक प्रतीक असेल लेखकाने दर्शवलेलं... प्रत्यक्षात कोणीही दुसरी कुठली तरी आवडीची वस्तू देऊ शकतो ना तिची मनधरणी करायला.... लेखकाला तसं सांगायचं असेल....
अंबज्ञजी, उपाशी बोकाजी, अक्षय
अंबज्ञजी, उपाशी बोकाजी, अक्षय, द्वादशांगुला, सायुरी, पंडितजी, शालीजी, च्रप्स, मेघा, सिद्धी, समाधी सर्वांना मनापासून धन्यवाद !
@मेघा, लवकरच येईन त्या कथेचा पुढील भाग.
@ च्रप्स, 'तो' म्हणजे गजरा !
@समाधी,
हो खरंय अगदी, 'गजरा घालणाऱ्या दुर्मिळ झाल्या आहेत !' पण ती माळते हो गजरा आणि गजरा बघून तिचा रागसुद्धा कुठल्या कुठे पळून जातो.. बस तेच लिहीलं मी जमेल तसं !
@आदिसिद्धी,
Exactly ! आवडीची कुठलीही वस्तू आणल्याने आपल्या प्रियजनांचा आलेला तात्कालिक राग चटकन विसरला जातो.