हातांचे आरोग्य, निगा इ. अनुशंगाने चर्चा

Submitted by योकु on 15 May, 2018 - 07:42

माझे तळहात मुळात फार राठ आणि स्पर्शाला कडक आहेत. आजकाल तळहाताच्या मागील भागही कडकसर आणि राठ जाणवतो, स्पेशली नखांच्या जवळ आणि बोटं. इनफॅक्ट संपूर्ण लोअर फोरआर्म (मनगटापासूनचा हाताचा पुढला भाग) राठ आणि खरखरीत झालेत. नेहेमी कोरडे ठक्क जाणवतात.
यावर काही उपाय आहे का?

स्पेशली माझ्या बाळाला हाताळतांना हे मलाच फार जाणवतं... म्हणून उपाय विचारतोय.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रोज रात्री झोपण्यापुर्वी हाताला मॉईश्चरायझर लावा. माझे हात खरखरीत झाले होते याउपायाने फरक पडला. त्वचा राठ आहे तर रात्री मॉ. लावायच्या आधि १० मि. गरम पाण्यात हात बुडवून ठेवा आणि मग मॉ. लावा.

बॉडीशॉपचे HEMP हॅन्डक्रीम हातांच्या कोरडेपणावर उत्तम उपाय आहे. तुम्ही जर मोटरबाईक चालवत असाल तर हँड ग्लोव्हज नक्की वापरा.

नेहेमी मॉईश्च्रायझर लावून हायड्रेशन चा प्रश्न सुटेल पण राठ झालेले तळहात, नखांच्या मागच्या स्किनचे सालं सतत निघतात इ. वर काही करता येऊ शकेल का? घरच्या घरी मॅनिक्योर/पॅडिक्योर (हे नक्की काय असतं? असंच नेटवर मिळालंय मला शोधतांना...) करता येतं का? काय पर्याय असू शकतील याला?

योकु, मॅनिक्युअरने खूप फरक पड्र्लसं वाटत नाही, पडला तरी टेंपररी. मुळातच हात राठ आणि कोरडे असल्यास मॉईश्चराईज करुन जरा मऊ ठेवणं हाच उपाय असावा. मुळात स्किन तशी नसल्यास काय बदललं हे बघायला हवं.

योकु, भांडी विसरणे, घासणे इत्यादी कामे करत असताना gloves वापरा, कुठलेही केमिकल (including dish bar, detergents) साफसफाईची विशेष करुन, हातावर फार वेळ राहणार नाही याची काळजी घ्या,‌
नखांच्या बाजूला कडक होऊन साल निघत असतील तर रात्री झोपताना Vaseline लावता येईल. त्याने त्वचा जास्त वेळ मऊ पडते. नखाभोवती जिव्हाळं निघालं की ते लगेच nailcutter नी काढा म्हणजे ते वाढत नाही.
माझी आजी ‌‌‌‌‌‌‌‌दह्य दुधाचे पातेले घासायला टाकण्या‌ आधी चोपडे हात कोपरा पर्यंत चोळून घ्यायची Happy तिचे हात पाय इतके मऊ आहेत अजूनही.

द बॉडी शॉपचे हेम्प हँड क्रीम खरोखर अफलातून आहे. नक्की वापरा. वास जरा घाण आहे फक्त. अ‍ॅक्चुली घाण नाही. असा आजीच्या मलमांना यायचा तसा वास आहे.

इथे मायबोलीवरच वाचले होते, बहुतेक रूनी पॉटरने लिहिले होते. ग्लिसरीन, एरंड तेल व कुठलेही मॉइस्राईझर समप्रमाणात एकत्र करून ठेऊन ते झोपायच्या आधी लावा. माझेही तळहात खूप कोरडे आहेत. मी अधून मधून हा उपाय करते. आधी तीनही गोष्टी मिसळून ठेवलेल्या पण तो वास आवडला नाही. आता ग्लिसरीन व एरंडेल वेगळेच ठेवलेय, हातावर समप्रमाणात घेऊन मिक्स करते व हातापायाला चोळते. फरक पडतो.

विकतच्या मॉइस्राईझरमध्येही ग्लिसरीन व एरंडेल असते. हे दोन्ही घटक त्वचा मऊ करतात.

कुरुडी मला वाटतंय की पाईण सापडला मला, सिंक्स साफ करतांना वगैरे ते केमिकल जराश्या प्रमाणात का होईना पण हाताला लागतंच, आणि आता लक्षात येतंय की बाथरूम्स साफ केल्यावर जास्तच कोरडे होतायत हात.
वर दिलेले उपाय करून पाहायला हवे...

लिंबाची साल चोळल्यानी फरक पडेल का काही? निबर झालेली स्किन कमी व्हायला वगैरे?

माझा धाकटा गेली ५-६ वर्षे जिम्नॅस्टिक्स मधे भाग घेत आहे. आठवड्याला १०-१५ तास पॉमेल, मश्रूम, स्टिल रिंग्स, पॅरलल आणि हाय बार यांची प्रॅक्टिस . शिवाय कंडिशनिंग / स्ट्रेन्थ ट्रेनिंग म्हणून प्लँक्स / पुल अपस इत्यादी . त्याच्या हाताला घट्टे आणि ब्लिस्टर्स कायम असतात.
त्याचे कोचेस सांगतात की रात्री झोपताना पेट्रोलियम जेली चोपडून मग हातावर मोजे घालून ठेवायचे. आठवड्यातून ३-४ वेळा तरी त्याला हे करायला लावतो आम्ही. त्याच्याने खूप फरक पडतो. अलिकडे बॉडी शॉप चं कोको बटर ट्राय केलं त्याने आणि ते त्याला आवडलंय. सकाळी आंघोळ झाल्यावर कोको बटर आणि रात्री पेट्रोलियम जेली.

इथे काही बागकाम / सुतारकाम वगैरे करणारी मंडळी बॅग बाम नावाचे प्रॉड्क्ट पण वापरतात .