पाटील v/s पाटील - भाग ३

Submitted by अज्ञातवासी on 11 May, 2018 - 08:41

भाग २ - https://www.maayboli.com/node/66097

मी अंबाबाईच्या समोर उभा होतो. मात्र समोरचा दृश्य चक्रावणारं होतं.
या अवस्थेत अंबा पाटलिनीला कुणी बघितलं असत, तर त्याला अंबा पाटलीन ओळखूच आली नसती.
अंबा पाटलीन एका पलंगावर टेकून बसली होती. आढ्याकडे डोळे लावून...
रडायचंय, पण डोळ्यात पाण्याचा टिपूस नाही, अशी अंबाची अवस्था होती.
"अण्णा, मी चुकली रे..."
"आई... असं नको बोलू... जे झालं ते झालं," अण्णा लहान मुलासारखा रडायला लागले
"डॉक्टर आजीला चेक करा... "ताईने आज्ञा दिली. 
"अहो पण मी...."
"सांगितलं ना..." ताईने डोळे वटारले.
मी उगाच काहीतरी चाळा करायचा म्हणून पलंगाकडे वळलो
"हात लावायचा नाही..."
अंबा पाटलीनीने इतका जळजळीत कटाक्ष टाकला, कि मला वाटलं मी जळून खाक होईल.
आणि...आणि.... आणि... अख्या गावाला, म्हाताऱ्या कोतार्यांना, आणि गुरा ढोराना उभ्या हयातीत जे दिसलं नाही ते मला दिसत होत.
अंबा रडत होती.....ढसाढसा....
अण्णाही लहान मुलासारखे रडत होते.
मला ह्यांचा माझ्या नव्या कॅमऱ्यावाला मोबाईल मध्ये फोटो काढायचा होता. शेवटी माझ्यातही खोडकर, निरागस वगैरे मूल दडलं होत ना... पण हा प्रताप केल्यास मी फोटोमध्ये जाईन हे मला लवकर ध्यानात आलं.
'शिरपा येड्याचा डॉक्टर होऊ नको.... 'मला वडिलांचे शब्द आठवत होते.
"अण्णा मी चुकली. तुझी आई चुकली. उशीर केला रे अण्णा खूप मी..."
"आई शांत हो..."
तेवढ्यात एक बाई वर आली...
"मीने, सोनी तुम्ही बाहेर जा बघू... डॉक्टर तुम्हीही जा..."
अच्छा, ताईच नाव मीने होत तर....
आम्ही तिन्हीही आगगाडीप्रमाणे बाहेर पडलो....
"सोनी तू तुझ्या रूममध्ये जा. बाकीचे उपचार नंतर बघू. डॉक्टर तुम्ही माझ्या रुममध्ये या." मीने म्हणाली.
"ओ मिनेताई, मी तसला माणूस नाही... "मी रागात म्हणालो.
"ये यडपट, तसाही तुला बायकांमध्ये रस दिसत नाही, मघाशी त्या दोघांना कसा चिकटून बसला होता, बघितलं मी. आणि मिनल... समजलं ना? मिनल ताई...चल...."
मी निमूटपणे मिनेच्या मागे निघालो...
"बसा... "मी निमूट बसलो.
"पाणी घ्या... "मी घेतलं
"इथे काय होतंय, बाहेर कुणालाही कळता कामा नये..."
मी मान डोलावली.
"सगळं सांगतेय... नीट ऐका... सोनीच्या उपचारांची जबाबदारी तुमच्यावर आहे. म्हणून तुम्हाला सगळं माहिती असायला हवं..."
मी पुन्हा मान डोलावली.
"मोहन पाटील. हेच नाव होतं त्याचं......"

युक्रेन.....

टक टक..दारावर आवाज झाला.
"कम इन..."
"हॅलो सर."
"अरे वा, पाटील स्टील आज आमच्याकडे. वाह!"
"हो सर, तुम्ही मला यायला भाग पाडलंय."
"मोहन, अरे हा बिजनेस आहे, इथे असं चालतंच."
"हो सर. पण तुम्हाला पाटील स्टील विकत घेऊन फायदा काय? इट्स नॉट युअर कोर बिजनेस."
"मला बिजनेस विकत नाहीये घ्यायचा मोहन... मला नाव विकत घ्यायचंय... पाटील...."
मोहन हसला... अगदी खळखळून...
"एक मिनिट... "तो उठला, आणि पाणी पिऊन पुन्हा जोरजोरात हसायला लागला.
थोड्या वेळाने तो हसायचा थांबला.
"माझ्या काकांनी मला एक गोष्ट सांगितली होती येताना..."
"काय?"
"समोरच्या माणसाकडे पैसे आहेत, पण अक्कल नाही."
''मोहन, तुझ्या पायाखालची जमीन सरकलीये असं म्हण ना..."
"ओके. मी थोडा डेटा कलेक्ट केलाय."
मोहन सफाईदारपणे बोलू लागला.
"आपली कंपनी. रलो केमिकल्स. याचे सव्वीस टक्के शेयर्स आपल्याकडे आहेत बरोबर? बारा टक्के कोणाराला पावर कडे. सात टक्के सोंसता जपान मध्ये. आणि अजून सहा टक्के इंदोल चायनाकडे. एकोणपन्नास टक्के शेर मार्केट मध्ये ओपन आहेत...."
मोहन, जे तू कितीही जोर लावला, तरीही तेवढे शेअर तुला मिळणार नाही.
"नाही हो... मी तेवढे शेयर घेऊच शकलो नाही... मला फक्त वीस टक्के मिळाले."
"मोहन, इट्स सुईसाईड... तुझ्या कंपनीचे छत्तीस टक्के शेर माझ्याकडे आहेत, आणि ते सोडून तू वीस टक्क्यांवर खेळतोय?"
"सॉरी.. अडतीस टक्के..."
"काहीही हं मोहन..."
"अरे हो, बोलता बोलता सांगायचं राहील.. आम्ही कोणाराला पावर आणि इंदोल चायना विकत घेतलीये.. "
"काय......"
"याला म्हणतात पायाखालची जमीन सरकणे. पुढच्या आठवड्यात ही घोषणा होईलच. त्यानंतर एक बोर्डची मीटिंग. मग आमचा मेजर शेर असल्याने आमचा एम डी, आणि तुमची हकालपट्टी..."
"मोहन, हे महागात पडेल."
इतका वेळ शांतपणे बोलणारा मोहन आता उठला....
"धमकी?"त्याने रोखून बघितले...
"धमकी नाही. चेतावणी..."
मोहनने कपाळावर हात चोळला.
"वेट... मी बोलतोय थोडं."
काही क्षण असेच शांततेत गेले. आणि मोहन जोरात किंचाळला.
"खंडेराया, का माझी परीक्षा घेतोस. का? आज शांततेत सगळ केलं ना मी. एवढे भारी डायलॉग मारले, आणि आता हा पामर मला चेतावणी देतोय... का?... का?..."
.... आणि मोहनने सरळ पिस्तुल काढून त्याच्यावर रोखली...
तो क्षणभर चपापला, आणि मात्र पुढच्याच क्षणी तो सावरला.
"इथले कॅमेरे तुला दिसले नाहीत वाटत?"
मोहन वेड्यासारखा हसत सुटला.
"तू या डब्याना कॅमेरे म्हणतोस. तुझ्या सहा महिन्यात १२ सेक्रेटरी बदलल्या. तू इथे काय करतोस हे कुणालाही दिसू नये, म्हणून तू फक्त हे डबे लावलेत, लोकांना घाबरवायला..."
"..तुला हे कुणी सांगितलं"
"तुला काय वाटलं, पोरी तुझ्यावर खुश असतात? त्यापैकी एकीला आमच्या एक माणसाने विश्वासात घेतलं, आणि.... सोड रे. तुला मारणार नाही मी. एकदा तुझं एम डी पद गेलं, तर तुझी अवस्था नांगी ठेचलेल्या विंचवासारखीच होईन."
तो फक्त बघत होता. असहायासारखा!
"चल निघतो. आजी थालीपीठ बनवणार आहे. ते गरम गरम खाल्ले नाहीत ना, तर सात जन्माचं पाप लागेल मला. गुड बाय."
मोहन पाटलाची फक्त ही एक चुणूक होती....
....मोहन पाटील, हाच मोहन पाटील पाटीलवाडीत येऊन अंबा पाटलीनीच घर हलवणार होता....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त जमलाय हाही भाग. हळूहळू डोक्यात शिरतंय प्रकरण. पण पुढे काय होईल अजिबात कळत नाहीय. पुभाप्र. Happy

Radaaaaaaaaaa
Honarya ki ky........