तारा खाई दाणे (विडंबन)
Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago
34
चाल - वारा गाई गाणे
तारा खाई दाणे
चुरमुरे, फुटाणे
रोज तिला लागे
नवे नवे खाणे ऽ
तारा खाई दाणे ॥
गोड आवडे, तिखट आवडे
कशाचे नसे तिला वावडे
बका बका खा ऽ णे, लठ्ठ होत जाणे ऽऽ
तारा खाई दाणे ।
ह्या पुण्यामधे खूप हॉटेले
एकही नसे तिने सोडले
कर्ज काढतो ऽ मी, भागविण्या देणे ऽऽ
तारा खाई दाणे ।
तिला वेड हे कुणी लाविले
कुणी पुरविले तिचे चोचले
दोष तिचा ना ऽ ही, खादाड घराणे ऽऽ
तारा खाई दाणे ॥
विषय:
प्रकार:
शेअर करा
(No subject)
परत एकदा
परत एकदा सर्वांना धन्यवाद...
अश्विनी तुझ्या मैत्रीणींना पण धन्यवाद सांग...
-------
हे ऐकलेत का? मराठी गझल इ-मुशायरा
(No subject)
मिल्या
मिल्या
बाकी वैनीच्याही सुचनेवर जरा लक्ष देऊन बघ 
*********************
प्रतिकार आणि प्रतिहल्ला यात फरक असतो!
स्वसंरक्षणार्थ असतो तो प्रतिकार अन् दुसर्याला स्वरक्षणाची संधी देतो तो प्रतिहल्ला! 
Pages