मायबोली अँड्रॉईड अ‍ॅपची खुली चाचणी (open Beta testing)

Posted
2 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
2 वर्ष ago
Time to
read
<1’

२०१७ मधे मायबोलीची मोबाईल सुलभ आवृती प्रकाशीत झाल्यापासून , मोबाईलवरून मायबोलीवर येणार्‍यांची संख्या प्रकर्षाने वाढली आहे. मायबोलीचे अ‍ॅप असावे अशी सुचना बर्‍याच मायबोलीकरांकडून येत असते. यावर बरेच दिवस काम सुरु होते. मायबोलीचे अँड्रोईड अ‍ॅप आजपासून खुल्या चाचणीसाठी (open Beta testing) खालील ठिकाणी उपलब्ध आहे.
https://play.google.com/apps/testing/com.maayboli.mbapp1

चाचणी खुली असल्याने कुणालाही लिंक पाठवल्यास हरकत नाही. या आवृत्तित डेस्कटॉपवरच्या सगळ्या सुविधा अजून उपलब्ध नाहित. पण तुमच्या वापरावरून कुठली सुविधा आधी देता येईल या कडे लक्ष देतो आहे.

सध्या असलेल्या प्रमुख सुविधा

१. मोबाईल ब्राऊझरपेक्षा कमी डेटा लागेल
२. मोबाईल ब्राऊझरपेक्षा पटपट चालावे/पळावे अशी अपेक्षा.
३. एकदा लॉगीन केल्यावर, पुन्हा पुन्हा लॉगीन करण्याची गरज नाही.

सध्या नसलेल्या प्रमुख सुविधा.

१. थेट देवनागरीत लिहता येत नाही. पण तुमच्या मोबाईलमधे गुगल इनपुट टुल किंवा इतर युनिकोड कीबोर्ड असेल तर ही अडचण जाणवणार नाही.
२. मायबोलीचे सगळे कप्पे /विभाग अजून दिसत नाहीत. पण एखाद्या विभागात नवीन लेखन / प्रतिक्रिया आली तर तो भाग "नवीन लेखनात" दिसेल आणि तिथे जाता येईल.
३. शोध सुविधा अजून नाही.

या अगोदरच्या चाचण्यात चिन्नु, टवणे सर, उपाशी बोका, चिनूक्स, नरेन., भास्कराचार्य, अमितव, फारएण्ड यांनी मदत केली त्यांचे आभार. त्यांनी केलेल्या सगळ्या सूचना वेळेअभावी अंमलात आणू शकलो नाही. काही आणल्या . इतरांवर अजून काम सुरु आहे.

अँड्रोईड अ‍ॅप थोडे दिवस वापरात आले की मग आयफोन अ‍ॅप तयार करायला घेऊ.

तुम्हाला काही अडचणी आल्या, काही चुका सापडल्या , नवीन कल्पना सुचवायच्या असतील तर इथेच सांगा.

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

>फायनल रिलिज्ड वर्झन परत डाऊनलोड करावे लागेल का?
नाही . हेच सध्या फायनल रिलीज आहे. मेसेज बदलला नाहीये.

ईमेज अपलोडची अडचण का येते आहे ते शोधतो आहे.

छान आहे app.
अभिनंदन . अभिप्राय देईनच गुगलवर.

>वर ग्रुपमध्ये नविन यावर टिचकी मारली तर तुम्हाला या पानावर जायची परवानगी नाही असा संदेश येतो आहे.
तुम्ही मेनू-> सदस्यत्व इथे जाऊन लॉगीन केले तर तो संदेश यायला नको. इथे वेबवरही हे असेच आहे.

Pages