मायबोली अँड्रॉईड अ‍ॅपची खुली चाचणी (open Beta testing)

Posted
1 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
1 वर्ष ago
Time to
read
1’

२०१७ मधे मायबोलीची मोबाईल सुलभ आवृती प्रकाशीत झाल्यापासून , मोबाईलवरून मायबोलीवर येणार्‍यांची संख्या प्रकर्षाने वाढली आहे. मायबोलीचे अ‍ॅप असावे अशी सुचना बर्‍याच मायबोलीकरांकडून येत असते. यावर बरेच दिवस काम सुरु होते. मायबोलीचे अँड्रोईड अ‍ॅप आजपासून खुल्या चाचणीसाठी (open Beta testing) खालील ठिकाणी उपलब्ध आहे.
https://play.google.com/apps/testing/com.maayboli.mbapp1

चाचणी खुली असल्याने कुणालाही लिंक पाठवल्यास हरकत नाही. या आवृत्तित डेस्कटॉपवरच्या सगळ्या सुविधा अजून उपलब्ध नाहित. पण तुमच्या वापरावरून कुठली सुविधा आधी देता येईल या कडे लक्ष देतो आहे.

सध्या असलेल्या प्रमुख सुविधा

१. मोबाईल ब्राऊझरपेक्षा कमी डेटा लागेल
२. मोबाईल ब्राऊझरपेक्षा पटपट चालावे/पळावे अशी अपेक्षा.
३. एकदा लॉगीन केल्यावर, पुन्हा पुन्हा लॉगीन करण्याची गरज नाही.

सध्या नसलेल्या प्रमुख सुविधा.

१. थेट देवनागरीत लिहता येत नाही. पण तुमच्या मोबाईलमधे गुगल इनपुट टुल किंवा इतर युनिकोड कीबोर्ड असेल तर ही अडचण जाणवणार नाही.
२. मायबोलीचे सगळे कप्पे /विभाग अजून दिसत नाहीत. पण एखाद्या विभागात नवीन लेखन / प्रतिक्रिया आली तर तो भाग "नवीन लेखनात" दिसेल आणि तिथे जाता येईल.
३. शोध सुविधा अजून नाही.

या अगोदरच्या चाचण्यात चिन्नु, टवणे सर, उपाशी बोका, चिनूक्स, नरेन., भास्कराचार्य, अमितव, फारएण्ड यांनी मदत केली त्यांचे आभार. त्यांनी केलेल्या सगळ्या सूचना वेळेअभावी अंमलात आणू शकलो नाही. काही आणल्या . इतरांवर अजून काम सुरु आहे.

अँड्रोईड अ‍ॅप थोडे दिवस वापरात आले की मग आयफोन अ‍ॅप तयार करायला घेऊ.

तुम्हाला काही अडचणी आल्या, काही चुका सापडल्या , नवीन कल्पना सुचवायच्या असतील तर इथेच सांगा.

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

In app purchase चा पर्याय असावा. ( for add free version )
खालच्या पट्टीतील जाहिरातींचा त्रास होतो

नवीन पोस्ट सेव्ह केल्यावर, लगेच दिसत नाही, पण रिफ्रेश केल्यावर पोस्ट झाल्याची पाटी येते वरती, मग पोस्ट झाली आहे हे लक्षात येते
आत्ता गूगल ची स्मायली टाकून बघितली, आणि एरर आली..

In app purchase चा पर्याय असावा. ( for add free version )
खालच्या पट्टीतील जाहिरातींचा त्रास होतो

इमेज टाकायला काय करायचे ते कळत नाहीयेनेहमीच्या प्रकारे इमेज वर क्लिक केल्यावर डायरेक्ट लिंक आली नाही एडिटिंग बॉक्स मधे

Error
The website encountered an unexpected error. Please try again later.
स्मायली टाकल्यावर सेव्ह करताना ही एरर येते आहे

एखादे पान बघितल्यावर मागे गेल्यावर ते पान बघितले आहे हे अँप रिफ्रेश केल्याशिवाय कळत नाहीये, मुद्दाम रिफ्रेश करायला लागते आहे.

मिसिंग नोड्स.. Sad

☺️

तुमच्या सगळ्यांच्या सूचनांबद्द्ल आणि चाचणीसाठी केलेल्या मदतीबद्दल धन्यवाद.

१) रिप्लाय देताना संबंधित आयडीला टॅग करायची सुविधा द्यावी.
> ही सुविधा अ‍ॅपच्या कक्षेबाहेर आहे , त्या साठी आधी मायबोलीच्या गाभ्यात बदल करावे लागतील कारण ती वेबवरही चालावी लागेल. सूचना चांगली आहे पण इतक्यात देता येणार नाही. सध्या अ‍ॅप सगळ्यांसाठी प्रकाशीत करण्यावर लक्ष केंद्रीत करतो आहे.

२)फॅंट छोटे करावे पानांवर धाग्याचा मजकूर मोठा दिसतोय त्यामुळे धागे कमी दिसत आहे.
फाँट लहान/मोठे सेटींग मधे जाऊन तुमचे तुम्हाला करता येतात. पण तुमचा प्रश्न फाँट मुळे नसून आजूबाजूच्या जागेमुळे असावा असे वाटते.

३) डाव्याबाजूस मेन्यु मध्ये सेटींग वगैरे ची सुविधा असताना पुन्हा उजव्याबाजूस पण का दिली आहे?
चांगली सूचना. डाव्या बाजूचा मेनी नेहमी वापरला जाईल आणि उजवा तुलनेने कमी वापरला जाईल असा अंदाज आहे. त्यामुळे डावीकडून ही सुविधा काढून टाकू

४)मला पोस्ट सेव्ह केल्यावर ती तशीच एडिटरमध्ये दिसत राहते. पेज रिफ्रेश होत नाही. मात्र प्रत्यक्षात ती पोस्ट कमिट झाली होती.
ही अडचण बर्‍याच जणांना आलेली दिसते. एकापेक्षा जास्त प्रतिसाद त्यामुळेच येत आहेत असे वाटते. शोध घेतो आहे.

५)Location aani file access permissions havya?
हो टाईमझोन, फोटो अपलोड आणी भविष्यातल्या काही सुविधांसाठी. तुमच्या परवानगीवाचून तुमचे लोकेशन इतर मायबोलीकरांना दिसणार नाही.

६)फेवरेट केलेले लिखाण ऑफलाईन मिळण्याची सोय हवी
हे बर्‍यापैकी अवघड आहे. त्यामुळे पहिल्या आवृत्तीत (version 1) शक्य नाही.

७)गुगल किबोर्ड बरोबर असणार्‍या स्मायलीज वापरल्या की एरर येते आहे..
नक्की कुठल्या स्मायलीज ना आली हे कळेल का? चाचणीत मला सापडली नाही.

८)लेखन फिट होत नाहि आहे विण्डो मधे. खालि बार दिस्तो आहे उजवी-डावी कडे हलवण्या साठि
पाह्तो काय करता येते ते.

९)आवडत्या मायबोलीकरांचे लेखन ची विन्दो असायला हवी
हम्म?? हे दिसायला हवे (नवीन लेखनच्या वर आत्ता दिसते तिथेच) तुम्हाला दिसत नाहीये का?

१०)मला इतका वेळ या धाग्यावरचे प्रतिसादच दिसत नव्हते. मुख्य पानावर मात्र 8 प्रतिसाद
तुम्ही अ‍ॅपमधे लॉगीन केले नसेल तर तुम्हाला काही वेळापूर्वीची पाने दिसतात त्यात कमी प्रतिसाद असू शकतात. हे फक्त अ‍ॅप नाही तर लॅपटॉपवरही लॉगीन केले नसेल तर होते.

११)प्रतिसाद सेव्ह केल्याचे बटण दाबल्यावर "your comment has been saved" हा मेसेज यायला वेळ लागतोय.
किंवा मला पोस्ट सेव्ह केल्यावर ती तशीच एडिटरमध्ये दिसत राहते. पेज रिफ्रेश होत नाही.
ही खरी अडचण आहे त्यामुळे एकापेक्षा जास्त प्रतिसाद दिले जात आहेत.

१२)नोटीफिकेशन्स आहेत का? असणार आहेत का?
असतील. पण पहिल्या आवृत्तित कुठले जमतील ते ठरले नाही.

१३)अॅप सुरू केल्यावर, सगळ्यात पहिले गुलमोहर वर जाते. जर मला ते नेहमी नविन लिखाण वर जावे असे वाटत असेल तर तसा प्रेफरन्स सेव्ह करता येईल अशी सुविधा देता येऊ शकेल काय?
पहिल्या आवृत्तित ही सोय नसेल. पण चांगली कल्पना आहे. सुरुवातीला सगळ्यांनाच अ‍ॅप " नविन लेखन" दिसेल असे होते. पण जे मायबोलीकर नाहीत त्यांच्यासाठी हा गोंधळात टाकणारा अनुभव आहे असा फीडबॅक मिळाला. कारण त्याना फक्त लॉगीन खिडकी दिसत राहिली.

१४)हे लेखन प्रसिद्ध झालं ति वेळ आणि शेवटचा प्रतिसाद आल्याची वेळ एकच दिसत आहे. शेवटचा प्रतिसाद आल्याची वेळ अपडेट होत नाहीये.
हा जुना प्रॉब्लेम इथे वेबवरही आहे . अ‍ॅपशी निगडित नाही.

१५) एरवी इतर दुसर्‍या अ‍ॅपमधून, ब्राउजरमधून जर माबो ची लिंक आली तर ती आपोआप अ‍ॅपमध्ये उघडत नाही. ब्राउजर मध्येच उघडते. अ‍ॅमेझॉन किंवा अशा काही अ‍ॅप्सच्या लिंक्स कुठूनही आल्या तरी त्या अ‍ॅपमध्येच उघडतात. असं काही करता येईल का इथेही?
खूप चांगली सूचना पण वेळेअभावी पहिल्या आवृत्तित जमेल का ते माहिती नाही. दुसर्‍या आवृत्तीत नक्की प्राधान्य देऊ.

१६) In app purchase चा पर्याय असावा. ( for add free version )
पहिल्या आवृत्तित तरी ही सुविधा नसेल.

१७)इमेज टाकायला काय करायचे ते कळत नाहीयेनेहमीच्या प्रकारे इमेज वर क्लिक केल्यावर डायरेक्ट लिंक आली नाही एडिटिंग बॉक्स मधे
शोध घेतो आहे असे का होते

१८) एखादे पान बघितल्यावर मागे गेल्यावर ते पान बघितले आहे हे अँप रिफ्रेश केल्याशिवाय कळत नाहीये, मुद्दाम रिफ्रेश करायला लागते आहे.
हे सोडवायला बरेच अवघड वाटते आहे. पण प्रयत्न करून पाहतो. पानाच्या शेवटी नोड नंबर दिला तर मदत होईल का?

App काढण्याचा उद्देश नक्की काय असतो?
१) ब्राउजर वापरावा न लागणे?
२) ते ओएस /अॅप वापरणाय्रांना एकसारखे दिसावे?
३) अॅपसााठी वेगळी मेमरी घ्यावी लागते का?
४) युट्युब व्हिडिओ प्लेअर देता येतील का?
५) विंडोज १० अॅपसाठी विशेष कोड लिहावा लागतो?
६) क्रोममध्ये ओफलाइन डाउनलोड करता येते तसे करता येईल?
७) व्ह्यु अॅज पिडीएफ?

नोटीफिकेशन ची गरज काय मला कळले नाही. आपल्या लेखावर जर प्रतिक्रिया आल्यात तर त्याची नोटीफिकेशन येणे लेखकालाच थोड्यावेळेत कंटाळवाणे होईल. ज्याचा धागा पेटला Wink त्याचे नोटीफिकेशन्स पण पेटतील. स्वतंत्र विपू आली तर त्याची नोटीफिकेशन यावी ते महत्त्वाचे आहे. अन्यथा बरेच लोक महिनोंमहिने विपू चेक करत नाही.

* हो मी फाँट कमी केला तरी पेज वरची जागा आहे तशीच आहे

धागा रिफ्रेश कसा करायचा?

धागा काढल्याची तारीख,प्रतिसाद तारीख- वेळ?

( हे एपमधून देत/लिहित आहे.)

दोनतीन ट्याब्झ उघडणे?
ओफलाईन धागा सेव?
फेवरिट = बुकमार्क करणे,
फेवरिट्स = साठवलेले बुकमार्कस.

छान
छान
छान.

ऍपमध्ये सेटिंगमध्ये फँट बदल करूनही तो बदल दिसून येत नाही.
टाईप करताना ऍड बंद करता येतील का? मोठ्या स्क्रिनवर सुद्धा टायपिंगचा विंडो छोटा दिसतो..

खालच्या पट्टीतील जाहिरातींचा त्रास होतो +१२३

एखाद्या बीबीवर कमेंट देऊन पेज रिफ्रेश केल्यास मला बीबीच्या नावापुढे माझीच कमेंट "१ नवीन प्रतिसाद" अशी दिसते. उत्साहात उघडून बघते तर मीच नुकतीच दिलेली कमेंट. थोडक्यात आपणच नव्याने दिलेल्या कमेंट्स सुद्धा ऍप आपल्यालाच नवीन प्रतिसाद आला आहे अशी दाखवतो आहे.

अजून एक म्हणजे फेसबुकप्रमाणे ह्या ऍपमध्ये कोणीही बीबीवर दिलेल्या कोणत्याही लिंक्स ऍपमध्येच उघडतात. तर हे असेच असणे अपेक्षित आहे का?

उदा. बिगबॉस च्या धाग्यावर कोणीतरी ट्विटरची लिंक दिली होती तर ट्विटरदेखील माबो ऍप मध्येच उघडले. ब्राउझर किंवा ट्विटर ऍप मधून नाही. ते वाचून झाल्यावर बॅक दाबले तर पुन्हा माबोचे मूळ पान दिसले.

>उघडलेला धागा बंद कसा करायचा?

१) सगळ्या स्क्रीनवर फोनचे बॅक बटन चालते.
२) "नवीन लेखन" सोडून इतर स्क्रीनवर, वर मागे जायचा बाण येतो त्यानेही मागच्या पानावर जाता येते.

शोध चालू आहे. काही दिसतात काही दिसत नाही. असे लक्षात आले आहे की सगळ्याच नवीन धाग्यांवरचे प्रतिसाद काही काळ दिसत नाहीत . नंतर दिसायला लागतात.

>काही नवीन बाफ उघडल्यावर तिथे केलेल्या कमेंट्स दिसत नाहीयेत

ही अडचण आता ९९% सोडवली आहे असे वाटते. थोडी सोडवायला अवघड होती म्हणून १००% सांगत नाही. पण अजून येत असेल तर इथे सांगा.

१) बॅक बटन - हे वापरून मागे अनुक्रमणिकेत नवीन लेखन इत्यादीमध्ये जातोच परंतू फारवड बाणाने परत हा धागा उघडतो याचा अर्थ तो धागा जाऊन मेमरी क्लिअर होत नाही. ( ब्राउजरात खरोखर मिटवता येतो. मी उगाच तुलना करतो आहे ,माफ करा. )
२) याच धाग्याला शेवटचा प्रतिसाद 5दिवस ago,posted 5दिवस ago हे उगाचच येते. पण फार मोठी चूक नसेल. होईल दुरूस्त.

Pages