मायबोली अँड्रॉईड अ‍ॅपची खुली चाचणी (open Beta testing)

Posted
2 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
2 वर्ष ago
Time to
read
1’

२०१७ मधे मायबोलीची मोबाईल सुलभ आवृती प्रकाशीत झाल्यापासून , मोबाईलवरून मायबोलीवर येणार्‍यांची संख्या प्रकर्षाने वाढली आहे. मायबोलीचे अ‍ॅप असावे अशी सुचना बर्‍याच मायबोलीकरांकडून येत असते. यावर बरेच दिवस काम सुरु होते. मायबोलीचे अँड्रोईड अ‍ॅप आजपासून खुल्या चाचणीसाठी (open Beta testing) खालील ठिकाणी उपलब्ध आहे.
https://play.google.com/apps/testing/com.maayboli.mbapp1

चाचणी खुली असल्याने कुणालाही लिंक पाठवल्यास हरकत नाही. या आवृत्तित डेस्कटॉपवरच्या सगळ्या सुविधा अजून उपलब्ध नाहित. पण तुमच्या वापरावरून कुठली सुविधा आधी देता येईल या कडे लक्ष देतो आहे.

सध्या असलेल्या प्रमुख सुविधा

१. मोबाईल ब्राऊझरपेक्षा कमी डेटा लागेल
२. मोबाईल ब्राऊझरपेक्षा पटपट चालावे/पळावे अशी अपेक्षा.
३. एकदा लॉगीन केल्यावर, पुन्हा पुन्हा लॉगीन करण्याची गरज नाही.

सध्या नसलेल्या प्रमुख सुविधा.

१. थेट देवनागरीत लिहता येत नाही. पण तुमच्या मोबाईलमधे गुगल इनपुट टुल किंवा इतर युनिकोड कीबोर्ड असेल तर ही अडचण जाणवणार नाही.
२. मायबोलीचे सगळे कप्पे /विभाग अजून दिसत नाहीत. पण एखाद्या विभागात नवीन लेखन / प्रतिक्रिया आली तर तो भाग "नवीन लेखनात" दिसेल आणि तिथे जाता येईल.
३. शोध सुविधा अजून नाही.

या अगोदरच्या चाचण्यात चिन्नु, टवणे सर, उपाशी बोका, चिनूक्स, नरेन., भास्कराचार्य, अमितव, फारएण्ड यांनी मदत केली त्यांचे आभार. त्यांनी केलेल्या सगळ्या सूचना वेळेअभावी अंमलात आणू शकलो नाही. काही आणल्या . इतरांवर अजून काम सुरु आहे.

अँड्रोईड अ‍ॅप थोडे दिवस वापरात आले की मग आयफोन अ‍ॅप तयार करायला घेऊ.

तुम्हाला काही अडचणी आल्या, काही चुका सापडल्या , नवीन कल्पना सुचवायच्या असतील तर इथेच सांगा.

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

>परंतू फारवड बाणाने परत हा धागा उघडतो याचा अर्थ तो धागा जाऊन मेमरी क्लिअर होत नाही. ( ब्राउजरात खरोखर मिटवता येतो. मी उगाच तुलना करतो आहे ,माफ करा. )
खरे तर ब्राऊझरात तसे होत नाही. तुम्ही फक्त ब्राउझरचे मागे पुढे बाण वापरून पहा. असाच अनुभव येईल. ब्राउजरात पूर्ण टॅब बंद करता येते ते इथे नाही.

ब्राउजरमध्ये अनुक्रमणिका उघडतो, वाचायचे धागे तीन चार "open in new tab " करतो. मग एकेक उघडून वाचून tab close करत जातो. शेवटी माबोही क्लोज करतो. असं काही करून बघत होतो app मध्ये.
ठीक आहे. समजलं.

अॅपवरून एखाद्या धाग्यावर प्रतिसाद दिला तर तो सेव्ह झालेला दिसत नाही पण नंतर ब्राऊजरमधून मायबोली ओपन केली तर ते प्रतिसाद सेव्ह झालेले दिसतायत.

नाही, अ‍ॅप रिफ्रेश केल्यावरही दिसत नाहीयेत काही बाफवरचे प्रतिसाद. विशेषतः एक दोन नव्या बाफ वरती (उदा: टण्याच्या कर्नाटक निवडणुकीवरचा) कुठलीच प्रतिक्रिया दिसत नाहीये. म्हणजे नव्या लेखनात किती आहेत पोस्ट्स त्याचा आकडा दिसतोय पण बाफ उघडला तर फक्त लेखन दिसतंय. एकही पोस्ट दिसत नाहीये. कालपासून

अजूनही बर्‍याच नव्या धाग्यांवरच्या प्रतिक्रिया दिसत नाहीयेत अ‍ॅप मधून
आज पुपु च्या सगळ्या ३१ पोस्ट्स दिसताहेत अ‍ॅपवर. दोन पानं दाखवतंय चक्क. इथून मात्र नॉर्मल १७ दिसताहेत.

>सुविधा क्र ३ - लॉगिन - साताठ दिवसांनी एप उघडल्यानंतर पुन्हा लॉगिन करावे लागले.
हा प्रश्न सोडवायला तात्पुरता कठीण आहे. खरोखरच ही अडचण आहे का चाचणीसाठी आम्ही सतत करत असलेल्या बदलामुळे होते आहे हे माहीती नाही. चाचणीच्या बदलांची वारंवारता कमी झाली की जास्त लक्षात येईल.

मायबोली अ‍ॅपची आवृत्ती ०.७ प्रकाशीत केली आहे. यात काही महत्वावे बदल आहेत.
१. सगळ्या ताज्या प्रतिक्रिया दिसण्यासाठी केलेले काही महत्वाचे बदल. काही पानांवरच्या प्रतिक्रिया दिसत नव्हत्या तो प्रश्न सोडवला आहे.
२. शोध सुविधा अ‍ॅपवरही सुरु
३. इतर काही अडचणी सोडवल्या आहेत
लवकर ही आवृत्ती बदलून घ्या. जुन्या ०.७ अगोदरच्या आवृत्त्या काही दिवसांनी चालणार नाही.

अॅप खूप आवडला. पानं मोबाईल बाऊजर्सपेक्षा पटकन लोड होताहेत हे विशेष. आताच 0.7 आवृत्ती घेतली. पण एखादा प्रतिसाद दिल्यावर पेज रिफ्रेश केल्याशिवाय तो दिसत नाही. ही छोटीशी समस्या वगळता अॅप एकंदर उत्तम जमलाय. वर जागाही कमी घेतोय. माबो प्रशासनाचे अभिनंदन. Happy

मायबोली अ‍ॅपची आवृत्ती ०.८ प्रकाशीत केली आहे.
१) प्रतिसाद दिल्यावर पान आता आपोआप ताजे होईल आणि तुमचा प्रतिसाद लगेच त्या पानावर दिसू लागेल. हा प्रश्न सोडवण्यासाठी एक छोटी तडजोड करावी लागली आहे. प्रतिसाद देण्याची खिडकी त्याच पानावर नसून अ‍ॅपमधे एक बटन आहे ते उघडल्यावर ही खिडकी दिसू लागेल.
२) मायबोलीच्या शेअर केलेल्या लिंक्स थेट अ‍ॅपमधे दाखवण्यासाठी काही बदल टप्प्याने करतो आहोत. त्यातला एक टप्पा या आवृत्तीत आहे.
उदा. जर अ‍ॅपची नवीन आवृत्ती ०.८ तुमच्या कडे असेल आणि अ‍ॅप सध्या चालू नसेल तर या लिंकवर टीचकी मारल्यावर थेट तुम्हाला त्या पानावर घेऊन जाईल. (हे सध्या फक्त अँड्रॉईड वरच उपलब्ध आहे.) अ‍ॅप नसेल किंवा जुने वर्जन असेल तर नवीन वर्जन घ्यावे असे सुचवेल.
https://yj64b.app.goo.gl/mbli

लवकरच अपग्रेड करून घ्या.

प्रतिसाद दिल्यावर पान आता आपोआप ताजे होईल आणि तुमचा प्रतिसाद लगेच त्या पानावर दिसू लागेल*-*-*-*-

हो. छान. प्रत्येक अपडेट तपासून पाहतो.

मायबोली अ‍ॅपची आवृत्ती ०.८ आता सगळ्यांसाठी खुली आहे (Released for production). २५८ मायबोलिकरांनी बीटा चाचणी साठी मदत करून वेळोवेळी सूचना केल्या त्यांचे आभारी आहोत. गुगल प्ले स्टोअर मधे कोण कोण खुल्या चाचणीसाठी मदत करत आहे हे कळत नाही त्यामुळे त्यांचा वैयक्तिक उल्लेख करू शकत नाही.

तुमच्या कडे बीटा टेस्टींगसाठी ०.८ आवृत्ती अगोदरच असेल तर नविन घ्यायची गरज नाही,

तुमच्या सूचनांचे स्वागत आहे आणि अ‍ॅप मधे सुधारणा सुरूच राहतील.

>मस्त. अभिनंदन.

धन्यवाद. तुम्हाला अ‍ॅप आवडलं असेल तर कृपया गुगल स्टोअर मधे अ‍ॅपच्या पानावर अभिप्राय द्या. अ‍ॅपमधूनही सेटींगच्या मेनूमधे जाऊन हे करता येईल.

ॲप ओपन केल्यावर जो मायबोलीचा लोगो दिसतो त्याची साईझ अजून थोडी मोठी हवी होती असं वाटतं नेहमी. ॲप भारी झालंय वेळोवेळी केलेल्या बदलामुळे वापरायला ही सोपं जातंय.
अभिनंदन.

वेमा, नवीन व्हर्जन डाउनलोड केले तर ते सांगतंय की हे व्हर्जन आता काढून टाकले आहे. नवीन व्हर्जन डाउनलोड करा. Uhoh पण मला ऍप ऑलरेडी अपडेटेड आहे असे गुगल स्टोर सांगत होता. शेवटी ऍप अनइंस्टोल करून इंस्टोल करायला बघते आहे तर आता मायबोली ऍपच्या पानावर डाउनलोड / ओपन यातला कोणताच ऑप्शन दाखवत नाहीये. आणि मोबाईल मध्ये ऍप सुद्धा नाहीये.

कुठून अपग्रेड करायला गेले असं झालं मला.

पियू , तुम्हाला आलेल्या या अनुभवाबद्दल दिलगीर आहोत.

तुम्ही नवीन वर्जन नक्की केंव्हा डाऊनलोड केले ते माहीती नाही पण जर ते रद्द केले आहे असा मेसेज येत असेल तर ते नक्कीच २-३ आठवडे (किंवा जास्त) जुने आहे. त्यानंतर नवीन २ वर्जन तरी आली आहेत आणि त्यात काही महत्वाचे बदल करावे लागले आहेत.
बीटा टेस्टींग सुरु असताना आम्हाला वरचेवर बदल करावे लागत होते. यापुढे इतके पटकन मोठे बदल होणार नाहीत.

https://play.google.com/store/apps/details?id=com.maayboli.mbapp1 या पानावर सगळ्यात नवीन वर्जन दिसेल आणि डाऊनलोड करता येईल.
पुन्हा एकदा सॉरी.

झालं.

माझ्या प्ले स्टोरला माझा इतर ईमेल आयडी (मायबोलीवर आहे त्याशिवायचा) संलग्न असल्याने ही अडचण येत होती. माझ्या मायबोलीवाल्या ईमेल आयडीला प्ले स्टोरने ऍप डाउनलोड करू दिले.

तसदी बद्दल क्षमस्व.

तुमची अडचण सुटली हे वाचून आनंद झाला.
जर अ‍ॅप आवडले असेल तर कृपया अ‍ॅप स्टोअर मधे तुम्हाला योग्य वाटेल ते रेटींग आणि अभिप्राय दिला तर मायबोली अ‍ॅप इतरांना सापडायला मदत होईल.

Pages