म्हणजे तिला मी पहिल्यांदा पाहिलेले तेव्हाच आतून काहीतरी हललेले. पण सांगतोय कोणाला. सारेच हसले असते.
मी अगदीच पोरसवदा भासत होतो तिच्यासमोर. ती अगदीच गोलमटोल नव्हती, पण पुरेशी धष्टपुष्ट होती. अगदीच गोरी नसली, तरी गव्हाळ उजळ कांतीची होती. अगदीच मराठी नाही, पण मराठी बोलता येणारी होती. आयुष्यात पहिल्यांदा मी एका गुजराती मुलीच्या प्रेमात पडलो होतो, अगदी पहिल्याच नजरेत पडलो होतो.
तिलाही माझ्यात नक्कीच काहीतरी आवडले होते, ते ही पहिल्याच नजरेत. तिची नजरच तसे सांगत होती. पण माझा तो पहिल्या जॉबचा पहिलाच दिवस होता. आणि ती तिथे आधीच सरावलेली खेळाडू होती. मागाहून समजले की तिलाही जॉईन करून चारच महिने झाले होते. तिचाही तो पहिलाच जॉब होता. पण तरीही तिच्यामानाने मी नवखाच होतो.
कोणीतरी मग दुसर्याच दिवशी चिडवाचिडवीत माझी तिच्याशी जोडी जमवली. आणि पुढे त्या चिडवण्याला आणखी कोणी खतपाणी घालू नये म्हणून उगाचच, अगदी उगाचच मी तिच्याशी एकदा तुसडेपणाने वागलो. फक्त एकदाच..
बस्स ! मग ज्या मुलांनी मला तिच्यावरून चिडवायला घेतले होते, तेच आता आमच्यातील खुन्नसचे किस्से रंगवू लागले. आमच्यात तसे काहीही नसताना आमच्यातील शीतयुद्धाच्या कहाण्या रचू लागले. मी देखील वेड्यासारखा, कसेही का होईना, तिच्यासोबत आपले नाव जोडले जातेय यातच आनंद मानू लागलो. कधीतरी फटक्यात या सर्व अफवांतील फोलपणा जगासमोर येईल आणि आमच्यातील तथाकथित शत्रुत्व प्रेमात बदलेल या विचारांत रमू लागलो. हळूहळू मला जाणवत होते, की मी तिच्यात आता गुंतू लागलो होतो.
जेव्हा ती माझ्याकडे बघायची, रागानेच बघायची. मी सुद्धा माझी नजर कोरडीच ठेवायचो. पण नेहमी माझ्या नजरेला नजर मिळेल, अश्याच जागी ती बसायची.
माझ्या अगदी शेजारून जायची. तिच्यासाठी मी अस्तित्वातच नाही असे दर्शवून जायची. पण ज्या दिवशी मी ऑफिसला यायचो नाही, तेव्हा हलकेच माझी चौकशीही करायची.
मी कधी तिची खोडी काढल्यास, थेट माझ्याशी भांडायलाही लाजायची. पण तिच्यावरून मला चिडवणार्या, माझ्या मित्रांशी लाजत लाजत बोलायची.
एक वेगळीच केमिस्ट्री होती आमच्यात. तिचे नाव घेताच लोकांना मी आठवायचो, माझे नाव घेताच ती आठवायची..
वर्ष गेले अश्यातच..
आणि मग ठरवले आता बोलायचे..
निमित्त होते दिवाळीनिमित्त ऑफिसमधील एका कार्यक्रमाचे. प्रत्येकाला दहाबारा कागदांचे चिटोरे वाटण्यात आले होते. आणि ठरले असे होते की प्रत्येकाने आपल्या आवडत्या वा नावडत्या व्यक्तींबद्दल त्या कागदावर लिहून तो चिटोरा त्यांच्यात्यांच्या डेस्कवर लावायचा. स्वत:चे नाव मात्र लिहायचे नाही. आपल्याबद्दल लोकं काय विचार करतात याचा थेट फिडबॅक..
मला फक्त एकाच कागदात ईंटरेस्ट होता. काय लिहू, आणि काय नको...
अशी संधी पुन्हा येणार नव्हती... थेट भिडायचेच ठरवले !
ठरलं ! लिहून यायचे, तू मला आवडतेस !
पण भावना नेहमी मातृभाषेतच पोहोचतात. मराठी लिहिता बोलता येणारी असली तरी होती मात्र ती गुजरातीच.. मग मेहुलची मदत घेतली.. आणि गुजराती भाषेतील सर्वात गोड वाक्य त्या कागदावर अवतरले,
"तू मने गमे छे ! "
दुपारच्या सत्रात बाहेर सारे कार्यक्रमात मग्न असताना मी हळूच तो कागद तिच्या डेस्कवर डकवून आलो. जणू काळजाचा छोटासा तुकडाच तिथे ठेवून आलो. आता प्रतीक्षा होती ते तिने माझे काळीज वाचण्याची.
प्रतीक्षा संपली. ती जागेवर आली. आम्ही टोळके करून जवळपासच उभे होतो. तिने तो डकवलेला कागद काढला. तो तसाच हातात घेऊन मुद्दामच आमच्या ग्रूपसमोर आली. आणि आम्हाला स्पष्ट दिसेल असे दोन्ही हातांत धरून तो टर्राटरा फाडला..
जरा धक्का लागल्यास खळ्ळकन फुटावे अश्या काचेच्या हृदयावर कोणीतरी तीक्ष्ण खिळ्याने कर्रकचून ओरखडा ओढावा असे झाले..
पण ते शेवटचेच ...
त्यानंतर मन कोडगे करून घेतले. पुन्हा त्याला नजरांचे चुकीचे अर्थ काढण्यापासून परावृत्त केले. साधारण दिडदोन महिन्यातच मला नवीन जॉब लागला आणि मी तिथून बाहेर पडलो. तेथील काही मित्र नंतरही संपर्कात होते. पण पुन्हा कधी तिचा विषय निघाला नाही. पुढे तिचे लग्न झाले हे मात्र उडत ऊडत कानावर आले. पण फारसे काही वाटले नाही. कारण एव्हाना माझेही झाले होते.
पण जगही किती छोटे असते ना..
वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये कामाचा अनुभव घेत अखेर आमची पुन्हा एकदा एकाच कंपनीत गाठ पडली.
बावरलेली नजर आम्हा दोघांची. काय बोलावे, कसे बोलावे. कि बोलूच नये. एक अवघडलेपण.
तरी सहा वर्षे झाली.. पण फरक असा काहीच नाही..
शेवटी मीच ठरवले, दोघांचीही लग्ने झाली आहेत. जे होते ते माझे एकतर्फी होते. उत्तरही तेव्हाच मिळाले होते. म्हणून संकोच सोडून हसतच तो विषय काढला, आणि जे झाले ते विसरून जाऊया म्हणालो..
चेंडू मी तिच्या कोर्टात ढकलला होता. आता अवघडून जायची वेळ तिची होती.
पण तिच्या डोळ्यात अविश्वास होता !
ते.. ते.. तू लिहिलं होतंस?? पण असं कसं.. तू मने गमे छे.. ते अक्षर तर मेहुलचे होते ना ....
थोडसं गरगरलं मला.. आणि ते तर होणारच होते.
क्षणात जे एवढ्या वर्षांची कॅसेट रिवाईंड होत माझ्याच डोक्यावर आदळली होती...
- भन्नाट भास्कर
प्रपोज कधीही तोंडाने
प्रपोज कधीही तोंडाने आमनेसामने बोलूनच करावा हा धडा आयुष्यात मी सुद्धा एक ठेच खाऊनच शिकलोय Happy >> सल्ल्याबद्दल धन्यवाद, पण अश्या नाजूक बाबतीत मी मुखदुर्बळच होतो. आयुष्यात अश्या सर्व नजरांना पुढाकार घेत बोलायची हिंमत दाखवली असती तर किमान ७-८ प्रकरणं असती माझी
पण तेवढं जमायचे नाही म्हणून हा चिठ्ठीचपाटीचा उद्योग !
का नाव न लिहिता लिहायचा खेळ होता? >> हो सस्मित, पण नाव न लिहिताही एकूणच आमच्या जोडीची प्रसिद्धी आणि चिडवाचिडवी यावरून तिच्या डोक्यात दुसरे नाव येऊच नये अशीच परीस्थिती होती.
अगदी उगाचच मी तिच्याशी एकदा तुसडेपणाने वागलो. फक्त एकदाच.. >> काय केलं होतं? >> खरे तर तसे आमच्यात बरेच किस्से घडलेले. पण वर ज्याचा उल्लेख केला ती पहिलीच चकमक म्हणजे एके दिवशी सकाळी ऑफिसमध्ये आल्यावर तिची खुर्ची घेऊन मित्रांशी गप्पा मारत बसलो होतो. आणि ती खुर्ची मागायला आल्यावर तुझीच कश्यावरून? तुझे नाव लिहिले आहे का? असे लहान मुलांसारखा वाद घातला होता
हे चिडवाचिडवीचे प्रकार फारच घाणेरडे आणि annoying आणि irritating वाटतात मला... >> खरंही आहे. कोणाला ते कितपत आवडते वा झेपते यावरून थांबायचे कुठे ते समजायला हवे.
जलसा करो जयन्तीलाल >>> हे पाहिले नाही
मुकद्दर का सिकंदर >>> हा पाहिला आहे.
पण सुदैवाने तिचे लग्न मेहुलशी झाले नाही, नाहीतर त्याचा जीवच घेतला असता
सही.. म्हणजे अजून स्कोप आहे तर... >>> नाही हो, दोघेही विवाहीत आहोत. आता स्कोप शोधायचे झाल्यास ती विवाहबाह्य भानगड झाली. ती करायची असती तर त्यावर लेख लिहून अशी दवंडी पिटली नसती
एके दिवशी सकाळी ऑफिसमध्ये
एके दिवशी सकाळी ऑफिसमध्ये आल्यावर तिची खुर्ची घेऊन मित्रांशी गप्पा मारत बसलो होतो. आणि ती खुर्ची मागायला आल्यावर तुझीच कश्यावरून? तुझे नाव लिहिले आहे का? असे लहान मुलांसारखा वाद घातला होता Happy >> ओह्ह

आपापली खुर्चीच हवी असणे, ती नसेल तर पाठ दुखणे, चान्गली खुर्ची शोधूनही त्यावर दुसर्याने डल्ला मारणे, त्यांच्याकडून ती by hook or crook परत मिळवणे वगैरे अनुभव आहेत
छान लिहताय. अजून किस्से येऊद्यात.
हा आणि आधीचा धागा वाचून मला
हा आणि आधीचा धागा वाचून मला काही इंट्युशन येत आहेत,
अजून कोणाला येत आहेत का?
अरे देवा! गर्ल फ्रेंडचा एम एन
अरे देवा! गर्ल फ्रेंडचा एम एन सी किस्सा की हो हा!
प्रतिसाद बोधप्रद आहेत!
प्रतिसाद बोधप्रद आहेत!
: D
: D
अमित, माझ्या मनात लागणारे रेडिओ स्टेशन तुझ्या मनात सुद्धा लागू शकते तर
लांबलचक प्रतिसाद वाचून मलाही
लांबलचक प्रतिसाद वाचून मलाही शंका येऊ लागल्या आहेत. गाडी कधी ‘मी’ नगरात घुसेल काही सांगता यायचं नाही.
अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र!
अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र!
लेखनशैली आवडली पण! लिहीत रहा.
लेखन शैली छान आहेच हो, त्या
लेखन शैली छान आहेच हो, त्या बद्दल वादच नाही.
पण.....
नाही हो, तो असता तर प्रत्येक
नाही हो, तो असता तर प्रत्येक प्रतिसादाला एक उत्तर प्रतिसाद आले असते, असा एकत्र एकाच प्रतिसादात एकदम उत्तरे, 10 प्रतिसाद संख्या कमी झाली ना..
थोडी तरी स्टाईल मॉड्युलेट
थोडी तरी स्टाईल मॉड्युलेट करायला हवी ना,
कधी अशुद्ध भाषा, कधी एकाच प्रतिसादात 4 जणांना उत्तर
सिम्बा, तुम्ही त्या आयडीला
सिम्बा, तुम्ही त्या आयडीला 'गंमत कमी झाली' वगैरे म्हणालात, म्हणून हे री-इन्व्हेन्शनचे प्रयत्न दिसतायत. ह्या सगळ्यात दोष तुमचाच आहे.
हो पण हा अवतार जास्त सेन्सिबल
हो पण हा अवतार जास्त सेन्सिबल आहे.
छान लिहिलयं.
छान लिहिलयं.
लेखन शैली छान आहेच हो, त्या बद्दल वादच नाही.
पण.....>>>>>+१.
हो पण हा अवतार जास्त सेन्सिबल
हो पण हा अवतार जास्त सेन्सिबल आहे. >> ते काय एक-दोन धाग्यांपुरतं. पुन्हा आहेच आपलं ये रे माझ्या मागल्या.
मस्त आहे कथा!
मस्त आहे कथा!
हम्मम्म
हम्मम्म
हो पण पन्नाशीचा शाहरुख, तिशीच्या माणसाचा रोल करताना केविलवाणा वाटतो,
बाई चा रोल करताना करताना घृणास्पद वाटेल,
पण पंचेचाळीशीच्या dr जहांगीर खान चा रोल करताना सेन्सिबल वाटतो ,
त्यातलेच हे...
पण तो जहांगीर रोलात, दोन हात
पण तो जहांगीर रोलात, दोन हात 180 अंशात शरीराच्या रिलॅटिव्ह 45 अंशात आणि मान हाताच्या रिलॅटिव्ह 45 अंशात म्हणजेच क्षितीज पातळीत आणून कधी बोलायला लागेल सांगता येत नाही. सुंभ जळला.. ताक फुंकरून ... ब्ला ब्ला ब्ला
अमित
अमित
आपण लोकांच्या लेखांवर जाऊन गोंधळ घालणारी वाह्यात लोक आहोत असा लोकांचा समज होण्यापूर्वी थांबावे हे बरे.
पण डोक्यात जो कीडा वळवळतो आहे त्याचे समाधान कोण करेल बरे?
छान लिहिले आहे!!
छान लिहिले आहे!!
>>माझ्या मनात लागणारे रेडिओ
>>माझ्या मनात लागणारे रेडिओ स्टेशन तुझ्या मनात सुद्धा लागू शकते तर
लेख वाचायला घेतल्यावरच इकडेही ते स्टेशन लागले.... पण म्हण्टले पुराव्याशिवाय कशाला बोला?
असो!
लेख/गोष्ट/किस्सा जे काही आहे ते आवडले!
हा आणि आधीचा धागा वाचून मला
हा आणि आधीचा धागा वाचून मला काही इंट्युशन येत आहेत,
अजून कोणाला येत आहेत का?>>>मलाही तसेच वाटले होते. पण सारखे सारखे काय त्याच झाडावर म्हणून सोडून दिले
लेख वाचायला घेतल्यावरच इकडेही
लेख वाचायला घेतल्यावरच इकडेही ते स्टेशन लागले.... >>>>
माबो वर चाणाक्ष वाचकांची जमात अजूनही मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात आहे हे पाहून आनंद झाला
>>>>>>
पण सारखे सारखे काय त्याच झाडावर म्हणून सोडून दिले Happy>>>>>>>>
आता झाडच रस्त्याच्या मधोमध येऊन उभे राहायला लागले तर काय करणार???
पण मेला फक्त परिस्थितीजन्य पुरावा आहे, याने किंवा त्याने (त्यानेच खरे तर) कबूल केल्याशिवाय कळणार नाही
कबूल? आजवर कधी कबुली देण्यात
कबूल? आजवर कधी कबुली देण्यात आल्याचं आठवतंय का?
हो हो , त्या स्त्री id वर
हो हो , त्या अशुद्ध लिहीणाऱ्या स्त्री id धाग्यांवर वर दिलेली कबुली
कुठे? बघू...
कुठे? बघू...
ता. क. : त्या शाळकरी मुली कुठे गायब झाल्या?
तो काय प्रेम विवाहात जात
तो काय प्रेम विवाहात जात महत्वाची वगैरे धागा होता ना,
अशुद्ध लिहिणारा id होता
मोबाईल वरून शोधता येत नाहीये
हायला !
हायला !
गुजराती शिर्षकामुळे हे मिसलं होतं...
छान लिहीलंय.
घ्या,
घ्या,
एका डु आई ची कबुली
https://www.maayboli.com/node/65883?page=2
अहो तो गमतीत म्हणतोय.. ही
अहो तो गमतीत म्हणतोय.. ही कबुली कुठे आहे ☺️
Pages