वाटीभर सोडे
पाच-सहा लसुण पाकळ्या ठेचून
हिंग थोडसं
हळद १ चमचा
लाल मसाला २ चमचे
चवीनुसार मिठ
तांदळाचे पीठ १ चमचा
लिंबाएवढी चिंच
फोडणीसाठी तेल
फोडणीसाठी तेल
२ मध्यम चिरलेले कांदे
कोथिंबीर चिरलेली थोडी
२ हिरव्या मिरच्या मोडून
भरीसाठी भाज्या हव्या असतील तर
१ वांग फोडी करून
बटाटा फोडी करून
शेवग्याच्या शेंगा तुकडे करुन
सोडे कोमट पाण्यात १० मिनीटे भिजत घालावेत.
गॅसवर भांडे गरम करुन तेल टाकून लसूण फोडणीला द्यायचा व त्यावर कांदा गुलाबी रंगाचा होई पर्यंत शिजवायचा. आता त्यावर हिंग, हळद मसाला घालायचा.
ते एकजीव झाले की कोलंबीचे सोडे, शेंगा, बटाटे व वांगी घालायची.
आता त्यात गरजेनुसार पाणी घालायचे व भाज्या शिजू द्यायच्या.
भाज्या व सोडे शिजले की त्यात चिंचेचा कोळ करून त्यातच तांदळाचे पीठ कालवून तो कोळ रश्यात घालावा. पुन्हा कालवणाला एक उकळी येऊ द्यावी व मिठ घालावे. नंतर गॅस बंद करण्यापूर्वी मोडलेल्या मिरच्या व कोथिंबीर घालावी म्हणजे कोथिंबीर व मिरच्यांचा सुगंध टिकून राहतो.
आता घरभर मस्त सोड्यांच्या कालवणाचा घमघमाट सुटलेला असतो व आपोआप भूक लागते.
सोडे कोलंबीपासून बनवतात. सोललेल्या कोलंब्या म्हणजे सोडे.
मोठ्या कोलंब्या सोलून त्या सरळ ठेऊन उन्हात कडकडीत वाळवून साठवणीसाठी तयार करतात.
सुके माकुल पण मिळतात?
सुके माकुल पण मिळतात?
रेसिपी मस्त जागुताई. सोडे
रेसिपी मस्त जागुताई. सोडे खुपच आवडतात. आमच्या येथे सातपाटी, पालघरला सोडे मिळतात. कालवणात सोडे असले म्हणजे दुसरे काहीही नको. जागुताई फोटोही सुरेखच.
अश्विनी, स्वाती, जेम्स बॉन्ड,
अश्विनी, स्वाती, जेम्स बॉन्ड, अतुल मनापासून खुप खुप धन्यवाद.
सुमुक्ता करता येईल ड्राईड फिश वापरून असे कालवण.
सस्मित हो मिळतात सुके माकुल. मला वाटत मी इथे रेसिपी पण टाकली असेल.
जागू अगं कित्ती दिवसांनी तुझी
जागू अगं कित्ती दिवसांनी तुझी रेसिपी आली. पाहूनच मस्त वाटलं. एकदम जुन्या माबोचा फिल आला मला.>>+१
सुके माकुल आहाहा... सोड्याचं
सुके माकुल आहाहा... सोड्याचं कालवण आहाहा.... मला काय आज रात्री झोप लागत नाही... सुकट सर्व संपलीय घरातली...
आमच्या कडे हळदीला फक्त घरातल्यांसाठी सुकटीच कालवण असतंच... आणि त्याची चव जबराट च असते... कैरी, शेंगा, वांगे या सर्वांनी तर चव अजून च जबरी बनते..
आणि 10 घास जरा जास्त च जातात...
सोडे नीट पारखून घ्यावेत विकत घेताना कारण त्यात वाम माश्याचे तुकडे इतके बेमालूम पणे मिसळतात की आपल्याला कळत ही नाही.. मी फसली आहे 2 दा...
Pages