मायबोलीवर कोणते सल्ले मागावेत, कोणते मागू नयेत?

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 April, 2018 - 17:00

मायबोलीवर "मदत हवी आहे", "माहिती हवी आहे", "कोणाशी तरी बोलायचे आहे" ईत्यादी विभागाअंतर्गत बरेच सल्ले मागितले जातात.
अगदी रुमाल कुठला घ्यायचा अश्या फुटकळ वस्तूपासून फ्रिज कसा घ्यावा यावर सल्ला मागितला जातो.
मोबाईल तर जणू सल्ल्याशिवाय घेताच येत नाही. लोकं गर्लफ्रेंड निवडताना ईतका विचार करत नसतील तितका मोबाईल घेताना चोखंदळपणा दाखवतात.
घरात ऊंदीर शिरला, हाकलू कसा? कारमध्ये डास घुसले, मारू कसे?
त्यात विवाहीत लोकं म्हटली की समस्यांचे भंडार असते.
बायकोशी पटत नाही, नवरयाचे बाहेर लफडे आहे, नणंद-सासू जोडगोळी त्रास देते अश्या वैवाहीक समस्या तर दर दुसरया घरात नांदत असतात.
लग्न करताना त्यावर खर्च किती करावा ते हनीमूनला कुठे जावे यासाठी ईथे सल्ला मागितला जातो.
मुले झाल्यावर तर धमालच धमाल. मुलाला नावे सुचवा पासून सुरुवात होते ते त्याची मुंज कधी करावी, शाळेत कुठल्या टाकावे, त्याला सुट्टीत चित्रपट कुठले दाखवावेत, त्याला डब्याला काय द्यावे, ते त्याला बारीक सारीक गोष्टीत शिस्त कशी लावावी याचे एकूण एक सल्ले ईथे मागितले जातात.
जे मुलांबाबत तेच पाळीव प्राण्यांबाबतही. मागे कुत्र्याला नाव सुचवा असाही एक शतकी धागा ईथे येऊन गेल्याचे आठवते.
बरं बॅचलर लोकंही आपले प्रेमप्रकरण ते व्यसनांबद्दल ईथे सल्ले मागतात.
येत्या विकेण्डला कुठल्या पिक्चरला जावे असा सहज सल्ला मागितल्यासारखे लोकं पैसे कुठे गुंतवावे याचा सल्ला मागतात, धंदा कोणता सुरू करावा याचा सल्ला मागतात, त्या धंद्याला नाव सुचवा याचाही सल्ला ईथेच मागतात.
एखादा माणूस सर्दी खोकला ताप जुलाब याने हैराण असतो. ईथे सल्ला मागतो काय करू? पहिलाच सल्ला मिळतो डॉक्टरकडे जा..
ते ऐकून तो जातोही. तरी याचा पत्त्याच नसलेले लोकं आपल्या आजीबाईंच्या बटव्यातील सल्ले देत धाग्याची शंभरी करतात.
तो मात्र रात्री डॉक्टरांकडे जाऊन आल्यावर बेडवर पडल्यापडल्या सारे सल्ले वाचत आपले मनोरंजन करतो.

येनीवेज, जुन्या जाणत्या मायबोलीकरांना कश्याला हवीत ईतकी उदाहरणे ..

तर धाग्याचा विषय आहे,

1) मायबोलीवर (वा तत्सम सोशलसाईटवर) कोणत्या प्रकारचे सल्ले मागावेत? कोणत्या प्रकारचे मागू नयेत?

2) तुम्ही स्वत: मायबोलीवर आजवर कुठल्या प्रकारचे सल्ले मागितले आहेत, आणि ईथे मिळालेल्या सल्ल्यांचा आणि माहितीचा तुम्हाला प्रत्यक्षात कितपत फायदा झाला आहे?

3) ईथे एखाद्याला सल्ला देताना तुम्ही कितपत सिरीअस असता? काय विचार करून सल्ला देता?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol
आवाज न करता यासाठी नमूद केलं की कोणी व्हॅक्युम क्लिनर वापरा म्हणु नये. कारण मी पहाटे चारला डस्टिंग करतो, तेव्हा घरात कुणाची झोपमोड होऊ नये म्हणुन.

आता मग हा काय अंधारात करतो का डस्टिंग, लाईट लावल्यावर नाही होत का झोपमोड? असा प्रश्न सुज्ञांना पडू शकतो. तर अंधारात नाही करत आणि घरातले लाईट पण नाही लावत. डोक्यावर कॅप आणि कॅपला टॉर्चलाईट लावून करतो.

डोक्यावर कॅप आणि कॅपला टॉर्चलाईट लावून करतो >> किती ती हौस! त्यापेक्षा सकाळ होऊ द्या ना, मग पाहिजे तेवढे आवाज करत धूळ साफ करता येईल. बॅटरीही वाचेल.

आवाज न करता यासाठी नमूद केलं की कोणी व्हॅक्युम क्लिनर वापरा म्हणु नये.
>>>>
कोणी कोणाला हा सल्ला दिला, आणि कोणाला तो घ्यावासा वाटला, तर आमचा घेऊन जाणे
ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/76732
हि धागा आणि वॅक्युम क्लीनर दोन्हींची जाहीरात समजू शकता.

कोणी कोणाला हा सल्ला दिला, आणि कोणाला तो घ्यावासा वाटला, तर आमचा घेऊन जाणे
>>> व्हॅक्युम क्लीनर घेऊन जाणे?

व्हॅक्युम क्लीनर घेऊन जाणे? >> हो, आम्ही तो बड्डेला फुगे फुगवायला वापरतो. त्यासाठी आम्ही नवीन पंप घेऊ. मूळ किंमत साधारण १५ हजार आहे, बोली लावा जिथूनही लावावीशी वाटेल तिथून...

मायबोलीवर कुठल्या विषयावर धागा विणावा ? त्याचं योग्य टायमिंग काय ?
( ऋबाळ सरांचा नवीन धागा आला नाही बरेच दिवस. माबोकरांना चुकचुकल्यासारखे होत असेल)

छे हो, ते असेच म्हटले.
म्हणजे मला तर त्या वॅक्युम क्लीनरला दूर जंगलात सोडून यायला आवडेल जो स्वतः १५ हजारांचा आहेच, त्यावर बिनकामाचे पडून माझ्या घरातील ३० हजार किंमतीची जागाही खाल्ली आहे.
पण तरीही आमच्या घरात खरेदी विक्रीचे सारे अधिकार बायको राखून असल्याने यात माझ्या मताला किंमत नाही.
पुरुषाचा जन्म कठीण आहे या काळात. तेवढाच तो वॅक्युम क्लीनरचा विषय काढून सोशलसाईटवर मनोरंजन करावे हेच माझ्या हातात Sad

Pages