मायबोलीवर कोणते सल्ले मागावेत, कोणते मागू नयेत?

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 April, 2018 - 17:00

मायबोलीवर "मदत हवी आहे", "माहिती हवी आहे", "कोणाशी तरी बोलायचे आहे" ईत्यादी विभागाअंतर्गत बरेच सल्ले मागितले जातात.
अगदी रुमाल कुठला घ्यायचा अश्या फुटकळ वस्तूपासून फ्रिज कसा घ्यावा यावर सल्ला मागितला जातो.
मोबाईल तर जणू सल्ल्याशिवाय घेताच येत नाही. लोकं गर्लफ्रेंड निवडताना ईतका विचार करत नसतील तितका मोबाईल घेताना चोखंदळपणा दाखवतात.
घरात ऊंदीर शिरला, हाकलू कसा? कारमध्ये डास घुसले, मारू कसे?
त्यात विवाहीत लोकं म्हटली की समस्यांचे भंडार असते.
बायकोशी पटत नाही, नवरयाचे बाहेर लफडे आहे, नणंद-सासू जोडगोळी त्रास देते अश्या वैवाहीक समस्या तर दर दुसरया घरात नांदत असतात.
लग्न करताना त्यावर खर्च किती करावा ते हनीमूनला कुठे जावे यासाठी ईथे सल्ला मागितला जातो.
मुले झाल्यावर तर धमालच धमाल. मुलाला नावे सुचवा पासून सुरुवात होते ते त्याची मुंज कधी करावी, शाळेत कुठल्या टाकावे, त्याला सुट्टीत चित्रपट कुठले दाखवावेत, त्याला डब्याला काय द्यावे, ते त्याला बारीक सारीक गोष्टीत शिस्त कशी लावावी याचे एकूण एक सल्ले ईथे मागितले जातात.
जे मुलांबाबत तेच पाळीव प्राण्यांबाबतही. मागे कुत्र्याला नाव सुचवा असाही एक शतकी धागा ईथे येऊन गेल्याचे आठवते.
बरं बॅचलर लोकंही आपले प्रेमप्रकरण ते व्यसनांबद्दल ईथे सल्ले मागतात.
येत्या विकेण्डला कुठल्या पिक्चरला जावे असा सहज सल्ला मागितल्यासारखे लोकं पैसे कुठे गुंतवावे याचा सल्ला मागतात, धंदा कोणता सुरू करावा याचा सल्ला मागतात, त्या धंद्याला नाव सुचवा याचाही सल्ला ईथेच मागतात.
एखादा माणूस सर्दी खोकला ताप जुलाब याने हैराण असतो. ईथे सल्ला मागतो काय करू? पहिलाच सल्ला मिळतो डॉक्टरकडे जा..
ते ऐकून तो जातोही. तरी याचा पत्त्याच नसलेले लोकं आपल्या आजीबाईंच्या बटव्यातील सल्ले देत धाग्याची शंभरी करतात.
तो मात्र रात्री डॉक्टरांकडे जाऊन आल्यावर बेडवर पडल्यापडल्या सारे सल्ले वाचत आपले मनोरंजन करतो.

येनीवेज, जुन्या जाणत्या मायबोलीकरांना कश्याला हवीत ईतकी उदाहरणे ..

तर धाग्याचा विषय आहे,

1) मायबोलीवर (वा तत्सम सोशलसाईटवर) कोणत्या प्रकारचे सल्ले मागावेत? कोणत्या प्रकारचे मागू नयेत?

2) तुम्ही स्वत: मायबोलीवर आजवर कुठल्या प्रकारचे सल्ले मागितले आहेत, आणि ईथे मिळालेल्या सल्ल्यांचा आणि माहितीचा तुम्हाला प्रत्यक्षात कितपत फायदा झाला आहे?

3) ईथे एखाद्याला सल्ला देताना तुम्ही कितपत सिरीअस असता? काय विचार करून सल्ला देता?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माननीय ज्येष्ठांनो, शब्दखुणांत जरी डोस शब्द असला तरी धागा आरोग्यविषयक नाही.. Proud

पाफा, क्या आपको लगता हैं, मैं बिना सोचे समझें लिखता हूँ ? Happy
काय भरवसा आणखी पाच दहा वर्षांनी एखादा जपून ठेवलेला स्क्रिनशॉट तुम्ही मंडळी येथे टाकायचात आणि म्हणायचात, "सल्ला दिलता पण आभार मानलंच नै.. कृतघ्न मेला, आनंद !" म्हणून आत्ताच आभार मानून घेतो... Proud
Submitted by आनंद. on 11 April, 2018 - 09:37
>>>>
"Copyrights" कायम मुळ लेखकाचे असतात. Wink समझे?

चौथ्याने इतरांचे खाल्ल्याने भयंकर पोटदुखी चालू झाली त्याला डॉक्टरकडे न्या.. आणि हो परत सल्ला ( अर्थाच फुकट) डॉक्टर चे नाव बघून मग उपचार घ्या Wink

बिजी प्लस तब्येत डाऊन ..
मोबाईलवरून दिवसात एकदा चक्कर टाकतोय. पण शक्यतो टाईपाचा मोह आवरतोय, वा तितका वेळ आणि उर्जा नाहीये.
आज सुट्टी घेऊन आरामाला घरी आहे, बिलं भरायला लॅपटॉप उघडलाय.
काळजीबद्दल धन्यवाद Happy

मोबाईलवरून दिवसात एकदा चक्कर टाकतोय. पण शक्यतो टाईपाचा मोह आवरतोय, वा तितका वेळ आणि उर्जा नाहीये.
>>> गेट वेल सून.
आणि चांगलं आहे कमी वापरत जा माबो.. हे देखील व्यसनच.
सत्कारणी लागेल वेळ.

वस्तु आणि वास्तु विषयक सल्ले जरूर मागावेत;
सजीवामध्ये फारतर पाळीवप्राणी संबधी ठीक पण वैयक्तिक नाते संबध ह्याविषयी सल्ले मागु नयेत असे वाटते.

तिथे राज यांचा एक प्रतिसाद आहे. कोणाशी तरी बोलायचेय हा विभाग अश्याच नाजूक विषयांवर अनामिक राहायचा पर्याय निवडत सल्ले मागायला बनवला आहे.
मला हे पटते.

गंमत अशी आहे की ईथे रूमाल कोणता घ्यायचाय हा सल्ला मागितला तरी अश्या फालतू विषयावर सल्ला मागू नका असा ओरडा होतो आणि अश्या विषयावर मागितला तरी ईतक्या गंभीर विषयावर सल्ले मागणे चुकीचे असे बोलले जाते.

डॉक्टरकडे जा किंवा कौन्सेलर बघा वगैरे सुद्धा फार असते. मुळात ज्यांना गरज वाटते वा शक्य असते ते हे पर्याय चाचपतातच. मायबोली धागा हा त्याव्यतीरीक्त असतो. कोणी मायबोलीवरच सल्ला मिळेल आणि मग तसेच करू या एकाच भरवश्यावर कधीच नसतो हे प्रतिसाद देणारयांनी समजून घ्यायला हवे.

वैयक्तिक नाते संबध ह्याविषयी सल्ले मागु नयेत त्याचे अजुन एक उदाहरण https://www.maayboli.com/node/65883
जेथे सल्ले/प्रतिसादानुसार मूळ लेखातला मजकूर आणि मुद्दे छोटे छोटे होत काही वादग्रस्त शब्द नाहीसे झाले.

नाजूक गोष्टींवर जाहीर रित्या सल्ले मागू नयेत हे जरी खरे असले तरी अनामिक सल्ले मागता येतात ही सोय आहे. त्यामुळे नावे गुप्त ठेवून सल्ला मागायला काहीच हरकत नाही.

अशा वेळी सल्ले देणा-यांनी जो मदत मागतोय त्याची मानसिकता काय असावी हे लक्षात घेऊन सल्ले दिलेले बरे. सल्ले मागणा-याला झापण्याचा अधिकार कुणाला कसा पोहोचतो हे समजत नाही. अशा असंवेदनशील आयडींना समज दिली पाहीजे. सल्लाच मागितला आहे, बाँबस्फोट नाहीत केलेले.

लिसनिंग स्पेस्/लिसनिंग इयर नावाची संकल्पना ही परफेक्ट सुपरकंडक्टर सारखी आहे. विज्ञानाच्या, मानवाच्या फाय्द्याच्या दृष्टिने सर्वांना हवीहवीशी पण तरीही १००% वास्तवात न येणारी.
'सल्ले इथे काय मागताय, कन्सल्टंट कडे जा' वगैरे बरोबर असले तरी इथे सल्ले मागणारा 'आपल्याला प्रत्यक्ष चेहरा न दाखवता, समोरच्या कडून जजिंग किंवा पक्षपाताची भीती न बाळगता काहीतरी मांडून मोकळे होण्याचा मंच' या अर्थाने बघत असावा. सल्ले किंवा निर्णय हे जो तो स्वतःच घेत असतो. घरी आग लागलीय, पसरतेय आणि पाणी आणण्याऐवजी पीसी समोर बसून 'थांब रे/गं, मायबोलीवर धागा टाकलाय, बघू लोक काय म्हणतात आणि त्यानुसार करु' म्हणत नसतो.
'कोणाशी तरी बोलायचंय' असा मूळ धागा विषय आहे. 'कोणाचा तरी सल्ला हवा/कोणीतरी बघून सांगा मी काढलेला धागा छाने की मूर्ख की समाजविघातक की खोटा' असा विषय नाहीये.

ए के हंगल डाकूंच्या अड्ड्यात पिस्तुल घेऊन एकटेच जातात आणि तुम्हें चारों तरफ से घेर लिया है असा डायलॉग मारतात तो चित्रपट कोणता ? त्यात नायिका त्यांना झाडाच्या इथे अडवत असते आणि जाऊ नका ना गडे टाईप काही तरी गाणं म्हणत असते.. ते गाणंही सुचवा.

वेगळा धागा काढायचा कंटाळा येतो म्हणुन इथेच विचारतो:
टेबल, खुर्च्या, कपाट यांच्यावरची आवाज न करता धूळ साफ करायला कोणते फडके वापरावे?

मलाही ही माहिती हवी आहे, ती धूळ न उडवता कशी साफ करावी. मला फार अ‍ॅलर्जी आहे धूळीची, सटासट शिंका येतात

धूळ साफ करणं फारच अवघड आहे. इतके बारीक बारीक कण असतात! ते कसे एक-एक करून साफ करणार? त्यापेक्षा ज्यावर ती धूळ बसली आहे, तो पृष्ठभाग साफ करावा.

टेबल, खुर्च्या, कपाट यांच्यावरची आवाज न करता धूळ साफ करायला कोणते फडके वापरावे?
ओले

आवाज कोण करतंय?

तुम्हाला धूळ झटकताना गाणी बीणी म्हणायची सवय आहे का? तसं असेल तर मऊ कॉटनचे पुरेसे मोठे फडके घेऊन, आपल्या तोंडावर त्याची घट्ट टापशी बांधून मग धूळ झटकावी.

शेजारी आवाज करत असतील आणि धूळ झटकताना तुम्हाला तो सहन होत नसेल तर शेजार्यान्च्या तोंडाला टापशी

बांधू नये. त्याऐवजी थोडा कापूस घेऊन आपल्या कानांत घालावा.

Pages