देवभक्त एकमेका

Submitted by पुरंदरे शशांक on 9 April, 2018 - 02:49

देवभक्त एकमेका

घरी दिसेना तुकोबा
जिजा राऊळी धावली
एकलीच रखुमाई
आत पार धास्तावली

येकयेकी पुसताती
आमचे "हे" दिसेना की
जिजा म्हणे वैतागून
काय बोल नशीबाशी

खंतावून दोघी सख्या
वेगी भंडारा चालल्या
काय म्हणावे या वेडा
विठू तुका हरवला ??

भंडार्‍याच्या माथ्यावरी
तुका किर्तनात दंग
साथ देण्यासाठी स्वये
नाचतसे पांडुरंग

दोघीजणी खुळावोनी
हात लाविती डोईला
देव भक्त कळेना की
भक्तिमय पूर्ण काला..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगुण निर्गुणाच्या या छंदात अविरत रमताना तुमच्या साध्या सुध्या वाटणार्‍या ओळींतून तुकयाचीच रसाळ वाणी प्रगटु लागलीये जणु ...

भक्त भगवंत
फिटता हे द्वैत
अवघे कवित्व
शब्दावीण
__/\__

व्वा अप्रतिमच
तुकयाचीच रसाळ वाणी प्रगटु लागलीये जणु ...>> +१११११