वेबसीरीज.

Submitted by बी.एस. on 9 April, 2018 - 01:55

सध्या अनेक वेबसीरीज येत आहेत. नेहमीच्या रटाळ दैनंदिन मालिके पेक्षा ह्या वेबसीरीज ना जास्त पसंती मिळत आहे. विशेषतः तरुण वर्गाची.. कारण मर्यादित भाग असल्याने बघण्याची उत्सुकता टिकून रहाते.. चला तर मग येथे चर्चा करुया वेबसीरीज.. तुम्हाला आवडलेली किंवा न आवडलेली..त्यासाठीच हा लेखनाचा धागा..

मला आवडलेल्या काही हिंदी वेबसीरीज.
1. लवबाईट्स..भाग 1 आणि 2
2. ब्लॅक काॅफी
3.स्पाॅटलाईट भाग 1
4. ट्विस्टेड भाग 1
5. अनटचेबल्स...
मराठीत अजून काही पाहिल्या नाहीत.

ह्या अजून काही वेबसीरीज
Pitchers (absolute must watch)
Bang Baaja Baarat
TVF Roommates
#movingOut (Marathi)
and absolutely hilarious How to train your dad

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेटर कॉल सॉलचे 5 सिजन पाहून संपले ...

ह्यूमन्स ही सिरिज पाहत आहे , एकूण 24 एपिसोड आहेत . विज्ञानाला हुबेहूब मानवी रोबोट निर्माण करण्यात यश मिळालं आहे . ज्या कामांसाठी स्वतंत्र बुद्धी लागते अशी कामं सोडून सर्व प्रकारची कामं हे सिन्थस करू शकतात - कुकिंग , मुल सांभाळणे , कारखान्यांमधली सोपी रिपीटिटीव्ह कामं .. त्यामुळे लाखो लोक बेकार झाले आहेत .. सिन्थस बद्दल रोष वाढत चालला आहे .. कार पेक्षाही सिंथ स्वस्त आहे , त्यामुळे सुखवस्तू मध्यमवर्गीय लोकांमध्ये घरट्यागणिक एक सिंथ असतोच ... शारीरिक सुखासाठीही यांचा वापर होतो , त्यासाठी लागणारं प्रोग्रामिंगही आहे . बरेच लोक सिंथना अतिशय क्रूरपणे वागवतात .. माणसातला क्रूरपणा त्यांच्या वागण्यातून प्रकट होताना दिसतो . तर अनेक लोक आयुष्यात खऱ्या माणसांना रिप्लेस करून सिंथने शारीरिक - भावनिक गरजा भागवत आहेत .. काहीजण आपल्या सिंथशी इमोशनली अटॅच झाले आहेत , रोबोटला काहीही भावना नाहीत हे माहीत असूनही .

ह्या सिंथची निर्मिती ज्याने केली त्या शास्त्रज्ञाला त्यांना ह्यूमन कॉन्शनसनेसही द्यायचा होता पण त्याच्या हयातीत ते शक्य झालं नाही . 5 - 6 कॉन्शनस रोबोट निर्माण करण्यात तो यशस्वी झाला .... दुसऱ्या सिजनच्या शेवटी जगभरातले सगळे रोबोट कॉन्शनस होतात आणि मग अक्षरशः गदारोळ उठतो ... माणसं त्यांना बरोबरीचे हक्क द्यायला तयार नसतात .. मग दोन गटांमधला संघर्ष ..

>>>>कारण त्या ग्लॅमरस रोलमध्येच असतात, टिचरच्या नाही.<<<<
मै हू ना हा शाहरुखचा पिक्चर बघितला नाही वाटतं? सुश्मिता काय दिसलीय त्यात. Happy
कदाचित कॉलेज प्रोफेसरने तसे कपडे घालणे चालत असावे. कींवा ती सुश्मिता म्हणून चालत असावे.

मै हू ना हा शाहरुखचा पिक्चर बघितला नाही वाटतं? >>>>> म्हणजे तू 'रसभरी' पाहिली नाही वाटतं? Wink मी सुश्मिता फॅन नाही पण स्वरा भास्कर आणि सुश्मिता तुलनाच होऊ शकत नाही. मी दोघींच्या respective रोलमध्ये दिसण्याबद्दल बोलते आहे. एक ग्लॅमरस दिसली आहे, पण अजिबात चिप दिसली नाही. पुरुष असो की स्त्री, तिला त्या रोलमध्ये बघितल्यावर wow वाटलं आहे, पण स्वरा भास्कर निव्वळ Wxxxx दिसली आहे. दोन्ही भूमिका पहिल्या आणि साड्या पाहिल्या तर फरक कळेल.

कदाचित कॉलेज प्रोफेसरने तसे कपडे घालणे चालत असावे. >>>> हो. शाळा आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांचं वय आणि मॅच्युरिटी पहाता मला त्यात हरकत वाटली नाही.

कींवा ती सुश्मिता म्हणून चालत असावे. >>> हो. याचं उत्तर पण हो आहे. कधी कधी, रादर नेहमीच, तुमची फिगर आणि ओव्हर ऑल पर्सनॅलिटी कशी आहे यावर तो ड्रेस तुमच्यावर क्लासी दिसेल की चीप ते ठरतं. उदाहरणं सांगू का? Happy किंवा मग सुश्मिताला बघून मग स्वराला बघितलं तरी माझा मुद्दा कळेल.

(या सगळ्यात सुश्मिता आणि स्वरा या प्रत्यक्ष जीवनातल्या व्यक्ती नाही, तर आपण तुलना करतो आहोत त्या दोन रोल्स आणि त्यांचे कपडे आणि दिसण्याबद्दल बोलते आहे)

*स्पॉयलर*

बुलबुल काल पाहीला, सिनेमा ओके ओके ...
पन मला लै प्रश्न पडले पाहून झाल कि

ठाकूर आगीत अस काय बघतो कि पाय मोडेपर्यंत तिला मारतो?

त्याने तिला लग्नानंतर स्पर्शही केलेला नसतो ?

मुळात एवढ्या लहानग्या मुलीबरोबर लग्नच का करतो??

इतक्या सीरिज आणि पोर्टल आहेत की आता असे वाटते की प्रत्येक पोर्टलसाठी एक धागा काढावा लागेल
अमेझॉन, नेटफ्लिक्स, सोनीलाइव्ह,इरॉस

ह्यूमन्स ही सिरिज पाहत आहे कुठे आहे ही सीरिज ? अमेझॉन की नेटफ्लिक्स ?>> अमेझॉन प्राईम वर आहे. मी ही कालच बघायला सुरु केली आहे. चांगला वाटला पहिला भाग.

ठाकूर आगीत अस काय बघतो कि पाय मोडेपर्यंत तिला मारतो?>> ती दुसरी बाई हळूहळू त्याच्या मनात सत्या आणि बुलबुल बद्दल काहीबाही भरवायला सुरुवात करते. मग हा सत्याला शिक्षणाच्या कारणाने लंडनला पाठवायचे बोलतो तशी बुलबुल फारच दु:खी होते. सत्या आणि बुलबुल मिळून एक कादंबरी लिहित असतात. त्या लेखनवही वर त्या दोघांचे नाव लिहिलेले असते. आगीत सगळी वही जळताना नेमका दोघांच्या नावाचा तुकडा ठाकूर बघतो मग त्याची सटकते.

आसा ,
बुलबुल ने व तिच्या दिराने मिळून लिहिलेली कथा आगीत जळालेली असते पण तुकड्यावर त्यांचे नाव पहातो त्याने त्याला खात्री पटते. बिनोदिनीने जो संशय निर्माण केला असतो.

त्याने तिला लग्नानंतर स्पर्शही केलेला नसतो ?
हे मलाही स्पष्ट कळले नाही. केला असेलच वाटले कारण नंतर मोठी झाली ना ती.

मुळात एवढ्या लहानग्या मुलीबरोबर लग्नच का करतो??

त्या काळी असेल कदाचित.

मला तर असं सुद्धा वाटले की त्याच्या मतिमंद जुळ्या भावाचे लग्न आधी कसे झाले जर हा बडे ठाकूर आहे !!

सध्या प्राइमवर जमेल तेव्हा 'मार्वलस मिसेस मेझल' बघते आहे. ५०-५५ मिनिटांचा एक एक भाग आहे.
ती कलाकार खूप छान काम करते. विषय वेगळा आहे. डायलॉग्जमध्ये सगळी मजा आहे. >>>> +1000 .
2-3 भाग बघितले. Dialogues are too crispy. ती खूप cute आहे. आवडतेय सीरीज.

टिनएजर्सना सिड्युस करायला अपॉइंट केल्यासारखी साड्या, आणि पदर घेऊन कोणती टीचर शाळेत येईल? >> मै हू ना मध्ये सुश्मिता टीचरनी पण अश्याच साड्या नेसल्या होत्या.

स्वरा भास्कर आणि सुश्मिता तुलनाच होऊ शकत नाही. >> हे नंतर वाचलं. बरोबर आहे. आणि मी रसभरी पाहिली नाही पण स्वरा भास्कर आणि सुश्मिताची तुलना होऊच शकत नाही हे खरंय.

शाळा या मराठी चित्रपटात अमृता खानविलकर शाळा शिक्षक असते आणि तिच्या साड्याही (की ब्लाउज की दोन्ही) अशाच आहेत, म्हणजे ती एकंदरीत मादक वाटते. शाळा हा चित्रपट तर अगदी 70-80 चा काळ दाखवतो. कुछ कुछ होता है मध्ये अर्चना पुरणसिंग अगदी ध्यान दाखवली आहे.
स्त्री शिक्षकांना चुकीचे दाखवण्याची जणू चढाओढ लागलेली असते. प्रत्यक्षात स्त्री शिक्षकांनी साडीवर कोट घालू द्यावा अशी मागणी केली आणि ती मान्यही झाली. हे सिनेमावाले कुठल्या जगात जगतात काय माहित.

damaged season 1 आणि 2 - दोन्ही मस्त आहेत.
सिझन 2 डायरेक्त्त बघितला तरी चालतो.. वेगळी कथा आहे..

धन्यवाद sonalisl. , मी_अस्मिता

मला तर असं सुद्धा वाटले की त्याच्या मतिमंद जुळ्या भावाचे लग्न आधी कसे झाले जर हा बडे ठाकूर आहे !!
>>>> अगदी !

टिनएजर्सना सिड्युस करायला अपॉइंट केल्यासारखी साड्या, आणि पदर घेऊन कोणती टीचर शाळेत येईल? >> मै हू ना मध्ये सुश्मिता टीचरनी पण अश्याच साड्या नेसल्या होत्या.>>>>
आणि मला आठवतय ती देखिल ग्लॅमरसपेक्षा चीपच वाटलेली. आम्ही चर्चा पण केलेली अश्या रोलसाठी ती तयार का झाली. त्या पिक्चरमधे खरतर केवळ शाहरूखची नायिका सोडता तिचा काहीच रोल न्हवता. आणि शाहरूखसाठी डोळ्यात बदाम घेउन बसलेल्या स्त्रीवर्गाने तिला ignore केले आणि पुरूषवर्गाला तिला अश्या स्वरुपात बघण्यात काहीच प्रॉब्लेम न्हवता. दुसरे म्हणजे इतके उत्तान कपडे दाखवले असतानाही शाहरूख सोडता इतर कॉलेज विद्यार्थ्यांना तीने आकर्षीत केले असे दाखवले न्हवते (मला तरी आठवत नाही). तो रोलच केवळ तेव्हढा होता.

त्याउलट मी रसभरी बघितली नसली तरी इथेच दिलेल्या वर्णनावरुन असे वाटते की सेक्शुअल कंटेंटसाठीच बनवली आहे आणि स्वराची त्यात मुख्य भूमिका आहे. तेव्हा कथेच्या गरजेप्रमाणे त्या स्वरुपाचाच कपडेपट असेल आणि त्याबरोबरीने तसे प्रसंग दाखवले गेले असतील. शाळामधे कथानक शाळकरी मुलांच्या नजरेतून दाखवले गेले आहे. त्यामुळे शिक्षिकेचे रुपही त्या मुलांच्या नजरेतूनच आलेले आहे. कदाचित मोठ्या माणसांच्या नजरेतून सादर केलेल्या कथानकात ते तसे आले नसते किंवा मै हु ना सारखे खटकले नसते.

सुष्मिताला कोणी इग्नोर केले Uhoh शाहरुखसाठी नाही पण सुश्मितासाठी डोळ्यात बदाम होते माझ्या. भयानक आवडते ती मला. ती कुठे आणि स्वरा कुठे. कहा गंगू तेली और कहा राजा भोज Biggrin

शाळा या मराठी चित्रपटात अमृता खानविलकर शाळा शिक्षक असते आणि तिच्या साड्याही (की ब्लाउज की दोन्ही) अशाच आहेत, म्हणजे ती एकंदरीत मादक वाटते. >>> हो, तिला ते शोभतं पण तरीही शाळा डोंबिवलीच्या एका शाळेत घडलेली स्टोरी आहे तीही माझ्या पिढीच्या आधी, त्यामुळे जरा आश्चर्य वाटलं त्या अटायरचं कारण आमच्यावेळीही मराठी शाळेत कोणी शिक्षिका साधा स्लीव्हलेस ब्लाऊज घालून शिकवायला येत नव्हत्या (निदान माझ्या शाळेत तरी). बाहेर क्वचित काहीजणी घालायच्या पण शाळेत नाही.

घालण्याला माझा काहीही आक्षेप नाहीये पण कदाचित cinematic लिबर्टी घेतली असावी ते charactor दाखवताना असं वाटलं.

रसभरी बद्दल अनुमोदन. काहीच्या काहीच सिरीज आहे.
नक्की काय गुढ उलगडलच नाही. त्या नंदच काम आवडलं फक्त.
११वी मधे खाता कोण खोलतं .. काहीही…
शेवटच्या सीन मधे नंद आणी प्रियांका दोघं रसभरीसमोर असताना तर यक्क च वाटलं.

बुलबुलची स्टोरी तशी काही खास वेगळी नाहीये पण तरीही हा movie खिळवून ठेवतो. कारण उत्कृष्ट cinematography, गूढ वातावरण निर्मिती , छान लोकेशन्स, रंगाचा वापर छान केला आहे. आणि बुलबुल झालेली अभिनेत्री Tripti Dimri मला खूपच आकर्षक वाटली. बाकी ऍक्टर्सनी पण चांगले काम केले आहे.
सिनेमा पाहून झाल्यावर थोडा वेळ भारावल्यासारखे वाटते. बस इतकेच. व एकदा पाहणेबल आहे

बुलबुलची स्टोरी तशी काही खास वेगळी नाहीये पण तरीही हा movie खिळवून ठेवतो. कारण उत्कृष्ट cinematography, गूढ वातावरण निर्मिती , छान लोकेशन्स, रंगाचा वापर छान केला आहे. आणि बुलबुल झालेली अभिनेत्री Tripti Dimri मला खूपच आकर्षक वाटली. बाकी ऍक्टर्सनी पण चांगले काम केले आहे.>>>> हो
वातावरणनिर्मिती क्लास आहे
कथा बरी आहे

बहुचर्चित असुर पाहिली .. हिंदी-मराठीत असे कथानक पहिल्यांदाच बघितले. मायथॉलॉजि चा वापर मस्त केलाय. पण शेवट पहिल्यावर इंग्लिश सेव्हन सिनेमाची आठवण झाली.

Pages