वेबसीरीज.

Submitted by बी.एस. on 9 April, 2018 - 01:55

सध्या अनेक वेबसीरीज येत आहेत. नेहमीच्या रटाळ दैनंदिन मालिके पेक्षा ह्या वेबसीरीज ना जास्त पसंती मिळत आहे. विशेषतः तरुण वर्गाची.. कारण मर्यादित भाग असल्याने बघण्याची उत्सुकता टिकून रहाते.. चला तर मग येथे चर्चा करुया वेबसीरीज.. तुम्हाला आवडलेली किंवा न आवडलेली..त्यासाठीच हा लेखनाचा धागा..

मला आवडलेल्या काही हिंदी वेबसीरीज.
1. लवबाईट्स..भाग 1 आणि 2
2. ब्लॅक काॅफी
3.स्पाॅटलाईट भाग 1
4. ट्विस्टेड भाग 1
5. अनटचेबल्स...
मराठीत अजून काही पाहिल्या नाहीत.

ह्या अजून काही वेबसीरीज
Pitchers (absolute must watch)
Bang Baaja Baarat
TVF Roommates
#movingOut (Marathi)
and absolutely hilarious How to train your dad

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नेटफ्लिक्स वर ८ भागांची ‘कॅलिफेट’ पाहिली.
सिरियातल्या स्त्रियांच्या गंभीर समस्यांबद्दल, स्विडनहून लहान वयातल्या मुलींची ब्रेनवॉश करूनं सिरीयाला होणारी निर्यात, टेररिझम आणि एस्केप फ्रॉम सिरीयाचा मोठा स्ट्रगल अशा गोष्टी हातळल्या आहेत , जरुर बघा , सत्यघटनांवर आधारीत आहे.
ही सिरीज मुख्य्तः ४ बायकांवर आहे पण ओव्हरॉल अनेक गोष्टी सुन्न करतात !
(मुळ सिरीज स्विडिश आहे, ऑप्शन्स मधे इंग्लिश सिलेक्ट करावे लागेल.)

प्राईम वर माधवन ची ब्रीद (Breathe) बघितली.

खूप फ्लॉज आहेत. बरीच प्रेडीक्टेबल पण वाटली. पण नेटाने बघितली. जॉशला बघून प्रत्येकवेळी आत कुठेतरी हलत होतं. फार गोड मुलगा घेतलाय त्या भूमिकेसाठी.

शेवट म्हटलं तर आनंदी आहे म्हटलं तर नाही.
मला वाईटच जास्त वाटलं. अरुणाच्या बाबतीत पण जे घडतं ते शॉकिंग होतं (स्पॉयलर नको म्हणून इथे जास्त लिहीत नाही). राव ला सुद्धा खूप बडवलं. एसीपी शंकर पाटील वठवणारे मुखर्जी आपला बंगाली लहेजा कुठेच सोडत नाहीत. मला वाटतं धोनीच्या सिनेमात पण आहेत ते. त्याच्या टॅटू वाल्या शेजारी आणि त्याच्या बायकोचा काहीतरी महत्वाचा रोल असेल पुढे/ शेवटी असं वाटत होतं. असो..

Hotstar वर 'Out of Love' हिंदी सीरिज पाहिली. काहीच नवीन नाही. डॉक्टर बायको (रसिका दुगल), आर्किटेक्ट नवरा (परब कोहली) त्यांचा एक मुलगा आणि सासूबाई - सोनिया राजदान. असं सुखी आणि सुखवस्तू कुटुंब. रहायला कुंनुर सारख्या निसर्गरम्य ठिकाणी (हो त्यामुळे आपल्या डोळ्यांना सुख).
मग एके दिवशी बायकोला नवऱ्याचं अफेअर असावं अशी शंका येते आणि थोडी डिटेक्टीव्हगिरी केल्यावर ते अफेअर 2 वर्ष चालु आहे आणि ती सोडता अख्ख्या जगाला (सासू, बेस्ट फ्रेंड, नवऱ्याची सेक्रेटरी, शेजारी इ सर्वच जण) माहीत आहे हे कळतं. त्यात नवऱ्याने प्रचंड कर्ज करून ठेवलं आहे हे ही बाहेर येतं. आणि मग सगळी भावनिक उलघाल.

ब्रीद मला पहिल्या भागातच फार बोर वाटलेली. कदाचित त्या हीरॊमुळे जो सारखा झोपाळलेला दिसतो. दुसरा भाग बघितलाच नाही.

एक फार्मा कंपनी असते ना यांची मग इतके मोठ्ठाले २ मॅन्शन , नोकरचाकर, गाड्या? असू शकतं का? ~~ फार्मा च्या नावाखाली अफिम पण विकत असतात ना ते.. दाखवल आहे पहिल्याच एपि मध्ये. आणि वडिलोपार्जित उद्योग दाखवला आहे.

स्वस्ति, दिपांजली ~ +१२३४५

When they see us.... watch on Netflix.... its a true story.... on how 5 black innocents were treated

कदाचित त्या हीरॊमुळे जो सारखा झोपाळलेला दिसतो. दुसरा भाग बघितलाच नाही.

>> माधवन कि कबीर? कि याआधीची ब्रीद सिरीज?
कबीर तर मलाही खूप इरिटेट झाला.

नेटफ्लिक्सवर ' ग्रँड हॉटेल' ही स्पॅनिश सिरीज बघतेय सध्या. कथानक छान फुलवत नेले आहे. मर्डर मिस्टरी आहे. Happy

@चंपा

>> तोच कबीर

तुम्ही खरंच माझा डु आय आहात चंपा Happy

आर्या पाहिली. मस्त आहे. आवडली. मी तसंही फार कीस पाडत नाही आणी सस्पेन्स शोधायचा प्रयत्न करत नाही. त्यामुळे मला एक तर शोज, मूव्हीज आवडतात, नाहीतर पकाऊ वाटतात. आर्यात सगळ्यांची कास्टींग, अ‍ॅक्टींग छान वाटली. प्रत्येक एपिसोड चा शेवट पुढच्या एपिसोडची उत्कंठा वाढवणारा होता. नेटफ्लिक्स नसल्यामुळे, सेक्स, व्हायोलन्स, टॉयलेट सीन्स आणी शिव्यांचा भडीमार नव्हता.

मी पण नुकतीच आर्या बघून संपवली. आवडली,

आर्यात सगळ्यांची कास्टींग, अ‍ॅक्टींग छान वाटली. प्रत्येक एपिसोड चा शेवट पुढच्या एपिसोडची उत्कंठा वाढवणारा होता. नेटफ्लिक्स नसल्यामुळे, सेक्स, व्हायोलन्स, टॉयलेट सीन्स आणी शिव्यांचा भडीमार नव्हता.>>>>> सहमत फेरफटका

आजच नेफीवर डार्क सिरीजचा तिसरा आणि शेवटचा सीजन बिंजवॉच केला. बऱ्याच काळानंतर एखाद्या आवडत्या सिरीजचा मला समाधानकारक असा शेवट झालाय. जस्ट माईंडब्लोविंग अँड माईंडबॉगलिंग स्टफ. आता डार्कचा दोन दिवस हँगओव्हर राहणार.

नेटफ्लिक्स वर बुलबुल पाहिला, सिनेमा ओक्के टाइप आहे पण वातावरण निर्मिती , व्हिज्युअल्स, सिनेमॅटोग्राफी , कास्टिंग, बॅक्ग्राउंड स्कोअर(थोडा गॉट इन्स्पायर्ड ) चांगला आहे.
तसेच मुव्हीमुळे बर्याच पालथ्या घड्यांना प्रोवोक केले म्हणे :
प्रतीक बोराडे या सो कॉल्ड मुव्ही रिव्ह्युअरचं डोक फिरलय, प्रत्येक सिनेमा, सिरीज हे कसे अँटि भारतीय संस्कृति आहेत हा एकमेव या माणसाचा अ‍ॅजेंडा असतोच पण ‘बुलबुल’ सिनेमाचा रिव्ह्यु देताना अतिच झालय !

https://youtu.be/1aYuKioQrks

याच्या म्हणण्यानुसार भारतीय स्त्रियांवर अन्याय होतच नाहीत, हो अगदी सिनेमात दाखवलेल्या १८ व्या शताकातले स्त्रियांचे बालविवाह, अत्त्यचार , विधवांचे जीवन हे सगळे म्हणे फक्त आपल्या महान संस्कृतिला बदनाम करण्यासाठी आहेत , मग भारतीय स्त्रिया कशा कायमच पॉवरफुल होत्या, त्यांना किती स्वातंत्र्य होत हे सांगण्यासाठी हा माणुस पुराणतल्या स्वयंवर वगैरे कथांचे रेफेरन्स देतो !
याच्या म्हणण्यानुसार अत्ताही खेडेगावात सुध्दा प्रत्येक घराची मुख्य ही बाईच असते म्हणे (थोडक्यात घरात जेवायला काय बनणार, सुनेला डॉमिनेट करणे हे त्याच्या दृष्टीने स्वातंत्र्य !)
सिनेमात जोडवी घालणे म्हणजे मुलीला कंट्रोल मधे ठेवणे असे सत्त्यवचन आल्याने तर या रिव्ह्युअरचा टिप्पिकल अ‍ॅक्युप्रेशर , सोळा शृंगार वगैरे ट्रॅक घसरलाच आहे, थोडक्यात बायकांनाच काय ते रोग होतात त्यामुळे त्यांनाच अ‍ॅक्युप्रेशरच्या उदात्त हेतुने कसे काय काय घालायची गरज आहे हे हा पालथा घडा सांगतो ! फॅक्ट अशी आहे कि बुलबुलच्या लेखक-डिरेक्टरनेच याचा ‘पालथा घडा‘ अ‍ॅक्युप्रेशर पॉइंट दाबलाय.
अनेक पालथे घडे बघितले आहेत, so nothing surprising पण या माणसाला 300K सबस्क्रायबर्स आहेत म्हणजे अशा वृत्तिचे किती लोक आहेत याचे रिअ‍ॅलिटी चेक मिळते.

येस्स्स! बुलबुल पाहिला. आवडला. फार मोठं रहस्य वगैरे नसलं तरी छान आहे. सिनेमॅटोग्राफी, दिग्दर्शन, अभिनय, लायटिंग आणी सेट्स- छान आहेत.

आर्या बघून संपली. मस्त वाटली. तिचे वडील म्हणजे जुन्या विक्स की गोली लो खिचखिच वाल्या दुरदर्शन जाहिरातीतला हिरो. मस्त दिसायचा एकदम. नाव माहित नाही.
सगळ्यांची कामं आवडली. दौलत, आर्या, जवाहर, संग्राम, शेखावत अगदी लक्षात राहण्यासारखे. राजस्थानच्या हवेल्या पण छान घेतल्या आहेत जिथे ही लोकं कामानिमित्त भेटतात. आर्याचा अ‍ॅक्सेंट कधीकधी इरिटेटींग फेक वाटतो पण तेवढे इग्नोअर. बाकी मस्त आहे सिरीज.

बु लबुल बघितला काल नेफ्लिवर. मस्त गुढ वातावरण निर्माण केलंय. लाल, करड्या रंगाचा वापर आवडला. १८०० चा काळ दाखवलाय बहुतेक. राहुल बोस अ‍ॅट हिज बेस्ट. ती हिरॉईन कोण आहे माहित नाही. तिचंही काम चांगलं आहे. लहानपणीची बुलबुल गोड एकदम.

तिचे वडिल म्हणजे अ‍ॅक्टर जयंत कृपलानि, मस्तं काम करतो .>>>>> हो बरोबर, अत्ता आठवलं, तू नाव लिहिल्यावर.
आणि इन्स्पेक्टर खान म्हणजे खोटे सिक्केवाला ना? अॅक्टर चं नाव नाही माहिती.

डार्क बघतोय .... अद्भुत , अतर्क्य .... जबरदस्त सीरिज ...

आतापर्यंत बघितलेल्या वेबसीरिज मधली सर्वोत्तम !

पहिला सीझन काल सम्पला , आज दुसर्‍या मधील चार भाग झाले , उद्या तिसरा

आता पीअर प्रेशर मुळे डार्क पण बघावी लागेल…. असा जोक फिरतोय सगळीकडे Proud

येस्स दीपांजली.. जयंत कृपलानी. काय हँडसम आहे.

बादवे मी सध्या एजंट राघव बघतेय नेफ्लिवर. मस्त टाईमपास. दुरदर्शन वर सुराग वगैरे असायची त्या टाईप् आहे. बिलकुल डोक्याला ताप नाहीये. दर एपिसोड वेगळी स्टोरी सो कंटीन्यूटी ची भानगड नाही. शरद केळकर फॅन्स साठी मस्त. बाळबोध आहे एकदम पण आवडतेय तो असल्याने. Happy

सोनी लिव वर "फॉल्स ऑनर" स्ट्रिमिंगला आली आहे. एकदम मस्त; बोलेतो सर्प्राइज पॅकेज. जिमी शेर्गील, वरुण बडोला, यशपाल शर्मा यांचे रोल्स्/कामं मस्त. इतर कलाकार हि ठिक आहेत फक्त तो जजचा मुलगा, की रोल असुनहि ठोकळ्या सारखा वावरला आहे. शेवटचा ट्विस्ट अनपेक्षीत...

बुलबुल पाहिला... फार वेगळा आहे. Dark sad... Mysterious...All in one. बंगाली मेकअप आकर्षक. पिरियड फिल्म आहे .काही तरी अद्भुत पाहिल्यासारखे वाटले.
नेटफ्लिक्सवर.

प्राईम - रसभरी - स्वरा भास्कर
माझं रेटिंग - * फक्त ( ते ही त्यातल्या काही सपोर्ट रोल मधल्या कलाकारांच्या अभिनयासाठी)

जे स्वरा भास्करचे फॅन्स आहेत त्यांच्यासाठी आणि त्यातही चीप केंटेटची आवड असणाऱ्या प्रेक्षकांसाठी ही वेब सिरिज बनवली गेली आहे. कथा, अभिनय, एकूणच सगळ्या बाबतीत बोंब आहे. सतत इंग्लिश मुव्हीज, नेटफ्लिक्स आणि प्राईम सीरिज बघून स्वेअर वर्ड्स आणि सेक्स सीन्स मला awkward करत नाहीत, पण ही सीरिज बघून किळसवाणं फिलिंग आलं.
स्वरा भास्करचे ट्विट्स आणि controversies यामुळेच ती माहीत होती. ऑन स्क्रीन TwM मध्ये पाहिलं होतं, पण फार लक्ष गेलं नाही. या सिरीजमध्ये मुख्य भूमिका असल्याने तसं तिला पहिल्यांदा नोटीस केलं. ती थोडी बोबली आहे. 'र' म्हणता येत नाही की या रोलमध्ये तिने मुद्दाम जीभ जड असल्यासारखे उच्चार केले आहेत, कोण जाणे. एके ठिकाणी ती 'ट्रॅव्हलिंग' शब्द म्हणाली आहे, तो मी रिपीट करून 2-3 वेळा ऐकला. तेव्हा तर जास्तच जाणवलं.
चीप कॉमेडी आहे, सेक्शुअँलिटी दाखवायची आहे, म्हणून काही वाट्टेल ते दाखवलं आहे. तिच्यासारख्या साड्या आणि ब्लाउजेस घालून कोणतीही टीचर शाळेत जाणार नाही, रादर तिला येऊ देणार नाहीत. टिनएजर्सना सिड्युस करायला अपॉइंट केल्यासारखी साड्या, आणि पदर घेऊन कोणती टीचर शाळेत येईल? माझा मुलगा कॉन्व्हेंट स्कुलमध्ये होता तिथे एवढ्या मॉडर्न आणि फॅशनेबल टीचर्स होत्या, पण चिपली ड्रेस्ड कोणीच कधीच पाहिलं नव्हतं. हिंदी सिनेमामध्ये आपल्याला कमी कपडे किंवा अगदी हाफ नेकेड हिरॉइन्स पहायची सवय असते. Awkward न होता आपण ते पहातो, कारण त्या ग्लॅमरस रोलमध्येच असतात, टिचरच्या नाही.

Pages