पुरुषांना स्त्री ड्यु आयडी घ्यावासा का वाटतो

Submitted by VB on 28 March, 2018 - 22:19

फेसबुकवर स्त्रियांचे अकाऊंट्स जगात असलेल्या स्त्रियांपेक्षा कैक पटीने जास्त आहेत असे ऐकलेय, त्यावरून खूप सारे जोक सुद्धा वाचलेत. कदाचित इथे माबोवरही असतील काही पुरुष मंडळी जी स्त्री आयडी वापरत असतील.
माझा एक मित्र आहे ज्याचे फेसबुकवर असे स्त्री खाते आहे. जिथवर मी त्याला ओळखते flirting type नाही वाटत तो. मी त्याला बरेचदा विचारलेही कि का असे करतो , तर उत्तर टाळले त्याने.
पण तरीही मला उत्सुकता आहे कि काय कारणे असतील असे वागण्यामागे. स्त्री आणि पुरुष फक्त शारीरिक नाही तर मानसिक अन भावनिक पातळीवर खूप भिन्न असतात. मग फक्त पुरुषाने स्त्री असल्यासारखे भासवून किंवा स्त्रीने पुरुष असल्याचे भासवून नक्की काय साध्य करायचे असते. असे वागण्याने नक्की कसला आंनद मिळत असेल त्यांना असे प्रश्न पडतात मला.

आता कदाचित काही स्त्रियासुद्धा पुरुष आयडी वापरत असतील, पण किमान माझ्या पाहण्यात नाही आल्या.

सो, हा धागा काढण्यामागचे प्रयोजन इतकेच की, यावर इतरांची मते जाणून घ्यावेसे वाटले.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काढा की धागा. >>> त्याच्यासाठी इथे बरेच उत्सुक आहेत, एक तरी माहीत आहे (पण तो मी न्हवे) Wink

उपाशी बोका, ‘हम तो तेरे आशिक‘ ही नवीन सिरियल वगैरे आहे का? मला कल्पना नाही.
गे किंवा ट्रान्स असण्याची शक्यता असू शकतेच. ही मंडळी भारतात असल्यास तिथे समाजाकडून स्विकारलं जाण्याची शक्यता कमी, त्यामुळे निदान ऑनलाईन तरी रोल प्ले भूक भागवता येते हे कारण असू शकेल.

ऑन सिमिलर लाइनः स्त्री आयडीना प्रोफाइलवर खरे फोटो टाकण्याऐवजी, सुंदर नट्यांचेच फोटो का टाकावेसे वाटतात?

>>>>>

आपली फोटो ओळख लपवणे ही फक्त स्त्रियांचीच मक्तेदारी नाहीये. मी सुद्धा प्रोफाईलवर माझा ओरीजिनल फोटो लावण्याऐवजी ईक्वली स्मार्ट शाहरूख किंवा स्वप्निलचा फोटो लावणे पसंद करतो Happy

अजुन पर्यंत या धाग्यावर दादाच्या ताईंचा एकही प्रतिसाद कसा आला नाही (त्याच त्या द्हावी / बारावी / सहावी / तिसरीतल्या) ? Uhoh

ऋन्म्याच्या नवीन धाग्यामुळे काही पुरुषांचे नवीन स्त्री ड्युआयडी उघडकीस आलेत.
>>>>

माझे धागे नेहमीच जनकल्याणासाठी असतात. त्यातील विचार वा त्याचे परीणाम ज्यांना रुचत नाही ते त्यावर टिका करतात.
हे म्हणजे अगदी नोटबंदीसारखे झाले. ज्यावर काळा पैसा असलेल्यांनी आगपाखड सुरू केली Happy

माझे धागे नेहमीच जनकल्याणासाठी असतात. त्यातील विचार वा त्याचे परीणाम ज्यांना रुचत नाही ते त्यावर टिका करतात.
हे म्हणजे अगदी नोटबंदीसारखे झाले. ज्यावर काळा पैसा असलेल्यांनी आगपाखड सुरू केली >>>>>>
झालं, आता ठराविक आयडी तुझ्याशी वाद घालणार! नोटाबंदी कशी चुकीचीच होती, आणि त्यामुळे किती माणसे मेली, लोकांना किती त्रास झाला इ. इ. रडगाणे गाणार!!!

विक्षिप्त मुलगा, मी ते गंमतीने लिहिले आहे.
जसे नोटबंदीचे फायदे तोटे दोन्ही होते तेच माझ्या धाग्यांना लागू. विरोधक आपल्या सोयीने तोटे तेवढे उचलतात. मी माझ्या धाग्यांचा समर्थक या नात्याने फायदा तेवढा सांगतो Happy

विक्षिप्त लोकांनी रडगाणी सगळीकडे सुरू केली वाटते Wink चालायचं

इथे बायकी नाव घेऊन आयडी बनवणारे काही विक्षिप्त लोक सुध्दा आहे. बरं का..

<<< उपाशी बोका, ‘हम तो तेरे आशिक है‘ ही नवीन सिरियल वगैरे आहे का? >>>
हो. झी मराठीवर आहे. (आगाऊ सल्ला: अगदी आचरट आहे, बघत नसाल तर बघू नका.)
https://marathistars.com/tv-serial/hum-to-tere-aashiq-hai-zee-marathi-se...

फेसबुक , ट्विटर , मायबोली वरील ड्यु आयडी , पुरषाचे स्त्री च्या नावाने ड्यु आयडी आणि खास करुन गेल्या दोन चार दिवसातली माबो वरील चर्चा याची अमेरिकन सरकारने दखल घेत अमेरिकन व्हिसा apply करताना मागच्या पाच वर्षाची सोशल मिडीया चे डिटेल द्यावे लागतिल असा फतवा काढला आहे.

https://timesofindia.indiatimes.com/world/us/us-wants-visa-applicants-to...

भारत लवकरच महासत्ता बनणार आहे याचा हा ढळढळीत पुरावा आहे. मे. भा. म.
भारताच्या मंत्री महोदयांनी तंबी दिल्यावर झुकरबर्ग पण लगेच काँग्रेससमोर उत्तरे द्यायला यायला तयार झाला. बघा आता तर महासत्ता बनतोच भारत!

विक्षिप्त मुलगा, मी ते गंमतीने लिहिले आहे.>>>>
ऋन्मेऽऽष, ते माहित आहे रे मला! मी देखील तसे तुला मुद्दामच लिहिले होते. मराठीतील 'लेकी बोले, सुने लागे' ही म्हण माहित असेलच ना! अगदी तसेच काहीसे! आणि विशेष म्हणजे माझे जे लक्ष्य होते त्यावर अगदी अचूक नेम लागला आहे!!!

>>कारण मला दुसरयावरच चर्चा करण्यापेक्षा ती स्वत:वर झालेली आवडते. याला माझ्यातील दोष वा दुर्गुणही म्हणू शकता.
ओकेओके..... आता मला कळल की तुला पिळगांवकर का आवडतात
बाकी चालू दे!

आता मला कळल की तुला पिळगांवकर का आवडतात
>>>>

पिळगावकर या एका माणसाच्या गुणांना एका पारड्यात टाकले आणि आजच्या तारखेच्या उर्वरीत मराठी पुरुष कलाकारांना दुसर्‍या पारड्यात टाकले तरी पिळगावकरांचे पारडे दणकून खाली बसेल !
म्हणून मला पिळगावकर आवडतात Happy

कारण मला दुसरयावरच चर्चा करण्यापेक्षा ती स्वत:वर झालेली आवडते. याला माझ्यातील दोष वा दुर्गुणही म्हणू शकता.
>>>
हे मात्र खरे आहे. आणि याला दोष म्हणा वा दुर्गुण हे ईतरांवरच सोडलेय. म्हणजेच मी स्वत:ला जज करत नाहीये Happy
या धाग्यापुरते बोलायचे झाल्यास अजूनही ईथे मी असा एकटाच आहे ज्याला स्त्री ड्यूआयडी काढायचा अनुभव आहे. तर विषयाच्या अनुषंगाने माझ्यावर चर्चा होण्यास का ही ही हरकत नसावी Happy

नार्सिसिस्ट हा स्वतःच्या प्रेमात पडलेला असतो. तो मानसिक आजार आहे, हे सत्य आहेच, पण त्यासोबतच इतरही मानसिक आजार आहेत.

अटेन्शन सीकींग पर्सनॅलिटी , एडीएचडी व नार्सिसिझम अशा तीन शेड्स एकत्र करून तयार होणार्‍या मनोविकाराचे ताजे उदाहरण सध्याच्या धाग्यांतून मला दिसते आहे.

याचे जुने उदाहरण, विथ प्रूव्हन संयुक्ता आयडी अजून इथे कसेकाय फिरकले नाही याचे नवल वाटते. तदनुषंगाने पूर्वी आमच्या एका मित्रांनी कुणा दुसर्‍यांना दिलेली "धाविघाभु" ही पदवी या नव्या महोदयांना ट्रान्सफर करावी असा प्रस्ताव मी येथे मांडत आहे.
***
पाकृतीला भरपूर प्रतिसाद मिळतील.
नवीन Submitted by Srd on 29 March, 2018 - 14:27
<<
ये बात गलत है. माझ्या दोन द्विशतकी पाकृ आहेत मायबोलीवर. अन आजपर्यंत स्त्री आयडी काढायची वेळ आलेली नाही, उलट स्त्री आयडी काढणार नाही हे वारंवार ठासून सांगितल्यामुळे अ‍ॅडमिन यांनी माझ्या काही आयडी उडवल्यात Lol
***
शेवटी डू आयडी बद्दल :

आमचा कुठेही ओरिजिनिल आयडी नाही!

.

.

.

.

.
कठीण शब्दांचे अर्थ : धाविघाभु = धाग्याला विळखा घातलेला भुजंग.

नव्या जनरेशन नेक्ष्ट माबो मेंब्रांना संयुक्ताचा अर्थही सांगावा लागेल कदाचित.. ते उत्तर कुणी स्पेसिफिक प्रश्न विचारल्यास देण्यात येईल.

नव्या जनरेशन नेक्ष्ट माबो मेंब्रांना संयुक्ताचा अर्थही सांगावा लागेल कदाचित>>>>
काय आहे हे प्रकरण ? Happy

माझ्या दोन द्विशतकी पाकृ आहेत मायबोलीवर. अन आजपर्यंत स्त्री आयडी काढायची वेळ आलेली नाही, उलट स्त्री आयडी काढणार नाही हे वारंवार ठासून सांगितल्यामुळे अ‍ॅडमिन यांनी माझ्या काही आयडी उडवल्यात
>>>>

आरारा, हे वरचे धाडसी विधान जर मी म्हटले असते तर मला नार्सिसिस्ट म्हटले गेले असते.
हे शाहरूख वा आमीरच्याच विधानांचाच कसा नेमका विपर्यास करत आपल्या सोयीचा अर्थ शोधला जातो यासारखे आहे Happy

बाकी स्त्री आयडी काढणार नाही म्हणून अ‍ॅडमिन यांनी आयडी उडवल्यात हे बाऊन्सर गेले.. असा आयडी काढायची जबरदस्ती केली गेलेली?? Uhoh

Pages