पुरुषांना स्त्री ड्यु आयडी घ्यावासा का वाटतो

Submitted by VB on 28 March, 2018 - 22:19

फेसबुकवर स्त्रियांचे अकाऊंट्स जगात असलेल्या स्त्रियांपेक्षा कैक पटीने जास्त आहेत असे ऐकलेय, त्यावरून खूप सारे जोक सुद्धा वाचलेत. कदाचित इथे माबोवरही असतील काही पुरुष मंडळी जी स्त्री आयडी वापरत असतील.
माझा एक मित्र आहे ज्याचे फेसबुकवर असे स्त्री खाते आहे. जिथवर मी त्याला ओळखते flirting type नाही वाटत तो. मी त्याला बरेचदा विचारलेही कि का असे करतो , तर उत्तर टाळले त्याने.
पण तरीही मला उत्सुकता आहे कि काय कारणे असतील असे वागण्यामागे. स्त्री आणि पुरुष फक्त शारीरिक नाही तर मानसिक अन भावनिक पातळीवर खूप भिन्न असतात. मग फक्त पुरुषाने स्त्री असल्यासारखे भासवून किंवा स्त्रीने पुरुष असल्याचे भासवून नक्की काय साध्य करायचे असते. असे वागण्याने नक्की कसला आंनद मिळत असेल त्यांना असे प्रश्न पडतात मला.

आता कदाचित काही स्त्रियासुद्धा पुरुष आयडी वापरत असतील, पण किमान माझ्या पाहण्यात नाही आल्या.

सो, हा धागा काढण्यामागचे प्रयोजन इतकेच की, यावर इतरांची मते जाणून घ्यावेसे वाटले.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही स्त्री आयडी घेऊन लिहिणारे पुरुष नाही ना? Wink
चला हवा येऊ द्या चा प्रभाव असावा लोकांवर.
मी अनोळखी लोकांना अ‍ॅड करत नसल्यामुळे असा प्रश्न आला नाही कधी.

तुम्ही स्त्री आयडी घेऊन लिहिणारे पुरुष नाही ना >>> नाही, इथे काहीजण मला वैयक्तिकरित्या ओळखतात. आणि त्यातील एक इथे नियमितपणे लिहीणार्या आहेत.

अर्थात मला स्पष्टीकरण द्यायची गरज नाही, तरी सांगतेय

सायो, मी हा धागा काढण्यापूर्वी हा असा प्रश्न विचारला जाईल असे वाटले होते मला.

तुमच्या आयडीशी मिळता जुळता एक आयडी होता इकडे जो मुळात पुरुष आयडी असल्याचं कानावर आलं होतं. तो आयडी तुम्हीच वाटल्याने विचारलं. तुमचं लेखन बघितल्यावर तुमचा आधीचा आयडी VB असल्याचं लक्षात आलं.

मित्रांमध्ये कोणी भोळाभाबडा असेल आणि त्याची टिंगल करायची असेल तर ही युक्ती वापरत असतील. फेसबुकवर हे सोपं आहे. इथे माहित नाही.

>मग फक्त पुरुषाने स्त्री असल्यासारखे भासवून किंवा स्त्रीने पुरुष असल्याचे भासवून नक्की काय साध्य करायचे असते. असे वागण्याने नक्की कसला आंनद मिळत असेल त्यांना असे प्रश्न पडतात मला.
मी सोशल नेटवर्कींग मागच्या व्यवस्थापनेतून आलेल्या अनुभवातून हे लिहित आहे. ज्यांना खरोखरच मानसिक आनंदासाठी (किंवा कारणासाठी) असे लिहायचे असते त्याबद्दल नाही.

सोशल नेटवर्कींग साईटवर जेंव्हा एक पुरूष व्यक्तीरेखा आपणहून दुसर्‍या व्यक्तीशी संपर्क करते किंवा संपर्क करायला तयार असते तेंव्हा काय होते?
पुरूष व्यक्तीरेखा -> स्त्री (खरी ) (माहितीतला पुरुष नसेल तर दाद देतेच असे नाही. थोडे फटकून वागेल , किंवा दादच देणार नाही)
पुरूष व्यक्तीरेखा -> पुरुष (खरा) ( सहसा पुढे संपर्क ठेवायची तयारी असेल)

आता जेंव्हा एक स्त्री व्यक्तीरेखा आपणहून दुसर्‍या व्यक्तीशी संपर्क करते किंवा संपर्क करायला तयार असते तेंव्हा काय होते?
स्त्री व्यक्तीरेखा -> स्त्री (खरी ) ( सहसा पुढे संपर्क ठेवायची तयारी असेल)
स्त्री व्यक्तीरेखा -> पुरुष (खरा) ( सहसा पुढे संपर्क ठेवायची तयारी असेल)

खरे तर स्त्रीया आणि पुरुष दोघांनी फसवल्याची भरपूर उदाहरणे असताना , अजूनहि स्त्री व्यक्तीरेखेशी संपर्क ठेवायची स्त्री /पुरुष दोघांचीही जास्त मानसिक अनुकुलता दिसते (विशेषतः भारतीय समाजात). हे प्रत्यक्ष व्यवहारातही होतेच. त्यामुळे मुद्दाम अशी व्यक्तीरेखा घेऊन , दुसर्‍यांशी संपर्क वाढवून त्यांची माहिती मिळवणे सोपे होते. त्या माहितीचा नंतर गैरवापर होऊ शकतो.
माझ्या माहितीप्रमाणे हे भारतीय समाजाशी निगडीत व्यक्तिंबरोबर जास्त होते. पाश्चात समाजात केवळ स्त्री आहे म्हणून जास्त विश्वास आणि केवळ पुरूष आहे म्हणून कमी विश्वास असे आढळत नाही . त्यामुळे त्या संदर्भात असे करणार्‍या व्यक्ती मानसिक आनंदासाठी करत असाव्यात.

फेसबुकवर हे सोपं आहे. इथे माहित नाही.>>>>

उलट इकडे सोपे आहे, फेसबुक वर तुमच्या फ्रेंडलिस्ट मधले इतर लोक वगैरे पूर्ण इको सिस्टम तयार करायला लागेल.

माबो वर एक बहाद्दर होते, वीणा सुरू, सपना हरिनामे वगैरे रूपे धारण केली होती त्यांनी. त्यांची प्रकट मुलाखत घेतलीत तर ते असे का करतात याची आम्हाला पण कारणे कळतील.
Happy

जसे ड्यू आय डी काढायची चांगली वाईट हजार कारणे असतात तशी स्त्री ड्यूआय काढायचीही कैक कारणे असू शकतात. ईतरांचे माहीत नाही, मी माझ्याबद्दल बोलतो.

मी सुद्धा मध्यंतरी विचार करत होतो मायबोलीवर स्त्री ड्यू आय काढायचा. म्हणजे अजूनही तो विचार डोक्यात आहेच. कारण फार सिंपल आहे. काही चर्चेचे धागे एका स्त्री आय डी ने काढले तर त्यातील विचार जास्त परीणामकारक ठरतील असे मला वाटते.

ऑर्कुटवर याच कारणासाठी माझे एक फेक प्रोफाईल होते. फार गाजलेलेही. कारण रोखठोक बोलणारे स्त्री व्यक्तीमत्व होते. काही जणांचा पुरुषी अहंकार दुखावल्याने तिच्यावर डूख धरून होते, तर काही जण ईम्प्रेस झाले होते. अर्थात पुरुषी स्वभावाला अनुसरून काही निव्वळ फ्लर्ट करायला येणारेही भेटले. पण जेव्हा एखादे स्त्री प्रोफाईल बनवले जाते तेव्हा त्यासोबत एक फार मोठी जबाबदारी सुद्धा अंगावर येते. एक म्हणजे त्याचा कुठलाही गैरफायदा घेऊ नये. तसेच आपण स्त्री वर्गाचे प्रतिनिधीत्व करत आहोत तर त्यांची प्रतिमा डागाळू नये याचीही काळजी घ्यावी लागते. त्यामुळे हेतूशी प्रामाणिक राहिलो आणि त्यातून फक्त धागे काढले.

मागे मी एकदा ऑफिसमधील एका स्त्रीलंपट सिनिअरमोस्ट व्यक्तीला धडा शिकवायला असा आयडी काढलेला. फार मोठा किस्सा आहे पण जे केले त्यामुळे ऑफिसमधील बरेच महिलांचे आशीर्वाद मिळाले. फक्त ते करणारा मीच हे त्यांना सांगू शकलो नाही ईतकेच. पण त्याने काही फरक पडत नाही. आपल्या अंगातील किड्यांचा योग्य वापर करत आपण काही चांगले काम केले याचे समाधान मिळाले Happy

त्या आधी कॉलेजमध्ये सेम असेच ग्रूपमधील मुलांना गंडवायला असा आयडी काढलेला. मित्रांमधील मस्करी होती ती. त्याचेही किस्से निघतील. पण एकंदरीतच कॉलेजमध्ये जे किडे केले आहेत ते पाहता अश्या छोट्यामोठ्या गोष्टींचे मला अप्रूप नाही.

माझा याबाबत एकच फण्डा आहे. कुठलाही आयडी घ्या, कितीही काढा. पण त्यातून कधीही असे वागू नका जे उद्या हा माझाच आयडी आहे हे कबूल करायला तुम्हाला लाज वाटेल.

मायबोलीवर हे होतं असावं कारण आयडी एस्टॅबलिश करायला पुरुष आणि स्त्री यांच्यात धाग्यावर पोस्ट मागून पोस्ट संभाषण झालं की इतर लोक जॉईन होतात आणि मग सिम्बा म्हणतोय तशी इको सिस्टीम चटकन तयार होते.
बाकी हा धागा आत्ताच काढावासा वाटण्याचं कारण माझ्या तर्काशी मिळतेजुळते आहे की काय!!! Wink

सध्या दोन id च्या पोस्ट वर अशी रॅली पाहायला मिळते.
अमित गुड ऑब्झर्वेशन.
अगदी अशाच प्रकारे पोस्ट्स वाढवून लोकांना संभाषणात ओढले गेलंय.

पांघरसि जरी असला कपडा ||
येसि उघडा, जासि उघडा ||
कपड्यासाठी करिसि नाटक तीन प्रवेशांचे ||

एक धागा सुखाचा..

ऑर्कुटवर याच कारणासाठी माझे एक फेक प्रोफाईल होते. फार गाजलेलेही. कारण रोखठोक बोलणारे स्त्री व्यक्तीमत्व होते. काही जणांचा पुरुषी अहंकार दुखावल्याने तिच्यावर डूख धरून होते, तर काही जण ईम्प्रेस झाले होते. >>> इथे कधी कबुल करणारेस ?

अनेक कारणे आहेत. पूर्वी एकदा एका ग्रुपवर यासंबंधी चर्चा झाली होती (मायबोलीवर नव्हे). तेंव्हा त्यात काही मानसशास्त्राचे अभ्यासक/तद्न्य होते. त्या चर्चेतून निघालेले मुद्दे:

१. अनोळखी व्यक्तीशी पट्कन संवाद साधण्याची गरज:
कोणत्याही कारणासाठी अनोळखी स्त्री अथवा पुरुषाशी संवाद साधायचा आणि जवळीक साधायची असेल तर स्त्री अकाउंट जास्त उपयोगाचे असते. कारण पुरुष असो वा स्त्री. दोघेही अनोळखी पुरुषापेक्षा अनोळखी स्त्रीशी संवाद साधायला जास्त कम्फर्टेबल असतात. याचा अनेकदा गैरफायदा पण घेतला जातो (जसे कि स्त्री शी संवाद साधून तिच्याविषयी खाजगी गोष्टी जाणून घेणे किंवा पुरुषाशी संवाद साधून त्याच्याकरवी एखादी गोष्ट करवून घेणे इत्यादी). उदाहरण म्हणून हि बातमी वाचा.

२. प्रसिद्धी:
एकच पोस्ट स्त्री व पुरुषाने केली तर स्त्रीच्या पोस्टला कितीतरी पटीने जास्त लाईक मिळतात. तसेच पुरुष अकौंटं पेक्षा स्त्री अकौंटंला पटापट व भरपूर फ्रेंड्स मिळू शकतात. याचा उपयोग एखाद्या गोष्टीची प्रसिद्धी/जाहिरात करण्यासाठी होऊ शकतो.

३. समलैगिकता:
समाजात अनेक पुरुषांचे लैंगिक orientation हे समलिंगी, तृतीयपंथी, क्रॉसड्रेसी इत्यादी प्रकारचे असते. असे पुरुष व्यक्त होण्यासाठी स्त्री अकौंट वरून संवाद साधायला जास्त प्राधान्य देतात. त्यात त्यांना एकप्रकारचे मानसिक समाधान मिळते.

४. टाईमपास:
अनेक तरुण बेरोजगार आहेत. किंवा बोअर झालेले आहेत. त्यांना वेळ घालवण्यासाठी काहीतरी साधन हवे असते. त्यांच्या पुरुष अकौंटला कोणी जास्त विचारत नाही. असे तरुण मग स्त्री अकौंट काढून अटेन्शन घेतात. टाईमपास करत बसतात. भरपूर फ्रेंड रिक्वेस्ट्स, भरपूर प्रतिसाद, भरपूर नोटिफिकेशन्स, भरपूर चाट्स इत्यादी सगळे या खोट्या अकौंट ला भरभरून मिळते त्यात त्यांना (खोटे का असेना पण) मानसिक समाधान मिळते व त्यांचा वेळ छान जातो.

>> सध्या दोन id च्या पोस्ट वर अशी रॅली पाहायला मिळते.

तुका म्हणे होय दादाशी (की द्वाडाशी??) संवाद | आपुलाची वाद आपणाशी || Lol

ती त्यांची मानसिक गरज असते. जोपर्यंत फसवत नाही वा तशा उद्दिष्टाची वाटचाल दिसत नाही तोवर दुर्लक्ष करावे.

मला तर जेंडरलेस आयडी असेल तर कळत ही नाही स्त्री आहे का पुरुष आणि त्यांच्या प्रोफाइल मध्ये जाऊन चेक करायची इच्छाही होत नाही.
एखादा संशयित वाटला तरच त्याचे वयोमान आणि शहर बघतो अन्यथा त्याने अथवा तिने काय लिहिले आहे यावर जास्त लक्ष देतो.

असा id, मजेसाठी असो की कोणत्याही कारणासाठी काढणाऱ्या माणसाची मानसिकता मला काही ठीक वाटत नाही.. मानसिक आजाराचे हे एकादे लक्षण म्हणायला हवे. काही लोक तर या प्रकाराला विकृती संबोधतात.

ड्यू आयडी ईण्टरेस्टवरून सोशलसाईटवरच्या लोकांचे ढोबळमानाने तीन ग्रूप पडतात.

1) ड्यू आयडी काढणारे.

2) कोण कोणाचा ड्यू आय आहे यात कमी अधिक प्रमाणात उत्सुकता दाखवत सीआयडीगिरी करणारे. क्रमांक 1 वाले या गटातही मोडू शकतात.

3) कोण कोणाचा ड्यू आय याच्याशी जराही देणेघेणे नसलेले. या प्रकारच्या चर्चेतही रस न दाखवणारे.

....

मी स्वत: क्रमांक 1 या गटात मोडतो. मला विविध आयडी काढायला आवडते.
पण मी क्रमांक 2 या गटात मोडत नाही. मी आजवर कोण कोणाचा ड्यू आयडी हे शोधण्यात माझ्या आयुष्यातील वेळ आणि मेहनत खर्ची घातली नाही.
कारण मला दुसरयावरच चर्चा करण्यापेक्षा ती स्वत:वर झालेली आवडते. याला माझ्यातील दोष वा दुर्गुणही म्हणू शकता.

>>कारण मला दुसरयावरच चर्चा करण्यापेक्षा ती स्वत:वर झालेली आवडते. याला माझ्यातील दोष वा दुर्गुणही म्हणू शकता.>> त्याला ‘नार्सिसिस्ट’ असणं म्हणतात. हा आजार असतो असं गुगल म्हणतंय. तुला तो आजार आहे की नाही हे तुलाच माहित.

त्याला ‘नार्सिसिस्ट’ असणं म्हणतात. हा आजार असतो असं गुगल म्हणतंय. तुला तो आजार आहे की नाही हे तुलाच माहित.
>>>>

स्वत:बद्दल चर्चा झालेली आवडणे हा आजार असेल,
तर मग हा आजार शाहरूखला सुद्धा आहे का?
किंवा मग आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना?

जर मी चुकत नसेल तर नार्सिसिस्ट हे थोडे वेगळे आहे.. तुम्ही नक्की काय गूगल केले हे समजू शकेल का? किंवा ते मराठीत भाषांतर करू शकाल का?

Pages