पुरुषांना स्त्री ड्यु आयडी घ्यावासा का वाटतो

Submitted by VB on 28 March, 2018 - 22:19

फेसबुकवर स्त्रियांचे अकाऊंट्स जगात असलेल्या स्त्रियांपेक्षा कैक पटीने जास्त आहेत असे ऐकलेय, त्यावरून खूप सारे जोक सुद्धा वाचलेत. कदाचित इथे माबोवरही असतील काही पुरुष मंडळी जी स्त्री आयडी वापरत असतील.
माझा एक मित्र आहे ज्याचे फेसबुकवर असे स्त्री खाते आहे. जिथवर मी त्याला ओळखते flirting type नाही वाटत तो. मी त्याला बरेचदा विचारलेही कि का असे करतो , तर उत्तर टाळले त्याने.
पण तरीही मला उत्सुकता आहे कि काय कारणे असतील असे वागण्यामागे. स्त्री आणि पुरुष फक्त शारीरिक नाही तर मानसिक अन भावनिक पातळीवर खूप भिन्न असतात. मग फक्त पुरुषाने स्त्री असल्यासारखे भासवून किंवा स्त्रीने पुरुष असल्याचे भासवून नक्की काय साध्य करायचे असते. असे वागण्याने नक्की कसला आंनद मिळत असेल त्यांना असे प्रश्न पडतात मला.

आता कदाचित काही स्त्रियासुद्धा पुरुष आयडी वापरत असतील, पण किमान माझ्या पाहण्यात नाही आल्या.

सो, हा धागा काढण्यामागचे प्रयोजन इतकेच की, यावर इतरांची मते जाणून घ्यावेसे वाटले.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथे कधी कबुल करणारेस ?
>>>>

श्री,
मी तिथेही कधी कबूल केले नव्हते. आपणहून कधीच कबूल करायचे नसते. उलट लोकांना उलटसुलट हिंट द्यायच्या असतात. त्याने चर्चा कायम राहतात. कबूल केले की एकदाच काय ती चर्चा होते आणि मग पुर्णविराम Happy

मला किती दिवसांपासुन अर्चना सरकार हा ऋ चा ड्यु आयडी आहे असं वाटतंय. >>> असं वाटणारी तु एकटीच नाहीस , हो की नाही रे ऋन्म्या ? Proud

मला किती दिवसांपासुन अर्चना सरकार हा ऋ चा ड्यु आयडी आहे असं वाटतंय.
दोघेही दिवा घ्या रे Happy
>>>>>

हे बहुतेक श्री यांनाही वाटतेय. ते त्यांच्या बरेच धाग्यावर माझे नाव घ्यायचे Happy
अजून दोन नवीन मुली आहेत ज्यांच्याबद्दल माझ्याकडे दोनतीन जणांनी विचारणा केली आहे.
कदाचित कोणी नवीन व्यक्ती फारसे रुळण्याआधीच भराभर धागे काढायचा आत्मविश्वास दाखवते तर हा ऋन्मेष तर नाही ना असा संशय येत असावा.

अर्थात मी हे संशय कधी क्लीअर करायला जात नाही. मनावरही घेत नाही. उलट एंजॉय करतो. फक्त ते ओरिजिनल आयडी हे कश्या स्पिरीटने घेतात त्यावर आहे. त्यांना कोणी आपल्याला ऋन्मेष समजतेय याचा त्रास झाला तर मला उगाच गिल्ट फिलींग येते..

अरे हो, अजून एक.
काही संशयास्पद किंबहुना बघताच ड्युआय वाटणारे आयडी उगाच माझे अति कौतुक करतात आणि माझे धागे वर काढतात असेही अनुभव येतात. जेणेकरून लोकांना वाटावे की हा रुनम्याच ड्युआय काढून हे सारे करतोय. मला याचीही मजा येते. जेव्हा लोकं आपल्याला बदनाम करायला कट रचतात, कांगावे करतात, तेव्हा आपण तेवढे नाव कमावलेय असा अर्थ काढून खुश होतो Happy

हा धागा कोण कोणाचा ड्यु आय वाटतो आणि का? (हे जास्त महत्वाचे) या चर्चेसाठी वापरता येईल का? किंवा एक नवीन धागा काढूया का? मजा येईल..

हा धागा आत्ताच काढावासा वाटण्याचं कारण माझ्या तर्काशी मिळतेजुळते आहे की काय!!! Wink

Submitted by अमितव on 29 March, 2018 - 10:03 >>> तुमचा तर्क इतकासा नाही समजला मला

माझ्या मनात असा धागा काढायचे विचार बऱ्याच दिवसांपासून म्हणजे जेव्हा माझ्या मित्राने त्याच्या फेक स्त्री फेसबुक अकाउंट बद्दल सांगितले अन कारण व स्पष्टीकरण द्यायला नकार दिला तेव्हापासून होते. काल त्याच्याशी बोलताना हे परत आठविले अन धागा काढला.

खरेतर मलाही इकडे काही स्त्री आयडी, पुरुष आयडी वाटतात. पण असते काहींची भाषा वा विचार तसे , अन मला काय करायचेय हा विचार करून सोडून दिले, तरी असे करण्यामागे काय कारणे असावीत हे जाणून घ्यायची उत्सुकता मात्र कायम होती.

मी नार्सिसिस्ट हेच गुगल केलं कारण तुझ्या ‘मी मी, माझ्याबद्दल बोला‘ ह्य स्वभावाची लक्षणं त्याच्या व्याख्येच्या जवळ जाणारीच वाटतात.
>>an individual showing symptoms of or suffering from narcissism: such as
a : an extremely self-centered person who has an exaggerated sense of self-importance>>

सायो हे समजेल अश्या भाषेत सांगा..
मराठीत..
आणि मग त्याला उदाहरण म्हणून माझ्या दोन तीन पोस्ट दाखवा ..

एवढी गधामजुरी करण्यात मी माझा वेळ वाया घालवत नाही. तुझ्याकडे आहे वेळ तर तूच शोध. मी मला जे वाटलं ते लिहिलं आहे. तुला पटवायला लिहिलेलं नाही. इग्नोअर मारु शकतोस.

सायो, तुम्ही ते मला उद्देशून लिहिले आहे. जे तुम्हाला नेमके माहीत नाही वा समजवता येत नाही तो शब्द तुम्ही एखाद्याबद्दल वापरता आणि त्याने स्पष्टीकरण विचारले तर इग्नोर कर बोलता Happy

येनीवेज ईटस एबसोल्युटली फाईन ! मी जिंकलो Happy

वर स्पष्टीकरण दिलेलं आहे. तुला इंग्लिश कळत नाही हा माझा प्रॉब्लेम नाही. आपण जिंकलो असं समजून आनंद होत असल्यास तसं जरुर समजावं.
हा बीबी तुझ्यावर काढलेला होता का? नाही ना? पण तू स्वतःबद्दल कौतुक करत त्याच बाजूने वळवलास. माझा मुद्दा सिद्ध केल्याबद्दल थॅन्क्यु.

सायो,
1) गूगल व्याख्या कॉपीपेस्ट म्हणजे स्पष्टीकरण नाही. त्याचा अर्थ आणि तो मला कसा लागू होतो हे उदाहरणासह स्पष्ट करायला नको का?

2) मायबोली मराठी संकेतस्थळ आहे. ईथे मराठीत चर्चेचा आग्रह धरणे चूक आहे का?

हा क्रमांक 2 वेगळ्या धाग्याचा विषय आहे. तो मी आरामात काढतो. त्याचे उत्तर सावकाश तिथे द्या Happy

आशूचॅम्प, विरोधाला विरोध करू नका. पुर्ण सिक्वेन्स वाचा आणि मग जे तुम्हाला योग्य वाटेल ते लिहा.

सायो,
स्वतः चा वेळ फुकट घालवण्याची ही तुमची तिसरी वेळ आहे,

हा बीबी तुझ्यावर काढलेला होता का? नाही ना? पण तू स्वतःबद्दल कौतुक करत त्याच बाजूने वळवलास.
>>>

ऑब्जेक्शन !

हा धागा पुरुषांनी स्त्री ड्यु आय काढण्यावर आहे. ईथे या धाग्यावर आतापर्यंत मी एकटाच आहे ज्याने आपल्या कारकिर्दीत असे केले आहे. त्यामुळे ते करण्यामागची कारणे, हेतू आणि करणारयाची मानसिकता अनुभवाने उदाहरणांसह सांगू शकेल असा मी ईथे एकमेव आहे. आणि मी तेच करत आहे. बाकीचे सारे निव्वळ् तर्क लढवत आहेत. अर्थात त्यांच्याही तर्काचा आणि मताचा आदर आहेच. पण मलाच डावलणे हे म्हणजे असे झाले की मुंबई अंडरवर्ल्डबद्दल काही पांढरपेशे लोकं चर्चा करत आहेत आणि दाऊद ईब्राहीम काही बोलायला लागताच त्याला ए तू चूप बस्स माकडा म्हणून खाली बसवणे Happy

सिन्बा Lol आय नो.
आशुचँप- यापुढे लेखनसीमा. नुसती मजा बघायची.

सायो - धागा कोणाचा, चिडताय कोणावर ☺️ इग्नोरांस इज ब्लिस म्हणतात ना.

रूनमेश मला वाटतंय टायपण्याआधी 100 मोजत असेल आणि मग शांत प्रतिसाद लिहत असेल... याबाबतीत कौतुक.. करण त्याचे एक्सप्रेशन्स ( चिडला आहे, राग आला आहे, व्हातेव्हर ) बिलकुल कळत नाहीत.

यापुढे लेखनसीमा.
>>>>
सायो,
मुळात माझी पोस्ट कोट करत आपणच नार्सिसिस्ट की काय मध्ये घुसलात. जोपर्यंत पोस्ट सुचल्या तोपर्यंत लिहिल्या. डेड एण्ड येताच लेखनसीमा Happy

नो प्रॉब्लेम एबसोल्युटली ! ! Happy
...

नुसती मजा बघायची.
>>>
हे स्पिरीट मात्र आवडले. माझ्याही लाईफचा हाच फंडा आहे. मजा घ्या, मजा करू द्या. मी तर ईथे वादही मजेमजेतच घालतो. त्यामुळे मला वादात जिंकायचे, हरायचे, कोणाला शब्दात पकडायचे, कसलेही टेंशन नसते. मी ती प्रोसेस एंजॉय करतो, एण्ड रिझल्ट नाही Happy

म्हणून जिथे आपली लेखनसीमा तिथे माझीही रायटींग बॉर्डर ..

इनफॅक्ट मलाही मज्जाच येतेय.
>>>

तुम्हाला ही मज्जा माझ्यामुळे येतेय का?
जे काही आहे ते प्रामाणिकपणे सांगा Happy

आणि हे पाथफाईण्डर यांनाही सांगा. त्यांना ते रक्त जाळणे वाटत आहे Happy

बाकी वरच्या विषयावर लेखनसीमा झालीच आहे दोघांची..

@ऋ
फ्रीज च्या धाग्यावर झाले होते तसे. नंतर मी ही मजा घ्यायला शिकलो.
रच्याकने उन्हाळा सुरू झालाय. बच्चे कंपनीला धागा लिंक द्या वर आणायला.

च्रप्स धन्यवाद,

पाफा एक्झॅक्टली.. ऋ हा असा आयडी आहे तुम्ही त्याला त्रास द्यायला जाल तर तुम्हाला त्रास होईल.. तुम्ही मजेत घ्याल तर तुम्हालाही मजा येईल ..
आणि हो, तुम्ही इग्नोर करायला जाल, तर मधल्यामधे सारेच अवघड होईल Happy

<<< पुरुषांना स्त्री ड्यु आयडी घ्यावासा का वाटतो. >>> गे किंवा ट्रान्सजेंडर असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

<<< चला हवा येऊ द्या चा प्रभाव असावा लोकांवर. >>> नुसतंच "हवा येऊ द्या" नाही, कालचा "हम तो तेरे आशिक है" पण. Wink

ऑन सिमिलर लाइनः स्त्री आयडीना प्रोफाइलवर खरे फोटो टाकण्याऐवजी, सुंदर नट्यांचेच फोटो का टाकावेसे वाटतात?

चला

किमान कोणीतरी विषयाला धरून लिहिले
गे किंवा ट्रान्सजेंडर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. >>>
हो, ती ही एक शक्यता असू शकते

ऑन सिमिलर लाइनः स्त्री आयडीना प्रोफाइलवर खरे फोटो टाकण्याऐवजी, सुंदर नट्यांचेच फोटो का टाकावेसे वाटतात? >>> सुंदर नट्याचे फोटो का ठेवत असतील माहित नाही, पण जर प्रोफाइल फोटो अनोळखी व्यक्तींना सुद्धा दिसत असेल, तर त्याचा गैरवापर करणारे बरेच असू शकतात
म्हणून स्वतःचा फोटो असे पब्लिक डिस्प्ले ला ठेवणे टाळलेलं बरं (हेमावैम)

ऑन सिमिलर लाइनः स्त्री आयडीना प्रोफाइलवर खरे फोटो टाकण्याऐवजी, सुंदर नट्यांचेच फोटो का टाकावेसे वाटतात?
नवीन Submitted by उपाशी बोका on 29 March, 2018 - 22:40
>>>>
काढा की धागा.

Pages