एक प्रश्न आहे, अधिक मासात किंवा ८व्या महिन्यात डोहाळजेवण करू शकतो का..

Submitted by केतकी पुराणिक on 26 March, 2018 - 00:28

१६ मे २०१८ ते १६ जून २०१८ हा अधिक मास आहे. मी गरोदर असून मला २५ एप्रिल मला ८वा महिना लागतो. डोहाळजेवण ८व्या महिन्यात किंवा अधिक मासात करू शकतो का हा प्रश आहे ..

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

डोहाळजेवण हा एक आनंदसोहळा आहे. वाढत्या पोटामुळे होणाऱ्या थोड्याफार गैरसोयींन्नी जरा कावलेल्या व लवकरच येऊ घातलेल्या बाळंतपणाने थोड्याश्या धास्तावलेल्या पहिलटकरणीचे मनोरंजन व्हावे, ती रिलॅक्स व्हावी या हेतूने या सोहळ्याचे आयोजन करायची परंपरा जगभर आहे. तुम्ही यात धार्मिक बाजू न शोधता याचा आनंद घ्या.

बाकी आठव्या महिन्यात सहसा करत नाहीत. सातव्यात करायचे राहिले तर बहुतेक नवव्यात करतात असे ऐकून आहे. पण तुमची तब्येत मस्त असेल, काही त्रास नसेल तर बिनदास हा आनंदसोहळा साजरा करा. हे दिवस परत येत नाहीत.

डोहाळे लागले आहेत का? नायतर डीकॅफ कॉफी सारखं डीडोहाळे डोहाळजेवण. मग कधी का केल तर काय फरक पडतो Happy
(गरोदरपणात वेळीच मल्टीव्हिटॅमिन्स व मिनरल्स घेतल्याने बर्‍याच जणींना क्रेव्हिंग उर्फ डोहाळे लागतच नाहीत.)
खूप खूप शुभेच्छा.

हे दिवस परत येत नाहीत.`>>>>>>>> येतात कि दुसर्‍यान्दा प्रेग्नट राहिल्यावर......... डोळा मारणारि बाहुलि.......हा हा हा

दिवस दर वर्षी जाऊ शकतात, त्याला कितीसा वेळ लागतो ...
पण कौतुक पहिलटकरणीचेच होते. सातव्या महिन्यातली आई पूर्ण वनराणीचा साजशृंगार करून धनुष्याची प्रत्यंचा ताणतेय व तिच्या कमरेला विळखा घालून पहिले बाळ उभे आहे असा फोटो कुणी पाहिलाय का Happy Happy

आठव्यात न करण्यामागे काही शास्त्रीय लॉजिकल कारण नसेल तर करा बिनधास्त..

येणारया आनंदासाठी शुभेच्छा Happy

आठव्या महिन्यात शक्यतो प्रसूति होऊ नये. बाळाला प्रॉब्लेम होऊ शकतो. कारण सातव्या महिन्या नंतर बाळाची पुन्हा एकदा फेर रचना होत असते.
या डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमात स्त्रीला दगदग झाली / ऊठबस झाली आणि तातडीने प्रसूती करावी लागली तर उगीच रिस्क नको.

बाकी आठव्या महिन्यात सहसा करत नाहीत. सातव्यात करायचे राहिले तर बहुतेक नवव्यात करतात असे ऐकून आहे. >>>>> +१ still have a complete month to plan and do it, why specifically plan it in 8th month or adhik maas? If possible take help of elders from both the sides of family / aunties / friends / neighbors etc. to plan and execute it for you.

पहिले जे महत्वाचे आहे

पहिले जे महत्वाचे आहे सासरकडचे किंवा माहेरकडे किंवा जॉइन्ट ते सातव्यात करून घ्यावे. मग बाकी हौसेची आहेत ती नंतर केली तरी चालतात.

केव्हाही करा.मोजका आणि भाराभार गोड तेलकट मसालेदार नसलेला मेनू, मोजकी नॉन भोचक लोक आणि मोजका बडेजाव्/नंबर ऑफ इव्हेंट्स वाला, सगळे आनंदी राहतील आणि लवकर २ तासात संपेल असा करा. Happy

@राजसी
If for some reason 7th month madhe hou shakla nahi tar vicharla... as my 9th month is alomos all Adhik Maas.. Hence asked if there is any rule for adhik maas as well..

डोहाळजेवणात काहीही धार्मिक विधी नसतात - अधिक महिन्याचा काहीही संबंध नाही.
उलट 'अधिकस्य अधिकम् फलम्' या न्यायाने सोहळा अधिक आनंदाचा होईल.
तुम्हाला शुभेच्छा! Happy

सातव्या महिन्या नंतर बाळाची पुन्हा एकदा फेर रचना होत असते. >>> म्हणजे काय ? याला काही शास्त्रीय आधार आहे का?
आठव्यात डोहाळजेवण करत नाहीत असे आयांना आज्ज्यांनी सांगितलेले असते याव्यतिरिक्त कसलेही कारण कुणा डॉक्टर ने सांगितलेले ऐकलेले नाही Happy अधिक महिन्याचा काही संबंध ऐकला नव्हता.

डोहाळजेवणात काहीही धार्मिक विधी नसतात> डोहाळ तुल्या बाईचे औक्षण करतात व ओटी भरतात. तेव्हा गर्भाचे ही औक्षण करतात. ती सोन्याची अंगठी पोटाला लावुन वगैरे. हे माझ्या सासुबाईंना पण माहीत नव्हते. त्यांची एक मैत्रीन आली होती तिने केले. हे काही फार धार्मिक रिचुअल नाही पण एक असते करायचे. इथे नमूद करून ठेवते. आमच्या
नात्यातल्या एक बाईंचा केटरिंग चा बिझनेस आहे त्यांनी चिवड्या लाडूचे पाकीट व हिरवी कंच साडी दिली व आता तू चहा करून बरोबर चिव्डा लाडू खा ही साडी नेसून हे तुझे चहा चिवड्याचे डोजे असे सांगितले. आनंदाचा व हौसे चा मामला आहे जास्त करून.

खरंतर माबोवर असा गोड बाफ आल्याने मलापण एकदम आनंद झाला आहे. मला ते अमेरिकन स्टाइल बेबी शावर पण खूपच आव्डतात. अमेरिकेत असाल तर ते ही एक करा मैत्रीणी व कली ग्ज साठी. आपले इंडो वेस्टर्न फ्युजन डोजे.
ब्लेसिंग्ज फॉर बेबी.

धार्मिक म्हणजे पूजा/देवतार्जन अशा अर्थी. औक्षण/ओटी अधिक महिन्यातच काय, कधीही करायला हरकत नाही. जावयाचे औक्षण/लाड करतात ना अधिक महिन्यात? Happy

अधिक महिना ही कॅलेन्डर ॲडजस्टमेन्ट आहे - लीप इयरसारखी. त्याचा काहीही बाऊ करायची आवश्यकता नाही!

सर्वप्रथम तुमचे अभिनंदन आणि शुभेच्छा !

अधिक महिना हा दान धर्मासाठी उत्तम समजला जात असला तरी शुभकार्यासाठी उत्तम समजला जात नाही. त्याला मलमास किंवा धोंड्यामास असे ही म्हणतात. म्हणून मुद्दाम कशाला डोजे अधिक महिन्यात करायचे ? अर्थात ह्याला फार महत्व दिले नाही तरी नक्कीच चालेल कारण आताच्या आधुनिक जगात आपली सोय आणि आनन्द महत्वाचा.

डोहाळजेवण सातव्यात करणे चांगले कारण तेव्हा तब्बेत जरा बरी असते त्यामुळे एन्जॉय करू शकाल. एकदा दिवस भरत आले की नाही फार enjoy करता येणार.

I am just saying if you have doubts just ask elders of your family , especially mother-in-law. If in doubt and no family member is around to consult, it may be appropriate to do it in 7th month when everyone knows it happens. There are some un-written rules about dos / don't oti bharne, aukshan and bangdya bharne etc. During pregnancy (I don't know it but heard discussion about these stuff)

Enjoy this period! Have fun.

पण कौतुक पहिलटकरणीचेच होते. सातव्या महिन्यातली आई पूर्ण वनराणीचा साजशृंगार करून धनुष्याची प्रत्यंचा ताणतेय व तिच्या कमरेला विळखा घालून पहिले बाळ उभे आहे असा फोटो कुणी पाहिलाय का >> Biggrin बियॉन्से बघा हो. दुसर्‍या बाळाच्या वेळी फुलांची वाडी इ इ सगळं कसं साग्रसंगीत झालं Wink

बियॉन्से बघा हो. दुसर्‍या बाळाच्या वेळी फुलांची वाडी इ इ सगळं कसं साग्रसंगीत झालं>> अगदी अगदी. तीच आठवली. काही फोटोत तिची मुलगी सुद्धा आहे तिच्या शेजारी.

बियॉन्से बघा हो. दुसर्‍या बाळाच्या वेळी फुलांची वाडी>>> आणी आपल्या डिजेची मेन्दी टॅटु पण रॉक्स!

होय करु शकता. धर्मशास्त्रीय आडकाठी काही नाहि.म्हणजे अधिकमासात ही करु शकता. व्यावहारिक सोयीचा भाग फक्त बघा. गेट टुगेदर असते ते शेवटी

इतर सर्वांनी सांगितल्याप्रमाणे हा एक आनंदसोहळा असतो.पूर्वीच्या मुलगी/बाई वाढत्या गर्भभारामुळे जास्त कुठे जात नव्हती,तिच्या मनोरंजनासाठी हे सारे प्रकार आहेत.कुठलाही विकल्प मनात न येऊ देता मजेत डोजे करून घ्या.

अधिक मासाविषयी माहिती नाही.. पण आठ्वा महिन्याविषयी माहिती आहे.या महिन्यात बाळ्याच्या मेंदूची आणि फुप्फूसाची वाढ होते.. म्हणून या महिन्यात गरोदर बाईने काळजी घ्यावी कारण बाळाचे वजनपण वाढलेले असते आणि ते खाली सरकतपण असतं.. नवव्या महिन्यात गरोदर बाईने जमत असेल तर चालावे त्यामुळे नार्मल डिलिव्हरी व्हायचे चान्स वाढतात कारण यामहिन्यात मुलाच्या सर्व अवयवाची वाढ होऊन फक्त शरीरावरचे मांस वाढत असते.

इति डॉक्टरने सांगितलेले पहिल्या मुलाच्या डिलिव्हरीला

माझ्या बहिणीच्या वेळेस हीच परिस्थिती उद्भवली होती, सर्वांशी (विशेषतः सासरच्यांशी) सल्लामसलत करून नवव्या महीन्यात डोहाळेजेवण केले होते.

बियॉन्से बघा हो. दुसर्‍या बाळाच्या वेळी फुलांची वाडी इ इ सगळं कसं साग्रसंगीत झालं>>>>>

ते दुसऱ्या वेळचे असते त्याला डोजे किंवा बे शॉ नाही म्हणत म्हणे, त्याला म्हणे पुश पार्टी म्हणतात. बाळाचे बाबा व त्याचे मित्रसुद्धा यात सामील होऊ शकतात.. बियोनसेनेच हा ट्रेंड सुरू केला म्हणे..

http://www.essentialbaby.com.au/news/celebrity-parents/beyonc-just-inven...

असे प्रश्न कसे पडू शकतात हाच एक प्रश्न आहे.>> असे प्रश्न कसे पडू शकतात असा प्रश्न काही लोकांना कसा पडतो हा पण एक प्रश्नच आहे. Happy कापूस कोंड्याची गोष्ट

>>>>पण आठ्वा महिन्याविषयी माहिती आहे.या महिन्यात बाळ्याच्या मेंदूची आणि फुप्फूसाची वाढ होते.. म्हणून या महिन्यात गरोदर बाईने काळजी घ्यावी कारण बाळाचे वजनपण वाढलेले असते आणि ते खाली सरकतपण असतं.. नवव्या महिन्यात गरोदर बाईने जमत असेल तर चालावे त्यामुळे नार्मल डिलिव्हरी व्हायचे चान्स वाढतात कारण यामहिन्यात मुलाच्या सर्व अवयवाची वाढ होऊन फक्त शरीरावरचे मांस वाढत असते.<<<<< +११११११
अगदी व्यव्स्थित शास्त्रीय आधार आहे. गर्भार स्त्रीचे शरीर परत जोमाने बदलत असते. हे पहिल्या १-३ महिन्यापेक्षा वेगळेच नवीन बदल असतात हॉर्मोन्स मुळे. बाळ खाली सरकायची वेळ सुरु होते. बाईच्या कमरेवरील ताण असा अधिक वाढतो( वाकणे, उचलणे कठिण), बाळाची मेंदू भरणे जोमाने सुरु असते, बाळ फिरते आत आणि त्यात चुकीच्या पद्द्तीने वळण वाक काहींना नाही चांगले वगैरे वगैरे.
मला जे सांगितले ते लिहुले. माझ गर्भाशय मुळात्च खाली होतं आणि बरीच कॉम्प्लिकेशन्स झालेली तेव्हा २-३ डॉक्ची मतं घेतली तर असे मत पडले की, सातव्यातच ऑपरेशन करु आणि बाळ पेटीत ( ईन्क्युबेटर) वाढवु. आठव्यात आणखी रिस्क वाढायचे चान्स नको कारण आठवा महिना वरील कारणामुळे तसाही त्रासदायक असतो.
आता प्रत्येक स्त्री वेगळे असते पण अशी शास्त्रीय कारणे दिली.

——
तुम्हाला शुभेच्छा! आनंदी राहून जे झेपेल ते करा. बारीक सारीक विचार नको.