आठवणीतल्या आज्जी

Submitted by ..सिद्धी.. on 25 March, 2018 - 14:07

मीरा आज निवांत होती.आज तीने हक्काने काॅलेजला सुट्टी घेतली होती.पटकन किचनमध्ये जाऊन तिने काॅफी बनवली आणि सोळाव्या मजल्यावरच्या गॅलरीत आरामात पीत बसली.तासाभराने माधव येणार होता.जसजशी संध्याकाळ चढत गेली तसतशा आज्जींच्या आठवणी तिच्या मनात उतरत गेल्या.
------------------------------------------------------------आज आज्जींना जाऊन बरोब्बर तीन वर्ष झाली होती.तरीही त्यांच्या आठवणी अजूनही ताज्या होत्या.फक्त अडीच वर्ष काय तो त्यांचा सहवास लाभला.पण ते दिवस मीरासाठी आजही अविस्मरणीय होते.
खर तर आज्जींची आणि मीराची भेट म्हणजे नियतीने घडवून आणलेला एक गोंडस अपघात होता.त्या दिवशी मीरा आणि माधव नेहमीप्रमाणे कट्ट्यावर गप्पा मारत उभे होते.माधव मीराचा बालमित्र होता.तितक्यात अचानक जोरात ब्रेक लावल्याचा आवाज आला आणि एका स्त्रीची अस्पष्ट किंकाळी ऐकू आली.क्षणभर मीरा-माधव शांत झाले.भानावर आल्यावर ते धावत रस्त्यावर गेले तेव्हा त्यांना एक आज्जी रस्त्यावर पडलेल्या दिसल्या.त्याचा पाय मुरगळल्याने त्यांना उठता येत नव्हत.माधवने त्यांना उठायला मदत केली आणि सोसायटीतल्या बाकावर आणून बसवलं.मीराने पटकन फर्स्ट एड बाॅक्स आणला आणि त्यांच्या जखमांवर मलमपट्टी केली.त्या नको म्हणत असतानाही ते हक्काने त्यांना मीराच्या घरी घेऊन गेले.मीराच्या आईने त्यांची प्रेमाने विचारपूस केली.त्यांच्या घरी कळवाव म्हणून तीने फोन नंबर मागीतला.तेव्हा काहीवेळ आज्जींच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या.हे मीराच्या नजरेतून सुटलं नव्हत.पण लगेच स्वतःला सावरत त्यांनी वृद्धाश्रमात फोन करून कळवायला सांगितल.मग त्या त्यांच्याशी गप्पा मारत बसल्या.थोड्यावेळाने आश्रमाची गाडी आल्यावर त्या निघून गेल्या.त्यांना जाताना पाहून नकळत मीराच्या डोळ्यात अश्रूंनी गर्दी केली.नंतर माधवही घरी गेला.मीरा मात्र शांत झाली.माणसांच्या गर्दीतही तिला एकटं वाटू लागलं.काहीतरी हरवलेलं ते गवसलं होतं.पण पुन्हा अदृश्य झालं होतं.काही वेळा एखाद्या माणसाशी नातं जुळायला काही क्षण पुरेसे असतात.मीराचही तसंच झालं होतं.अवघ्या चार पाच तासात तिचं आज्जींशी जन्मजन्मांतरीचं नातं निर्माण झालं होतं. त्यांचा मायेने ओथंबलेला स्वर; मृदू बोलणं;चेहेर्यावरचं हास्य यानेच तिला भुरळ पाडली होती.आज्जींनी गोड स्वभावाने तिला आपलसं केल होत. शेवटी उद्या त्यांना भेटायच असं तिने ठरवल्यावर तिला शांत झोप लागली.दुसर्या दिवशी सकाळी उठल्यावर तीने आईला शिरा करून ठेवायला सांगितला आणि शाळेत गेली.शाळेत गेल्यावर तिने माधवलाही येण्याबद्दल विचारलं.तोही आनंदाने हो म्हणाला.मीराला आता कधी शाळा सुटते असं झालं होतं.घड्याळ फारच स्लो चाललय असं वाटत होतं.शेवटी एकदाची बेल झाली आणि शाळा सुटली.मीरा नेहमीप्रमाणे टाईमपास न करता लगेच घरी आली .तिने झटकन आवरलं आणि न विसरता शिर्याचा डब्बा घेऊन धावत खाली गेली.माधवला हाका मारून बोलवलं आणि ते दोघे निघाले.
साधारण वीस मिनीटं चालल्यावर आश्रम आला.दोघंही आत गेले.तिथे लांब एका बाकावर आज्जी जप करत बसल्या होत्या.कालच्यापेक्षा जास्त प्रसन्न दिसत होत्या.कमालीचे शांत भाव त्यांच्या चेहर्यावर पसरले होते.पाच मिनीटांनी त्यांनी डोळे उघडले . या दोघांना असे अचानक समोर बघून त्या आश्चर्यचकीत झाल्या.कालच ओळख झाल्याने त्यांनी गप्पा मारायला सुरूवात केली.उशीर झाल्यामुळे ते आज्जीला डब्बा आणि परत भेटायचं वचन देऊन घरी आले.आज मात्र मीरा आनंदात होती.
त्या दिवसानंतर मीरा-माधव आणि आज्जींच्या भेटी वाढल्या.आज्जींचा त्यांना लळा लागला होता.ते मनाने आज्जींशी जोडले गेले होते.आज्जींचीही काही वेगळी अवस्था नव्हती.आयुष्याच्या संध्याकाळी त्यांना आधार मिळाला होता.इतक्या दिवसांच्या नीरस आयुष्यात मीरा-माधवच्या येण्याने आनंदची उधळण झाली होती.त्याना त्यांच्यावर जीव लावणारी नातवंड मिळाली होती.काळ आपल्या गतीने पुढे सरकत होता आणि नात्यांची समीकरणं बदलत होती.
एका रविवारी मीरा माधव आज्जींना सरप्राईज देण्यासाठी सकाळी लवकर आश्रमात गेले.तिथे गेल्यावर समोरचं दृश्य बघून दोघेही स्तब्ध झाले.आज्जी एक फोटोला छातीशी कवटाळून रडताना दिसल्या.क्षणभर त्या दोघांना काही सुचत नव्हतं.मीरा त्यांच्या जवळ गेली.त्यांच्या पाठीवरून हात फिरवून त्यांना शांत केलं.त्यांची कथा ऐकून मीरालाही अश्रू अनावर झाले.त्यांचा एकुलता एक मुलगा चार वर्षांपूर्वी अपघातात वारला होता.त्यानंतर या लोकांनीच त्यांना आधार देऊन सावरलं होतं.तेव्हापासून आश्रमच त्यांच जग होत.तो पूर्ण दिवस त्यांनी आज्जींसोबतच घालवला.हळूहळू वर्ष संपल आणि मीरा माधवची दहावीची परीक्षा सुरू झाली.जोमाने अभ्यास करून त्यांनी पेपर लिहीले.आज्जींचे आशीर्वाद सदैव त्यांच्यासोबत होते.
परीक्षेमुळे ते काही दिवस आश्रमापासून दुरावले होते.
शेवटी एकदाची परीक्षा संपली.आज्जींना भेटायला मिळणार म्हणून ते आनंदात होते.दुसर्या दिवशी ते आरामात उठून आश्रमात गेले. नियतीने त्यांच्यासाठी एक सरप्राईज ठेवले होते.तिथे गेल्यावर त्यांना कळलं की आठ दिवसांपूर्वी आज्जींच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं होतं.यांच्या परीक्षेत व्यत्यय नको म्हणून यांना सांगायच नाही अस बजावलं होतं.हे ऐकून मीराला भोवळ आली.माधवने तिला सावरल आणि दोघही रडू लागले.जाताना तिथल्या एका सेवकाने माधवच्या हातात एक लिफाफा दिला आणि म्हणाला;आज्जींनी रिझल्ट लागल्यावर बक्षीस म्हणून द्यायला सांगितला होता.मीरा पुन्हा गहिवरली.नंतर ते घरी आले.मीराने या सगळ्याचा धसका घेतला होता.जवळच्या माणसाचं अस एकाएकी निघून जाणं ती पहिल्यांदा अनुभवत होती.शेवटी काळ सगळ्यावरच उत्तम औषध असतो.महिन्याभराने मीरा सावरली.आता त्यांच आश्रमात जाणं कमी झालं होत.तरीही वेळ मिळेल तेव्हा ते तिथे जात होते.आश्रमाशी जुळलेली नाळ त्यांनी अजूनही तोडली नव्हती.
------------------------------------------------------------
तासाभराने मीरा भानावर आली.बाहेर काळोख झाला होता.ती लगेच घरात आली.झटपट आवरून ती तयार झाली.दहा पंधरा मिनीटांनी माधव आल्यावर ते आश्रमात जायला निघले....आज्जींच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी..... वरून आज्जी हे सगळं पहात होत्या..... आणि समाधानाने नकळत त्यांच्याही डोळ्याच्या कडा पाणावल्या...
====================================
तळटीप:-मी आठवीत असताना लिहीलेली आणि सगळ्यात पहिली कथा आहे.आज कपाट लावताना एका वहीच्या शेवटी सापडली. एक आठवण म्हणून इथे लिहीली.

----आदिसिद्धी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान Happy
पुलेशु.. Happy

ताई नको बोलूस अगं.. जास्त मोठी नाहीये मी तुझ्यापेक्षा Happy

चुका असतील.त्या सांगा .दुरूस्त करेन मी.आता केल्यात.>> हो.. म्हणूनच मी माझी पोस्ट एडिट केली Happy

ही मी आठवीत असताना लिहीलेली सगळ्यात पहिली कथा आहे.आज कपाट लावताना वहीच्या शेवटी सापडली. एक आठवण म्हणून इथे लिहीली.

माझी माबोमैत्रीण आदिसिद्धी, मस्त लिहिली आहेस ही कथा. टापटीप, मुद्देसुद, यथातथ्य शब्दांत आहे. मला तुझी ही कथा मनाचा ठाव घेणारी, मानवी भावभावना समर्पकपणे मांडणारी वाटली. आजींचा दाखवलेला अंत चटका लावून गेला खरा , पण त्यांच्या भावना, परिस्थिती योग्य रीतीने मांडले आहेस. एकट्या वृद्धांची मनोवस्था जाणवतेय. भारी लिहीतेस गं तू...

ही मी आठवीत असताना लिहीलेली सगळ्यात पहिली कथा आहे.>>>>>> आठवीच्या मानाने खूपच प्रगल्भ वाटतेय. तुला आता छान लेखन जमेल , यात शंकाच नाही.
पुढील लिखाणाच्या प्रतिक्षेत. पुलेशु.

तुझी माबोमैत्रीण,
द्वादशांगुला
(जुई)

इनतेरेस्टिंग... मला असे दिसत आहे -

Screenshot_20180325-203344.png

छान कथा आदिसिद्धी !
पुलेशु !

मी कथा कादंबरी विभागातच लिहीली आहे. प्रश्न मधे का दिसते आहे ते कळत नाहीये.>>>
नविन लेखन करताना कार्यक्रम, प्रश्न, लेखनाचा धागा आणि वाहते पान असे चार पर्याय आहे. आपण लेखन करताना चुकून 'प्रश्न' पर्याय निवडला आहे.

दुरूस्ती>>> वेमांना (वेबमास्टर) विनंती केल्यास दुरूस्त करतील..
पुढच्या वेळी 'लेखनाचा धागा' यामध्ये लिहीत जा.

बर हे वेमा म्हणजे वेबमास्टर सर का??हा शाॅर्टफाॅर्म अनेक धाग्यांवर वाचलाय.पण अर्थ माहीत नाहीये म्हणून विचारते.

छान आहे.
लिफाफ्याचे मलाही सिक्रेट वाटलेले. आजींनी जाताना आपली प्रॉपर्टी त्यांच्या नावे केली वगैरे..

छान लिहिलेय आसि. फक्त गोष्टीतच ही वृत्ती न ठेवता प्रत्यक्ष आयुष्यात सुद्धा अशी दुसर्यांप्रति सहसंवेदना राहो हीच प्रार्थना.

मीरा/माधव ही वृद्धाश्रमातल्या आजी-आजोबांच्या आई/बाबांची नावं वाटतात. त्याच्या जागी कॉलेज ला जाणाऱ्या मुलांची आर्या, अनुष्का, विहान, गेला बाजार रोहन वगैरे नावं वापरा ना ताई.

ओके.पुढच्या वेळी वापरेन. नवीन नावं सुचवल्याबद्दल धन्यवाद.तेव्हा लिहीलेली ती तशीच्यातशी इथे टाईप केली.त्यामुळे नावांबद्दल तितकासा अंदाज नव्हता मला.
प्लीज मला एकेरी नावाने हाक मारा .मी लहान आहे तुमच्यापेक्षा.

>>मी लहान आहे तुमच्यापेक्षा.

नाही सिद्धी ताई, मी सध्या सहावीत आहे. माझा बाबा मला वेगळं लॉगिन ची परमिशन देत नाही म्हणून त्याचंच लॉगिन वापरतो Happy

ठीकठाक कथा !

एक सुचना, पटली तर बघा. पुर्णविराम दिल्यानंतर एक स्पेस देत जा.

नंतर माधवही घरी गेला.मीरा मात्र शांत झाली.माणसांच्या गर्दीतही तिला एकटं वाटू लागलं.

यापेक्षा
नंतर माधवही घरी गेला. मीरा मात्र शांत झाली. माणसांच्या गर्दीतही तिला एकटं वाटू लागलं. ........ जरा बर वाटत वाचताना

नाही सिद्धी ताई, मी सध्या सहावीत आहे. >>>>> व्यत्यय Lol
मीरा माधव शाळेतली मुलं होती का तेव्हा? जर्रा पटत नाहीये. ठीक आहे पण कथा.
मीरा आजी वैगेरे वाचुन मला तुझा माझा ब्रेकप चं आठवलं आधी.

.मीरा आजी वैगेरे वाचुन मला तुझा माझा ब्रेकप चं आठवलं आधी..>>>>>>>हे काय आहे...कोण आहेत या???..संदर्भ सांगता का जरा...

नाही सिद्धी ताई, मी सध्या सहावीत आहे. >>>>>> हळुहळू आदिसिद्धी नि माझ्यासकट नवी पिढीही वळायला लागलीय माबोकडे.

हे काय आहे...कोण आहेत या???..संदर्भ सांगता का जरा...>>>>>>>> ही ती सिरियल आहे बहुतेक झी मराठीवरची. माझ्या आईच्या राधिका नंतर लागते म्हणून माहीत. बाकी कोणी बघत नाही घरातलं.

थॅक्स जुई .या दोघी कोण आहेत याच कोड उलगडल्याबद्दल .आमच्या कडे आई फक्त राधिकाची सिरीयल बघते .तेही फार तर पहिल्या ब्रेकपर्यंत.आता हे बोअर करणारेत याचा अंदाज आला की मग बंद करते.

आमच्या कडे आई फक्त राधिकाची सिरीयल बघते .तेही फार तर पहिल्या ब्रेकपर्यंत.आता हे बोअर करणारेत याचा अंदाज आला की मग बंद करते.>>>>>>>>> Happy :हहपुवा: नाहीतर आमच्या मातोश्री गेल्या दोन महिन्यांपासून 'ही सिरियल बघायचं थांबवेन' बोलत आहेत..... !

ते माझ्याही आईच तसच आहे पण बघायच मोह आवरेल तर ना...तरी बर दहा मिनीटांनी आपणहून बंद करते....खरं तर त्या डायलाॅगपेक्षा आईच्या त्यावरच्या कमेंट्स ऐकायला मजा येते.

खरं तर त्या डायलाॅगपेक्षा आईच्या त्यावरच्या कमेंट्स ऐकायला मजा येते.>>>>>> हाहाहा... भारीच. ऐकव तरी एक-दोन..

ऐकवेन.एखादा जबरी मारेल तेव्हा सांगीन.सध्या आजोबा आल्याळे सिरीयल बंद आहे मागचे आठ दिवस.ते रामदेव बाबांच चॅनल लावून बघत बसतात.त्यामुळे आधीच डोक आऊट होतं.नाहीतर आस्था लावलेल असतं.सवय नाही गं आमच्या टीव्हीला याची.त्यालापण नाॅशिया आलाय...

ऐकवेन.एखादा जबरी मारेल तेव्हा सांगीन.>>>>> हा हा नक्कीच

सध्या आजोबा आल्याळे सिरीयल बंद आहे मागचे आठ दिवस.ते रामदेव बाबांच चॅनल लावून बघत बसतात.त्यामुळे आधीच डोक आऊट होतं.नाहीतर आस्था लावलेल असतं.सवय नाही गं आमच्या टीव्हीला याची.त्यालापण नाॅशिया आलाय..>>>>>>>>>>>>>>> हा हा हा.... आजोबांना टिव्हीचं मनोगत ऐकवायचं.... टिव्हीला नाॅशिया? भारीच... बिच्चारा टिव्ही!

अजून महिनाभर सहन करायचय बिचार्याला.देव त्याला शक्ती देवो.आजी आली असती तर त्याच जगण जरा तरी सुसह्य झालं असतं.कारण आई आणि आजीची एकत्र टीम होते तेव्हा बाबा आणि आजोबा शांतपणे त्या लावतील बघणं प्रीफर करतात.

गोष्टीतील आजी आणि प्रत्यक्षातले आजोबा यांच्याबद्दलच्या मनोभूमिकेत फरक नाही ना ... ?

प्रश्न नाही झेपला निरू तुमचा.
माझे आजी आजोबा मला आईबाबांइतकेच प्रिय आहेत.किंबहुना जास्तच कारण लहानपणापासून त्यांनीच मला सांभाळलय.कुठल्याही स्पर्धेसाठी मला प्रोत्साहन दिलय. त्यामुळे ते माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत.

माझा त्या ईश्वरी सिद्धांतांवर वगैरे गोष्टींवर विश्वास नाहीये .त्यामुळे त्या चॅनलवरची व्याख्यान मला असह्य होतात.पण आजोबांना या गोष्टींवर फार विश्वास आहे.त्यामुळे त्यांना वाईट वाटू नये म्हणून मी फार तर दहा मिनीट बघते आणि नंतर शांतपणे माझ्या रूममध्ये येऊन वाचत बसते.कारण कुठल्याही बाबतीत मला कोणालाच दुखवायला आवडत नाही.त्यांना तर नाहीच नाही.