आपल्या शरीराचा मूलभूत घटक म्हणजे पेशी. निरनिराळ्या अवयवांमध्ये अनेक प्रकारच्या पेशी असतात. सर्व पेशींना त्यांच्या अस्तित्वासाठी सतत उर्जानिर्मिती करावी लागते. त्यासाठी अर्थातच पुरेसे इंधन उपलब्ध झाले पाहिजे. ज्याप्रमाणे वाहनांसाठी काही प्रकारची इंधने असतात त्याचप्रमाणे पेशींमध्येही वेगवेगळी इंधने उपलब्ध आहेत. जो रासायनिक पदार्थ इंधन म्हणून वापरला जातो त्याचे ज्वलन (oxidation) होऊन त्यातून रासायनिक उर्जा (ATP) तयार होते. पेशींमधली विविध इंधने अशी आहेत:
ग्लुकोज
मेदाम्ले
ग्लिसेरॉल
किटोन बॉडीज
अमिनो आम्ले
यांपैकी कशाचा वापर उर्जानिर्मितीसाठी करायचा हे पेशीचा प्रकार आणि त्यातली परिस्थिती यानुसार ठरते.
बहुसंख्य पेशींच्या बाबतीत ग्लुकोज हे महत्वाचे इंधन आहे. काही पेशी त्याव्यतिरीक्त इतर इंधनेही वापरू शकतात. पण, रक्तातील लालपेशी मात्र फक्त ग्लुकोजच वापरतात. म्हणजे त्या ‘खाईन तर तुपाशी’ या प्रकारच्या पेशी आहेत. मेंदू सुद्धा शक्यतो ग्लुकोजचीच मागणी करतो पण आणीबाणीच्या परिस्थितीत तो इतर इंधन वापरू शकतो.
आहार आणि ग्लुकोजचा पुरवठा
आता एक नजर टाकूया आपल्या रोजच्या आहारावर. आहाराचा ६०-७०% भाग हा कर्बोदकांच्या रुपात असतो. पोळी, भाकरी आणि भात हे आपले पोट भरायचे मुख्य पदार्थ. त्या सगळ्यांत असतो ‘स्टार्च’. तर मांसाहारातून ‘ग्लायकोजेन’ हे कर्बोदक मिळते. मुळात स्टार्च आणि ग्लायकोजेन हे ग्लुकोजचे polymers आहेत. त्यांचे पचनसंस्थेत पूर्ण विघटन झाल्यावर आपल्याला भरपूर ग्लुकोज मिळते. तसेच आपण आहारात अनेक गोड पदार्थ, दूध व फळेही घेतो. त्यातून आपल्याला ग्लुकोजची भाईबंद असलेली अन्य काही कर्बोदके मिळतात. ती पचनसंस्थेतून शोषून जेव्हा पेशींत पोचतात तेव्हा त्यांचेही ग्लुकोजमध्ये रुपांतर होते. थोडक्यात कुठलेही कर्बोदक आहारात घेतले तरी पेशींमध्ये शेवटी त्याचे ग्लुकोज बनवले जाते. त्यामुळे ग्लुकोज हेच आपल्या शरीराचे मुख्य इंधन ठरते.
कर्बोदकांच्या पचनातून निर्माण झालेला ग्लुकोज नंतर रक्तात शोषला जातो. रक्तप्रवाहातून तो शरीराच्या सर्व अवयवांना पोचवला जातो. आता तो प्रत्यक्ष पेशीत शिरणे ही एक महत्वाची पायरी असते. यकृताच्या पेशींमध्ये तो अगदी सहज शिरतो पण स्नायू आणि मेदपेशींमध्ये मात्र तसे होत नाही. या दोन्हीकडे शिरण्यास त्याला इन्सुलिनची मदत लागतेच.
पेशींमध्ये ग्लुकोजचा वापर तीन प्रकारे होतो:
१. ५०% लगेचच ऊर्जानिर्मितीसाठी वापर. उरलेला ५०% हा पेशींना लगेच लागणार नसतो. म्हणून त्याचा ‘साठा’ खालील रूपांमध्ये होतो
२. १०% ग्लुकोजचे ‘ग्लायकोजेन’ मध्ये रुपांतर होते आणि
३. ४०% चे रुपांतर मेदात होते.
ग्लुकोजचा साठा करण्याचे मार्ग
आता ग्लुकोजचे जे दोन साठे होतात त्यांचा हेतू समजून घेऊ. इथे मला बँकेत पैसे ठेवण्याच्या ज्या नेहमीच्या पद्धती आहेत त्यांची उपमा द्यावी वाटते. समजा, मला रोज १०० रु. मिळतात. त्यातले ५० मला रोजच्या खर्चासाठी लागतात, म्हणून मी ते घरीच ठेवतो. उरलेल्या ५० मधले १० रु. मला त्या आठवड्यात कधीही लागू शकतात. पण, मला ते घरी ठेवायचे नाहीत कारण ते लगेच खर्च होण्याची भीती वाटते. मग मी ते माझ्या बचत खात्यात ठेवतो. शेवटी जे ४० उरले आहेत ते मला कधीतरी अडीअडचणीतच लागतात. म्हणून मी त्यांची मुदत ठेव बनवतो.
आता वळूया ग्लुकोजकडे. त्याचा १०% साठा हा ग्लायकोजेनच्या रुपात केला जातो. हे संयुग मुख्यतः यकृत व स्नायूंमध्ये साठवले जाते.यापैकी यकृतातील ग्लायकोजेनचे गरजेच्या वेळी अत्यंत वेगाने ग्लुकोजमध्ये रुपांतर होते. थोडक्यात हे झाले ग्लुकोजचे बचत खाते! आता त्याचा उपयोग बघा. रोज रात्रीचे जेवणानंतर ते दुसऱ्या दिवशीच्या सकाळच्या न्याहारीपर्यंत आपण ‘उपाशी’ असतो. तेव्हा मध्यरात्र ते सकाळ या काळात यकृतातील ग्लायकोजेनचे ग्लुकोजमध्ये रुपांतर होते आणि ते रक्तात सोडले जाते. मग सर्व पेशी ते वापरू लागतात. म्हणजेच, रोज दिवसभरात आपण आहारातला ग्लुकोज थेट वापरतो तर रात्रीत हा ‘बचत’ केलेला ग्लुकोज वापरात आणतो.
शेवटी जो ४०% ग्लुकोज उरलाय त्याचे मेदात रुपांतर केले जाते आणि ते मेद (fat) शरीराच्या मेदसाठ्यांमध्ये( adipose tissue) साठवले जाते. हे साठे खर्या अर्थाने ‘fixed deposits’ असतात! जेव्हा काही कारणाने दीर्घकाळ उपोषण घडते, त्या काळात त्यांचे विघटन करून त्यातून काही प्रमाणात ग्लुकोज मिळवला जातो. तसेच त्यातून मिळालेली मेदाम्लेही इंधन म्हणून वापरली जातात.
आपण साठवलेला मेद ही एका अर्थी आपली ‘संपत्ती’च असते. ज्याप्रमाणे व्यवहारातील कुठलीही संपत्ती निर्माण करण्यास मुळात आपल्याकडे भरपूर ‘चलन’ असावे लागते, तद्वत शरीरात जेव्हा ग्लुकोजचा पुरवठा भरपूर असतो तेव्हाच आपण मेदरुपी संपत्ती निर्माण करतो. ज्याप्रमाणे गरजेहून अधिक संपत्ती आयुष्यात कटकटी निर्माण करू शकते त्याप्रमाणे मेदाचे साठेही नको इतके झाल्यास काही व्याधी उत्पन्न होतात.
शरीरातील ग्लुकोजचे कार्य
१. सर्व पेशींमध्ये इंधन म्हणून ऊर्जानिर्मितीत वापर
२. ग्लुकोजपासून ribose तयार होते, जे DNA व RNA यांच्या उत्पादनासाठी लागते.
३. पुरुषाच्या जननेंद्रियात ग्लुकोजपासून fructose तयार होते, जे शुक्राणूंना उर्जा पुरवते.
४. स्तनांमध्ये स्तनपानाच्या काळात जे Lactose तयार होते त्यासाठी ग्लुकोज आवश्यक असते
५. ग्लुकोज हा अन्य मेद व प्रथिनांशी संयोग पावतो आणि त्यातून काही महत्वाची संयुगे तयार होतात, जी पेशींच्या बळकटीसाठी आवश्यक असतात.
या विवेचनातून लक्षात येईल की ग्लुकोज हा शरीरातील अनेक रासायनिक घटनांचा मूलाधार आहे.
ग्लुकोजचा चयापचय आणि हॉर्मोन्सचे कार्य
जेव्हा आपण नियमित पुरेसा आहार घेतो तेव्हा ग्लुकोजचा ग्लायकोजेन व मेदांच्या रुपात साठा केला जातो. या दोन्ही कामांत इन्सुलिनचा वाटा मोठा आहे. हे हॉर्मोन आपल्या स्वादुपिंडात तयार होते. जेवणानंतर जेव्हा आपली ग्लुकोजची रक्तपातळी वाढू लागते तेव्हा इन्सुलिनही अधिक प्रमाणात रक्तात सोडले जाते. ते पेशींमध्ये ग्लुकोजचा व्यवस्थित वापर आणि साठा करण्यात मोलाची मदत करते. त्याच्या या महत्वाच्या क्रियेमुळेच ग्लुकोजची वाढलेली रक्तपातळी अल्पावधीत पूर्ववत केली जाते. तेव्हा पुरेसा आहार आणि इन्सुलिनचे कार्य यांचा मिलाफ होऊनच ग्लुकोजपासून मेदनिर्मिती होते.
जेव्हा बऱ्याच तासांसाठी आपण आहार घेत नाही तेव्हा शरीरातील घडामोडी बघू. सुरवातीस रक्तातील ग्लुकोज पेशींकडून वापरले जाते. ते बऱ्यापैकी वापरल्यावर त्याची रक्तपातळी कमी होऊ लागते. आता हा ‘संदेश’ अन्य काही हॉर्मोन्सकडून टिपला जातो आणि ती अधिक प्रमाणात स्त्रवू लागतात. या हॉर्मोन्समध्ये प्रामुख्याने ‘ग्लुकॅगॉन’ व ‘एपिनेफ्रीन’ चा समावेश आहे. मुळात ही दोन्ही ‘इन्सुलिन-विरोधी’ गटातील आहेत. त्यामुळे त्यांच्या सर्व कृती या बरोबर इन्सुलिनच्या विरुद्ध असतात. आता ती कार्यरत झाल्यावर यकृतातील ग्लायकोजेनचे ग्लुकोजमध्ये रुपांतर होते आणि ते रक्तात सोडले जाते. जोपर्यंत पुढील अन्नग्रहण होत नाही तोपर्यंत हे ग्लायकोजेन ग्लुकोजची रक्तपातळी टिकवते. जास्तीतजास्त १६ तासांच्या उपासापर्यंत हा ग्लायकोजेनचा साठा टिकतो.
समजा, आता एखाद्याने त्याहीपुढे उपोषण करायचे ठरवले तर काय होते ते पाहू. आपण वर पाहिले आहे की लालपेशी आणि मेंदू यांना सतत ग्लुकोज लागतेच.त्यामुळे आता ती पातळी टिकवण्यासाठी एक नवीन प्रक्रिया यकृतात होते. तिला ‘नव-ग्लुकोज निर्मिती’ असे म्हणतात. ही एक अत्यंत महत्वाची प्रक्रिया आहे. त्यामध्ये शरीरातील प्रथिने आणि मेद यांच्या विघटनातून ग्लुकोज तयार होतो आणि मग रक्तात सोडला जातो. किंबहुना या अनोख्या क्रियेमुळेच माणूस( मर्यादित काळाचे) उपोषण करूनही जिवंत राहतो. या प्रक्रियेस गती देण्याचे काम
ग्लुकॅगॉन व एपिनेफ्रीन ही हॉर्मोन्स करतात.
रक्तातील ग्लुकोजची योग्य पातळी
आपले खाणे आणि ही पातळी यांचा थेट संबंध आहे. सकाळी उपाशी पोटी ही सर्वात कमी असते( ७० – १०० mg/dL ). जेवणानंतर ती वाढू लागते आणि एक तासाने ती सर्वोच्च असते. दरम्यान जे वाढीव इन्सुलिन स्त्रवलेले असते त्याच्या प्रभावाने ती पुढील तासाभरात बऱ्यापैकी खाली येते. निरोगी अवस्थेत जेवणानंतर दोन तासाने ती १४० mg /dL चे आत असते. ज्या लोकांचा जेवणानंतरचा ‘इन्सुलिन-प्रतिसाद’ अत्युत्तम असतो, त्यांचे बाबतीत तर ती उपाशी-पातळी इतकी खाली येते.
आपण आहारातील कर्बोदकांचे प्रमाण जेवढे वाढवू त्याच प्रमाणात स्वादुपिंड अधिक इन्सुलिन सोडते. ग्लुकोजची पातळी खाण्यानंतर बेफाम वाढू नये यासाठीच इन्सुलिनचा लगाम आपल्याला निसर्गाने दिला आहे. इन्सुलिन आणि इन्सुलिन-विरोधी हॉर्मोन्स यांच्यातील समन्वयाने संपूर्ण २४ तासांत ग्लुकोज-पातळी नियंत्रित राहते.
बिघडलेल्या ग्लुकोज-पातळीचे परिणाम
जेव्हा ग्लुकोज, इन्सुलिन आणि त्याविरोधी हॉर्मोन्स यांच्यातील समन्वय बिघडतो तेव्हा अर्थातच ग्लुकोजची रक्तपातळी जास्त वा कमी होते. या दोन स्थिती अशा:
१. ग्लुकोज अधिक्य(hyperglycemia) : याची महत्वाची कारणे अशी:
अ) इन्सुलिनची कमतरता
आ) इन्सुलिनचा पेशींवर प्रभाव न पडणे (resistance)
इ) इन्सुलिन-विरोधी हॉर्मोन्सचे अधिक्य
यापैकी (अ) आणि (आ) मिळून जो आजार होतो तोच ‘मधुमेह’. मधुमेह हे अवाढव्य प्रकरण असून तो एका स्वतंत्र लेखमालेचा विषय आहे. त्याबद्दल लिहिणे हा या लेखाचा उद्देश नाही.
मधुमेह या ‘कादंबरी’चा ग्लुकोज हा नायक तर इन्सुलिन ही नायिका आहे! निरोगी अवस्थेत या दोघांचा कसा सुंदर मिलाफ होतो ते आपण पाहिले आहे. किंबहुना ही पूर्वपीठीका समजून घेणे हे मधुमेहाबद्दल वाचण्यापूर्वी आवश्यक आहे. इन्सुलिनच्या कार्याअभावी गरजेपेक्षा जास्त ग्लुकोज रक्तात साठून राहतो कारण तो पेशींमध्ये शिरू शकत नाही. मग हा साठून राहिलेला ग्लुकोज ‘बिनकामाचा’ ठरतो आणि तो कटकटीही निर्माण करतो.
२. ग्लुकोज-कमतरता (hypoglycemia) : याची महत्वाची कारणे अशी:
अ) जे मधुमेही इन्सुलिनचे उपचार घेत असतात त्यांच्यात कधीकधी त्याचा ‘ओव्हरडोस’ होतो. त्यामुळे रक्तातील ग्लुकोज जास्त प्रमाणात पेशींत शिरते आणि त्याची रक्तपातळी नको इतकी कमी होते.
आ) अतिरिक्त मद्यपान : जर एका बैठकीत फाजील मद्यपान केले आणि त्यानंतर अन्न खायची शुद्धी राहिली नाही तर हा बाका प्रसंग ओढवतो. अल्कोहोलच्या प्रभावाने पेशींमधील नव-ग्लुकोजनिर्मितीस मोठा अडथळा होतो.
जेव्हा ग्लुकोजची रक्तपातळी कमी होत होत ४० mg/dL इतकी उतरते तेव्हा रुग्णात लक्षणे (चक्कर, आकलन न होणे) दिसू लागतात. याहीपुढे जर पातळी २० mg/dL चे खाली उतरली तर मात्र रुग्ण बेशुद्ध पडतो. ही स्थिती धोकादायक असते आणि तेव्हा रुग्णास तातडीने ग्लुकोज पुरवावे लागते.
.....तर असे हे ग्लुकोज – आपले महत्वाचे इंधन. आपल्याला क्षणोक्षणी लागणारे. तसेच आपल्या पेशींचा रासायनिक मूलाधार. मात्र त्याची रक्तपातळी योग्य प्रमाणातच हवी. ती फार जास्त झाल्यास कटकटीची तर फार कमी झाल्यास धोकादायक ठरणार. आपणा सर्वांची ती कायम आटोक्यात राहो या सदिच्छेसह लेख संपवतो.
**************************************************************************************************
टीप: आरोग्य लेखमालेतील या १०व्या लेखाबरोबरच ही माला आता थांबवत आहे. यादरम्यान वाचकांनी जे अजून काही विषय सुचवले आहेत त्यावर आता चिंतन व मनन करेन. कालांतराने त्यावर स्वतंत्र लेख लिहीता येतील. आपणा सर्वांचे सहकार्याबद्दल मनापासून आभार!
https://youtu.be/4DWKf5RqU-s
https://youtu.be/4DWKf5RqU-s?si=_W7J7f_cYO9yW0Z-
डॉ. रॉबर्ट लस्टिग यांची diary of a ceo या युट्यूब चॅनल वरची मुलाखत जरूर ऐका. मोठी आहे आणि काही गोष्टी माहीत असतील पण तरीही ऐकावी अशी मुलाखत आहे.
*मुलाखत जरूर ऐका. मोठी आहे
*मुलाखत जरूर ऐका. मोठी आहे
>>> धन्यवाद.
सुरुवातीचा भाग पहिला. चांगल्या पद्धतीने सांगत आहेत.
फ्रुक्टोज आणि अल्कोहोल यांची चयापचयाच्या दृष्टीने केलेली तुलना रोचक आहे !
मुलाखत मोठी असल्यामुळे नंतर वेळ काढावा लागेल.
पुण्याच्या केईएम
पुण्याच्या केईएम रुग्णालयाच्या मधुमेह संशोधन विभागातर्फे मनोरंजनातून शिक्षण या स्वरूपाचे चांगले उपक्रम राबवले जातात. त्याचाच एक भाग म्हणून
साखरेपेक्षा गोड
हा मराठी लघुपट प्रसारित केलेला आहे : https://www.youtube.com/watch?v=6e8zLgF9ggQ
जन्मतःच शरीराचे वजन बरेच कमी असल्यामुळे भविष्यात मोठेपणी मधुमेह (प्रकार दोन) होण्याचा धोका आशियाई वंशाच्या काही लोकांमध्ये वाढतो. हा मुद्दा या लघुटात चांगल्या प्रकारे मांडलेला आहे.
मराठी कलाकारही उत्तम आहेत.
मधुमेह : प्रकार 1
मधुमेह : प्रकार 1
गेल्या 30 वर्षांत या आजाराच्या उपचारांमध्ये लक्षणीय सुधारणा झालेल्या आहेत. त्यामुळे जगभरात या प्रकारच्या रुग्णांचे मृत्यूदर कमी होऊन आयुर्मान वाढलेले आहे.
या संदर्भात जगातील 204 देशांतील (देश + भूभाग) 65 वर्षे वयावरील अशा रुग्णांचा अभ्यास सन 1990 ते 2019 या दरम्यान करण्यात आला.
https://www.bmj.com/content/385/bmj-2023-078432
काही ठळक निरीक्षणे :
. 1990 मध्ये या आजाराचे 13 लाख हयात रुग्ण 65 वर्षावरील होते. 2019 मध्ये अशा रुग्णांची संख्या 37 लाख झाली.
. या 30 वर्षात अशा रुग्णांच्या मृत्युदराचे प्रमाण 25 टक्क्यांनी कमी झाले आहे.
. या वयोगटातील रुग्णांची मुख्य समस्या म्हणजे सातत्याने वाढलेली उपाशीपोटीची ग्लुकोज पातळी. ती कमी करण्याचे आव्हान मोठे आहे.
मधुमेहाच्या उपचारासंबंधी
मधुमेहाच्या उपचारासंबंधी समाजमाध्यमांवर फिरत असलेले खोडसाळ आणि चुकीचे ढकलपत्र आणि सत्यता पडताळणी :
https://www.thequint.com/news/webqoof/diabetes-us-doctors-accept-hba1c-r...
ग्लुकोजचा चयापचय चांगला
ग्लुकोजचा चयापचय चांगला राहण्याच्या दृष्टीने रात्रभराची शांत झोप महत्त्वाची आहे. त्या झोपेदरम्यान डोळ्यांवर पडणारा कुठल्याही प्रकारचा प्रकाश (दिवा, इ-स्क्रीन, इ.) हा अत्यंत कमी आणि मंद स्वरूपाचा असावा. जर का रात्रभर डोळ्यांवर पडणाऱ्या प्रकाशाची तीव्रता जास्त राहिली तर त्यातून मेलाटोनिन हार्मोनची पातळी कमी होते. असे वर्षानुवर्षे झाल्यास त्याचा ग्लुकोज-इन्सुलिन संबंधांवर परिणाम होऊन मधुमेह होण्याचा धोका वाढतो.
या संदर्भात एक मोठ्या प्रमाणावर झालेले संशोधन इथे प्रसिद्ध झालेले आहे :
https://www.thelancet.com/journals/lanepe/article/PIIS2666-7762(24)00110-8/fulltext#%20
सदर अभ्यासात सहभागी झालेल्या लोकानी शरीरावर प्रकाशसंवेदक परिधान केले होते आणि या सर्व लोकांचा सलग अभ्यास आठ वर्षे झालेला आहे.
सारांश : रात्रीच्या संपूर्ण झोपेच्या कालावधीत डोळ्यांवर पडणारा प्रकाश न्यूनतम असावा आणि त्याची तीव्रता मेणबत्तीच्या प्रकाशाएवढी असलेली उत्तम.
कर्बोदकांचे अनियंत्रित सेवन
कर्बोदकांचे अनियंत्रित सेवन हे चयापचयाच्या आजारांच्या मुळाशी आहे. माणसाची ही प्रवृत्ती नक्की किती प्राचीन असावी यावर बऱ्यापैकी संशोधन होत असते. पूर्वी असा समाज होता, की शेतीच्या शोधानंतर माणूस जी पिके घेऊ लागला त्यातून ही प्रवृत्ती वाढली.
परंतु अलीकडील एका संशोधनानुसार ही मानवी प्रवृत्ती इतकी अलीकडची नसून सुमारे आठ लाख वर्षांपूर्वीपासूनची आहे. ती Neanderthals या पूर्वजांमध्येही आढळून आलेली आहे. शेतीच्या शोधानंतर ती अजून वाढीस लागली.
https://scitechdaily.com/unlocking-the-ancient-secrets-behind-our-carb-c...
https://www.nature.com/articles/s41586-024-07911-1
type १ मधुमेह हा ऑटो immune
type १ मधुमेह हा ऑटो immune प्रकार असतो का? auto immune hypothyroidism असल्यावर तो मधुमेह सोबत घेऊन येऊ शकतो का? हल्लीच मला अती वारंवार UTI चा त्रास झाला म्हणून डॉक्टरांनी शुगर टेस्ट करायला सांगितली त्यात फास्टिंग १०५ आलं.
* type १ मधुमेह हा ऑटो immune
* type १ मधुमेह हा ऑटो immune प्रकार असतो >>> होय, बरोबर.
* auto immune hypothyroidism
>>> होय, या दोन्ही आजारांचे एकमेकांची जवळचे नाते आहे. हे दोन्ही एकाच व्यक्तीत होण्याची शक्यता समान जनुकीय आणि काही पर्यावरणीय घटकांमुळे निर्माण होते.
(autoimmune polyendocrinopathy)
ऑटो immune आजार मुळात का
ऑटो immune आजार मुळात का होतात? जनुकीय बदलामुळे? कि स्ट्रेस मुळे?
या आजारांची कारणमीमांसा
Autoimmune >>>
या आजारांची कारणमीमांसा multifactorial असून त्यामध्ये प्रामुख्याने खालील कारणांचा/ घटकांचा वाटा असतो :
धन्यवाद डॉ. कुमार सर,
धन्यवाद डॉ. कुमार सर,
105 prediabetic की नॉर्मल?
105 prediabetic की नॉर्मल?
F 105 : prediabetic
F 105 : prediabetic
100 to 125 (mg/dL) prediabetic (WHO)
जागतिक मधुमेह दिनानिमित्त
जागतिक मधुमेह दिनानिमित्त सर्व संबंधितांना आरोग्यपूर्ण शुभेच्छा !
सर्वांचा मधुमेह नियंत्रणात राहो. मधुमेहपूर्व अवस्था असलेल्या लोकांनी जीवनशैलीत योग्य ते बदल घडवून आणावेत ही सदिच्छा.
आज जागतिक पातळीवर सर्वाधिक मधुमेही चीनमध्ये (14 कोटी) असून भारत 7.7 कोटींसह दुसऱ्या स्थानावर आहे.
https://www.who.int/india/health-topics/mobile-technology-for-preventing...
(चित्र सौजन्य WHO)
“भारतातील मधुमेहाची ‘लाट’
“भारतातील मधुमेहाची ‘लाट’ रोखण्यासाठी काय काय करता येईल?” या विषयावर जागतिक मधुमेह दिनानिमित्त झालेले विचारमंथन :
निरोगी अवस्थेतील प्रतिबंध
* बाल्यावस्था : नियमित व्यायाम आणि आरोग्यपूर्ण आहार. लठ्ठपणाचा प्रतिबंध अत्यंत महत्त्वाचा
* विवाहपूर्व वयातील तरुणांनी - विशेषतः तरुणींनी - नियमित व्यायाम करून वजन नियंत्रणात राखणे महत्त्वाचे, जेणेकरून भविष्यातील गरोदरपणातील मधुमेहाची शक्यता कमी राहते.
* गरोदरपणात : आहारातील प्रथिने, चोथायुक्त अन्न आणि ब-१२ जीवनसत्वावर विशेष लक्ष देणे. कर्बोदकांचे प्रमाण शक्य तितके कमी. यातून जन्माला येणाऱ्या संततीमध्ये भविष्यात मधुमेह होण्याचा धोका (‘program’ ) कमी होतो.
* सर्वांसाठी महत्वाचे : नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि हवा प्रदूषणापासून संरक्षण
मधुमेहपूर्व अवस्था
आरोग्यतज्ञांच्या सल्ल्याने आहार व व्यायाम यांच्यावर विशेष लक्ष देणे.
मधुमेही व्यक्ती
नियमित उपचार घेणे हे तर महत्त्वाचेच. त्याचबरोबर “ABCD” या चार घटकांवर लक्ष देणे महत्त्वाचे :
ABCD म्हणजे -
A1c
Blood pressure
Cholesterol &
Discipline (आहार, व्यायाम, झोप आणि डॉक्टरांशी नित्यनेमाने सल्लामसलत)
वरील ABC घटक नियंत्रणात राहिल्यास गंभीर दुष्परिणाम (complications) होण्याचे टळते.
“भारतातील मधुमेहाची ‘लाट’
“भारतातील मधुमेहाची ‘लाट’ रोखण्यासाठी काय काय करता येईल?” या विषयावर जागतिक मधुमेह दिनानिमित्त झालेले विचारमंथन>>>>> माहितीबद्दल धन्यवाद सर.
हवा प्रदूषणापासून संरक्षण>>>>> इंटरेस्टिंग. हे तर आपल्या हातात नाही. पण हवा प्रदूषणाचा आणि मधुमेहाचा संबंध कसा?
*हवा प्रदूषणाचा आणि मधुमेहाचा
*हवा प्रदूषणाचा आणि मधुमेहाचा संबंध
>>>
याची नक्की कारणमीमांसा समजली नसली तरी प्रयोगांमधून काही गृहितके मांडली गेलीत. दीर्घकाळ खूप मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषके शरीरात गेल्यास oxidative stress वाढतो आणि तो एकूणच अनेक इंद्रियांच्या दाह प्रक्रियेला कारण ठरतो.
यातून काही प्रकारची cytokines शरीरात सोडली जातात आणि त्यातून विविध इंद्रियांना इजा होते. परिणामी चयापचय आणि हृदयविकारांसाठी पोषक वातावरण तयार होते.
धन्यवाद.
धन्यवाद.
दीर्घकाळ खूप मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषके शरीरात गेल्यास oxidative stress वाढतो आणि तो एकूणच अनेक इंद्रियांच्या दाह प्रक्रियेला कारण ठरतो.>>>>>> म्हणजे शहरातील लोकांना मधुमेह अधिक प्रमाणात असण्यास हवा प्रदूषण हा गोंधळात टाकणारा घटक (रिस्क फॅक्टर/ confounding factor) आहे असे म्हणावे का?
हवा प्रदूषण >>>
हवा प्रदूषण >>>
सध्या त्याला additional risk factor असे म्हणणे सयुक्तिक ठरेल. यावर अधिक संशोधनाची आणि चिकित्सेची गरज आहे :
https://read.qxmd.com/read/21442161/environmental-pollutants-and-type-2-...
धन्यवाद सर
धन्यवाद सर
भारतातील पहिली मधुमेह जैविक
भारतातील पहिली मधुमेह जैविक बँक चेन्नई येथे स्थापन. या संस्थेत भारतीय जीवनशैलीनुसार मधुमेहाचा सखोल अभ्यास केला जाईल
https://www.indiatoday.in/health/story/india-sets-up-its-first-diabetes-...
सन 2050 पर्यंत भारताच्या
सन 2050 पर्यंत भारताच्या लोकसंख्येच्या एक तृतीयांश लोक लठ्ठ झालेले असतील असे लँसेटच्या शास्त्रीय अहवालात म्हटले आहे.
https://www.indiatoday.in/health/story/obesity-crisis-epidemic-one-third...
तेव्हा लठ्ठपणाच्या देशांच्या क्रमवारीत चीन, भारत आणि अमेरिका असा अनुक्रम असेल.
जागतिक मधुमेह महासंघाच्या
जागतिक मधुमेह महासंघाच्या यंदा झालेल्या अधिवेशनात मधुमेहाच्या पाचव्या प्रकाराला अधिकृत नोंदीची मान्यता देण्यात आली. अशा तऱ्हेने आता मधुमेहाचे पाच अधिकृत प्रकार झालेले आहेत :
१. इन्सुलिनची अतीव कमतरता
२. यात इन्सुलिन resistance हा भाग मुख्य असतो.
३. वरीलपेक्षा इतर कारणांमुळे होणारे मधुमेह : यामध्ये स्वादुपिंडाचे विशिष्ट आजार, तसेच औषधे आणि रसायनांचा परिणाम यांचा समावेश.
४. गरोदरपणातील मधुमेह
५. कुपोषणाशी संबंधित मधुमेह : या रुग्णांमध्ये इन्सुलिनचे स्त्रवणे खूप कमी होते आणि ग्लुकोज पातळी देखील खूप जास्त असते. तरीदेखील यांना प्रकार-१ प्रमाणे ketosisची समस्या उद्भवत नाही. हा प्रकार आशिया व आफ्रिका खंडात अधिक आढळून येतो.
https://medicalxpress.com/news/2025-04-diabetes.html
Pages