अकरा हजार तीनशे कोटींचा चुना - नीरव मोदी

Submitted by ऋन्मेऽऽष on 15 February, 2018 - 12:23

महिन्याअखेरीस दहाबारा हजारांचा ओवरटाईम हातात पडतो तेव्हा आपली तर ऐश झाली असे वाटले. खरे तर असतो आपल्याच मेहनतीचा पैसा. पण तरीही नेहमीच्या पगारापेक्षा जास्त म्हणून वरकमाई झाल्यासारखे वाटते. शॉपिंग होते, हॉटेलिंग होते, गर्लफ्रेंडसोबत डेटींग होते. फक्त त्या दहा बारा हजारांच्या ज्यादा कमाईत. मग हे अकरा हजार कोटींचे घोटाळे करणारे आनंदाने मरत कसे नाहीत?

सार्वजनिक क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाची बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेला ११,३०० कोटी रुपयांचा गंडा घालून अब्जाधीश हिरे व्यापारी नीरव मोदी देशाबाहेर फरार झाला आहे.
अशी बातमी ऐकल्यावर माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या मनात येणारे काही प्रश्न -
१) पहिलाच प्रश्न - हे नुकसान शेवटी आपल्यासारख्या सामान्य करदातांच्या खिशात हात घालून वसूल केले जाणार का?
२) त्या बॅंकेत ज्यांची खाती आहेत त्यांना याचा काही फटका बसतो का?
३) आपल्याला साधे छोटेमोठे कर्ज काढायचे असेल तर आपल्याला ईतका मनस्ताप होतो, हे असे घोटाळे बॅंकेच्या डोळ्यात धूळ फेकून होतातच कसे? बॅंकाना अक्कल नसते का?
४) एखादा राजकीय गॉडफादर पाठीशी असल्याशिवाय हे घोटाळे करणे शक्य असते का? ईथे कोण्या एका पक्षावर आरोप करायचा नाहीये.
५) आता हे पैसे वसूलणार कसे? आज काहीतरी हिर्‍यांच्या दुकानावर छापे घालून पाचेक हजार कोटी वसूलले असे ऐकले आहे. पण मग ती दुकाने बंदच पडली का? त्यात काम करणार्‍या लोकांचे काय? त्यांचा तर चालू महिन्याचा पगारही बुडालाच का? नोकर्‍याही गेल्याच..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजची बातमी:
सहा वर्षांत, ८० हजार कोटींचे गैरव्यवहार. अनेक छोटेमोठे नीरव मोदी देशभरात सगळीकडेच कार्यरत आहेत.
"बँकिंग व्यवहाराच्या नियमातील त्रुटी शोधून बँकांना चुना लावण्याचा प्रयत्न म्हटल्यावर याच दोन घटना आठवत असल्या तरी देखील मधल्या काळात असे अनेक प्रकार झाले आहेत. केवळ २०१२ ते २०१७ या पाच वर्षांच्या काळातच कर्ज गैरव्यवहारांच्या तब्बल आठ हजार ६७० घटना घडल्या असून त्यातून ६१ हजार कोटी रुपयांचे (६१२.६ बिलियन) गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार रिझव्‍‌र्ह बँकेनेच ही आकडेवारी त्यांना माहिती अधिकारात दिली आहे. त्यात हा नीरव मोदीचा ताजा गैरव्यवहार आणि गेल्या वर्षभरातील इतर गैरव्यवहार पकडल्यास ही रक्कम ८० हजार कोटींच्या घरात जाते."

तपशीलवार बातमीसाठी इथे क्लिक करा:
https://www.loksatta.com/coverstory-news/80-thousand-crore-frauds-in-6-y...

आम्हि उमेदवार कसेही देउ - करप्ट, दगेखोर, मर्डर केलेले, रेपिस्ट. तुम्हि फक्त मोदीच्या नावावर निवडुन द्या.
भक्त - वा अमित शाह , काय मास्टर स्टोक आहे!

दयनीय अवस्था आहे भक्तांची!

घ्योंच्यु लोकांना भारतीय लोकशाही पटलेलीच नाही व त्यांना एकचालकानुवर्ती राज्य आणायचं आहे हे वारंवार स्पष्ट होतंच. भारतीय लोकशाहीत आपला प्रतिनिधी निवडून द्यायचा असतो.

दक्षिण दिल्लीच्या खासदार आणि काही काळ दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावर कार्यरत राहिलेल्या सुषमा स्वराज यांना नाकारत बेल्लारीच्या जनतेने अननुभवी सोनिया गांधींना निवडून दिले होते ते काय सोनियांचे कर्तृत्त्व पाहून की काँग्रेसच्या पंजाचे चिन्ह पाहून?

त्यांच्या कर्तृत्वामुळेच वाजपेयी आणि अडवाणी 10 वर्ष व त्यानंतर कायमचे घरी बसले. Wink
बाकी त्या स्वराज यांचे केस वाचावे म्हणबन पंप्र झाल्या नाहीत Rofl त्याचे स्वराज यांनी किमान ट्विटर वर तरी आभार मानायला हवे..

आणी त्या निवडुन आल्या असत्या तर आज मोदींना गुजरातेतच थांबावे लागले असते नाहितर परराष्ट्र खाते साम्भाळावे लागले असते.
तेव्हा भक्तांनी आभार मानावेत. तेहि आम्हालाच सांगावे लागते की भक्तांचे चांगले कशात आहे.

याची मोदींना पूर्ण कल्पना आहे,
पुढच्या टर्म मध्ये त्यांना परराष्ट्र खातेच सांभाळायचे आहे, त्याची ते कसून प्रॅक्टिस करत आहेत या टर्म मध्ये :p

चर्चा अत्यंत टूकार आणि पातळी सोडून चालू आहे .

काही बेसिक प्रश्न
यांनी त्यांनी अमूक हजार कोटींचे घोटाळे केले त्याचा तूमच्या व्ययक्तिक आयुष्यावर काही परिणाम झाला का ?
म्हणजे पागार कमी झाला, वाढ थांबली , झोप लागत नाही वगैरे -
असे अनेक घोटाळे आधीही झालेत आणि आताही होत आहेत कुठलाही पक्ष किंवा व्यक्ति धूतल्या तांदळाची नाही

असो चालू द्या

बेल्लारीच्या जनतेने अननुभवी सोनिया गांधींना निवडून दिले होते ते काय सोनियांचे कर्तृत्त्व पाहून की काँग्रेसच्या पंजाचे चिन्ह पाहून? >> उदाहरणं देताना जरा चांगली देत जावा प्लीज.. ते मोदींच्या नावानं "राज्यात" मत मागत आहेत.. त्यावेळी तुमच्याच म्हणण्याप्रमाणं काँग्रेसचं चिन्ह पाहून मतदारांनी निवडून दिलं होतं तेही "लोकसभेला".. आणि त्यांना लोकांनी निवडून दिलं होतं. इथं आक्षेप लोकांना आवाहन करणार्‍यावर घेतलाय लोकांवर नाही.. तुम्ही तर डायरेक्ट बेल्लारीच्या जनतेवर आक्षेप घेत आहात.. शिवाय २०१४ ला अख्ख्या देशात कोणाच्या नावानं की पक्षाच्या नावानं मतं मागितली होती?

यांनी त्यांनी अमूक हजार कोटींचे घोटाळे केले त्याचा तूमच्या व्ययक्तिक आयुष्यावर काही परिणाम झाला का ?
म्हणजे पागार कमी झाला, वाढ थांबली , झोप लागत नाही वगैरे ->>>>>>>
काय तो 2g ,कोळसा वगैरे घोटाळा झाला होता म्हणे, त्याने कोणाचा पगार किती कमी झाला होता? की कोणाची झोप उडाली होती?
लोकांनी तेव्हा सुद्धा बोंब ठोकली होती, आणि आता न्यायालयाने निर्दोष सुटका करून सुद्धा बोंब ठोकत आहेत,

दुसऱ्या बाजूने जरा बोलायला सुरुवात केली की शांतातवादी, स्थितप्रज्ञ विचार कसे सुचतात?

एसबीआय वाले न सांगता १४७ रुपये खात्यातुन गायब करत आहे असा मेसेज बरेच जण सोशल मिडीयावर पोस्त करत आहे. तसेच पीएफचे व्याज देखील कमी केले आहे.
माझ्या मते हे सामान्य नागरीकांच्या खिशावर परिणामकारक नाही आहे Wink

यांनी त्यांनी अमूक हजार कोटींचे घोटाळे केले त्याचा तूमच्या व्ययक्तिक आयुष्यावर काही परिणाम झाला का ? >>>>> झाला आहे. १५ लाख रुपये येणार होते खात्यात ते अजुन आले नाहित. १५ लाखाचे नुकसान झाले आहे. देताय ?

सीबीआय धाडीच्या वेळी जे हिरे १.०६ करोड रुपये किमतीचे होते, ते दहा लाखाचे असल्याचं आता कळतंय.

लोलवा.

एकंदरित गणिताचा प्रॉब्लेमच आहे. सहाशे कोटी भारतीय. परत आलेल्या नोटा, चौपदरी रस्ते. आता हे.

झी न्युजचीच बातमी आहे हं.
https://zeenews.india.com/hindi/india/vijay-mallyas-file-missing-require...

सुप्रीम कोर्ट (Supreme Court) में भगौड़े विजय माल्या (Vijay Mallya) की फाइल से जरूरी दस्तावेज गायब हो गए हैं.

विजय मल्याने न्यायालयाचा अवमान केला या अत्यंत गंभीर प्रकरणातील कागदपत्रे हरवली म्हणे.

१,७६,००० कोटी रूपयांच्या कोळसा खाणी घोटाळा या किरकोळ प्रकरणातील सर्व कागदपत्रे २०१३ मध्ये अशीच हरवली होती.

https://www.google.com/amp/s/www.ndtv.com/india-news/some-crucial-coal-g...

>>> छान छान. म्हणजे मोदी दुस र्‍यांदा येऊनही मागील पानावरून पुढे चालू >>>

मागचं पान तर मालकीणबाईंच्या आज्ञेवरून बुजगावण्यानेच लिहिलं होतं.

सर्व कागदपत्रे २०१३ मध्ये अशीच हरवली होती.
>>>>
नवीन Submitted by पुरोगामी on 6 August, 2020 - 17:51

त्यांनी हरवली म्हणून यांनी पण हरवायची?

२०१३ ला कागदपत्र हरवल्यामुळे मल्ल्याच्या केसची कागदपत्रे हरवण्याचे समर्थन कसे काय होऊ शकते?

अडचणीत आले की "काँग्रेसच्या वेळेस पण असे झाले होते"
ही सबब पुढे करणे नेहमीचेच झाले आहे.

म्हणजे त्यांनी चुका केल्या तर आम्ही पण करणार.

Pages