अकरा हजार तीनशे कोटींचा चुना - नीरव मोदी

Submitted by ऋन्मेऽऽष on 15 February, 2018 - 12:23

महिन्याअखेरीस दहाबारा हजारांचा ओवरटाईम हातात पडतो तेव्हा आपली तर ऐश झाली असे वाटले. खरे तर असतो आपल्याच मेहनतीचा पैसा. पण तरीही नेहमीच्या पगारापेक्षा जास्त म्हणून वरकमाई झाल्यासारखे वाटते. शॉपिंग होते, हॉटेलिंग होते, गर्लफ्रेंडसोबत डेटींग होते. फक्त त्या दहा बारा हजारांच्या ज्यादा कमाईत. मग हे अकरा हजार कोटींचे घोटाळे करणारे आनंदाने मरत कसे नाहीत?

सार्वजनिक क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाची बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेला ११,३०० कोटी रुपयांचा गंडा घालून अब्जाधीश हिरे व्यापारी नीरव मोदी देशाबाहेर फरार झाला आहे.
अशी बातमी ऐकल्यावर माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या मनात येणारे काही प्रश्न -
१) पहिलाच प्रश्न - हे नुकसान शेवटी आपल्यासारख्या सामान्य करदातांच्या खिशात हात घालून वसूल केले जाणार का?
२) त्या बॅंकेत ज्यांची खाती आहेत त्यांना याचा काही फटका बसतो का?
३) आपल्याला साधे छोटेमोठे कर्ज काढायचे असेल तर आपल्याला ईतका मनस्ताप होतो, हे असे घोटाळे बॅंकेच्या डोळ्यात धूळ फेकून होतातच कसे? बॅंकाना अक्कल नसते का?
४) एखादा राजकीय गॉडफादर पाठीशी असल्याशिवाय हे घोटाळे करणे शक्य असते का? ईथे कोण्या एका पक्षावर आरोप करायचा नाहीये.
५) आता हे पैसे वसूलणार कसे? आज काहीतरी हिर्‍यांच्या दुकानावर छापे घालून पाचेक हजार कोटी वसूलले असे ऐकले आहे. पण मग ती दुकाने बंदच पडली का? त्यात काम करणार्‍या लोकांचे काय? त्यांचा तर चालू महिन्याचा पगारही बुडालाच का? नोकर्‍याही गेल्याच..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पूर्ण व्यवसायावरचा बँकांचा विश्वास उडवल्या बद्दल- हे तर नेहमीच होते. अतिरेक्यांनी सायकलवर बॉम्ब लावून फोडले म्हणून साधी तीन चार हजारची सायकल विकत घ्यायला येणार्‍या ग्राहकांना केवायसी पूर्ण करायला लागले आहे.

अजुनहि काहि लोकांना वाटते आहे की मोदी ने टाइट केल्यामुळे हि प्रकरणे बाहेर येत आहेत. आमच्याहि औफिस मध्ये आहे असा एक महाभाग. समजावायचा प्रयत्न केला की जास्तीत जास्त एलोयु २०१५ ते २०१७ मधील आहेत पण भक्ताडाला काहि समजले नाहि. त्याचे एखाद्या बैकेतील पैसे जेव्हा बुडतील तेव्हा समजेल. कालाय तस्मे नमः !

मला नाही वाटत की आम्ही भारतात असताना भारताच्या तिजोरीत देखील एव्हढे पैसे असतील, एका बँकेत तर सोडाच!
निदान भारत एव्हढा श्रीमंत झाला की एव्हढ्या पैशाचा घोटाळा पचवून अजून उभा आहे नि प्रगती करतोच आहे!
कुठलाहि पक्ष सत्तेवर असला तरी हे असले घोटाळे करणारे लोक असतातच. ते कुठल्याहि सरकारला भीक घालत नाहीत नि आपले धंद चालूच ठेवतात, मदत मिळाली सरकारची तर ठीकच नाहीतर काही फरक पडत नाही.
तर जोपर्यंत लोक तेच किंवा तसलेच तोपर्यंत कितीहि सरकारे बदला!

अशांचे नाही बुडत,
ऐकले नाही का, यांना आधीच 'आतल्या गोटातून' खबरबात लागते. ही लोक पैसे आधीच काढून मोकळी होतात.. नंतर हेच "लोका सांगे...!" करत फिरतात.

तर जोपर्यंत लोक तेच किंवा तसलेच तोपर्यंत कितीहि सरकारे बदला!>>> बरोबर पण किमान मागील सरकारमध्ये घोटाळेबाजांना पळून तरी जाता येत नव्हते. यात कर दे खंडणी, बांध मुख्यालय, आणि जा पळून हे तीन सुत्रे लागू झाली.

केवळ कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी कुणालाही, अक्षरशः कुणालाही गिली, गीतांजली च्या डायरेक्टरपदी बसवले.

आता मेहुलभाय गायब झाल्यामुळे या कनिष्ठ मध्यमवर्गीत निर्दोष लोकांवर कायद्याची कुर्हाड कोसळली आहे.

https://m.economictimes.com/news/politics-and-nation/people-living-in-ch...

<<यात कर दे खंडणी, बांध मुख्यालय, आणि जा पळून हे तीन सुत्रे लागू झाली.>>
म्हणजे असल्या प्रकरणांत सुद्धा प्रगती! धन्य भारत!

६० वर्षाच्या तथाकथित लुट करून पण भाड्याचे कार्यालय असणारे काँग्रेस आणु अवघ्या ४ वर्षाच्या राष्ट्रवादी,देशप्रेमी चौकीदारीने १३०० करोडचे अत्याधुनिक ७ मजली हायटेक मुख्यालय असणारी भाजप

करा विचार

मोदी सारखा तुघलक आणि शेखचिल्लीचे मिश्रण नाही आहे..
म्हणून जनता आता राहूलकडे आशेने बघत आहे.
तुघलकी कारभार पुरा झाला

<<<म्हणून जनता आता राहूलकडे आशेने बघत आहे.>>>

दुसर्‍या कुणाकडे आशेने बघण्यापेक्षा घोटाळे करणार्‍यांना पकडून चौकात उभे करून फटके मारा नि पैसे वसूल करा. तुमचेच पैसे, तुम्हाला तो अधिकार असायला पाहिजे. त्यांनी पोलीस लोकांचे, वकील, न्यायाधीश राजकारणातले लोक वगैरेंचे पैसे परत केले असतील, वर थोडे जास्तीचे व्याज देऊन. ते काही नाही करणार नाहीत, त्यांचे हे काम असले तरी.
अश्या दोन तीन लोकांना धरून जरा फटके मारले म्हणजे ठिकाणावर येतील.
अर्थात त्या लोकांकडे चांगले कसलेले गुंड असतीलच तेंव्हा जरा हुषारीनेच.

<अर्थात त्या लोकांकडे चांगले कसलेले गुंड असतीलच तेंव्हा जरा हुषारीनेच.>
हे बरोबर आहे. ते गुंड सध्या कुठे आहेत, तेवढं विचारू नका.

नेहेमी जोरदार भाशणे देणारे नरेन्द्र मोदि या विषयावर अजून गप्प कसे. जेतलीनी सुद्धा या विषयावर नुकतेच वक्तव्य केले आहे. निरव मोदी प्रकरणात बन्केचे अधिकारी, ऑडीटर तसेच अनेक राजकारणी यान्चा हात आहे असे दिसते. हा घोटाला काही दिवसात विसरला जाईल याचे कारण दुसरा नवा घोटाळा असेल. मोदीना एक प्रश्न विचारावासा वाटतो तो असा तुमचे न खाउन्गा न खाने दून्गा या प्रॉमिसचे काय झाले.

५८००० करोडचा घपला लपविण्यासाठी ११००० करोडचा घोटाळा पुढे आला!

विठ्ठल जसा स्वतःला वाचवण्यासाठी कोडनानी, बाबू बजरंगी यांना पुढे आणले तोच प्रकार आता नीरव बाबत केला आहे.

पाकिस्तानी लोकांची सिक्रेट मिटींग होते, कटकारस्थान रचले जात आहे इत्यादी गोष्टींचा माहीती जर 56 इंची तुघलकाला आधीच मिळते तर नीरव, माल्या, इत्यादींची माहीती का बरे मिळाली नाही? की माहीती मिळाल्यावर मुख्यालय बांधण्यासाठी खंडणी वसूल केली गेली? मग पळवून लावले?

५८००० करोडचा घपला लपविण्यासाठी ११००० करोडचा घोटाळा पुढे आला!
नवीन Submitted by विठ्ठल on 22 February, 2018 - 10:16
<<

५८००० करोड हा आकडा बहुतेक पप्पुच्या डायरीतील, एकाद्या पानावरुन घेतलेला दिसतोय ! Proud

संयुक्त अरब अमिराती, भारतात ७५ बिलियन डॉलर्स ची गुंतवणूक करणार आहे. महिनाभरापूर्वीची बातमी.

संयुक्त अरब अमिरातीतील ऑफशोअर कंपन्यांच्या करामती पाहता गेलेला पैसा स्वित्झरलँड-बर्मुडा-लिबेरिया-चॅनेल आयलँड्स-कॅनरी आयलँड्स-टर्क्स अँड केकोस आयलँड्स असा व्हाया व्हाया करीत मौरीशस, सिंगापूर, संयुक्त अरब अमिरातीतुन येईल परत भारतात.

<<< एक लाख साठ हजार कोटीचा आकडा घेतला तिथूनच ५८००० कोटीचा आकडा घेतला. >>>
आयला केव्हढे हे पैसे!!
म्हणूनच घोटाळा झाला. सगळ्या रकमा १००० कोटींमधे मोजायच्या! बिचारा ११,००० रु. काढायला गेला असेल नि त्याला चुकून ११,००० कोटी दिले!

आता मला वाटते १०,००० रु. = १ नवा रुपया असे करावे.

आता मला वाटते १०,००० रु. = १ नवा रुपया असे करावे.

मग 5 रुपये पगार असलेल्या अनेक मुलांना मुली कोण देईल

आता कर्नाटकात अमित शाह म्हणतायत की उमेदवार नको फक्त मोदींच्या नावावर मत द्या.
म्हणजे उमेदवार फालतू आहेत की काय.

Pages