दुधीचे थालीपीठ

Submitted by Darshna on 9 February, 2018 - 10:01
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

दुधी - १ छोटा (मिडीयम साइज) / पाव किलो
बेसन - २ वाटी
गव्हाचे पीठ - १/२ वाटी
हिरवी मिरची - ७/८
आल-लसूण पेस्ट - १ छोटी वाटी
जीरा पावडर - २ चमचा
हळद - १/२ चमचा
लाल तिखट - १ चमच
मीठ - चवीनुसार
तेल - आवश्यकतेनुसार
कोथिंबीर - १ छोटी वाटी

क्रमवार पाककृती: 

१. दुधी धुवून किसून घेणे.
२. चाळणीत ठेवून / कपडयात बांधून पाणी काढून घेणे. ते भाजी करताना वापरता येईल किंवा पाणी न काढता वापरल तरी चालेल, पण मग बेसन थोड जास्त लागेल.
३. नंतर दुधी व वरील सर्व साहित्य व २ छोटे चमचे तेल एकत्र करा. पाणी घालू नये. घट्टसर मिश्रण करा.
४. नंतर लगेच हाताला थोड तेल लावून छोटे गोळे करा.
५. प्लास्टिकच्या पिशवीला तेलाचा हात लावून थालीपीठ थापून घ्या.
६. गरम तव्यावर तेल टाका व दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्या.
७. गरमागरम सर्व्ह करा.
सोबत : कैरी लोणच / दही.

वाढणी/प्रमाण: 
१२
माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मिक्स पीठे ही घालू शकतो. तसेच पालक बारीक चिरुन, ओवा, तीळ वगैरे...