ट्रेन मधे आमच्या कंपार्टमेंट मधल्या माझ्या सहप्रवाश्यांमधे एक कुटुंब होतं. नवरा बायको आणि आठ-दहा वर्षांची त्यांची मुलगी. मोनिका नाव होतं तिचं. त्या मुलीची अवस्था बघवत नव्हती. She was physically and mentally challenged. तिचं स्वतःचंच असं एक विश्व होतं. तिचे आई वडील अधूनमधून तिच्याशी बोलत होते, तिला खिडकी बाहेरची पळणारी झाडं दाखवत होते... अगदी नॉर्मल आई वडीलांसारखे. पण ते सगळं मोनिका पर्यंत पोचतच नव्हतं.
नंतर तिच्या आईशी बोलत होते तेव्हा त्यांनी स्वतःच सांगितलं की मोनिका जन्माला आल्या आल्या रडलीच नाही. आणि त्यामुळे तिच्या मेंदू ला पुरेसा रक्तपुरवठा आणि पर्यायानी ऑक्सीजन नाही मिळाला. As a result, some brain cells were permanently dead.आणि यावर काही औषध किंवा उपचार नाहीत, त्यामुळे मोनिका आयुष्यभर अशीच राहणार - like a vegetable - परधार्जिणं आयुष्य जगत!
हे सगळं ऐकलं आणि माझ्या मनात वेगवेगळ्या विचारांनी थैमान घालायला सुरुवात केली. त्या छोट्याशा जीवाबद्दल एकाच वेळी प्रेम, करुणा, दया, कीव अशा अनेक भावना एकत्र झाल्या. वाटलं, 'या एवढ्याशा जीवाच्या नशीबात असं जगणं का?'तिच्या आई-वडिलांच्या मनःस्थिती ची कल्पना करूनच जीवाचा थरकाप उडत होता. आपल्या मुलीला अशा अवस्थेत बघणं म्हणजे त्यांच्यासाठी नरकयातनाच असणार. पण त्यापेक्षाही जास्त त्रासदायक असेल त्यांना वाटणारी 'असहायता'..... आपली इच्छा असूनही स्वतःच्या पोटच्या गोळ्यासाठी आपण काहीच करू शकत नाही .... या सत्य परिस्थितीतून जाणवणारा helplessness. सगळंच कल्पने पलीकडचं होतं. त्या क्षणी एका हिंदी गाण्याच्या ओळी आठवल्या.. 'दुनिया में इतना ग़म है...... मेरा ग़म कितना कम है।'
मी खरंच खूप नशिबवान असल्याची पुन्हा एकदा जाणीव झाली.
९ नोव्हेंबर ला संध्याकाळी आम्ही पुण्याला पोचलो. स्टेशन वर अपेक्षेप्रमाणे माझ्या बहिणी, जिजाजी सगळे आले होते. माझ्या मोठ्या बहिणीबरोबर मी स्टेशन वरून सरळ ऑन्कॉलॉजिस्ट ला भेटायला गेले. मुलींना माझी चुलत बहिण तिच्या घरी घेऊन गेली.
डॉक्टर ना मी माझी सगळी केस हिस्ट्री सांगितली. माझे केस पेपर्स, CT Scan चे रिपोर्ट्स सगळं त्यांच्या समोर ठेवलं. त्यांनी ते सगळे रिपोर्ट्स नीट अभ्यासले आणि म्हणाल्या,"तुमच्या डॉक्टर नी केलेलं रोगाचं निदान अगदी योग्य आहे. You have bilateral ovarian carcinoma of stage 3-C. पण मला एक सांगा की तुम्हाला कधी आणि कसं कळलं याबद्दल? कारण तुमच्या केसमधे कुठलेच दर्शनीय असे signs ,symptoms दिसत नाहिएत.'
मग मी त्यांना सगळं सविस्तर सांगितलं," देवदयेनी मला वेळेतच लक्षात आलं .. actually ऑक्टोबर महिन्यात माझी मंथली साइकल ऑलमोस्ट पंधरा दिवस आधी आली. त्यामुळे मला थोडी काळजी वाटत होती कारण माझ्या बाबतीत हे असं पहिल्यांदाच झालं होतं. म्हणून मी डॉक्टर ना कन्सल्ट केलं. पण ते म्हणाले,"तुम्ही काळजी नका करू. Hormonal imbalance मुळे कधीकधी होतं असं. मला तरी यात काही सिरियस असेल असं वाटत नाहीए. आपण अजून दोन तीन महिने वाट बघू. त्यानंतरही जर ठीक नाही झालं तर मग सगळ्या टेस्ट्स करून घेऊ."
पण मला कुठेतरी काहीतरी खटकत होतं. म्हणून मग मी माझ्या शाळेतल्या मैत्रिणींना सांगितलं. त्या सगळ्यांनी सुद्धा तेच सांगितलं... 'काळजी नको करू. हे सगळं नॉर्मल आहे'
पण somehow माझं मन हे मानायला तयार नव्हतं. मी खूप प्रयत्न केला सकारात्मक विचार करायचा... पण मनात आत कुठेतरी शंकेची पाल सारखी चुकचुकत होती. आणि ती शंका मला स्वस्थ बसू देत नव्हती..अचानक माझ्या मनात विचार आला की 'माझं शरीर मला काहीतरी सांगायचा प्रयत्न करतंय. My body is giving me a signal that something is wrong with it.' आणि हळूहळू माझ्या नकळत मी माझ्या पोटावरून हात फिरवायला लागले, हलकेच दाबून बघत होते। कुठे काही वेगळे जाणवतंय का? अचानक पोटाच्या उजव्या बाजूला काहीतरी hard जाणवलं, एखादा lump असल्यासारखं. तसंच काहीतरी डाव्या बाजूला ही लागले .. मला वाटलं ‘कदाचित कुठेतरी internal swelling आली असेल’... पण मग शंका आली, दोन वेगवेगळ्या ठिकाणी swelling ?’ माझ्या मनातली शंकेची पाल आता जोरजोरात ओरडायला लागली होती. लगेच डॉक्टर कडे गेले. त्यांनीही चेक केलं. त्यांनाही इंटर्नल swelling ची शक्यता वाटत होती. त्यांनी लगेच मला सोनोग्राफी करून घ्यायला सांगितली… and the rest is history.
हे सगळं ऐकून त्या म्हणाल्या,” मॅम, तुम्ही योग्य च केलंत. नाहीतर बऱ्याच वेळा patients आणि खास करुन स्त्रिया, आपलं दुखणं अंगावर काढतात आणि जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाते तेव्हा जातात डॉक्टर कडे!
मी आमच्या संभाषणाची गाडी परत माझ्या ट्रीटमेंट च्या दिशेनी वळवत त्यांना विचारलं,"तुमच्या मते कोर्स ऑफ ट्रीटमेंट काय आहे?" त्यांनीही तेच सांगितलं- आधी तीन केमो मग सर्जरी आणि मग उरलेल्या तीन केमो. ट्रीटमेंट च्या बाबतीत आता कुठलीही शंका नव्हती. पण मला एक वेगळीच काळजी लागून राहिली होती. मी अजूनपर्यंत कुणाशीच नव्हते बोलले त्या बद्दल. मी त्यांना विचारलं," मी असं ऐकलंय की जर एखाद्या स्त्री ला कँसर असेल तर तिच्या बहिणी आणि मुलींना पण हा रोग होण्याची शक्यता जास्त असते. अशा वेळी त्यांना काय काळजी घ्यायला पाहिजे?" त्या हसल्या आणि म्हणाल्या,"तुमचा आजार सोडून तुम्हाला त्यांची काळजी वाटते आहे? तुमच्या बहिणींनी स्क्रीनिंग टेस्ट्स केल्या पाहिजेत आणि तुमच्या मुली तर अजून खूप लहान आहेत. आणि तसंही तुम्हाला कँसर झाला म्हणून त्यांना सगळ्यांनाही होईल हे काही जरूरी नाही. तेव्हा आता तो विचार मनातून काढून टाका." त्यांचं हे बोलणं ऐकून माझी एक मोट्ठी काळजी मिटली.
दुसऱ्या दिवशी सकाळी कमांड हॉस्पिटलमध्ये ऑन्कॉलॉजिस्ट ला भेटायला गेले. ओ.पी.डी च्या वेटिंग हॉल मधे बसले होते तेव्हा समोरच्या भिंतीवर लावलेल्या एका पोस्टर वर माझी नजर गेली-त्यात cancer survivors करता आवाहन केलं होतं की 'जर तुम्हाला कँसरग्रस्त लोकांना मदत करायची असेल तर तुमचं नाव रजिस्टर करा.' ते वाचून मी तिथल्या अटेंडंट ला म्हणाले," माझं नाव लिहून घ्या." त्यावर तो हसला आणि म्हणाला," मँडम, हे cancer survivors साठी आहे. कँसर पेशंट्स करता नाहीए." मी त्याला ठामपणे सांगितलं," तुम्ही आज जरी माझं नाव लिहिलं नाहीत तरी थोड्याच दिवसांत मी स्वतः येऊन माझं नाव या रजिस्टर मधे लिहिन.कारण मला खात्री आहे की मी या रोगावर नक्कीच मात करीन." तेवढ्यात माझ्या अपॉईंटमेंट ची वेळ झाली आणि मी डॉक्टर च्या केबीन मधे गेले. त्यांच्या समोर सगळे रिपोर्ट्स, रेफरन्स डॉक्युमेंट्स ठेवले. त्यांनी CT Scan चा रिपोर्ट वाचला आणि म्हणाले,"पेशंट कुठे आहे?" मी त्यांना म्हणाले,"पेशंट तुमच्या समोर बसलीए." त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य स्पष्ट दिसत होतं.त्यांनी विचारलं," तुम्ही अशा अवस्थेत जोधपूरहून इथे एकट्या आलात?" मग मी त्यांना सगळी परिस्थिती सांगितली. ते म्हणाले," कमाल आहे तुमची! पण इथे तुम्हाला कुठल्याही प्रकारची मदत लागली तर मला सांगा. तुमची राहण्याची सोय, तुमच्या मुलींची इथल्या शाळेत अँडमिशन- काहीही मदत लागली तर सांगा. " त्यांना माझ्या बद्दल वाटणारी काळजी बघून मनात एक विचार आला -' या जगात पदोपदी चांगली माणसं भेटतात आपल्याला. आणि या अशा माणसांमुळेच हे जग सुरळीत रित्या चाललं आहे.'
त्यांनी मला वेगवेगळ्या टेस्ट्स करून घ्यायला सांगितल्या. त्यात दोन टेस्ट्स महत्त्वाच्या होत्या - CA-125 (ओव्हेरियन कँसर डिटेक्शन टेस्ट), आणि FNAC (Fine Needle Aspiration Cytology).
CA-125 ही एक ब्लड टेस्ट आहे. या टेस्ट मधे नॉर्मल रिपोर्ट्स ची रेंज 0-35 अशी असते. पण माझ्या रक्तात तो काउंट होता '४२९.८'.. म्हणजे नॉर्मल रेंज पेक्षा कितीतरी पटींनी जास्त... पण ते तर अपेक्षितच होतं.
FNAC टेस्ट मधे एका अगदी बारीक नीडलच्या मदतीनी ट्यूमर मधल्या काही पेशी काढून घेतात. ही प्रक्रिया लोकल अँनेस्थेसिया देऊन केली जाते. त्या पेशींचा अभ्यास/निरीक्षण करून मग त्याप्रमाणे कोर्स ऑफ ट्रीटमेंट, औषधे वगैरे ठरवलं जातं.
सगळ्या टेस्ट्स झाल्यानंतर मी १३ नोव्हेंबर ला माझ्या पहिल्या केमोथेरपी साठी हॉस्पिटलमधे अँडमिट झाले.
हॉस्पिटलमधे जायच्या आदल्या दिवशी मी माझ्या दोन्ही मुलींना कुशीत घेऊन समजावून सांगितलं," माझ्या पोटात जो ट्यूमर आहे ना- म्हणजे ज्या bad सेल्स आहेत- त्यांना मारुन टाकायला एक औषध असतं. पण ते औषध सलाइन मधून घ्यावं लागतं. त्या साठी मला हॉस्पिटलमधे राहावं लागेल.पण मी लवकर परत येईन." त्या दोघींनीही खूपच समजुतदारपणे सगळं ऐकून घेतलं आणि दोघीही मला सोडून राहायला तयार झाल्या. त्यांची मावशी होतीच त्यांच्या बरोबर, त्यामुळे मला काळजी नव्हती.
रात्री झोपताना स्रुष्टी माझ्या कुशीत शिरताना नकळत माझ्या पोटाला हलकेच तिच्या पायाचा धक्का लागला. ते बघून माझी बहिण तिला म्हणाली,"सावकाश हं बाळा. आईला दुखेल!" हे ऐकल्याक्षणी तिचा चेहरा कसनुसा झाला आणि ती म्हणाली,"सॉरी गं! पण अगं मावशी, आमच्या आईला असं कधीच होत नाही ना, त्यामुळे माझ्या लक्षातच नाही आलं." त्या एका वाक्यावरून मला तिच्या भाबड्या मनात चालू असलेली विचारांची घालमेल स्पष्ट दिसून आली. तिला जवळ घेऊन मी म्हणाले, "हो गं बेटू, you are right. मला खरंच कधी असं काही होत नाही आणि यापुढेही काही नाही होणार . त्यामुळे तू अजिबात काळजी करू नकोस." माझं बोलणं ऐकून तिच्या मनातलं वादळ शांत झालं असावं. कारण लगेच तिच्या चेहरा उजळला आणि ती हसून म्हणाली," मला माहितीए ऑलरेडी कारण तू तर brave girl आहेस ना!"
तिचा माझ्या वरचा हा विश्वास मला अजूनच ताकद देऊन गेला.
माझ्या आजूबाजूला जशी मला सपोर्ट करणारी माणसं होती तशीच माझ्या आजाराची जाणीव करून देणारी माणसंही होती. एकजण म्हणाले,"इतक्या लहान वयात तुला हे सगळं भोगावं लागतंय. तू कुणाचं असं काय वाईट केलंस? मग तुझ्याच नशीबात हे असं का?" मी त्यांना म्हणाले," अहो, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात चांगले आणि वाईट असे दोन्ही भोग असतातच ना! आता हेच बघा ना.. कँसर जरी मला झाला असला तरी तुम्हाला ही त्यामुळे मानसिक त्रास होतोच आहे ना? तुम्ही तरी कुणाचं काय वाईट केलंय? तरीसुद्धा तुमच्या नशीबात हा मनस्तापाचा भोग आहेच की!"
नंतर विचार करताना लक्षात आलं-'माझ्याच बाबतीत असं का?' या प्रश्नाचं उत्तर.... बघा तुम्हाला पटतंय का.... मी जेव्हा शाळेत नोकरी करत होते तेव्हा एखादं अवघड किंवा महत्त्वाचं काम मी वर्गातल्या काही ठराविक मुला-Aमुलींनाच सांगायचे, कारण मला त्यांच्या बद्दल खात्री होती..काम कितीही अवघड असलं तरी ती मुलं ते नक्की पूर्ण करतील असा विश्वास होता मला.
कदाचित देवही असाच विचार करत असेल. जेव्हा त्याला एखाद्याची परीक्षा घ्यायची असेल तेव्हा ज्या माणसाबद्दल त्याला खात्री आहे, त्या माणसासाठी सगळ्यात अवघड परीक्षा ! याचा अर्थ असा की देवाला माझ्या बद्दल खात्री आहे, विश्वास आहे. आणि म्हणूनच तो माझी 'अशी ' परीक्षा घेतोय. देवानी माझ्यावर दाखवलेला हा विश्वास मी खोटा ठरू देणार नाही. मी या परीक्षेत नक्की पास होईन. या नुसत्या विचारानीच मला एक वेगळंच बळ मिळालं... एक प्रकारचं मानसिक बळ -'मी या रोगावर मात करणारच' हा विश्वास निर्माण करणारं बळ!
माझी पहिली केमोथेरपी १६ नोव्हेंबर ला सुरू झाली. नितिन बरोबर होताच. मोगाला त्याच्या युनिटचा कमाडिंग ऑफीसर म्हणून सगळी सूत्रं हातात घेतल्यानंतर तो एका आठवड्याची सुट्टी घेऊन आला होता. मला त्याच्या मनस्थितीची पूर्ण कल्पना होती. एकीकडे प्रमोशन मिळाल्याचा आनंद आणि तेही एका युनिटचा 'कमांडिंग ऑफीसर' (CO) म्हणून! आम्ही दोघांनीही या दिवसासाठी मनोमन देवाची प्रार्थना केली होती. कदाचित नितिन नी त्याच्या CO होण्याची जेवढी स्वप्नं बघितली नसतील तेवढी मी बघितली होती. देवानी आमचं हे स्वप्न पूर्ण केलं पण अशी परिस्थिती निर्माण केली की आम्ही त्या यशाचा निर्भेळ आनंद नाही भोगू शकलो. पण म्हणतात ना-'याला जीवन ऐसे नाव!'
मी या घटनाक्रमाकडे पॉझिटीव्हली बघायचं ठरवलं. मी असा विचार केला की या दोन्ही घटना एकाच वेळी घडल्या कारण- मला या आजारावर मात करण्यासाठी 'नितिन चं प्रमोशन' हे एक मोटिव्हेशन आहे. मी लवकरात लवकर बरी होईन आणि 'CO' ची बायको म्हणून मिरवेन. त्या नुसत्या विचारानीच त्या अवस्थेतही माझ्या ओठांवर हसू आलं.
जेव्हा नर्स मला इंट्रा व्हेनस सलाइन लावायला आली तेव्हा मी खूप अधीर झाले होते. वाटत होतं, लवकर ट्रीटमेंट सुरू करा. मला लवकर बरं व्हायचंय. IV लावताना ती नर्स मला म्हणाली," मँडम, आत्ता तर तुमच्या व्हेन्स अगदी सहज सापडतायत, पहिलीच केमो आहे ना म्हणून. पण पुढे हळूहळू सगळ्या व्हेन्स रबर सारख्या हार्ड होतील. त्यावेळी त्यांत नीडल घुसवणं कठीण होईल आणि तुम्हाला पण खूप दुखेल."
एक नर्स असून पेशंट समोर असं बोलणं? तीनी तर पेशंटला धीर द्यायला हवा. पण मी आधीच ठरवलं होतं की कुठल्याही प्रकारची निगेटिव्हीटी आपल्या जवळपास ही फिरकू द्यायची नाही. मी पण त्या नर्सला ऐकवलं. म्हणाले," व्हेन्स कितीही हार्ड झाल्या तरी असतील माझ्या शरीरातच ना? त्यांत नीडल घुसवण्याचं तुमचं काम तुम्ही नीट, व्यवस्थित करा. राहिली गोष्ट माझ्या दुखण्याची....त्याची काळजी तुम्ही नका करू. मला खात्री आहे, सगळं ठीकच होईल."
थोड्याच वेळात तिनी IV ड्रिप चालू केला आणि त्या सलाइन च्या बॉटल मधे केमोथेरपी चं औषध इंजेक्ट केलं. मी डोळे बंद करून देवाचं नाव घेतलं आणि डोळ्यासमोर एक द्रुश्य आणलं- सलाइन मधे मिक्स होऊन हे औषध माझ्या शरीरात शिरतंय, रक्तात मिसळतंय आणि संपूर्ण शरीरात फिरून जिथे जिथे त्याला कँसर सेल्स दिसतायत तिथेच त्यांना मारून टाकतंय." या कल्पनेनीच किती बरं वाटत होतं. मीही मग त्या औषधाला सांगितलं (अर्थात मनातल्या मनात)," नीट शोधून काढ रे सगळ्यांना. एक एक को चुन चुन के मार डालो। देखना, कोई भी बचने ना पाए।"
पहिली केमो सुरळीतपणे पार पडली. पण मला नंतर दोन दिवस हॉस्पिटल मधेच under observation ठेवलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी ड्यूटी वर जी नर्स होती, तिनी अगदी आपुलकीनी माझी चौकशी केली. माझ्या फँमिली बद्दल विचारलं. मी खाण्या पिण्याच्या बाबतीत काय काय काळजी घ्यायला पाहिजे ते सगळं नीट समजावून सांगितलं. मला तर काय लोकांशी गप्पा मारायला आवडतंच. त्यामुळे थोड्याच वेळात आमची दोघींची गट्टी जमली. तिसऱ्या दिवशी मला हॉस्पिटल मधून डिसचार्ज मिळाला आणि मी घरी जायला निघाले. माझ्या कालच्या मैत्रीणीचा निरोप घ्यायला म्हणून मी ड्यूटी रूम मधे गेले. तिथे तिचा तीन-चार वर्षांचा गोंडस मुलगा बसला होता. डोक्यावरचे सगळे केस मुंडन करून काढून टाकले होते. ती नर्स दक्षिण भारतीय असल्यामुळे मला वाटलं की 'तिरूपतीला जाऊन मुलाचं केशवपन केलं असावं' कारण त्यांच्या साठी तिरूपतीला जाऊन केस दान करणं याला धार्मिक द्रुष्ट्या खूप महत्व आहे. म्हणून मी तिला सहज विचारलं," तिरूपती में कराया इसका मुंडन?" त्यावर केविलवाणं हसून ती म्हणाली,"नो मँम. केमोथेरपी की वजह से उसके बाल झ़ड गए हैं।" तिच्या या वाक्याचा अर्थ लक्षात यायला मला काही क्षण लागले. पण जेव्हा समजलं तेव्हा मी सुन्न झाले. मला काय बोलावं तेच कळत नव्हतं. मनात विचारांची मँरेथॉन चालली होती. एकदम तिच्या मुलाकडे लक्ष गेलं.. तो कलरिंग बुकमधली चित्रं रंगवण्यात मग्न होता. साहजिकच त्याला परिस्थिती चं गांभिर्य कळत नव्हतं. पण त्याच्या आई वडिलांचं काय? नकळत माझी नजर माझ्या मैत्रिणीकडे वळली. माझ्या डोळ्यांतलं प्रश्णचिन्ह पाहून ती म्हणाली,"त्याला डोळ्याचा कँसर आहे.. to be precise .. retina चा. आत्तापर्यंत तीन केमोज् झाल्या आहेत. डॉक्टर्स चं म्हणणं आहे की 'सर्जरी ची गरज नाहीए, केमोथेरपी पुरेशी आहे.' तिचं बोलणं ऐकून मी माझ्याही नकळत तिला घट्ट मिठी मारली. थोड्या वेळापूर्वी जी माझी फक्त मैत्रीण होती, ती आता अचानक माझी गुरु झाली.. तिनी मला खूप काही शिकवलं होतं .. rather तिच्या वागण्या बोलण्यातून मीच बरंच काही शिकले. आपलं वैयक्तिक दुःख तिनी स्वतःकडेच ठेवलं होतं..... She had managed to keep her personal and professional life separate. And that is not easy .. not at all ! स्वतःचा मुलगा कँसरग्रस्त असताना, इतर कँसर पेशंट्सची सेवा करायची आणि तीदेखील हसतमुखानी, आपलं दुःख चेहऱ्यावर दिसू न देता !!! हा निष्काम कर्मयोग नाही तर दुसरं काय?
'स्वतःच्या दुःखाचा गाजावाजा न करता दुसऱ्याचं दुःख कमी करणं' हा आयुष्यातला एक खूप इंपॉर्टंट धडा शिकले मी त्या दिवशी तिच्या कडून.
त्या दिवशी हॉस्पिटल मधून घरी आल्यानंतरही माझ्या मनात सारखे तेच विचार घोळत होते.मी तिच्या बाळासाठी आणि तिच्यासाठीही देवाकडे प्रार्थना केली. त्या वेळी तेवढंच शक्य होतं मला. आता हळूहळू मला केमोथेरपी च्या औषधांचे साईड इफेक्ट्स जाणवत होते. Nausea आणि त्यामुळे लॉस ऑफ अँपेटाइट. साहजिकच थोडा अशक्तपणा आला होता.
एके दिवशी जोधपूरच्या माझ्या एका मैत्रिणीचा मला फोन आला. तिच्या आवाजावरून ती खूप काळजीत असावी असं वाटत होतं. तिनी तीन चार वेळा माझ्या तब्बेतीची चौकशी केली. अगदी तिची खात्री होईपर्यंत. त्याच दिवशी संध्याकाळी अजून एका मैत्रिणीचा फोन आला. तिच्या मनात पण माझ्या तब्बेती विषयी तीच काळजी... दुसऱ्या दिवशी अजून एकीचा फोन - माझी हालहवाल विचारायला !! मला कुठेतरी काहीतरी खटकत होतं. तसं पाहिलं तर त्यांनी फोन करून माझी चौकशी करणं यात काही गैर नव्हतं. पण लागोपाठ तीन फोन? ... हा देखील निव्वळ योगायोग असू शकतो. पण का कोण जाणे, माझं मन हे मानायला तयार नव्हतं. शेवटी मी न राहवुन माझ्या तिकडच्या अगदी खास, जिवाभावाच्या मैत्रीणीला फोन करून हा सगळा प्रकार सांगितला आणि तिला म्हणाले की 'या प्रकरणाचा काय तो छडा लावून मला सांग.' दोन दिवस होऊन गेले पण तिचा फोनच नाही आला. मला हा सस्पेंस स्वस्थ बसू देत नव्हता. शेवटी मीच तिला फोन केला. सुरुवातीला तिनी विषय बदलून उत्तर द्यायचं टाळलं. पण मी खूप insist केल्यावर तिनी मला सत्य सांगितलं. ती म्हणाली,"हे बघ, तू हट्ट च धरलायस म्हणून मी सांगतिए, पण तू मला प्रॉमिस कर की तू याचा त्रास नाही करून घेणार.." आता हा सस्पेंस मला असह्य झाला.. मी तिला म्हणाले," नमनाला घडाभर तेल नको गं! सरळ मुद्दयावर ये." तेव्हा ती म्हणाली,"अगं, आपल्या शाळेत कुणीतरी अशी अफवा पसरवली आहे की "प्रियाचा कँसर आता लास्ट स्टेज मधे गेलाय आणि आता ती यातून वाचणार नाही. Doctors have also given up now. आता तिच्याकडे जास्त दिवस नाहीएत." आणि म्हणून इथे सगळयांना खूप टेन्शन आलंय"
हे सगळं ऐकल्यावर मला हसावं का रडावं हेच कळेना!
मी तिला म्हणाले,"तू तिकडे सगळ्यांना सांग की माझी ट्रीटमेंट इकडे अगदी व्यवस्थित चालू आहे आणि मी लवकरच 'पूर्ण' बरी होऊन तिकडे येणार आहे सगळ्यांना भेटायला. तेव्हा आता कुणीही टेन्शन घेऊ नका म्हणावं."
आणि शेवटी मी तिला अजून एक काम सांगितलं... ही अफवा पसरवणाऱ्या व्यक्तीचा शोध लावण्याचं काम. कारण मी या आजारातून पूर्ण बरी झाल्यावर त्या व्यक्तीला भेटायचं होतं मला... शक्यतो personally, पण ते शक्य नसल्यास निदान फोनवर तरी ! 'कावळ्याच्या शापानी गाय मरत नाही" , "जा को राखे साईया, मार सके ना कोई" या आणि अशा म्हणींचे अर्थ शिकवायचे होते तिला/त्याला.
पण somehow मला त्या अफवा पसरवणाऱ्या व्यक्तीचा राग नव्हता आला उलट कीव येत होती. अशा मानसिकतेची माणसं ही असतात अस नुसतं ऐकलं होतं इतके दिवस.. पण आज अनुभव घेतला.Such people get a 'sadistic pleasure' out of such behaviour. पण या अनुभवामुळे माझा 'कँसर ला नेस्तनाबूत करायचा' निश्चय अजूनच पक्का झाला. आणि दुष्टबुद्धीनी का होईना पण त्या व्यक्तीनी मला माझ्या या लढाई साठी प्रेरणा दिली म्हणून मी मनोमन त्याचे आभार मानले.
२२ नोव्हेंबर ला नितिन मोगाला जायला निघाला. त्याची सुट्टी संपली होती. इतर वेळी कामानिमित्त बाहेरगावी जाताना-अगदी पाकिस्तान बॉर्डरवर जाताना सुद्धा त्यानी कधी मागे वळून बघितलं नाही. त्या वेळी मी च अगदी तो दिसेनासा होईपर्यंत त्याच्या गाडीकडे बघत राहायची की कदाचित हा मागे वळून बघेल....पण कथीच नाही! तो एक खराखुरा सैनिक असल्यामुळे त्याच्या परिवारापेक्षा त्याचा देश त्याच्यासाठी महत्वाचा होता. आणि त्याबद्दल मला त्याचा खरंच खूप अभिमान वाटतो. पण त्या दिवशी मात्र आम्हाला सोडून जाताना त्याचा पाय निघत नव्हता. मी त्याला इतकं vulnerable कधीच पाहिलं नव्हतं.क्षणभर वाटलं- घड्याळाला 'स्टँच्यु' म्हणावं. म्हणजे नितिन ला जायला नाही लागणार. पण मग माझी ट्रीटमेंट, माझं बरं होणं आणि आम्ही चौघांनी मिळून आमचं आयुष्य एन्जॉय करणं- हे सगळंच स्टँच्यु होऊन जाईल. म्हणून मग मी घड्याळाला 'ओव्हर' म्हटलं आणि नितिन मोगाला गेला.
क्रमशः
बिच्चारा कॅन्सर.... माझी विजय गाथा (भाग २)
Submitted by nimita on 7 February, 2018 - 22:54
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
रोजच्या जीवनातल्या छोट्या
रोजच्या जीवनातल्या छोट्या छोट्या घटना, भेटणारी ओळखी-अनोळखी माणसं आपल्याला सतत काहीतरी शिकवत असतात. त्यातली प्रत्येक गोष्ट सकारात्मक कशी घ्यावी हे तुमच्या attitude मधून दिसतंय. बोलायला खूप सोपं वाटत असलं तरी प्रत्यक्ष करायला खूप अवघड आहे हे !
जीवनाकडे एका वेगळ्या दृष्टीने कसं पहावं हे तुमच्या दोन्ही भागातल्या अनुभवकथनातून उलगडतंय !
परत एकदा hats off and stay blessed !!
निमिता, तुमच्या पहिल्या
निमिता, तुमच्या पहिल्या भागापासूनच असं झालं य की प्रतिसाद तर लिहावासा वाटतोय, पण काय लिहावे हेच सुचत नाहीये. काळजाला भिडलंय पण नेमक्या शब्दात मांडता येत नाहीये.
सध्या फक्त salute तुम्हाला......
शरीराने दिलेल्या संकेतावरून अ
शरीराने दिलेल्या संकेतावरून अॅलर्ट राहून घेतलेला शोध - हा भाग खूप प्रभावी आहे.
अशी सजगता गंभीर आजारांना तोंड देण्यासाठी आवश्यक असते आणि उपयोगीही पडते.
निमिता, खरचं ग्रेट आहात
निमिता, खरचं ग्रेट आहात तुम्ही.
निमिता, तुमच्या पहिल्या
निमिता, तुमच्या पहिल्या भागापासूनच असं झालं य की प्रतिसाद तर लिहावासा वाटतोय, पण काय लिहावे हेच सुचत नाहीये. काळजाला भिडलंय पण नेमक्या शब्दात मांडता येत नाहीये +१
तुमच्या पोसिटीव स्पिरीट ला सलाम
ग्रेट, पहिला आणि हा भाग पण
ग्रेट, पहिला आणि हा भाग पण तुमची विजिगीषु व्रुत्ती दाखवून देतो. खूप खूप शुभेच्छा !
तुमच्या स्पिरिटला मान तुकवून
तुमच्या स्पिरिटला मान तुकवून मुजरा.
प्रत्येक शब्दातून तुमची जगण्याबद्दलची आस्था जाणवते आहे. इतक्या कठिण काळात मनातली वादळं थोपवणं इतकं अवघड असताना, आत्मविश्वास टिकवून ठेवणं महाकठिण काम आहे. पण तुम्ही ते केलंत हे कौतुकास्पद आहे.
__/\__
__/\__
__/\__
Hats off to your attitude!
निमिता, खुप ग्रेट आहात तुम्ही
निमिता, खुप ग्रेट आहात तुम्ही. Hats off to you.
सलाम तुम्हाला व त्या नर्स
सलाम तुम्हाला व त्या नर्स ताईंना सुध्दा.......
जिथे त्याला कँसर सेल्स
जिथे त्याला कँसर सेल्स दिसतायत तिथेच त्यांना मारून टाकतंय." या कल्पनेनीच किती बरं वाटत होतं. मीही मग त्या औषधाला सांगितलं (अर्थात मनातल्या मनात)," नीट शोधून काढ रे सगळ्यांना. एक एक को चुन चुन के मार डालो। देखना, कोई भी बचने ना पाए।">> प्रिया, CO ची बायको अगदी शोभताय की
मला हे इतकं रिलेट झालंय. नंतर कळले त्याला पॉझिटिव्ह इमेजरी म्हणायचे.
खूप प्रेरणादायी लिखाण, मी माझ्या मैत्रिणीला लिंक पाठवली. जिला सध्या अशा विजयगाथा कळण्याची फार्फार गरज आहे.
ग्रेट खरंच. त्या नर्सला पण
ग्रेट खरंच. त्या नर्सला पण सलाम.
वंदना, तुमच्या मैत्रिणीला पण
वंदना, तुमच्या मैत्रिणीला पण याची लिंक पाठवलीत हे वाचून खरंच बरं वाटलं. माझे अनुभव कागदावर उतरवायच्या मागे एकच भावना आहे - लोकांना positive thinking आणि will power यामधे किती शक्ती आहे ते सांगणं. तुमच्या मैत्रिणीला माझ्या लिखाणा मुळे जर मदत झाली तर माझा हेतू साध्य झाला असं मला वाटेल. जर अजून कुठल्याही प्रकारची मदत हवी असेल तर जरूर कळवा.
वंदना, याला positive imagery
वंदना, याला positive imagery म्हणतात हे मला सुद्धा आत्ताच कळलं.
नीमीताजी.. प्रेरणा घ्यावी
नीमीताजी.. प्रेरणा घ्यावी अश्या आहात तुम्ही !
वाचते आहे! पुभाप्र..
वाचते आहे! पुभाप्र..
तुमचा हा सकारात्मक प्रवास खरच
तुमचा हा सकारात्मक प्रवास खरच खूप प्रेरणा देणारा आहे.
हॅट्स ऑफ टु यू.
पुढचा भाग वाचायला उत्सुक आहे. तुमचे लिखाणाचे शैली पण छान ओघवती आहे.
तुम्ही आज जरी माझं नाव लिहिलं
तुम्ही आज जरी माझं नाव लिहिलं नाहीत तरी थोड्याच दिवसांत मी स्वतः येऊन माझं नाव या रजिस्टर मधे लिहिन.कारण मला खात्री आहे की मी या रोगावर नक्कीच मात करीन." >>>>>
किती जबरदस्त सकारात्मक मानसिकता...
सलामच....
____/\____
कॅन्सरसारखा विषय असूनदेखील
कॅन्सरसारखा विषय असूनदेखील लेख खूप सकारात्मकता देतो. हॅट्स ऑफ टू यु!!
खरचं खुप सकारात्मक लिखाण आहे
खरचं खुप सकारात्मक लिखाण आहे तुमचं , हॅट्स ऑफ टू यू .
सही जातेय मालिका...
सही जातेय मालिका...
पुढचा भाग वाचायला घेतो...
______________/\_____________
______________/\______________
नर्स ताई त्यान्चा बाबु आणि तुम्हाला
परत एकदा hats off and stay
परत एकदा hats off and stay blessed !!>>>>> +१.
काय प्रतिसाद लिहावा तेच काळात
काय प्रतिसाद लिहावा तेच कळात नाहीये. खूप हिमतीच्या आहात तुम्ही. generally आपल्या घरात आपल्या जवळच्या माणसाला ह्यातून जाताना बघणं, itself is not less than hell .But I am sure your family would be proud to have you in their lives!!