सुखाचा पाळणा

Submitted by दत्तात्रय साळुंके on 28 January, 2018 - 09:34

सुखाचा पाळणा

सुख लोपताच मन बालहट्ट करतं
मोडलेला उस पुन्हा जोडून मागतं

पाळणा सुखाचा जत्रेत असा भिरभिरतो
कधी उंच आकाशी तर कधी भूईशी फिरतो

फिरवणारा हात अदण्यात
आपण फक्त बसायचं
वर गेलं तरी हसायचं
खाली आलं तरी हसायचं

गतिशीलता पाळण्याचा स्थायिभाव
नाही येत गंमत , येता
वरचा किंवा खालचा ठेहराव

अंधार चिरत गाडी
बोगद्यात शिरतेच ना
शिळ घालत घालत
पुन्हा उजेडात येतेच ना

चक्र निसर्गाचही बदलत असतं
ग्रीष्माच्या पाठून वर्षा बरसतं

दत्तात्रय साळुंके

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults