वृद्धाश्रमात अध्यात्मिकता

Submitted by डॉ रवी१ on 25 January, 2018 - 12:24

वृद्ध लोकांसाठी अध्यात्मिक उपक्रम राबवावी प्रवचने, ग्रंथाची उपलब्धता, CD player इ उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे.

विषय: 
प्रांत/गाव: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टिव्ही असतात आश्रमात. हिंदीमधले बरेच चानेल आहेत त्यावर अध्यात्मिक कार्यक्रम चालू असतात.मराठीत कमी आहेत.

म्हाताऱ्या लोकांनी अध्यात्मिकच पाहावे/वाचावे/ऐकावे हे बंधन का? उलट मी म्हणेन की त्यांना निखळ विनोदी सिनेमे/नाटके/पुस्तके वाचू द्या, जे आजवर करता आले नाही ते वृद्धाश्रमाच्या जागेत जसे शक्य आहे तसे करू द्या. कॅरम, बुद्धिबळ, लुडो, व्यापार, पत्ते इत्यादी फारशी शारीरिक हालचाल न लागणारे खेळ खेळू द्या.

जे आयुष्य उरलेय ते हसत खेळत मजेत जाऊ द्या. मी बरीच वृद्ध माणसे पाहिलीत जी कायम कडू किराईत खाल्ल्यासारखा चेहरा करून वावरतात. आपले संस्कार असे जालीम आहेत की कुणी वृद्ध वयाला विसरून आनंदाने हसत खेळत नाचत दिसला तर म्हातारचळ लागलं म्हणतो. वृद्धत्व म्हणजे आध्यात्म, लाम्ब चेहरा, देव देव करणे हे सगळे डोक्यातून हद्दपार करायला हवे.

म्हातारपणी अध्यात्मिक वाचून काहीही फरक पडत नाही. मरताना गीता वाचून काहीही फायदा नाही. हे सगळे आपण लहानपणापासून मुलांना शिकवले पाहिजे जेणेकरून आयुष्याची खडतर वाटचाल करताना त्यांना बळ मिळेल.

साधना ह्यांच्या प्रत्येक शब्दास अनुमोदन.

वायफाय सुविधा मात्र हवी असा मी मला अ‍ॅड्मिट करवून घेताना हट्ट धरणा र आहे. फोन वर फोरजी परव्डेल कि नाही माहीत नाही तोपरेन्त जिओ चे वृद्धा श्रम पण आलेले असतीलच. तिथे जाईन पण वायफाय मस्ट.

साधना यांच्या प्रयेक शब्दास अनुमोदन

<<आपले संस्कार असे जालीम आहेत की कुणी वृद्ध वयाला विसरून आनंदाने हसत खेळत नाचत दिसला तर म्हातारचळ लागलं म्हणतो.>> अगदी अगदी म्हातारं झाल्यावर असं आणि असच वागायला पाहिजे हे लोकांच्या डोक्यात फिट्ट बसलाय . त्याच्या पासून जरा कुठे कोणी वेगळं वागताना दिसलं कि या वयाला हे शोभत का ? म्हणून लगेच कुजबुज . का ? कशासाठी ? आणि कायम त्यांनी अध्यात्मिकच वाचावं /पाहावं/ ऐकावं हे का बंधन ? खरंच Sad

टिव्ही माध्यम अशासाठी सुचवलं की त्यामध्ये कॅापीराइटचा प्रश्न येत नाही. कुणाच्या प्रवचनाच्या ओडियो सिडी असतील तर त्यांचा संग्रह करून आश्रमातल्या रहिवाशांना ऐकायला देता येतील का शंका आहे. वैयक्तिक वापरासाठी असतात.

>>आरोग्याबद्दल काय?>>

बारा तेरा वर्षांपुर्वी ठाणे कर्जत परिसरातील आश्रम शोधायची वेळ आली एका नातेवाइकासाठी. त्यातील निरिक्षणानुसार -
१) वैद्यकीय मदत चांगली होती सर्व ठिकाणी परंतू काही ठिकाणी मनपा/सिविल हॅास्पिटलातून सेवा मिळवून देत होते तिथे खर्च वाढत नव्हता.
२) कशामध्ये /छंदामध्ये मन गुंतवल्यास आरोग्याचा अतिरेकी विचार केला जात नाही आणी आपोआपच आरोग्य सुधारते. सतत माझे हे दुखते ते दुखते याचा विसर पडणे गरजेचे आहे.
३) एका ठिकाणी हिंडत्या फिरत्या वृद्धास आश्रमाच्या बाहेर सकाळी संध्याकाळी जाऊ द्यायचे. ते जवळच्या देवळात जाऊन बसायचे. विरंगुळा मिळाल्याने आनंदी राहायचे.
४) शाळेतल्या स्काउट गाइडना स्वइच्छेने आश्रमभेटीस आणावे. अगदी स्वत:चीच नातवंडे नाही आली तरी हळहळू मन रमेल.

तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे Srd, पण उद्विग्न राहत असू नये. विरंगुळा जरुर असावा. तोचतोचपणामुळे
कंटाळा येणे स्वाभाविक आहे, बदल करावासा वाटतोच माणसाला. काही उत्तम विचारांचा शोध घ्यावा.

वृद्धाश्रमात उद्विग्नपणा येण्याचे कारण १) नातेवाइक भेटायला येत नाहीत. एखाद्याकडे वारंवार कुणी येतात तर दुसय्राकडे न आल्याने ते दु:खी होतात. २) इथे आपल्याला आणून टाकलय ही भावना वाढत जाते.
३) ओफिसात विचारत होतो तेव्हा सगळे गोळा होतात. एकाने विचारले " माझा *** भेटला ना स्टेशनात? येतोय ना?" मग संचालिकेने खुण केल्यावर " हो हो तो निघालाच आहे म्हटल्यावर कोण आनंद झाला.
४) अमच्या नातेवाइकास भेटायला गेल्यावर सर्वांचीच विचारपूस करणे महत्त्वाचं असायचं.
५) दु:खी माणसास अध्यात्म मनोरंजन/सांत्वन करू शकत नाही.

मला असं म्हणायचय की ज्यांना अध्यात्माची खरंच आवड व गरज असेल फक्त त्यांच्यासाठीच थोडेसे समाधान इतकंच!बस्‍ा! पण चर्चा वाढत गेली.

हो. ज्यांना वाचायला त्रास होतो त्यांच्यासाठी ऐकायचे माध्यम सिडी लावता येतील. आणि प्रत्येकाच्या जागेपाशी हेडफोन सॅाकेट्स ठेवायची. कल्पना चांगली आहे.