तुझी आय लय मारती

Submitted by चैतन्य रासकर on 23 January, 2018 - 08:54

काथ्याकूट: नकळत चघळत (भाग सहा) यामधील स्वलिखित, काल्पनिक विशेष गाणं

तू घे करून आरती,
मग करू पार्टी,
नको सांगू आईला,
तुझी आय लय मारती (चार वेळा)

तू पटकन ये खालती
मी आणलीय गाडी मारुती
सांग तुझ्या ताईला
तू आता पहाटेच येती

साडी कशाला घालती?
गजरा कशाला माळती?
नको बोलवू भावाला
देऊ त्याला कल्टी

आपण घ्यायची नाही जास्ती
करायची नाही उलटी
लास्ट टाईमला लय झालती
तुला घ्यायला ऍम्ब्युलन्स आलती

आता उशीर का करती?
माझी काय गलती?
मारू नको पलटी
करू नको गिल्टी

कारण ?

तुझी आय लय मारती (चार वेळा)

- © अर्रर्रर्र
(माझं रॅपर नाव)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ अ।नंद
अरे मलाच आता या गाण्याचं दुसरं व्हर्जन लिहायचं आहे>>>
ओके चैतन्य.
मी ते आपल्याला विचारलं त्यानंतर लगेच लिहून काढलं होतं. आपल्या त्या ओळीनं मनावर इतकं गारूड केलंय की मला सुचलेल्या ओळी मी लगेच उत्स्फूर्त पणे लिहून काढल्या. आपण हो बोललात तरच पोस्टेल अन्यथा नाही.
श्रेय आपलंच, गैरसमज नसावा. Happy

Pages