तुझी आय लय मारती

Submitted by चैतन्य रासकर on 23 January, 2018 - 08:54

काथ्याकूट: नकळत चघळत (भाग सहा) यामधील स्वलिखित, काल्पनिक विशेष गाणं

तू घे करून आरती,
मग करू पार्टी,
नको सांगू आईला,
तुझी आय लय मारती (चार वेळा)

तू पटकन ये खालती
मी आणलीय गाडी मारुती
सांग तुझ्या ताईला
तू आता पहाटेच येती

साडी कशाला घालती?
गजरा कशाला माळती?
नको बोलवू भावाला
देऊ त्याला कल्टी

आपण घ्यायची नाही जास्ती
करायची नाही उलटी
लास्ट टाईमला लय झालती
तुला घ्यायला ऍम्ब्युलन्स आलती

आता उशीर का करती?
माझी काय गलती?
मारू नको पलटी
करू नको गिल्टी

कारण ?

तुझी आय लय मारती (चार वेळा)

- © अर्रर्रर्र
(माझं रॅपर नाव)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त Lol

तुझी आय लय मारती
लावून विविधभारती
>>> माझ्या मुलाचा एक मित्र आहे, त्याची आई विविधभारती लावून मारायची, शेजारी आवाज जावू नये व ते वाचवायला येवू नये म्हणून Lol

खल्लास....कल्ला गाणं आहे.
हे गाणं कोणीतरी अवधुत भाउ गुप्ते ना पाठवा प्लीज...भारी चाल देतील ते याला Wink

चैतन्य..माझ्या ८ वर्षाच्या भाचीला खुप म्हणजे खुपच आवडले हे गाणे
अगदी सकाळी शाळेत जाताना पण गुणगुणत गेली Rofl
रच्याकने खरच या गाण्यात शांताबाई सारखे पोटेंशियल आहे फेमस होण्याचे so प्लीज़ बघ कुठे पाठवून वगैरे

बाप रे, मला कधीच वाटलं नव्हतं की हे गाणं सगळ्यांना एवढं आवडेल, सगळ्यांच्या प्रतिक्रिया वाचून छान वाटलं.

@ अ।नंद
अरे मलाच आता या गाण्याचं दुसरं व्हर्जन लिहायचं आहे Happy
"माझी आय लय मारती" यावर पण भारी गाणं होऊ शकतं

@विनिता.झक्कास
त्याची आई विविधभारती लावून मारायची Lol

@आदू
अगदी सकाळी शाळेत जाताना पण गुणगुणत गेली Lol
आता आमच्या इथल्या मुलांना वाचायला देतो Lol

माबोचा परिवार बराच मोठा आहे, हे गाणं कोणा सुज्ञ माणसापर्यंत नक्कीच पोहचेल

रच्याकने खरच या गाण्यात शांताबाई सारखे पोटेंशियल आहे फेमस होण्याचे so प्लीज़ बघ कुठे पाठवून वगैरे > ++१

भारीये..
एक नंबर! ह्याला 'चार बोटल व्होडका' ची चाल चांगली जुळतीये. +१
Happy

रच्याकने खरच या गाण्यात शांताबाई सारखे पोटेंशियल आहे फेमस होण्याचे so प्लीज़ बघ कुठे पाठवून वगैरे >>>> + १००००
सोनु च्या भरवश्यासारखी वेगवेगळी वर्जन्स पण निघतिल .

भारीच.. Lol
कथा सोबत गाणंही लिहिता तुम्ही.. तेही मजेशीर.. व्वा Happy

Pages