भारतीय आणि परदेशी शाळेचे नियम

मदत हवी आहे, भारतीय आणि परदेशी शाळेचे नियम आणि होणारे परिणाम ?

Submitted by निर्झरा on 20 January, 2018 - 01:54

येत्या काही महिन्यांनी आम्ही फिनलँड येथे जाणार आहोत. आत्ता मुलगा ६ वीत शिकत आहे. तिकडच्या शाळेची चौकशी केली असता, त्यांच्या नियमाप्रमाणे त्याला तिकडे ५ वीत टाकावे लागेल. अशा वेळी पुन्हा एक वर्षा नंतर भारतात परत आल्यावर त्याला नक्की कुठल्या वर्गात अ‍ॅडमिशन मिळेल. आपल्या नियमा प्रमाणे वय बघता ८वीच्या वर्गात घालता येईल की परत ६वीत टाकावे लागेल ?
कोणाला असा अनुभव असल्यास अथवा माहीती असल्यास सांगा.

Subscribe to RSS - भारतीय आणि परदेशी शाळेचे नियम