बायकोला बर्थडे गिफ्ट काय द्यावे?

Submitted by पाथफाईंडर on 16 January, 2018 - 12:39

मायबाप माबोकरांनो, पहीले वहीले लिखाण आहे. चुका मोठ्या मनाने पदरात/ओढणीत /स्टोलात/रूमालात (भगीनी वर्गासाठी ) आणि पोटात (बंधूवर्गासाठी) घालून घ्या.
तर झालेय असे. परवाच संक्रांत झाली अन त्या दिवसभर गोड बोलणारी बायको पुढचे दोन दिवसही गोडच बोलतेय. मी उगाचच जाऊन चेक करून आलो की राणीसरकारांच्या मधुमेहाच्या गोळ्या चुकून संपल्या तर नाहीत. पण भानगड काही समजेना.
काय सांगू, डोळ्याला डोळा लागत नव्हता , डोक्यात एकच विचार के ये माजरा क्या है? अखेर ट्युब पेटली की हे सर्व फक्त आणि फक्त येत्या महीन्यात येणाऱ्या तिच्या वाढदिवसामुळे आहे. (सुज्ञास अधिक न सांगणे लागो.)

फेब्रुवारी हा फार घातक महीना असतो हो. HR वाले प्रुफ देऊनही भलामोठा TDS कापून पगार देतात. अन दरवर्षी प्रमाणे बायकोचा वाढदिवस मग लेकीचा वाढदिवस अन पाठोपाठ १४ फेब्रुवारी येतो. दोघींनाही बर्थडेप्रमाणे व्हॅलेंटाइन गिफ्टही हवे असते अन तेही सरप्राईज?

आता तुम्हीच सुचवा

(ताजे )ताक: @ वेमा, असा धागा न सापडल्याने नवीन धागा काढला आहे. धाग्यात काही त्रुटी असल्यास कृपया मार्गदर्शन करावे.

Group content visibility: 
Use group defaults

येणार्‍या वाढदिवसाला १ आरडी काढा १००० ची पुढच्या ते सर्व तुझे सांगुन द्या ! १२०००/- व्याज तुम्ही कापुन घ्या. काहीही कर म्हणा Proud

१. साडी किंवा पंजाबी ड्रेस: कॉटन शक्यतो नको, कारण मेंटेनन्स साठी कठीण (म्हणे), त्यापेक्षा सिल्क बरे (म्हणे)
२. उंची परफ्युम: ब्रँडेड पाहिजे
3. मेकअप हॅम्पर: नुसती एखादी लिपस्टिक किंवा नेलपॉलिश चालणार नाही.
४. स्पा गिफ्ट कार्ड
५. फोन
६. नवीन पर्स
७. नवीन शूज किंवा चपला: शूज रोजच्या वापराला चांगले आणि ब्रँडेड हवेत. चपला दिसायला चांगल्या (नक्षीदार, डिझायनर वगैरे) हव्यात, जास्त टिकल्या नाहीत तरी चालेल.
८. चांदीच्या नक्षी असणाऱ्या अंगठ्या: साधारण ₹ ५००-६०० प्रत्येकी. लेकीसाठी ठीक आहे, बायको फसणार नाही.
९. एखादा नक्षीदार दागिना: (अगं, खास तुझ्यासाठी ओरिसा/वेस्ट बंगालमधून मागवला मित्राकडून, हे सांगायला विसरू नका. बोनस गुण मिळण्याची शक्यता आहे. जास्त चौकशी झाली तर मित्राची ट्रान्स्फर परदेशात झाली ते पण सांगायला विसरू नका).
१०. हातात घालायला घड्याळ किंवा कडे: हल्ली कुणी रिस्टवॉच वापरत नाही म्हणून हे नक्षीचे कडे आणले, सांगायला विसरू नका.
११. वेगवेगळे फोटो एकत्र करून त्याचे छानसे कॉफीटेबलवर ठेवायचे पुस्तक बनवता येते. पण आता कमी वेळात मिळेल का? माहीत नाही, पुढच्या वर्षी उपयोगी पडेल.
१२. वाचनाची आवड असेल तर १-२ पुस्तके (वेटलॉस करण्याबद्दलचे पुस्तक अजिबात आणू नका).
१३. Rayban sunglasses for women (Amazon वरून)
१४. Klipsch headphones (Amazon वरून)

वि.सु.१: गिफ्टचा फोटो लगेच फेसबुकवर टाकता आला पाहिजे ही किमान अट आहे.
वि.सु.२: चॉकलेट, केक, फुले (शक्यतो गुलाब, तो पण लालच रंगाचा), हॉटेल, सिनेमा, आईस्क्रीमचा खर्च बजेटमधे धरावा. कुठलीही गिफ्ट दिली तरी तो करावा लागेलच.
वि.सु.२.१: मिक्स अँड मॅच: चॉकलेट आणले तर केक नको, हॉटेलमध्ये गेलात तर सिनेमा नको वगैरे. बजेट सांभाळणे गरजेचे.
वि.सु.२.२: कॅशबॅक देणारे क्रेडिट कार्ड खरेदीसाठी वापरा. त्या कॅशबॅकमधून तुम्हाला किमान १ कप चहा किंवा शीतपेय पिता येईल.
वि.सु.३: वरील कुठलीही गिफ्ट दिल्यावर, डाव अंगावर उलटला तर मंडळ जबाबदार नाही. Happy

उबो यांच्या आयडिया सेन्सिबल आहेत.शिवाय यात बायको आणि आपण बरेच छान दिसत असलेला बॉटल नाईट लॅम्प वगैरे पण आता येईल.तुम्ही घाण दिसलात तरी चालेल, बायकोचा फोटोत तिच्या मते बेस्ट लूक आणि वजन असलं पाहिजे.

बीचवर टेबल, स्वतः डेकोरेशन, पांढरा/लाल रेशमी शामियाना.(उडून मेणबत्त्याना लागणार नाही असा नीट बांधलेला).
मस्त सुंदर वारा.आणि तुमच्या हातात बदामाचा फुगा किंवा अंगठी.आणि एका गुडघ्यावर बसून म्हणा, " लग्नाला इतकी वर्षे(इथे योग्य तो आकडा) झाली, आणि अजूनही भूतकाळात मागे जाऊन दुसऱयांदा लग्नाचा निर्णय घ्यायचा असेल तर डोळ्यासमोर फक्त तू आहेस.विल यु मॅरी मी?"
(हे सगळं माझ्या नवऱ्याला सांगितलं तर तो हुरर म्हणेल.☺️☺️☺️☺️
पण ज्याला करता येत असेल त्याने नक्की करावं.अगदी मालदीव किंवा सेशल्स चा बीच पाहिजे असं नाही.कोकण किंवा इतर पॉप्युलर नसलेला बीच पण चालेल.नशिबाने साथ दिली तर तुमच्या बाजूला हजार सेल्फी घेणारी जोडपी नसतील.मुश्किल है पर मुमकीन है.)

5000 चं अमेझॉन गिफ्ट कार्ड द्या.चांगलं क्रेडिट कार्ड सारखं दिसणारं मिळतं त्यावर कोड असतो.तिला ठरवू दे…टप्प्यात वापरायचं का एकदम.

Submitted by mi_anu on 19 January, 2019 - 07:08>>> हे मस्तेय.

सस्मित तुमची वाढदिवस साजरा करायची पद्धत आवडली.
बहुतांशी गृहिणींना वायफळ खर्च आवडत नाही. सगळे कसे मोजून मापून करतात.

सध्या डिझायनर गाऊन ची फॅशन आहे, जर त्यांना आवड असेल तर ते देऊ शकता किंवा एखादे ब्रँडेड ट्रेंडी वॉच देऊ शकता.
अन शेवटी त्यांचे आवडते फूड ऑर्डर करा किंवा रेस्टॉरंट मध्ये जाऊ शकता.

बाकी मला तुमच्या बायकोचे खूप कौतुक वाटते, तुम्हाला त्यांचा वाढदिवस विसरुच देत नाहीत☺️

माझ्या नवऱ्याला हे वाचायला द्यायला हवं. किमान वाढदिवस लक्षात ठेवेल मोबाईलमध्ये reminder लावून. मला काय एक कॅडबरी पण चालेल. फार अपेक्षा नाहीत Lol

मी फार गुणी बायको आहे Wink .

अहो त्याचा मोबाईल घ्या आणि तुम्हीच लावा रिमाईंदर,
आणि तिमाईंदर सुद्धा " time to visit PNG" " trf 30,000/ to wife's account" वगैरे अशी लावा.
बझर वाजेल तेव्हा त्याला आठवत बसु दे त्याने कधी लावला म्हणून.

एक जुना मुरलेला अस्सल नवरा अश्या मेसेज बद्दल आपण कधी लावला म्हणून न गोंधळता "फोन मध्ये व्हायरस किंवा मालवेअर आहे " म्हणून पयले फोन फॉरमॅट करेल.
(मुरलेली बायकोही हेच करेल.आयपॅड चं कुठलंसं व्हॉइस टू टेक्स्ट सॉफ्टवेअर टेस्ट करायला नवर्याचा 'यु आर माय वर्ल्ड' वगैरे इमेल आला तेव्हा 'डोक्यावर पडलास काय' असा रिप्लाय केल्याचा आठवतोय. ☺️☺️☺️)

Submitted by mi_anu on 20 January, 2019 - 12:37
>>>>
वो अनु जी कशाला गरिबाची थट्टा करून राहील्या.
बायको वाचतेय हे सगळे प्रतिसाद. फुल तडी पडलिये मला.

उबो आणि अनु ह्यान्चे प्रतिसाद भारी आहेत :), आधीचे पान वाचले नाही अजून Happy
मी तर स्वतहच गिफ्ट काय पाहिजे ते सान्गुन टाकते, कारन सर्प्राइझ च्या नादात काहीही (न आवडणारे) मिळू शकते

काय मग पाफा, यावेळी CCM कि तिबेटियन मार्केट?
दोन्ही जवळ आहेत म्हणून विचारलं!
Wink

नवीन Submitted by अज्ञातवासी on 22 January, 2019 - 13:49
>>>>
मेन रोड Wink

धागा वर काढतोय.
या वेळचे बजेट साधारण ३ हजार.
भगिनी मंडळ मार्केट मे कुछ नया है तो बतलाना.

पान 1 पासून परत वाचायला सुरुवात करा.giftmdhe नवीन काय येणार?
रच्याक ने यावेळचे बजेट कमी झाले,असे कसं चालेल?

तुमच्या बायकोला गिफ्ट काय द्यायचे हे तुम्ही लोकांना काय विचारताय? बायको तुमची.. त्यांची आवडनिवड तुम्हाला माहित ना.

बायको तुमची.. त्यांची आवडनिवड तुम्हाला माहित ना.
>>>>
सर्वसाधारण बायकांची एक आवडनिवड असतेच की... ज्से की फुले, चॉकलेट, पिंक कलर, ईअर रिंगस नेलपॉलिश, दोघांचे फोटो फ्रेम वगैरे वहगैरे

३००० मध्ये अश्या छोट्या छोट्या वस्तू घ्या पाफा
आणि सरळसोट हातात न ठेवता ट्रेजर हण्ट खेळत एकेक वस्तू तिच्या पदरात पडू द्या..
मागच्या वर्षी मी आणि माझ्या बायकोने मेहुण्यांच्या वाढदिवसाला असे केले होते. ते हिट झाले म्हणून मुलीच्या पाचव्या वाढदिवसाच्या आदल्या रात्रीही तिला अश्याच एकेक करत पाच गिफ्टस दिल्या. तिच्या शोधाशोधीचा विडिओही काढला. धमाल अनुभव होता Happy

@ देवकी, बाहेरही आणि खिशाला मंदी जाणवते आहे. म्हणून बजेट कमी.
@च्रप्स इथे कायमच भन्नाट आयडिया मिळतात. गेली दोन वर्ष बघतोय, एक से एक सजेशन्स येतात. आपल्या बजेट मधे जे यथायोग्य जास्तीत जास्त बसेल ते करायचे.
@ऋ, ट्रेजर हंट गेली २ दोन वर्ष मुलीबरोबर चालू आहे. प्रत्येक वर्षी वयाइतक्या वस्तू. तीची या वर्षीची ९ वस्तूची लिस्ट आणि लपवायच्या जागा सबमीट करून झाली आहे. Rofl

जुलै महिन्यात वाढदिवस येतो तेव्हा अलुबुखार मिळतात. त्याचा सॉस करुन देतो ताजा.
जानेवारीसाठी स्ट्रॉबेरी सॉस करा.
स्वस्त आणि दरवर्षी रिपीट केला तरी नवीन आणि ताजाच. उगाच वस्तूंची भर कशाला करायची घरात?
-------
वन -डे ट्रिप कुठेतरी जवळच्या ठिकाणी. मुंबईकरांसाठी माथेरान /केळवा बीच .

कृपया गमतीत घेणे,पण वाचून हसू आवरले नाही म्हणून इथे दिलेय
src="/files/u61220/IMG_20200126_150333.jpg" width="689" height="550" alt="IMG_20200126_150333.jpg" />

कृपया गमतीत घेणे,वाचून हसू आवरले नाही म्हणून शेअर केले
alt="IMG_20200126_150333.jpg" />IMG_20200126_150333.jpg

आदू Lol Lol

आदु>>> Lol

एवढे कुठे आमचे नशीब>>> Rofl

हा धागा सौंच्या नजरेस पडेल असं काही करा. तुम्ही एवढे प्रयत्न करत आहात गिफ्टसाठी हे पाहूनच कृतकृत्य होतील त्या. बजेटचाही प्रश्न राहणार नाही. Wink

पाफा, सौ ना अर्बनिक.कॉम आणि स्टोकबायलव्ह.कॉम ची लिंक द्या(फेसबुकवर अशीच जाहिरात पाहिली, ट्राय करून बघ म्हणून द्या)
एकदम खतरा वन पीस आहेत.
Urbanic.com
Stalkbuylove.com

आदू ...
आई ग्ग Lol

बाई दवे, ते विष आणि दंश हे शब्द एक संकेत समजा...

बायकोला बड्डे "विश" करा आणि तिच्यासोबत "डान्स" करा Happy

अखेर तडजोड झाली.

१. मिनी सारेगमपा कारवान रू १८०० अन
२.एक वन पीस रू १३५०. धन्स टू अनु.

अनु यांनी दिलेल्या लिंकवरून तसाच वन पीस जवळच्या शोरूम मधून बायकोने शोधून काढला. आणि ऑनलाईन शाॅपिंग न करता वट्ट १२० रूपये वाचवल्याचे बोलून दाखवत आहे. (मलाही पैसे वाचल्याचे समाधान, ऐकून घेतोय मी बापडा) Wink
प्रतिसाद देणार्यांचे धन्यवाद.

मी पुन्हा येईन..
मी पुन्हा येईन...
मी पुन्हा येईन......
पुढच्या वर्षी Happy

वा मस्त पाफा..
नेक्स्ट टाईम मेहुण्यांसाठी मला हा बायकोचा धागाही चाळता येईल आता. सेव्ह करून ठेवतो !

खरं एक डेटा बेस करायला हवा. त्यात वयानुसार कॉलम आणि बजेट्नुसार रो असलेला स्प्रेड्शीट .
सगळ्यानाच ऑलटाइम हँडी असा !

क्रिएटीव्हिटीला स्प्रेडशीटमध्ये बंदिस्त नाही करू शकत कोणी...
बाकी आयड्या छान आहे.

Pages