पायलट (वैमानिक) होण्यासाठी काय करावे?

Submitted by विक्षिप्त_मुलगा on 12 January, 2018 - 01:29

माझा मावसभाऊ सध्या ११ वी (विज्ञान) शाखेत शिकतो आहे. पायलट होण्याची त्याची इच्छा आहे. तरी पायलट (वैमानिक) या क्षेत्रात करिअर करण्याविषयी खालील माहिती हवी आहे.
१. पायलट होण्यासाठी आवश्यक असणारा कोर्स (CPL i.e. Commercial Pilot Licence) करण्यासाठी योग्य कॉलेज वा इन्स्टिट्यूट कोणती?
२. या कोर्सला प्रवेश मिळवण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आवश्यक आहे? (आम्ही open category मध्ये येतो.)
३.. या कोर्सला प्रवेश मिळवण्यासाठी शारीरिक क्षमता काय आवश्यक आहे? (वजन, उंची, दृष्टीक्षमता इ.) (चष्मा असणाऱ्यांना प्रवेश मिळू शकतो का?)
४. या कोर्सचा कालावधी किती आहे? कोर्सला प्रवेश घेतल्यापासून कमीतकमी किती कालावधीत पायलटची नोकरी मिळू शकते?
५. संपूर्ण कोर्स करण्यासाठी किती खर्च येतो? व त्यासाठी शैक्षणिक कर्ज (educational loan) मिळू शकते का?

मायबोलीवर कुणी वैमानिक या क्षेत्रात कार्यरत असल्यास त्यांनी पुढील बाबींवरही प्रकाश टाकावा.
१. पायलट म्हणून एखाद्या आस्थापनात (Jet Airways, Indigo, Spicejet etc.) नोकरी करण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची गरज भासते? (उदा. वैमानिकाचा परवाना, पासपोर्ट इ.)
२. साधारणपणे नवीनच रुजू झालेल्या पायलटचा मासिक पगार किती असतो?
३. पुरेशा साप्ताहिक सुट्ट्या असतात का? कामाचे तास निश्चित असतात का? (रेल्वेच्या मोटरमनच्या बाबतीत या गोष्टींची बोंब आहे, म्हणून विचारतो आहे.)

Bombay Flying Club बाबत काही अनुभव आहेत का? असल्यास कृपया शेअर करावेत. (चांगले/वाईट दोन्ही प्रकारचे)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वीट टॉकर या आयडीने यावर मायबोलीवर लेख लिहीला होता. त्यांच्या मुलीने पायलट झाल्यावरचे पहिले उड्डाण त्यांच्याबरोबर केले होते, त्यावर लेख लिहील्याचे आठवते.
त्यांचा लेख शोधुन त्यांच्याशी संपर्क साधा, ते तुम्हाला मदत करु शकतील.

on lighter note,
.....
3१ dec ला या आमच्या कडे, हवे तितके पायलतस दिसतील Happy

ही माहिती वाचा. थोडी जुनी माहिती असेल कदाचित, पण नक्कीच उपयुक्त आहे.

ओपन कॅटेगरीचे आहात असे लिहिले आहे, म्हणून सुचवतो की इंडियन एअर फोर्स मध्ये पण प्रयत्न करू शकता. माझ्या माहितीप्रमाणे सैन्यात अजूनतरी आरक्षण आले नाही. सर्वात उत्तम म्हणजे हे ट्रेनिंग परदेशात मिळेल का आणी नंतर तिथेच काही संधी आहेत का, याची पण चौकशी करा.

सर्व प्रतिसादांबद्दल धन्यवाद!
@ राहुल१२३, आपण पाठविलेल्या लिंक वरील लेख वाचला, परंतु त्यांच्या मुलीने ऑस्ट्रेलिया मध्ये पायलटचे शिक्षण घेतले आहे, पण असो. त्यांच्याकडून काहीनाकाही माहिती नक्कीच मिळेल. बाकी अडीच वर्षांपूर्वी आलेला धागा धागाकर्त्याच्या नावासकट लक्षात आहे, खरंच दाद दिली पाहिजे आपल्या स्मरणशक्तीला!
@ उपाशी बोका, इंडियन एअर फोर्स मध्ये जाण्यासाठी कठीण शारीरिक परीक्षा द्यावी लागत असणार. आमचे बंधुराज आहेत लिंबूटिंबू (limbutimbu या आयडीशी काहीही संबंध नाही!) ११ वीत असूनही दिसतो जेमतेम ७वी, ८वी चा! त्यामुळे हे कितपत झेपेल सांगता येत नाही!
@ सिम्बा, तुमचा सल्ला अंमलात आणण्यासाठी मला हा धागा काही दिवस अगोदर काढायला हवा होता! आता उशीर झाला! रच्याक, 'तसा' पायलट नाही करायचा त्याला!!!

पायलट हे मला ऐकूनच भारी वाटते..
म्हणजे एखाद्याला नेमके कसे आणि केव्हा वाटत असेल की मला पायलट व्हायचे आहे? नक्की कशी उपजते ती आवड वा नेमके कसे समजते की हे प्रोफेशन आपल्यासाठी आहे? मला हे जाणून घ्यायची उत्सुकता आहे. भावाला नक्की विचारा.
बाकी हे प्रोफेशन मला डॉक्टरांच्या तोडीचे वाटते. कारण यातही कित्येक प्रवासी आपल्या जीवाला पायलटच्या भरवश्यावर सोडून विमानात चढतात. शुभेच्छा तुमच्या भावाला.

तुम्ही खूप पूर्वग्रह करून ठेवलेत (कठीण परीक्षा, शारीरिक क्षमता वगैरे) व एखाद्या क्षेत्रात जायच्याआधीच अपेक्षा करून ठेवल्यात (पगार, सुट्ट्या)…

तुमच्या भावाला पायलट बनायचेय तर त्याने ते एकमेव लक्ष्य समोर ठेऊन प्रयत्न करायला हवेत. काहीही झाले तरी मी पायलट होणारच ही जिद्द असेल तर तो होणारच. तसे न करता सुट्ट्या किती, पगार किती, झेपेल ना, जमेल ना, नोकरी मिळेल ना ही काळजी.

अमुक शिक्षण घेतले म्हणजे अमुक इथे नोकरी, अमुक इतका पगार, अमुक इतक्या सुट्ट्या ह्याची हमी आता कोणीही देऊ शकत नाही. आमच्या इथे mechanical engg झालेली मुलेही इतर कुठेही जॉब मिळाला नाही पण आईटीत जॉब मिळाला म्हणून सॉफ्टवेअरमध्ये खर्डेघाशी करताहेत.

@ भरत. , लिंक दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!
(विशेषतः मांसाहाराच्या धाग्यावर आपल्यात एवढे मतभेद होऊनसुद्धा आपण मनात काहीही न ठेवता मला मदत केलीत हा खरोखर आपल्या मनाचा मोठेपणा आहे!!!)

विमान लागेल. म्हणजे कमर्शिअल पायल ट का सुखोई आर्मी वाले का हेलिकॉप्टर त्या वरून ट्रेनिन्ग ठरवता येइल
तिन्ही कडे वेगवेगळा माइंडसेट लागतो. सर्वाकडे २० २० व्हिजन लागते. कमर्शिअल पायलट ट्रेनिंग व सर्टिफिकेट देणार रे स्कूल्स असतात व जॉब ची कधी ही कमी नाही. बाकी फोर्सेस मध्ये किंवा कमर्शिअल हेलिकॉप्टर . एव्ढ्यासाठी लिहिले की ट्रेनिंग नुसार पूर्ण जीवनाचाच मार्ग ठरेल. म्हणून त्याला हा विचार करू द्या.

विक्षिप्त_मुलगा, कमाल आहे!
जोवर कोणी पर्सनल होत नाही, तोवर मलाही काहीही पर्सनली घेण्याचं कारण नाही.
मांसाहाराच्या धाग्यावर तुमच्याशी मतभेद झाले होते, हे माझ्या लक्षातही नाही. लक्षात राहिले असते, तरीही ही माहिती दिलीच असती.