लूइझियाना स्टाइल स्पाइसी रेड बीन्स

Submitted by मेधा on 9 January, 2018 - 15:15
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

१ पॅकेट Andouille Sausage ( मी D'Artagnan या ब्रॅडचे वापरले आहे. १२ आउंसचे पॅकेट मिळते इथे)
२ फुग्या मिरच्या अर्धा इंचाचे तुकडे
२-३ सेलेरी चे दांडे बारीक चिरुन
१ मध्यम गाजर बारीक चिरुन
१ मध्यम कांदा बारीक चिरुन
२-३ पाकळ्या लसूण अगदी बारीक चिरून
२ कप राजमा रात्र भर भिजवून
केजन स्पाइस
पार्सली, सेज, थाइम फ्रेश किंवा सुकवलेली पाने
पातीचा कांदा एक बारकी जुडी

तेल, मीठ

क्रमवार पाककृती: 

सॉसेज लेंथ वाईज अर्धे चिरून मग त्याच्या १/४ इंच चकत्या करून घ्या

जाड स्किलेट मधे थोड्या तेलावर सॉसेज ब्राउन करुन घ्या.
सॉसेज ब्राउन झाले की ते बाजूला काढून कांदा आणि लसूण घालून २-३ मिनिटे परता .
मग सेलेरी, मिरच्या आणि गाजराचे तुकडे घालून परता २-३ मिनिटे.

आता सॉसेज चे तुकडे, परतलेले कांदा मिरची गाजर सेलेरी मिश्रण, भिजवून निथळलेले बीन्स, मीठ, एक टेबलस्पून केजन स्पाइस, पार्सली थाईम आणि सेज यांची पाने ( ताजी असल्यास एक टेबलस्पून भरुन. सुकी असल्यास साधारण एक टी स्पून ) आणि हे सर्व जेमतेम बुडेल एवढे पाणी हे इंस्टंट पॉट मधे घाला. झाकण लावून , व्हेंट सीलिंग पोझिशन ला ठेवून बीन्स सेटिंग वर शिजवा.
वाढायच्या आधी ४-६ कांद्याची पात बारीक चिरुन घालून १-२ मिनिटे शिजू द्या.
साध्या प्रेशर कूकर मधे राजमा जसा शिजवता तसेच शिजवता येईल.

व्हाइट राइस, ब्राउन राइस किंवा किन्वा या सोबत सर्व्ह करा

वाढणी/प्रमाण: 
४-६ जणांसाठी
अधिक टिपा: 

मुलं डब्यात आवडीने नेतात. एकाच डिश मधे प्रोटीन आणि भरपूर भाज्या म्हणून आई बाबा खुश .
Andouille Sausage आणि केजन मसाला यांची विशिष्ट चव असते. प* , ब* , किंवा इतर कुठले मसाले वापरुन ती चव येणार नाही.
काही दुकानात चिकन बेस्ड Andouille Sausage मिळतात. ते पण चांगले लागतात.
केजन मसाला मी Penzeys ब्रँडचा वापरते .
पार्सली , थाइम, सेज घरच्या बागेतले - ताजे किंवा सुकवलेले वापरते.

माहितीचा स्रोत: 
पारंपारिक. पूर्वी स्लो कूकर मधे करत असे. आता इंस्टंट पॉट ची सवय झाल्यापासून जास्त वेळा केला जातो हा प्रकार
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा! छान वाटते आहे रेसिपी.
मी अजून IP किंवा स्लो कूकर घेतलेला नाही पण रेग्युलर पॉट मध्ये तसंच ट्रॅडिशनल अँड्युइ सॉसेज घरी आणलं जात नाही तेव्हा चिकन चं सॉसेज वापरून करून बघायला हवं. डब्याकरता आयडिया हव्याच असतात.

Penzeys चे मसाले छान आहेत. महाग आहेत फार पण. त्यांचा बोल्ड टाको सिझनींग छान आहे.
बीन्स सॉसेज न घालता करून बघेन.

दोन आठवड्यांपूर्वीच अँड्युइ सॉसेज वापरून जंबालया करून झाले आहे आणि खुप आवडलेही आहे त्यामुळे आता ही पाकृ पण करून बघायला हवी.