आजकालच्या मुलांना मॅनर्सचा ओवरडोस पाजला जातोय का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 January, 2018 - 12:55

कालचा किस्सा - बसस्टॉपवर गर्लफ्रेंडची वाट बघत उभा होतो. शेजारी एक अख्खे मराठी कुटुंब उभे होते. बसची वाट बघत होते की शेजारच्या गार्डनमध्ये खेळून दमून नुसते विसाव्यासाठी तिथे थांबले होते कल्पना नाही. एक चार वर्षांचा मुलगा, त्याचे आई-बाबा आणि आज्जी होती. मुलगा बसस्टॉपभोवती नुसता पळत होता. मग दमला. तहान लागली. आईकडे पाणी मागितले. तसे त्याच्या आजीने तत्परतेने त्याला पाणी दिले. दमलेला मुलगा ती छोटीशी बाटली तोंडाला लावून घटाघटा पाणी प्यायला. बाटली आजीला परत करून पुन्हा मस्ती करायला पळणार तोच त्याची आई म्हणाली, "रोहू, आजीला थॅन्क्स म्हणालास का?" .... मी शॉकड् ! आज्जीला कसले थॅंन्क्स..??

आजी ओशाळली. रोहूने भाव खाल्ला. आई चिडली. आजी आणखी ओशाळली. रोहूला राहू दे म्हणाली. आई आज्जीला म्हणाली, "नाही हा आई, या वयातच सवयी लागायला हव्यात" रोहूच्या बाबांनी यावर नंदीसारखी मान हलवली. मग रोहू औपचारीकता दाखवत थॅंन्क्यू आज्जी बोलत पसार झाला.

चार दिवसांपूर्वीचा किस्सा - त्या दिवशी आम्ही बागेत बाकड्यावर बसून गप्पा मारत होतो. शेजारी दोन कुटुंबांची भेट झाली. म्हणजे दोन आया आणि त्यांची गार्डनमध्ये खेळायला आलेली मुले. वयोगट हाच. चार ते पाच. त्या आयांनी आधी मुलांना प्रथेप्रमाणे एकमेकांशी शेकहॅण्ड करायला लावले. त्यानंतर ती दोन्ही मुले अनुक्रमे जे वेफर्स आणि बिस्कीट खात होती ते त्यांना एकमेकांशी शेअर करायला सांगण्यात आले. बिस्कीट खाण्यार्‍या मुलाने लाडाने एक बिस्कीट समोरच्याला ऑफर केले. पण वेफर खाणार्‍या मुलाने ईच्छा असूनही ते घेतले नाही कारण त्याबदल्यात त्याला आपली वेफर्स शेअर करायची नव्हती. झाले, त्या वेफर्सवाल्या मुलाच्या आईला ईतके लाजिरवाणे वाटले की तिचे दुसर्‍या बाईला सॉरीही म्हणून झाले. आणि मग ती बाई दूर जाताच आपल्या मुलाला रागावूनही झाले. मुलगा आधी चिडला, मग रडला, आणि मग खेळायला निघून गेला. झाल्या घटनेनंतर त्या बाईला बहुतेक आमच्यासमोर थांबणेही लाजिरवाणे वाटले असावे, त्यामुळे ती सुद्धा दोन बाक सोडून दुसरीकडे बसायला गेली.

तर मुलांनी आपला खाऊ आणि खेळणी एकमेकांशी शेअर करावेत हे संस्कार चांगलेच आहेत. पण काही बाबतीत त्यांना ते जमेलच असे नसते. शेवटी लहान मुलेच ती, कुठे जीव अडकेल त्यांनाच माहीत. पण आपल्या मुलांना खाऊ शेअर करायचे साधे मॅनर्स नाहीत याचा एवढा प्रेस्टीज ईश्यू करायची खरंच गरज असते का?

माझी या दोन्ही किस्स्यांमध्ये तशी तक्रार नाही. कारण पॅरेंटींग हा एका मर्यादेपर्यंत ज्याचा त्याचा पर्सनल विषय आहे. आणि हे वरचे दोन्ही किस्से कदाचित त्या मर्यादेतच येत असावेत. त्यामुळे हे चूक आहे वा मुलांशी असे वागू नये वगैरे मला सांगायचे नाहीये, माझा तो अधिकारही नसावा. फक्त मला पर्सनली हे फारसे पटत नाही ईतकेच. ईतरांची मते जाणून घ्यायला आवडतील. अनुभवाचे बोल, पुढे भविष्यात कामाला येतील Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अपेक्षा छोट्या असो वा मोठ्या, पूर्ण झाल्या नाहीत की खरा प्रश्न येतो. Happy
>>>

वावे छान वाक्य.
आणि जसे त्या अपेक्षा लादायला सुरुवात होते तसे प्रॉब्लेम वाढत जातात.

या लेखात खूप जजिंग चाललं आहे असं वाटलं.
५ मिनीट बघून आईने मुलाला कसं वागवलं, आजी ओशाळली अशी कन्क्ल्युजन काढता येतात का?
>>>>>
आजी ओशाळली हे कन्क्लुजन नाही. तिचे त्यावेळचे भाव जे दिसून आले ते मांडलेत. चेहरयावरचे एक्स्प्रेशन सहज ओळखता येतात.
आणि ती ठराविक आई मुलाला कशी वागवते यावरही भाष्य केले नाही. तर त्यावेळचे वागणे जे होते ते लिहिलेय.
हे फक्त प्रसंगवर्णन आहे.

{हल्ली ऋन्मेष काहीतरी बोललेच पाहिजे , आपला मुद्दा रेटलाच पाहिजे म्हणून लिहितो....
त्याची पूर्वीची उत्स्फूर्तता आणि स्वतः वर जोक करायची वृत्ती हरवत चालली आहे.....असो...}

+४२ सिम्बा . तंतोतंत पटले. असो...

मध्येच उडी मारतोय
<कुटुंब संस्था नामक जो प्रचंड प्रभावी घटक भारतात आहे तो कैक देशात नाही। > हे खरंय का? कैक देश म्हणजे इथे पाश्चिमात्य संस्कृती म्हणायचं असावं. यांबद्दलचं माझं ज्ञान टीव्ही मालिका आणि लिटरेचर वाचून मिळालेलंच आहे. प्रत्यक्ष अनुभवलेले लोक अधिक सांगू शकतील. त्त्यांच्याकडे एकत्र कुटुंब नसतील, व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या आणि स्पेसच्या कल्पना वेगळ्या असतील. पण म्हणून कुटुंब, नाती या संकल्पनाच मोडीत काढल्यात का त्यांनी?

मॅनर्स लावण्याबद्दल थोडा वेगळा मुद्दा : उपचारासाठी थँक्यू आणि सॉरी म्हणण्यापेक्षा ते न म्हटलें परवडलं. There is no use saying it unless you feel it. आणि हे शिकवून येण्यातलं आहे का? की मॅनर्स म्हणजे फक्त असं झाल्यावर असं म्हणणं? इतकंच?

शेवटी मुलांना एखादी गोष्ट शिकवायची असेल, तर ती स्वतःही पाळायला हवी. संस्कार अनुकरणातून घडतात , हे पुस्तकी वाटणारं वाक्य लिहितोय.
(रिक्षावाले , बस कंडक्टर यांनाही थँक्यु म्हणायला मला आवडतं. अर्थात ते करताना eye contact साधला जाणं शक्य असतंच असं नाही. But I thank them.

मॅनर्स लावण्याबद्दल थोडा वेगळा मुद्दा : उपचारासाठी थँक्यू आणि सॉरी म्हणण्यापेक्षा ते न म्हटलें परवडलं. There is no use saying it unless you feel it. आणि हे शिकवून येण्यातलं आहे का? की मॅनर्स म्हणजे फक्त असं झाल्यावर असं म्हणणं? इतकंच?>>>>

लहान मुलांना कुठे तेव्हढे कळते.... लहान वयात जर मी त्याला माझा खाऊ देणार नाही, आणि त्याने देऊ केलेला पण खाणार नाही यामधे मी फक्त माझाच विचार करते.... मला दुसर्याबद्द्ल काहीच वाटत नाही. तर तेव्हा तुझ्या अश्या वागण्याने समोरचा दुखावला याची जाणिव मला दुसर्या कोणीतरी करुन द्यायला हवी किंवा तुला त्याने त्याचा खाऊ दिला तर तू ते appreciate करायला हवे हे सांगायला हवे येथे हेच काम आईने केले. तसेच ते व्यक्त करण्यासाठी thank you, sorry वापरले तर कुठे बिघडले.

There is no use saying it unless you feel it.>>>>आयुष्यात बरेचदा अशी वेळ येते कि आपली ईच्छा नसेल तरी माफी मागावी लागते, किंवा समोरच्याला वाईट वाटू नये म्हणून गोड बोलावे लागते. प्रत्येक वेळी माझेच खरे असे बोलता येऊ शकते पण त्यामुळे कोणतेही नाते जास्त काळ टिकत नाही किंवा त्यात आनंद राहत नाही.

अगदी साधी गोष्ट घेऊ......माझा कोणाला धक्का लागला तर मी sorry म्हणावे का? कि मी धक्का मारलाच नाही तर तो चुकुन लागला मग मी का सॉरी म्हणू असा भाव चेहर्‍यावर आणू.
की मॅनर्स म्हणजे फक्त असं झाल्यावर असं म्हणणं? इतकंच?>>> हो तसेच आहे ते. way of behaving toward others.

कारण समोरचा ते ग्रेसफुली स्विकारेल याची खात्री नसते. काय करणार, आपण मनुष्यप्राणी आहोत हा अहंकार जन्मजात आपल्या नसानसात भिनला आहे ना.>>>>> कसला अहंकार आणि कसले काय!!! माणसाला माणूस म्हणावे ना, उगा कुत्रा, नंदी म्हणायचे आणि ग्रेसफुली घ्यायला लावायचे Uhoh
बाकी रोहूच्या बाबांचे कौतुक करात होतास कि नाही ते सांगितलेच नाहीच. गोल गोल बोलायला छान जमते तुला Happy

लहान मुलांना कुठे तेव्हढे कळते.... या वयात मी त्याला माझा खाऊ देणार नाही, आणि त्याने देऊ केलेला पण खाणार नाही यामधे मी फक्त माझाच विचार करते. मला दुसर्याबद्द्ल काहीच वाटत नाही.
>>>नक्कीच प्रोग्रामिंग मध्ये गडबड असावी.

माणसाला माणूस म्हणावे ना, उगा कुत्रा, नंदी म्हणायचे आणि ग्रेसफुली घ्यायला लावायचे Uhoh
>>>>
नातवाला आज्जीला थॅन्क्यू बोलायला लावायचे आणि तिला हे ग्रेसफुली घ्यायला लावायचे Happy वर अग्ग आजी हेच मॅनर्स आहेत असे म्हणावेत Happy जर तिला हे सो कॉलड मॅनर्स नाही जमले तर तिला हे शिकण्याची गरज आहे असा निष्कर्श काढावा Happy
शेवटी कोणाला काय अचंबित करणारे वाटेल हे ज्याच्या त्याच्या विचारांवर आहे Happy

बाकी रोहूच्या बाबांचे कौतुक करात होतास कि नाही ते सांगितलेच नाहीच.
>>>
यात कौतुक किंवा टिका आलीच कुठे.
त्यांनी मान हलवून आर्ग्युमेंट न करता अनुमोदन दिले ईतकेच Happy

उपचारासाठी थँक्यू आणि सॉरी म्हणण्यापेक्षा ते न म्हटलें परवडलं. There is no use saying it unless you feel it. आणि हे शिकवून येण्यातलं आहे का? की मॅनर्स म्हणजे फक्त असं झाल्यावर असं म्हणणं? इतकंच?
>>>>
एक्झॅक्टली !
सविस्तर नंतर....

नातवाला आज्जीला थॅन्क्यू बोलायला लावायचे आणि तिला हे ग्रेसफुली घ्यायला लावायचे Happy वर अग्ग आजी हेच मॅनर्स आहेत असे म्हणावेत Happy जर तिला हे सो कॉलड मॅनर्स नाही जमले तर तिला हे शिकण्याची गरज आहे असा निष्कर्श काढावा Happy
शेवटी कोणाला काय अचंबित करणारे वाटेल हे ज्याच्या त्याच्या विचारांवर आहे Happy>>>> हे सगळे आपल्या डोक्यात ...प्रश्न नातवाला सवय लावायचा आहे कारण पुढे तो काय बोलतो काय नाही, मान हलवतो कि वाद घालतो, thank you बोलतो का?, sorry का बोलत नाही.. यावर सतत घरात, बागेत, ऑफिसमधे, बस मधे, बस्टॉपवर कोणी ना कोणी तरी नजर ठेऊन असेल Lol

यात कौतुक किंवा टिका आलीच कुठे.
त्यांनी मान हलवून आर्ग्युमेंट न करता अनुमोदन दिले ईतकेच Happy>>> हो ना.. मग नंदी कसा आला मधे Proud

लहान मुलांना कुठे तेव्हढे कळते.... >> लहान मुलांना खूप काही कळतं. शब्द कळले नाहीत, किंवा शब्दात त्यांना व्यक्त करता आलं नाही तरी त्यांना भावार्थ कळत असतो. मुलांची निरीक्षणशक्ती अचाट असते.
उपचारासाठी थँक्यू आणि सॉरी म्हणण्यापेक्षा ते न म्हटलें परवडलं. There is no use saying it unless you feel it. आणि हे शिकवून येण्यातलं आहे का? की मॅनर्स म्हणजे फक्त असं झाल्यावर असं म्हणणं? इतकंच? शेवटी मुलांना एखादी गोष्ट शिकवायची असेल, तर ती स्वतःही पाळायला हवी. संस्कार अनुकरणातून घडतात >> + १००

लहान मुलांना कुठे तेव्हढे कळते....
>>>>
मला पर्सनली असे वाटते की लहान मुलांना कुठे तेवढे कळते हा विचार शक्यतो नसावा. आणि हे मॅनर्सच नाही तर कुठलीही गोष्ट शिकवताना लागू ..
लहान मुलांच्या इमोशनला कधीही इग्नोर करू नये, त्यांच्या सेल्फ रिस्पेक्टला कधीही दुय्यम समजू नये, आणि त्यांच्या अकलेला कधीही कमी लेखू नये. मोस्ट क्रिएटीव्ह माईंडस असतात ते. त्यांच्याभोवताली कुठलीही चौकट जोपर्यंत आखली जात नाही तोपर्यंत त्यांचे सारेच विचार आउट ऑफ द बॉक्सच असतात. पण आपण सो कॉलड मोठी शहाणी माणसे त्यांना आपल्यासारखे ठोकळेबाज विचार करायला आणि वागायला शिकवतो.
पटकन वरचे वाक्य वाचून राहावले नाही म्हणून हे लिहिले ईतकेच.
पण लेट देम डिसाईड, कोणाला थॅंक्यू बोलायचे आणि कोणाला सॉरी बोलायचे. एखाद्या शेजारच्या अंकलने चॉकलेट दिल्यावर आपल्या पोराला ते चॉकलेट आवडत नसल्यास तो नाही थॅंक्यू बोलला तर काही आभाळ कोसळत नाही. कश्याला एवढ्यातच ते औपचारीकतेचे मुखवटे त्यांना चढवायला लावायचे.

लहान मुलांना कुठे तेव्हढे कळते.... त्यापुढे या वाक्याचा संदर्भ दिला आहे कि. लहान मुलांना दुसर्याला काय वाटेल ते नाही कळत पटकन. आपल्याला हवे ते मिळवायचे हे शिकवावे लागत नाही पण आपल्याकडे आहे ते दुसर्‍याबरोबर वाटून घेणे हे शिकवावे लागते.

पण लेट देम डिसाईड, कोणाला थॅंक्यू बोलायचे आणि कोणाला सॉरी बोलायचे. एखाद्या शेजारच्या अंकलने चॉकलेट दिल्यावर आपल्या पोराला ते चॉकलेट आवडत नसल्यास तो नाही थॅंक्यू बोलला तर काही आभाळ कोसळत नाही. कश्याला एवढ्यातच ते औपचारीकतेचे मुखवटे त्यांना चढवायला लावायचे.>>> नम्रपणे नकार द्यायला शिकविण्यास काय हरकत आहे.

मला नाही आवडत चॉकलेट... आणि थॅक्स पण मला चॉकलेट नको... दोन्हीत फरक आहेच ना.

नम्रपणे नकार द्यायला शिकविण्यास काय हरकत आहे.
मला नाही आवडत चॉकलेट... आणि थॅक्स पण मला चॉकलेट नको... दोन्हीत फरक आहेच ना.
>>>>

लहान मुलांना फारसे कळत नाही असे एकीकडे म्हणताना दुसरीकडे जे म्हणत आहात ते शिकवणे जास्त अवघड आहे Happy

ऋन्मेऽऽष, तुम्ही इतरांना ठोकळेबाज म्हणत आहात, पण जरा विचार करा. तुमचे हे तुम्हाला वाटणारे <कोट> आउट ऑफ द बॉक्स <कोट एन्ड्स> विचार आज प्रचंड टिपिकल आणि स्टिरिओटाईप वाटावे इतके ठोकळेबाज आहेत.
बाकी वानप्रस्थचा अर्थ विचारुन चर्चा घसरवणे आणि अशाच प्रकारचे वर केलेले अनेक उपाय हल्ली चालत नाहीत तुमचे. कोणी भिक घालत नाही हो.

सिरियस बोलायचंच असेल तर: मुलांना मॅनर्स जितके शिकवायचा प्रयत्न करा तितकंच समोरच्या माणसाच्या मर्यादांची जाणिव करुन द्यावी लागली तरी ती नीट शब्दांत कशी करुन द्यायची हे ही शिकवा. कुणी जवळ घेतलेलं/ शरिरावरुन हात फिरवलेला त्याला आवडला नाही तर ते स्पष्ट शब्दांत व्यक्त करायला शिकवा. आई/ बाबा सोडून इतर को_णा_ चं_ ही एक्स्पेप्शन नाही. आजीचा स्पर्ष मायेचा असेल तर तो त्याला समजेलच. आता यावरुन आई/ बाबा का वगळायचे असले तुमचे टिपिकल इन द बॉक्स प्रश्न विचारु नका.
स्वत:चा विचार करुन स्वतःचे प्रश्न स्वतः सोडवायला शिका.
सोनाली यांच्या बर्‍याच पोस्टना सहमती. "त्यांना कुठे तेव्हढं कळतं" चा विपर्यास चालू दे.

भरत, अर्थातच. बस मधून उतरताना कंडक्टर, ड्रायव्हरला धन्यवाद म्हणून उतरणे, आय कॉन्टॅक्ट शक्य नसेल तर रेअर व्हू मिरर मध्ये ड्रायव्हरला दिसेल असा हात वर करुन भावना पोहोचवणे हे ही आलेच. हे आता अमेरिअकन वाटेल कोणाला, पण जर ते चांगलं आहे तर नक्की करावं.
वर सोनाली म्हणाल्या तसं चुकुन धक्का लागला आणि तुमची चूक नाही हे तुम्हाला माहित असलं तरी सॉरी... ते अगदी नसेलच म्हणायचं तर किमान एस्क्युजमी तरी म्हणावंच.
हे शिकवून येणार्‍यातलं आहे का? हो आणि नाही. त्यांच्या जवळची माणसं करत असतील तर बघण्यातून एनफोर्स होईलच पण म्हणून फक्त क्रुतीतून येईल यावर विसंबुन राहाण्यातलं नाही असं वाटतं. सांगत रहावं कर म्हणून. केलं नाही तर आकांड तांडव किंवा ओरडून काही फायदा नसतो. पण शांत आवाजात सांगत रहावं. मुलांना काम सांगितलं आणि केलं की लगेच आपण म्हणावं.
पण याला नको म्हणू कारण हा जवळचा आहे आणि याला म्हण हे शिकवू नये.

लहान मुलांना कुठे तेव्हढे कळते.... >>>
मी एक वाक्य कोट केले तरीही, प्रतिसाद सर्व प्रश्नोत्तरांना मिळून आहे. sonalisl कृपया वैयक्तिक घेऊ नका.

मग त्यांना कळण्याएव्हढी समज येईपर्यंत आपण मोठ्यांनी थोडा धीर धरला तर? त्यांना त्यांच्या बालसुलभ / स्वभावसुलभ पद्धतीने व्यक्त होऊ दिले तर? त्यांच्या आवडीची गोष्ट/कृती केली तर त्यांचे डोळे चमकतात, ते हसत येऊन पायाला / गळ्याला मिठी मारतात. ते शाब्दिक धन्यवादापेक्षा खूप छान व्यक्त होणे असते.

मोठेपणीही मनापासून हसून, मान झुकवून, हातात हात घेऊन, डोळ्यात पाणी आणून अश खूप तर्‍हेने धन्यवाद व्यक्त करता येतील. प्रसंग काय यावर ठरेल. केलेल्या अमूल्य मदतीची जाण असणे पण न बोलता आपला आनंद / कृतज्ञता व्यक्त करणे शक्य आहे की. आणि ते नैसर्गिक असल्याने उत्स्फूर्त येते. शिकावे लागत नाही.

राहिला प्रश्न अनोळखी / लौकिक जगात वावरताना सभ्य भासण्याचा तर ते शिकवायला खूप अवधी मिळतो.
काय म्हणायचे, कसे म्हणायचे, न चुकता म्हणायचेच -- याऐवजी -- का म्हणायचे, एखाद्याच्या मदती बद्दल / आपण केलेल्या चुकी बद्दल आपली काय भावना असणे जरूरीचे आहे आणि ती तशी का असावी हे रूजवता आले तर सॉरी / थँक्यू उद्गार आपसूक आणि खरेखुरे, मनापासून येतील.

उद्गार रूजवले तर भावना येतील किंवा येणारही नाहीत. भावना रूजवली तर ती काय उद्गारायचे / काय कृती करायची ते सोबत आणतेच.

माझे अनुभव --
१. मी केळी घेत असताना, बाजूला चहाच्या टपरीवर चहा घेण्यापूर्वी पानाची चूळ भरणारा ईसम मी आहे हे बघूनही चूळ टाकतो. मी विचारात की काय बोलू... टपरीवाला सांगतो ताईंचे कपडे खराब झाले. तो चहाचा घोट घेऊन एक निर्विकार सॉरी माझ्या दिशेने फेकतो. घरी जाऊन कपडे बदलून पुढे जायला होणारा उशीर + त्याचा निर्विकारपणा याने संतापून मी बोलले तर --- ' हां, तो? सॉरी बोला ना? '

यात सॉरीची औपचारिकता आहे. स्वतःच्या चुकीची दिलगिरी जाणवणे आहे?

२. ट्रेनमध्ये मोबाईलमध्ये लक्ष (तिचे) असतानाच धपकन खाली बसलेली मुलगी. माझ्या मांडीला चिमटा बसला / कुर्ताही फाटला. तिला याची जाणीवच नाही. मी बोलल्यावर एक निर्विकार सॉरी आणि पुन्हा गेम सुरू. मी पुढेही २ वाक्य बोलले रागाने तर मैत्रिणीला म्हणते ' देख यार, मैने सॉरी बोला हां, फिर भी चढे जा रही है'.

शिक्षण पूर्ण करून, नोकरीला लागून, औपचारिक जगात वावरून, मॅनर्स शिकून, वापरून तिला मॅनर्सचा म तरी कळला का?
की मीच चुकले? तिला सॉरी "म्हणता" येते या आनंदात मी नो इश्यूज, डिअर म्हणायला पाहिजे होते?

तेव्हा, शब्द पोपटासारखे उच्चारायला लावणे आणि त्यामागचा कार्यकारणभाव / प्रयोजन / भावनांशी सांगड हे समजून घ्यायला मदत करणे ---- आणि ते समजण्याची कुवत / वय येईपर्यंत ---- केवळ, माझ्या मुलाला मॅनर्स येतात हे दुनियेला कळले पाहिजे या आग्रहातून (न कळता) बोलायची जबरदस्ती न करणे -------------- यापैकी काय सु़जाण पालक म्हणून योग्य आहे?

मुलं बोलायला लागली की त्यांना आई वडिलांना thanks for bringing me in to this world म्हणायला शिकवावे काय? याने त्यांना पुढे नेहमी थॅंक्स बोलायची सवय लागु शकेल.

उद्गार रूजवले तर भावना येतील किंवा येणारही नाहीत. भावना रूजवली तर ती काय उद्गारायचे / काय कृती करायची ते सोबत आणतेच. >> ताई, सॉरी म्हणून भावनाच रुजवायचा प्रयत्न चाललाय. फक्त आणि फक्त उद्गार रुजवतोय असा सोयिस्कर अर्थ का काढताय?
आणि अहो मिठी मारणे, हात हातात घेणे आणि धन्यावाद म्हणणे हे म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह आहे असं कोणी सांगितलं ?
पराचा कावळा करणं आणि आपल्याला सोयिस्कर तसा अर्थ काढणे चालू आहे तुमचं.

कारवी छान उदाहरणे.
वर मानव पृथ्वीकर यांनीही विमानप्रवासातील काही उदाहरणे दिलेली. थॅंक्यू आणि सॉरीचा उत्तम वापर करता येऊ शकणार्‍यांची. तेव्हाही मी हाच प्रश्न विचारलेला. अजून कोणी उत्तर दिले नाही. थॅंक्यू आणि सॉरी बोलता येणे वा बोलणे हे खरेच मॅनर्समध्ये मोजावे का? मुलांना शब्द नाही तर बिहेविअर शिकवा.

अर्थातच. बस मधून उतरताना कंडक्टर, ड्रायव्हरला धन्यवाद म्हणून उतरणे, आय कॉन्टॅक्ट शक्य नसेल तर रेअर व्हू मिरर मध्ये ड्रायव्हरला दिसेल असा हात वर करुन भावना पोहोचवणे हे ही आलेच. हे आता अमेरिअकन वाटेल कोणाला, पण जर ते चांगलं आहे तर नक्की करावं.
>>>
पहिली गोष्ट म्हणजे हे अमेरीकन कोणाला का वाटेल? या मतात पूर्वग्रह तर नाही?
दुसरी गोष्ट, याची आजीला थॅंक्यू बोलण्याशी तुलना कशी होऊ शकते हे अजून मला समजले नाही.

सॉरी म्हणून भावनाच रुजवायचा प्रयत्न चाललाय. फक्त आणि फक्त उद्गार रुजवतोय असा सोयिस्कर अर्थ का काढताय?
>>>>
जेव्हा पाहुण्यांनी आपली औपचारीकता पाळत दिलेल्या चॉकलेटबद्दल त्यांना थॅंक्यू बोलणे आणि आज्जीने मायेने खाऊ दिल्यावर तिला थॅंक्यू बोलणे हे एकाच स्केलवर आणले जाते तेव्हा अशी शंका येणे साहजिकच आहे ईतकेच. बरेच पालकांचा हेतू उत्तम असतो पण आपला मार्ग चुकत तर नाही ना हे देखील चेक करणे गरजेचे.

अमित आणि सोनाली,....
I am sorry.......... For you Wink
तुमचे आपापले view सांगून झाले ना? आता काय दुसरी पार्टी 'हो तुमचंच बरोबर' म्हणायची वाट पाहत आहेत का?
आता सगळ्यांना पार्टीसिपेट केल्या बद्दल थँक्यू म्हणा आणि आटपा

शिक्षण पूर्ण करून, नोकरीला लागून, औपचारिक जगात वावरून, मॅनर्स शिकून, वापरून तिला मॅनर्सचा म तरी कळला का?
की मीच चुकले? तिला सॉरी "म्हणता" येते या आनंदात मी नो इश्यूज, डिअर म्हणायला पाहिजे होते?>>>त्याही पुढे भांडणे जातात. सॉरी म्हणून माझ्यावर उपकार नाही करत....असे पुढे सुरुच राहते.

तर मैत्रिणीला म्हणते ' देख यार, मैने सॉरी बोला हां, फिर भी चढे जा रही है'.>>>हेच... तुझी चूक झाली तर तू माज करता कामा नये हे सुद्धा मुलांना शिकवावे लागेल ना.

जर तुम्हाला असे म्हणायचे असेल कि वाटत नसेल तर thank you , sorry म्हणूच नये तर मग वरच्या उदाहरणात जे सॉरी बोलले त्यांना तसे वाटलेच नव्हते याचा खेद दिसतो. त्यांना तसे वाटायला हवे होते म्हणूनच तर तुम्ही अजून दोन वाक्ये बोलून राग व्यक्त केला ना?

लहान मुलांना न सांगता भावना कश्या रुजवणार?
गरज जर भावनांची आहे तर आपण त्यांना असे सांगणार का कि आता तुला चॉकलेट दिले तर तू हास्य दाखव. त्यापेक्षा आपण हसत मुखाने त्याला थँक्यू बोलायला सांगितले तर त्याला कळेल ना कि त्या शब्दाशी या भावना जोडलेल्या आहेत.

आजी ला का thank you म्हणायचे, ती तर आपलीच आहे असेच आपण जवळच्या सगळ्यांना ग्रुहित धरत जाऊ.
पण मग जर नातू आजीला 'थँक्यू' म्हटला आणि तिला त्याचे कौतुक वाटून तिनेही 'कश्याला' असे बोलून स्वतःचे प्रेम व्यक्त केले तर बिघडले कुठे?
आणि ते आईने त्याला शिकविले तर त्यात काय वाईट? जबरदस्ती करु नयेच पण प्रयत्न करायला काय हरकत आहे.

आता सगळ्यांना पार्टीसिपेट केल्या बद्दल थँक्यू म्हणा आणि आटपा>> Lol

भावना आणि शब्दांचा खेळ Happy
काहींना भावना हव्यात शब्द नको.
काहींना शब्दच ठिक वाटतात जास्त भावनिक नको.
काहींना दोन्ही हवेत.

आणि अहो मिठी मारणे, हात हातात घेणे आणि धन्यावाद म्हणणे हे म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह आहे असं कोणी सांगितलं ? >> अमितचे हे पटलय. खर तर कारवीच्या उदाहरणावरून लोकांना ह्या सवयी नि त्यानुषंगाने आपले चुकलय तर मनापासून कस वागायला हवं हे कळण्यासाठी लहानपाणापासूनच का प्रयत्न करायला हवेत ह्याची नितांत गरज लक्षात येतेय.

I am sorry.......... For you >> हे एकदमच पटले. ऋन्मेऽऽष चे त्यांच्या पोस्टवरचे प्रतिसाद फक्त इथला काऊंट वाढवण्यापलीकडे काही वेगळ्या उद्देशाने टाकलेले नाहित असे मला वाटते. आणि हे म्हटल्याबद्दल मी अजिबात सॉरी वगैरे नाहिये.

तिला त्याचे कौतुक वाटून तिनेही 'कश्याला' असे बोलून स्वतःचे प्रेम व्यक्त केले तर बिघडले कुठे?
>>>>>

हे कधी झाले? Uhoh
मी पाहिलेली आजी तर ओशाळली.
त्या बिचारीला तर मॅनर्स नव्हते ते थॅन्क्स ग्रेसफुली एक्सेप्ट करायचे. Sad
ते पाहून बिचारा मुलगाही कावराबावरा झाला असेल आपले काही चुकले का म्हणून..
त्या मुलाच्या आईचा हेतू चांगला होता पण सिक्वेन्स चुकला मॅनर्स शिकवायचा. आधी आजीला मॅनर्स शिकवून तरबेज करायचे होते, मग आपल्या मुलाला तिला थॅन्क्स बोलायला लावायचे होते. खूप काळजी घ्यावी लागते मॅनर्स शिकवताना. एकदा का त्या मुलाच्या डोक्यात बसले की आपण थॅन्क्स बोलल्यावर समोरची व्यक्ती ओशाळते तर तो कधी आपल्या बापालाही थॅन्क्स बोलणार नाही Sad

ऋन्मेऽऽष हे वरचे पोस्ट सोनाली च्या पोस्टला प्रतिसाद म्हणून लिहून माझ्या तुझ्या पोस्टच्या अगोदरच्या पोस्ट मधील मुद्दा सिद्ध केल्याबद्दल मनापासून धन्यावाद रे बाबा Happy

हे कधी झाले? >> आता तुला समजण्यासाठी हे पुढे वाच. तू ह्या आजी नि नातवामधे 'मॅनर्स ची गरज काय असे म्हणतो आहेस त्याला उद्देशून ओनाली ने ते लिहिलय. आजीच्या प्रेमामूळे मुलांचे thanks अनाठायी वाटतेय ना, ठिक आहे. मग ते आजीने कशाला ? असे म्हणून व्यक्त केले असते तर मुलालाही कुठे थेट व्यक्त व्हायचे नि कुठे नाही हे कळले असते. हा त्या वाक्याचा अर्थ आहे. प्रत्यक्षात काय घडले ह्याबद्दल नसून 'आजजीला असे वागता आले असते' ह्या अर्थाचे ते कोट आहे.

तर तो कधी आपल्या बापालाही थॅन्क्स बोलणार नाही Sad>> बोलेल बोलेल. घरातल्यांनी नाही शिकविले तर बाहेरचे लोक नक्की मॅनर्स शिकवतील Happy

खुलासा केल्याबद्दल धन्यवाद असामी Happy

आता मी आटोपते घेते.
रु....गोल गोल बोलणे छान जमते तुम्हाला. (कौतुकाने Happy )

रु....गोल गोल बोलणे छान जमते तुम्हाला. (कौतुकाने Happy )
नवीन Submitted by sonalisl on 11 January, 2018 - 02:26
>>>>>
अहो याच कौशल्यावर (Unique Selling Point) तर तो इतके धागे आणि प्रतीसाद काढू शकतो. Rofl

Pages