आजकालच्या मुलांना मॅनर्सचा ओवरडोस पाजला जातोय का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 January, 2018 - 12:55

कालचा किस्सा - बसस्टॉपवर गर्लफ्रेंडची वाट बघत उभा होतो. शेजारी एक अख्खे मराठी कुटुंब उभे होते. बसची वाट बघत होते की शेजारच्या गार्डनमध्ये खेळून दमून नुसते विसाव्यासाठी तिथे थांबले होते कल्पना नाही. एक चार वर्षांचा मुलगा, त्याचे आई-बाबा आणि आज्जी होती. मुलगा बसस्टॉपभोवती नुसता पळत होता. मग दमला. तहान लागली. आईकडे पाणी मागितले. तसे त्याच्या आजीने तत्परतेने त्याला पाणी दिले. दमलेला मुलगा ती छोटीशी बाटली तोंडाला लावून घटाघटा पाणी प्यायला. बाटली आजीला परत करून पुन्हा मस्ती करायला पळणार तोच त्याची आई म्हणाली, "रोहू, आजीला थॅन्क्स म्हणालास का?" .... मी शॉकड् ! आज्जीला कसले थॅंन्क्स..??

आजी ओशाळली. रोहूने भाव खाल्ला. आई चिडली. आजी आणखी ओशाळली. रोहूला राहू दे म्हणाली. आई आज्जीला म्हणाली, "नाही हा आई, या वयातच सवयी लागायला हव्यात" रोहूच्या बाबांनी यावर नंदीसारखी मान हलवली. मग रोहू औपचारीकता दाखवत थॅंन्क्यू आज्जी बोलत पसार झाला.

चार दिवसांपूर्वीचा किस्सा - त्या दिवशी आम्ही बागेत बाकड्यावर बसून गप्पा मारत होतो. शेजारी दोन कुटुंबांची भेट झाली. म्हणजे दोन आया आणि त्यांची गार्डनमध्ये खेळायला आलेली मुले. वयोगट हाच. चार ते पाच. त्या आयांनी आधी मुलांना प्रथेप्रमाणे एकमेकांशी शेकहॅण्ड करायला लावले. त्यानंतर ती दोन्ही मुले अनुक्रमे जे वेफर्स आणि बिस्कीट खात होती ते त्यांना एकमेकांशी शेअर करायला सांगण्यात आले. बिस्कीट खाण्यार्‍या मुलाने लाडाने एक बिस्कीट समोरच्याला ऑफर केले. पण वेफर खाणार्‍या मुलाने ईच्छा असूनही ते घेतले नाही कारण त्याबदल्यात त्याला आपली वेफर्स शेअर करायची नव्हती. झाले, त्या वेफर्सवाल्या मुलाच्या आईला ईतके लाजिरवाणे वाटले की तिचे दुसर्‍या बाईला सॉरीही म्हणून झाले. आणि मग ती बाई दूर जाताच आपल्या मुलाला रागावूनही झाले. मुलगा आधी चिडला, मग रडला, आणि मग खेळायला निघून गेला. झाल्या घटनेनंतर त्या बाईला बहुतेक आमच्यासमोर थांबणेही लाजिरवाणे वाटले असावे, त्यामुळे ती सुद्धा दोन बाक सोडून दुसरीकडे बसायला गेली.

तर मुलांनी आपला खाऊ आणि खेळणी एकमेकांशी शेअर करावेत हे संस्कार चांगलेच आहेत. पण काही बाबतीत त्यांना ते जमेलच असे नसते. शेवटी लहान मुलेच ती, कुठे जीव अडकेल त्यांनाच माहीत. पण आपल्या मुलांना खाऊ शेअर करायचे साधे मॅनर्स नाहीत याचा एवढा प्रेस्टीज ईश्यू करायची खरंच गरज असते का?

माझी या दोन्ही किस्स्यांमध्ये तशी तक्रार नाही. कारण पॅरेंटींग हा एका मर्यादेपर्यंत ज्याचा त्याचा पर्सनल विषय आहे. आणि हे वरचे दोन्ही किस्से कदाचित त्या मर्यादेतच येत असावेत. त्यामुळे हे चूक आहे वा मुलांशी असे वागू नये वगैरे मला सांगायचे नाहीये, माझा तो अधिकारही नसावा. फक्त मला पर्सनली हे फारसे पटत नाही ईतकेच. ईतरांची मते जाणून घ्यायला आवडतील. अनुभवाचे बोल, पुढे भविष्यात कामाला येतील Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झाल्या घटनेनंतर त्या बाईला बहुतेक आमच्यासमोर थांबणेही लाजिरवाणे वाटले असावे, त्यामुळे ती सुद्धा दोन बाक सोडून दुसरीकडे बसायला गेली.>>>लाजिरवाणे वाटले नसेल तर तुमचे त्यांच्याकडे बघत बसणे आवडले नसेल

रोहूच्या बाबांनी यावर नंदीसारखी मान हलवली.>>> त्यांना बैलाची उपमा देणे कितपत योग्य आहे? याबद्द्ल काही मॅनर्स असावेत का?

आपल्या माणसांना धन्यवाद का नाही द्यायचे पण?
>>
नाही द्यायचे असे कोण म्हणतेय? धन्यवाद देण्याचा आग्रह का असा प्रश्न आहे !

आणि धन्यवाद म्हणण्याने माणूस परका होते हे काही नवीनच!
>>
साला दोस्त को थॅण्क्यू बोलता है ....... थ्री ईडियटस Happy
म्हटलं तर फिल्मी, म्हटलं तर यामागे तेच लॉजिक आहे.
अर्थात हे लॉजिक समजून घेण्यास एक ठराविक इमोशनल कोशंट गरजेचा आहे. तो ज्यांच्याकडे नाही ते काही वाईट झाले असे नाही, पण मग हा वाद चालतच राहणार ईतकेच Happy

मी पोराच्या शाळेत आठवड्यात एक दिवस मदत करायला जातो तर त्याच्या टीचरने मला हॉलिडेज मध्ये एक स्टार बक्सचं गिफ्ट कार्ड विथ थँक्यू नोट पाठवलं. मला भारी मस्त वाटलं.
>>>>>>>
शाळेतल्या टीचरने तुम्हाला धन्यवाद म्हटले याचे तुम्हाला काय मलाही मस्तच वाटले असते. पण याची तुलना नातवाने आजीला छोट्या छोट्या गोष्टींवरून आई सांगते म्हणून औपचारीक धन्यवाद बोलण्याशी होऊ शकते हे अजूनही पटत नाहीये.

आजची भारतीय संस्कृती काहीतरी वेगळीच दिसते आहे. असो.
>>>>
ईथे मी परत थोडा कन्फ्यूज झालोय.
आजीआजोबांना थॅंक्यू बोलणे ही भारतीत संस्कृती आहे की परकीय? हे आधी फायनल करूया.

तुम्ही काय देता हे महत्त्वाचं नाही काय भावनेने देता ते सगळ्यात महत्त्वाचं हे आमच्या हिंदू संस्कृतीत सांगितलं आहेच. आमच्या हिंदू संस्कृतीत जमिनीवर पाय ठेवतो तर तिला ही सॉरी म्हणायला आम्हाला शिकवलं आहे.
>>>>>
आपल्यामते हिंदू संस्कृती = भारतीय संस्कृती का?
असो, तो एक वेगळाच विषय झाला. पण यात संस्कृती आणायची मुळातच गरज नाही. जगातल्या कुठल्याही प्रदेशातल्या कुठल्याही धर्मातल्या मुलाचे आपल्या आईवर एकसारखेच प्रेम असते. आणि जगातल्या कुठल्याही प्रदेशातल्या कुठल्याही धर्मात आपल्या उपकारकर्त्याबद्दल कृतज्ञताच व्यक्त केली जाते. त्यामुळे हा विषय ईकडचे आणि तिकडचे असे न करता डिस्कस नाही का करता येणार? तसेही मी कधी वसईच्या पुढे गेलो नसल्याने मला ईतर जगात काय चालते याची कल्पना नाही. मुंबईतच सारे जात-प्रांत-धर्म दिसतात आणि मला दिसलेले कुटुंब मराठी नसून ईतर कुठलेही असते तरी माझ्या मनात हाच विचार आला असता.

पण बस स्टॉप वर एकदा आजीला थँक्यू म्हणायला लावले म्हणून आपण अस्वस्थ का व्हायचं?
>>>>>
आजींची अस्वस्थता बघून
क्या करे, अपना दिल ही कुछ ऐसा है. मला कुठल्याही आजीत माझीच आजी दिसते.

>>>>> वर अमित म्हणाला तसे ते आजीला पण मॅनर्स शिकवणे होते, ग्रेसफुली थँक्यू ऍक्सेप्ट करण्याचे.
>>>>>
बिचारी आजी Sad

असो, मला वाटते, वृद्धाश्रमात जाऊन तिथे मनाविरुद्ध आणून सोडलेल्या वृद्धांनाही एक मॅनर्सचे लेक्चर द्यावे. आणि सांगावे, जर तुम्ही तुमच्या मुलांना आईवडिलांना थॅंक्यू बोलायची सवय लावली असती तर त्यांनी आज तुम्हाला असे वार्‍यावर सोडले नसते. बोल्ल्या थॅंक्यूला जागले असते.
पण मला कधी कधी प्रश्नच पडतो की आपल्या या थोर भारतीय आणि हिंदू संस्कृतीत म्हातारे आईबाप वार्‍यावर सोडले जातातच कसे?
खरेच, भारतीय संस्कृती काहीतरी वेगळीच दिसते आहे. असो.

रोहूच्या बाबांनी यावर नंदीसारखी मान हलवली.>>> त्यांना बैलाची उपमा देणे कितपत योग्य आहे? याबद्द्ल काही मॅनर्स असावेत का?
>>>>
बैल काही वाईट नसतात हो, शेतकर्‍याला विचारा एका बैलाची किंमत.
किंमत म्हणजे पैश्यातील नाही हा... तर मोल !
किंबहुना भारतीय कृषीप्रधान संस्कृतीत बैलाचे महत्व कोणाला सांगायला लागूच नये.
कोणाला बैलाची उपमा देणे आणखी कोणाला खटकूच कसे शकते हे मी समजूच शकत नाही..
असो, यावर वेगळा धागा नक्की काढेन, ईथे अवांतर नको Happy

असो, यावर वेगळा धागा नक्की काढेन, ईथे अवांतर नको Happy>>प्लिज नको.

बैल काही वाईट नसतात हो, शेतकर्‍याला विचारा एका बैलाची किंमत.
किंमत म्हणजे पैश्यातील नाही हा... तर मोल !>>>> अच्छा तर तुम्ही रोहूच्या बाबांचे कौतुक करत होता का? नंदीची उपमा नेहमी कौतुक करण्यासाठी वापरतात माहित नव्हते मला.

आता वृद्धाश्रम वाईट स्टेशन लागले म्हणजे गाडी इप्सित गंतव्य स्थळी जोरदार निघाली आहे. Lol
हिंदू संस्कृतीत म्हातारे आईबाप वार्‍यावर सोडले जातातच कसे? >> हिंदू परंपरेप्रमाणे वय झाल्यावर वृद्धांनी स्वतःहून वानप्रस्थ स्वीकारला पाहिजे, जो आजकालचे वृद्ध घेत नाहीत. मग हे प्रश्न उद्भवणारच.
आणि वृद्धांना मॅनर येत नसतील तर त्यांना का नाही शिक्षण द्यायचं?
डीग्नीटीने कसं जगलं पाहिजे, कर्कश्य कसं बनलं नाही पाहिजे याचे शिक्षण वृद्धांना अवश्य द्यावे.
बाकी आमच्या भारतीय संस्कृतीत कुणीही गुरु असू शकतो, आणि शिक्षण कुठल्याही वयात देतात. वय वाढलं तरी शिक्षण संपत नाही.
आणि मॅनर्स मध्ये जर आणि तर नसतात. ते मनातून यायला लागतात. पण ते आले नाहीत तर कमीतकमी तोंड देखलं तरी म्हणा.

मुळात दिसली जाडी बाई कि तिला म्हैस म्हणणे, कोणाचा चेहरा नाही आवडला तर त्या/तिला माकड म्हणणे, एकदम गोर्‍या बाईला पांढरी पाल म्हणणे, कुचकट बाईला चिचुंद्री म्हणणे असे कौतुक नाही आवडत मला.
कुत्रा हा इमानदार प्राणी आहे म्हणून कोणी कोणालाही तू कुत्रा/कुत्री आहेस असे कौतुकाने म्हटलेले नाही पाहिले.

पण मला कधी कधी प्रश्नच पडतो की आपल्या या थोर भारतीय आणि हिंदू संस्कृतीत म्हातारे आईबाप वार्‍यावर सोडले जातातच कसे?
>>> नंदीबैलासारखी मान डोलावणारे काय विरोध करणार . फकत सुरात सूर मिसळणार.
धागा नक्कीच काढा...रुन्मेषभाऊ

>> हिंदू परंपरेप्रमाणे वय झाल्यावर वृद्धांनी स्वतःहून वानप्रस्थ स्वीकारला पाहिजे, जो आजकालचे वृद्ध घेत नाहीत. मग हे प्रश्न उद्भवणारच.
Happy सहमत.

पुढील काही काळात येणाऱ्या नवीन धाग्यांचे भरपूर स्फोटक मटेरियल या धाग्यात जमा झाले आहे. त्यासाठी ऋ नक्कीच ऋणी राहील. Lol

अमित
हिंदू परंपरेप्रमाणे वय झाल्यावर वृद्धांनी स्वतःहून वानप्रस्थ स्वीकारला पाहिजे, जो आजकालचे वृद्ध घेत नाहीत. >>>>
अगदी हेच उत्तर माझ्या पण डोक्यात आलेले Happy

सोनाली,
>>>>>कुत्रा हा इमानदार प्राणी आहे म्हणून कोणी कोणालाही तू कुत्रा/कुत्री आहेस >>> खल्लास Lol

क्या करे, अपना दिल ही कुछ ऐसा है. मला कुठल्याही आजीत माझीच आजी दिसते.>>>>>>>
आजी आजोबांनि आजच्या काळाचे मॅनर्स आत्मसात करणे ही काळाची गरज आहे,
नाहीतर काही वृद्ध/प्रौढ पूर्वी चाळीच्या चौकामध्ये कचरा भिरकवलेला चालायचा, किंवा व्हरांड्यात बसून दातून करायचो म्हणून आता चाळीमधून टॉवर मध्ये आले तरी तसेच वागत राहिले तर चालेल का?

शेवटी मॅनर्स म्हणजे काय? वावरायचे, वापराचे नियम.
अगदी मायबोली जरी घेतलीस तरी गेल्या 5 वर्षात हे नियम बदलले की नाही? लिखित स्वरूपात नसतील बदलले कदाचित, पण काय लिहिलेले चालते, काय नाही हे बदलले आहेच,
अशा वेळी या फोरम मध्ये टिकून राहण्यासाठी एखाद्या जुन्या id ला काही गोष्टी सुचवल्या तर लगेच इतके मनाला लावून घ्यायला नको.

घराघरातल्या शिष्टाचार आणि संस्कारांच्या कल्पना वेगवेगळ्या असू शकतात. उदा. काही घरांमध्ये मोठ्या माणसांना भेटल्याभेटल्या पाया पडून नमस्कार करण्याची पद्धत असते. आता ज्या घरांमध्ये अशी पद्धत नाही, त्यातल्या माणसांना मोठ्या माणसांबद्दल आदर नसतो असं नाही Happy
भारतीय/ पौर्वात्य देश आणि अमेरिका/ पाश्र्चात्य देश यांच्या शिष्टाचारांच्या कल्पना वेगवेगळ्या असणारच!

संस्कार असे शिकवून करता येतात की आपोआप होतात? कदाचित दोन्ही! पण नकळत झालेले संस्कार जास्त खोलवर जातात असं माझं मत.
बाकी आजी-आजोबांना मॅनर्स शिकवणं जरा जास्तच आहे बरं का! शिव्या देणं ( संदर्भ : नटसम्राट) यासारख्या गंभीर गोष्टीसुद्धा जिथे सापेक्ष असतात, तिथे थॅन्क्स आणि सॉरी तर किस झाड की पत्ती! आजी आजोबांचे मॅनर्स आपल्या सहनशक्तीच्या पलीकडे असतील ( किंवा आपले त्यांच्या) तर विभक्त कुटुंब झिंदाबाद.

आजी आजोबांचे मॅनर्स आपल्या सहनशक्तीच्या पलीकडे असतील ( किंवा आपले त्यांच्या) तर विभक्त कुटुंब झिंदाबाद.>>>>>
म्हणजे एकतर मी गोष्टी "सहन" करीत ,भले त्यांचा मला ताण येत असेल तरी, किंवा वेगळे राहायला लागेल (यात either त्यांना वृद्धाश्रमात पाठवा, or स्वतः रिलोकेट व्हा हे पर्याय)
पण त्यांच्याशी बोलून त्यांना किंवा मला काचणारे वर्तन बदलायचा प्रयत्न करणार नाही , हे म्हणणे काही मला कळले नाही

पण त्यांच्याशी बोलून त्यांना किंवा मला काचणारे वर्तन बदलायचा प्रयत्न करणार नाही >> प्रयत्न जरूर करावे, पण साठ-सत्तराव्या वर्षी त्यांनी त्यांना बरोबर वाटणार्या सवयी नाही बदलल्या, तर इरेस पेटू नये, एवढंच मला म्हणायचं आहे Happy

अहो पण इरेस कोण पेटतय,
लहान मुलांना कोणतीही गोष्ट शिकवताना थोडे पुशी व्हावेच लागते, ते शिकवायची प्रोसेस चालू असताना ज्येना नि "असू दे गं, " " त्यात काय एवढं" " मी नाही तर कुणी करायचं" वगैरे बोलून प्रोसेस डिरेल करू नये,
थँक्यू म्हटल्यास " you are welcome" म्हणावे इतकिच अपेक्षा ठेवतोय Happy

कुत्रा हा इमानदार प्राणी आहे म्हणून कोणी कोणालाही तू कुत्रा/कुत्री आहेस असे कौतुकाने म्हटलेले नाही पाहिले.
>>>>

कारण समोरचा ते ग्रेसफुली स्विकारेल याची खात्री नसते. काय करणार, आपण मनुष्यप्राणी आहोत हा अहंकार जन्मजात आपल्या नसानसात भिनला आहे ना.
पण प्रत्यक्षात जोपर्यंत हे अहंकार तुम्हाला दूर ठेवता येत नाहीत तोपर्यंत तुमचे थॅन्क्यू सॉरी हे मॅनर्स बिग झिरो आहेत.

@ वानप्रस्थ - हे काय असते नेमके कोणी सांगेल का?

सिम्बा+100
>>जोपर्यंत हे अहंकार तुम्हाला दूर ठेवता येत नाहीत तोपर्यंत तुमचे थॅन्क्यू सॉरी हे मॅनर्स बिग झिरो आहेत.>> अब आया उट पाहड के नीचे. Lol लॉजिकल आर्ग्युमेंट जमत असेल तर करा. उगा सेंटी मारायचं असेल तर राहुद्या.

थँक्यू म्हटल्यास " you are welcome" म्हणावे इतकिच अपेक्षा ठेवतोय
>>>

हि अपेक्षा नंतर आली. आधी ते थॅन्क्यू बोलणे उचित आहे की नाही हे ठरले पाहिजे ना.
त्या आजींनी शेजारच्या पिंकीला चॉकलेट दिल्यावर जेव्हा ती थॅन्क्यू बोलत असेल तेव्हा त्या यूह आर वेलकम बोलत असतील..

या लेखात खूप जजिंग चाललं आहे असं वाटलं.
५ मिनीट बघून आईने मुलाला कसं वागवलं, आजी ओशाळली अशी कन्क्ल्युजन काढता येतात का?
त्याच्या आधीचा कंटेक्स्ट आपल्याला माहित आहे का?
यावरुन एक उदाहरण आठवले. मुलीला हाताला धरुन घेऊन रिकाम्या, चालायला सेफ फुटपाथ वरुन चालले होते.कॅब बुक केली होती.ड्रायव्हर ला पत्ता समजत नव्हता तो फोन वर समजवून सांगत होते. मुलगी त्याच वेळी हात ओढून एक कुत्र्याचं पिल्लू, किंवा बोर्ड किंवा दुकानातले कपडे अशी ५ मिनीटाने पाहिली तरी पळून जाणार नाही अशी गोष्ट दाखवत होती.मी ते तात्पुरते इग्नोर मारुन ड्रायव्हर ला सोसायटी चे योग्य नाव, खुणा सांगायचा प्रयत्न करत होते.सोसायटीतले एक आजोबा तरातरा चालत आले आणि रागात 'पहले बच्चे का तो सुन लो! क्या फोन फोन' म्हणून झापून गेले Happy
मी बघतच बसले.कटकट्या,बुकिंग रोजच्या १० ट्रिप होणार नाही म्हणून कॅन्सल करणार्‍या, एक पत्ता चुकला तर ३ किलोमीटर चा यु टर्न मारावा लागेल अश्या रस्त्यावर ४० किमी वेगाने कार चालवणार्‍या ड्रायव्हर ला योग्य पत्ता आणी तोही अर्जंट (तो वळण्यापूर्वी) सांगणे किती महत्वाचे असते हे आबांना कसे पटवणार?

कुत्रा हा इमानदार प्राणी आहे म्हणून कोणी कोणालाही तू कुत्रा/कुत्री आहेस असे कौतुकाने म्हटलेले नाही पाहिले. >>> + १

तसेच गाढव हा खुप कष्ट करणारा प्राणी आहे म्हणून कोणी कोणालाही तू गाढव आहेस असे कौतुकाने म्हटलेले नाही पाहिले

लॉजिकल आर्ग्युमेंट जमत असेल तर करा. उगा सेंटी मारायचं असेल तर राहुद्या.>>>
हल्ली ऋन्मेष काहीतरी बोललेच पाहिजे , आपला मुद्दा रेटलाच पाहिजे म्हणून लिहितो....
त्याची पूर्वीची उत्स्फूर्तता आणि स्वतः वर जोक करायची वृत्ती हरवत चालली आहे.....असो...

लेखात खूप जजिंग चाललं आहे असं वाटलं.
५ मिनीट बघून आईने मुलाला कसं वागवलं, आजी ओशाळली अशी कन्क्ल्युजन काढता येतात का?>>>>>>

अनु +1
मी या अर्थाच्या 3 4 लाईन लिहून खोडल्या,
मागे पण मेडिकल शॉप मधल्या प्रसंगावर असेच झाले होते.

दुसरा त्याच्या आयुष्यात काय करतो हे तो आपल्या समोर असणाऱ्या 10 मिनिटाच्या इन्ट्रॅकशन वरून ठरवणे म्हणजे ,दाराच्या पीपहोल मधून पाहून सिनेमा शूटिंग ची फ्रेम ठरावण्यासारखे वाटते.

कुत्रा हा इमानदार प्राणी आहे म्हणून कोणी कोणालाही तू कुत्रा/कुत्री आहेस असे कौतुकाने म्हटलेले नाही पाहिले. >>> Lol Lol

ज्येना नि "असू दे गं, " " त्यात काय एवढं" " मी नाही तर कुणी करायचं" वगैरे बोलून प्रोसेस डिरेल करू नये,
थँक्यू म्हटल्यास " you are welcome" म्हणावे इतकिच अपेक्षा ठेवतोय>> अपेक्षा छोट्या असो वा मोठ्या, पूर्ण झाल्या नाहीत की खरा प्रश्न येतो. Happy
दुसरं म्हणजे आपल्याला नक्की काय हवं आहे? सॉरी/ थॅन्क्स म्हणणं की कृतज्ञ / दिलगीर राहणं? आजी आजोबा सॉरी/ थॅन्क्स / वेलकम म्हणत नसतील, पण कृतज्ञ/ दिलगीर रहात असतील तर?

लॉजिकल आर्ग्युमेंट जमत असेल तर करा.
>>>
तो नंदीवरून सुरू झालेला माणसाला कुत्रा बोलायचा विषय होता. त्यात या विषयाचे लॉजिक शोधायला जाऊ नका.
मात्र त्यातील अहंकाराचा मुद्दा ईथे लागू होतो. मुलांना थॅन्क्यू सॉरी असे आजी आजोबांना आणि दूरच्या कुठल्यातरी चॉकलेट देणारया काकांना असे सेम लेवलवर येत बोलायला शिकवण्याऐवजी त्यांना त्यामागची नम्रपणाची भावना शिकवा. अर्थात आधी ती आपल्या अंगात असली पाहिजे. अन्यथा ज्या मुलांना लहानपणी उठसूठ प्रत्येकाला थॅन्क्यू सॉरी बोलायला शिकवले जाते ती पुढे नम्र होतात हा भ्रम आहे.

मॉरल ऑफ द स्टोरी ! जशी ती पुस्तकी शिक्षणपद्धती असते तसे हे पुस्तकी मॅनर्स शिकवणे झाले. थोडं या मेथडच्या बाहेर येऊन विचार करा Happy

>>>> मुलांना लहानपणी उठसूठ प्रत्येकाला थॅन्क्यू सॉरी बोलायला शिकवले जाते ती पुढे नम्र होतात हा भ्रम आहे.>>>

माझाच जुना प्रतिसाद परत लिहितो आहे
>>>>>>
Sorry आणि thank you चा अर्थ असणारे शब्द मराठीत नाहीत,
कृतज्ञा किंवा किंचीत अपराधी असण्याची भावना आपण मोठा शब्द समुच्चय , टोन मधील बदल किंवा हावभावातून दाखवतो.
आजच्या काळात, जिथे शब्द संपत्ती आणि बोलायला वेळ दोन्ही खूप मर्यादित झाले आहेत तिकडे या दोन्ही भावना व्यक्त करायचा सॉरी किंवा थँक्यू म्हणणे एक अतिशय सोपा मार्ग आहे आणि तो जोपासायला पाहिजे.>>>>>

मुलांना या 2 शब्दांचा वापर लहानपणापासून शिकवलं नाही तर पुढे ते शिकणे फार कठीण जाईल,

असो...तू मोरल ऑफ द स्टोरी लिहून टाकल्यामुळे यापुढे लिहिणे व्यर्थ आहे.

Sorry आणि thank you चा अर्थ असणारे शब्द मराठीत नाहीत
>>>>
क्षमस्व, माफी असावी, दिलगीर आहे.
धन्यवाद, आभारी आहे
हे शब्द मराठी नाहीत की समानार्थी नाहीत.
माझे मराठी कच्चे आहे.
..

मुलांना या 2 शब्दांचा वापर लहानपणापासून शिकवलं नाही तर पुढे ते शिकणे फार कठीण जाईल,
>>>>>>
काय कठीण जाईल?
हे जरा विस्तार कराल का?
याबद्दल बरेच जणांचे बरेच गैरसमज दिसून येत आहेत.
आणि बहुतेक या गैरसमजातूनच हा ओवरडोस मुलांना पाजला जात आहे.

..

असो...तू मोरल ऑफ द स्टोरी लिहून टाकल्यामुळे यापुढे लिहिणे व्यर्थ आहे.
>>>>>
मला देवाचा दर्जा देऊ नका. माझा शब्द अंतिम ठरवू नका Happy

Pages